दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं.
#Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
काही वेळापूर्वी ज्या हिमतीने उठून बसलो होतो..ती हिम्मतसुद्धा पांघरूण घेऊन दडपून निजली होती..ही परिस्थिती.
मला जे लहान मुलीचं गाणं ऐकू येतंय..ते पप्पा मम्मीना ऐकू येत नसेल का? हे वेगळंच टेंशन.. कारण मांजर चालण्याच्या आवाजाने ते जागं होतात..आता इतका वेळ हा दंगा असूनही झोपलेत कसे?
संगीत बंद व्हायचं नाव घेईना..इतर कोणी जागं व्हायची आशा पण मावळत चालली..मी तोंडावरच पांघरून न काढता अंदाजाने फक्त हात बाहेर काढून मोबाईल आत घेतला..आणि आतूनच torch लावली..आता जरा धीर आला..हळूहळू पांघरूण काढून रूमच्या दरवाज्यात येऊन बंद दाराबाहेरचा अंदाज घेतला..हळूच दरवाजा उघडला.
पटकन हॉलमधील लाईट लावली..तिथं कोणीच नाही..सगळं जिथल्या तिथं यथास्थित..पुढं आवाजाच्या दिशेवर जाऊ लागलो..ती दिशा जात होती टेरेसकडे..लाईट असूनही मोबाईल टॉर्च बंद करायचं धाडस होईना..हळूच पायऱ्या चढत जाऊ लागलो..टेरेसचा दरवाजा उघडाच होता..सायकलची संगीतबद्ध लाईटही आता हळूहळू दिसू लागली.
पुढं काय दिसतंय काय न्हाय..या धाकधूकीत खट् आवाज न करता पुढं जात होतो..एवढ्यात पाठमागून दार उघडल्याची करकर ऐकू आली..म्हणून दोन मिनिटं स्तब्ध झालो..पुढं काहीच हालचाल ऐकू येईना म्हणून परत मोर्चा इंग्लिश गाण्याकडे वळवला..चिंब भिजलेली सायकल त्या चमकत्या प्रकाशात अजूनच अंगावर येत होती.
मी पुढं होऊन आता सायकलला हात लावणार तोच पाठीमागून कोणीतरी मला धरलं..पप्पा होते ते..गाण्याचा आवाज ऐकून आलो असं म्हणून..तू जा खाली..मी सायकल घेऊन खाली येतो म्हणाले..
आता भीती शांत झाल्यामुळे मी पण गुमान खाली गेलो.. पाहतो तर पप्पांच्या खोलीचा दरवाजा बंद..वर आतून लॉक..
वरती सायकलही आता शांत झालेली..पण पावलांचा आवाज मोठा होत माझ्याकडेच येत होता..मी त्या आवाजाकडे तोंड करून उभा असा..तोच पाठून पप्पांनी मला हात लावला..आणि दचकून मला जाग आली..तेंव्हा डोक्यात हॉरर संगीत वाजत होतं.. Annabelle Comes Home चं..❤️

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

Oct 2
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता..
#Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
Read 7 tweets
May 11
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
Read 11 tweets
Mar 8
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️
#farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.
Read 8 tweets
Dec 31, 2021
सांज रातीला पडक्या वाड्याच्या पल्याड भिंतीला निवाळसंग तलावाची छबी नाकासमोर ठेवत ती बसलेली असायची..तलावावरचा धुंद वाऱ्याचा झोत..अदबशीर होऊन तिच्या मोकळ्या केसांना बटेसहित कुरवाळायचा.. त्याला यायला नेहमीचा उशीर असायचा यावर तिची लालबुंद नाकाची धार शीतल वातावरणात चमकून उठायची.
#म
आज त्याने त्या लेकुरवाळ्या आठवणींसहित तिथल्या दगडी सोपानावर चार गरका घेतल्या...प्रत्येक गरकेसरशी आठवणी आपला विळखा अजूनच तंग करत्या झाल्या.. त्यातून सैलावण्यासाठी त्याला अजून चार गरका घ्याव्या लागल्या.
पुढं होऊन तलावात पाय सोडून बसताना चपळ चंचल मासे धावताना दिसले..
आयुष्यातले क्षण असेच चपळ असतात..आत्ता हा क्षण माझ्या कवेत आहे म्हणेपर्यंत तो निघून गेलेला असतो.. त्या एवढ्याशा क्षणाला..क्षणाच्या आत..त्या आपुलकीच्या घटकेसहित काळजात साठवून ठेवावं लागतं..परत परत तो क्षण काळजाच्या तळात जाऊन अनुभवण्यासाठी.
डाव्याअंगाला वयोवृद्ध वड पानगळ सोसत उभाय..
Read 6 tweets
Dec 31, 2021
१६च्या नोव्हेंबरात नोटबंदी झाली तेंव्हा काळजात एक जखम घर करून होती..नोटबंदीने त्या जखमेवरची खपली काढली..ती जखम म्हणजे त्याच ऑगस्टमध्ये वि.ग. कानिटकर या ऐतिहासिक लेखकाचं निवर्तनं.
जागतिक इतिहास त्याचं आकलन आत्ता गुगल दुनियेत क्षुल्लक..पण कानिटकर जगले तो काळ अखंड सर्व्हर डाऊनचा.
#म
यंदा वाचलेलं पुस्तक 'नाझी-भस्मासुराचा उदयास्त' वि. ग. कानिटकर या कसलेल्या लेखकाचं हे पुस्तक.
हिटलर आणि त्याची नाझी संघटना दोघेही कोणत्या परिस्थितीत बळ धरते झाले.. एखादा अख्खा देशच्या देश कशा पद्धतीने सामूहिक भावनेच्या अंकित जातो..ती भावना कशा पद्धतीने नर्चर केली जाते.
हे सगळं टिपून घेण्यात लेखक निर्विवाद यशस्वी झाला आहे.
जसं दुसऱ्या महायुद्धाची बीजं पहिल्याच्या अंतात होती तसं जर्मन जनतेच्या सामूहिक अपमानित भावनेची मूळही पहिल्या महायुद्धाच्या शेवटात होती. हिटलर सारखा हे युद्ध रणांगणाच्या थेट मैदानातून अनुभवलेला माणूस सुडाने पेटने साहजिकच.
Read 11 tweets
Dec 12, 2021
तांदळाच्या तुलनेत मक्का पिकास पाचपट कमी पाणी लागतं.. तांदळाच्या तुलनेत इतर पिकास लागणारी इनपुट कॉस्टही कमी आहे.. तरीही शेतकरी तांदळाचं उत्पादन घेतात..₹ तीनेक लाख खर्चून बोअरवेलची सोय करतात.. हे सगळं का आणि कशासाठी? तर MSP बाबत भातास आणि गव्हास असलेली कडेकोट व्यवस्था.
#म #थ्रेड
अन्न सुरक्षा योजनेस अखंड पुरवठा व्हावा यासाठी फक्त गहू आणि तांदळास MSP द्यायची..त्याद्वारेच त्या दोन पिकांची सरकारी खरेदी उरकायची..आणि बाकीची पिके वाऱ्यावर उफनायची..त्याकडे पहायची सरकारची इच्छा नाही आणि जनतेला स्वतःच्या जीवाचा प्रश्न निर्माण होत नाही तोवर बघण्याचं काही कारण नाही.
देशातील शेती आणि शेतकरी यांचा इतिहास पहाता पंजाब राज्य हरितक्रांतीनंतर उत्पादनासाठी वाढीस लागले..तिथं गहू आणि तांदूळ उत्पादनासाठी जी काही निसर्गाशी प्रतारणा झाली..त्यामुळे तिथल्या शेतीचाच नाही तर माणसांच्याही जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. कॅन्सर ट्रेन हे त्याचं उत्तम उदाहरण.
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(