#औरंगाचे_बेरंग ( भाग-१)
१) मुघल औरंगजेब हा अतिशय हरामखोर व नीच दानतीचा क्रूर रानटी शासक होता.
याचा दाखला देताना, त्याकाळचा 'बर्नियर नावाचा एक प्रवाशी सांगतो- मुघल राज्यात कोणी सरदार, उमराव कर्तव्यावर गेले की, औरंगजेब त्यांची सगळी मालमत्ता सोने-चांदी आदी माया जप्त करत असे.
२) मुख्य याच कारणाने मोघली सरदार- उमराव, अज्जिबात तणाव घेत नव्हते, फार दिलखुलास राहायचे, चैन करायचे, तऱ्हेतऱ्हेचे शौक- नाटकशाळा, रंगशाळा आदीमध्ये दौलत फुकुन यायचे.
त्याना माहीत होतं मतलबी बादशहा, आपण खपल्यानंतर आपल्या कुटूंबाला चुकुन -ढुंकून- थुंकूनही बघणार नाही.
३) बादशहा त्यांची मालमत्ता जप्त करताना त्यांचे घरदार सुद्धा जप्त करायला मागेपुढे बघत नसत. मर्जी झालीच तर पुढे त्या सरदाराच्या कार्ट्याना बक्षीसी वैगरे देत सरदारी बहाल करी.
ह्या सगळया भिकार भानगडीचा विचित्र परिणाम मोघल प्रजेवर, राज्यावर, आर्थिक परिस्थिती अन व्यवस्थेवर झाला.
४) सरदारपद म्हटले की भरपूर पैसा, पण आपण गेल्यावर, सर्वसंपत्ती बादशहा जप्त करेल या भितीने मोघली सरदार 'भिकार बांबू अन हातात चंबू' ह्या मनोस्थितित वावरू लागले.
कोणी बगलबच्चा चलन बाळगत नसल्याने राष्ट्राच्या भांडवलावर वाईट परीणाम झाला. व बादशहा सोडता सगळे राज्य दळभद्री झाले.
६) कोणतंही राष्ट्र भांडवल्याच्या बळावर आर्थिक यशाचा झेंडा फडकवते. मात्र मुघलशाहच्या महामतलबी- योजनाचे नको ते वाईट परिणाम मोघल राज्यात झाले.
बाकी राजकीय घडामोडीमुळे औरंगजेब हाल सोसत जहन्नमला रवाना झाला अन त्याच्या मागेच त्याची प्रजा कंगाल होऊन जिवंतपणी जहन्नमला प्यारी झाली.
७) ह्या अशा उलट्या काळजाच्या स्वार्थी मनोवृत्तीमुळेच औरंगजेब आशिया खंडातील सर्वात मोठा राज्यकर्ता असला तरी, तो त्याकाळी आणि आताही सन्मानाला अज्जिबात पात्र नाही.
त्या उलट आशिया खंडातील छोट्या राज्यापैकी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला आजही लोक आदराने बघतात.
८) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील मुजोर- माजोरड्या सामंत, देशमुख, पाटील आदी वतनदार जहागीरदार कंपूचे राजेशाही वाडे पाडले व त्याना जनतेप्रमाणे राहण्याचे कडक आदेश दिले. असे जरी असले तरी राजांनी हा निवाडा नेहमी जनतेचं शोषण करणाऱ्याच्या विरोधात दिला होता.
९) यामागे छत्रपतींचा राजा म्हणून रयतेप्रति पालक या नात्याने असलेला करुणाभाव होता.
मोहिमेवर धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या कुटूंबाला महाराजांनी नंतर तितक्याच मायेने वागवलं. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चिरंजीवाचे लग्न मोठ्या थाटाने लावून दिलं व नंतर त्याची काळजी घेतली.
१०) हे आपण लहानपणीपासून जाणून आहोत. असे अनेक सरदार आहेत ज्यांच्या पाठीमागे महाराजांनी त्यांच्या कुटूंबाची फार ममतेने विचारपूस केली, आर्थिक व मानसिक बळ दिल.
फरक हाच-
नुसतं राज्याच्या सीमा लांबवर खेटवत जाणे, आणि लूटमार करून तिजोरी भरणे यापलीकडे मोघल दरबारने काही काम केलं नाही.
११) अगदी नंतरही, १८ व्या शतकात
छत्रपतीच्या श्रद्धेचा उमाळा आणून गादीला महादेवाची पिंड बनवून स्वतः नंदीबैलासारखा कारभार रेटणारे साम्राज्यवादी पेशव्यांनाही सरदारांच्या पश्चात त्यांच्या मालमत्ता काबीज करण्याचे कृत्य ऐकिवात नाही.
शेवटी औरंगजेबाने नीच माणसाला लाजवेल अशी काम केली.
अधिक माहितीसाठी संदर्भ-
१) छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
२ ) शिवाजी कोण होता- गोविंद पानसरे,
३) महाराष्ट्राचा इतिहास कालखंड ( भाग -१)
शिवकाल (१६३०- १७०७)- डॉ वि.गो खोबरेकर
#Thread - महाराष्ट्राचा पहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव -
"श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव"
( दादर-मुंबई- महाराष्ट्र राज्य )
हा उत्सव कुणी सुरू केला, त्यामागचा सद्हेतू काय होता. मराठी मातीचा गौरव वाढवणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबद्दल माहिती देणारा हा लेख संपूर्ण वाचा. ( १३/१)
1920 च्या दशकातील घटना-
दादर ला सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होण्यास बहुजन बांधवाना बंदी होती, यातून पूज्य डॉ आंबेडकर, रा. बोले व प्रबोधनकार ठाकरे यांनी आंदोलन उभा करत तो डाव हणून पाडला, यापुढे उत्सवात दलित नको ह्या कुयोजनेने ब्राह्मणांनी गणेशोत्सव बंद पाडला. ( १३/२)
मात्र प्रबोधनकार ठाकरेना मनोमन वाटायचे असा कुठला तरी उत्सव असावा ज्यात स्पृश्य-अस्पृश्य आदी मंडळी आनंदाने सहभागी व्हावे व महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत व्हावा. याच पुण्यहेतू कारणे राव बहादूर बोले यांच्या बंगल्यावर अनेक पुरोगामी मंडळींची नियोजनबद्ध बैठक झाली व ठरले.. (१३/३)
आज महाराष्ट्राचे लाडके, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती. या निमित्ताने त्यांच्या महालोकप्रिय अशा देवळाचा धर्म धर्माची देवळे या पुस्तकातली काही मुख्य ओळी थ्रेडमार्फत आपल्या वाचनास देत आहे. नक्की वाचा..👍 आणि त्यावर विवेकबुद्धीने चिंतन करा. #लोकप्रबोधनदिन 🔥
१) देवळें म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाहीं आणि भटाशिवाय देऊळ नाहीं.
३) देशांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला, तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही
४) गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही
हा भटांचा ‘सनातन धर्म’ त्यांनी आजर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे
#वाचकांचे_पार्लमेंट भाग -२
जळगांव मधील बातमीदार साप्ताहिकात वाचकांचे पार्लमेंट या सदरात वाचक विविध प्रश्न विचारायचे, अन प्रबोधनकार त्याना मार्मिक, तिखट, विनोदी, शैलीत उत्तर द्यायचे त्यालाच आपण ठाकरी स्टाईल म्हणतो.!
अशीच काही प्रश्नोत्तरे खाली दिले आहेत वाचा. 👇
भाजपचे नेते- जे लोकशाहीत अधिकृतपणे कुठल्याही शासकीय प्रशासनात सहभागी नाही.
ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, अन शासकीय यंत्रणा लगेच कारवाई करतात..! याचा अर्थ जनतेने नक्की काय घ्यायचा ?
ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षातील पक्षातील नेते पदाधिकारी यंत्रणेत हस्तक्षेप कसा काय करू शकतात ? अन त्यांनी दिलेले पुरावे व तत्सम बाबींवर तातडीने होकारार्थी निर्णय घेऊन, सरकारी यंत्रणेतील लोक संबंधीत विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी मोठ्या वेगाने करतात, आणि थेट अटक करतात..!
नीट पाहिलं तर त्या राजकीय पक्षांनी केलेले आरोप हे फारसे मोठ्या स्वरूपाचे नसूनही, त्या यंत्रणा केवळ हुकमावरून असा हावभाव दाखवतात जणू काय त्यांनी भारत सरकारची तिजोरी फोडलीय. मला वाटत अशा आकसभावनेतून केलेल्या कारवाया समाजात, अन त्या विरोधी पक्षात एक विक्षिप्त मत तयार करत आहेत..!
देशात अनेक पुढारी होऊन गेले प्रत्येक जण लोकप्रिय होता, सर्वाना जनतेनं भरभरून प्रेम दिल, मात्र त्यात मला राष्ट्रपिता गांधी बापूचं व्यक्तिमत्त्व हे अधिक तेजस्वी आणि अद्वितीय दिसतं. त्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी मुख्य कारणे.👇
स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व गांधी बापु आधी बऱ्याच जणांनी केलं होतं, मात्र त्या सर्वांना गांधीजी इतका प्रतिसाद आणि प्रेम मिळाला नाही, फक्त गांधीजीना का लोकांनी डोक्यावर घेतले याचा कुणी मनन केलंय का ? ते मला ठाऊक नाही. पण मला जे वेगळेपण आढळलं ते थोडक्यात आपल्यापुढे स्पष्ट करतो..!!
कुठल्याही राष्ट्राला पारतंत्र्याच्या अभेद्य पोलादी साखळदंडातुन मुक्त करावयाचे झाल्यास नेमकं काय करायचं ? सशस्त्र उठाव, की आक्रमक आंदोलन, ? की शांततापूर्ण आंदोलन ?
ह्यामध्ये गांधींनी निवडलेला पर्याय आपल्याला ज्ञात आहेच. यामागे जी आंदोलने झाली ती हिंसक आणि नुकसानकारक होती.