१३ वर्ष वयाचा माझा मावसभाऊ गेले तीन आठवडे हॅास्पिटलला आहे. मी दोन दिवस प्रवासात होते. जाण्यापूर्वी त्याला भेटून आले होते. आज संध्याकाळी परत त्याला भेटायला जायचं होतं. पाऊस, झाडं पडणं, पाणी साचणं, ट्रॅफिकच्या रांगा अशा परिस्थितीत जायला मिळेल का शंका होती.
१/५
पण पाऊस उघडला तसे बाहेर पडलो. वारजे ते कर्वे रोडवर गरवारे कॅालेजपर्यंत एक तासापेक्षा जास्त वेळ अडकलो. या गतीने लक्ष्मी रोडवर हॅास्पिटलला पोहोचायला आणखी किमान एक तास लागला असता. म्हणून कर्वे रोडवर जागा मिळाली तिथे कार पार्क केली आणि पुढे चालत जाऊन त्याला भेटून आलो.
२/५
नंतर कळलं मर्सिडिज बेंझचे सीईओ पण आज असेच अडकले आणि त्यांनाही चालत, रिक्षा करत प्रवास पूर्ण करावा लागला.
एवढ्या मोठ्या माणसात आणि आपल्यात काही साम्य असावं अशी अपेक्षा नाही पण असेल तर ते असं तरी असू नये असं वाटलं.
आमच्या पलिकडेच एका गाडीत अभिनेते प्रवीण तरडे होते.
३/५
शिवसेनेचे आदित्य ठाकरेही आज पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं सोशल मिडियावरुन कळलं.
अर्ध्या तासाच्या पावसानं उडणारी दाणादाण हे नवं आणि स्मार्ट पुणे आहे…
हा असा स्मार्टनेस काही भूषणावह नाही.
माझा एक मित्र म्हणतो, ज्याची लाज वाटायला हवी त्याचा अभिमान वाटून
४/५
घेण्याचे दिवस आहेत सध्या. त्याच्या त्या वाक्याची आठवण आली आज.
नदाल आणि फेडररला हुंदके अनावर झालेला एक व्हिडिओ बघूनच आजचा दिवस सुरु झाला…
पुरुष असेल तर त्यानं रडायचं नाही… डोळ्यातलं पाणी पुरुषांना शोभत नाही… पुरुषानं नेहमी कणखर आणि खंबीरच असायला हवं असे काही तरी बावळट समज आपण आपल्याकडे करुन घेतले आहेत.
१/७
मुल (मुलगा) जेमतेम बोलायला चालायला लागला की ‘रडतोस काय मुलींसारखा?!’ हेच त्याला ऐकवलं जातं. त्यातून मग रडणं म्हणजे बावळटपणा, रडणं म्हणजे मुलींसारखं आणि रडणं म्हणजे वीकनेस हे ठसवणं जमुन जातं आपल्याला!
२/७
प्रत्यक्षात काही प्रसंगी खरंच आपल्या डोळ्यात पाणी येत नसेल तर आपण नक्की जिवंत आहोत का?! आपल्याला भावना-मन-संवेदना आहेत का?! याचा विचार बायका-पुरुष सगळ्यांनीच करायला हवं असं मला वाटतं. डोळ्यातल्या पाण्याबरोबर अनेकदा राग-द्वेष-हताशपण यांचा निचरा होतो.
डॅाक्टरांना जाऊन काल २० ॲागस्टला ९ वर्ष झाली. सॅारी, डॅाक्टरांची हत्या होऊन ९ वर्ष झाली, डॅाक्टर अजून गेलेले नाहीत. त्यांच्या विचारांच्या रुपात ते भक्कम आणि ठाम उभे आहेत. तेव्हा मी एबीपी माझा या वृत्तवाहिनीत पुणे प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
१/१५
सकाळी ८ च्या बुलेटिनला लाईव्ह द्यायचं म्हणून मी पावणेसातच्या दरम्यान घरातुन निघणार तेवढ्यात ॲाफिसचा फोन आला - संजय दत्तला आज पॅरोल मिळणार आहे. ८ च्या बुलेटिनला त्याही बातमीवर लाईव्ह होईल. त्या पॅरोलबद्दल २/३ ओळीत माहिती लिहुन ॲाफिसला कळवली आणि निघाले.
२/१५
तेवढ्यात कलिगचा फोन आला - अगं बालगंधर्वच्या पुलावर कुणावर तरी गोळ्या झाडल्यात. मी कॅमेरा तिथेच बोलवतो, तू ही तिथेच ये, आपण दोघांचंही लाईव्ह तिथुनच देऊ. त्या सकाळी ‘कुणावर तरी’ झाडलेल्या गोळ्या अशा उभं आयुष्य पुरुन उरणाऱ्या असतील अशी तेव्हा शंकाही आली नव्हती.