3 शतकापासून व त्याआधीचाही इतिहास समजून घेतला तर उमजून येईल की महाराष्ट्रावर फक्त दक्षिण आणि महाराष्ट्रातील लोकांनीच सत्ता गाजवली आहे.
दिल्लीने अज्जिबात नाही. मग ते मौर्य असतील, तुघलक असतील, मोघल असतील.
ह्याच सह्याद्रीच्या काळ्या दगडाने सर्वांची माथी फोडली आहे.
आक्रमण नक्कीच झाले असतील. त्याची तर माळच लागेल गिणती करायला गेलं तर.
पण महाराष्ट्रभूमी आणि दक्षिणेवर बाहेरच्या लोकांना खास चमक दाखवता आली नाही.
(अपवाद युरोपियन लोकांचा सोडला तर )
याच कारणं आणि समान उदाहरण द्यायचे झाले तर. जगातील सर्वोच्च नीचात्म्यापैकी एक अशा हिटलर -
हिटलर जेव्हा रशिया जिंकण्यासाठी जातो तेव्हा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता उतावीळ पण रशियात घुसतो, पण - उणे ४० तापमानाची सवय फक्त त्याच भूमीपुत्राना असल्याने जर्मन सैन्य हाल बेहाल होऊन मरतात. आणि नाझी भक्ताना तिथ हार मानावी लागली.
तसाच ह्या मराठादेशाला वरदान आहे, ते ह्या रांगड्या राकट सह्याद्रीचे. डोंगर कपाऱ्या, नद्या, ओढे, घनदाट अरण्य, काळे कभिन्न विशाल खडक, ह्याच भौगोलिक वैभवाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी व शिवपुर्व काळातील राजांनी उत्तरेकडील आक्रमणानां उलट सलामी देऊन झुंझार लढा दिला.
हा केवळ मनाच्या समाधानासाठी, पूर्वजांच्या गायलेला पराक्रमाचा पोवाडा नाही. त्यांचच रणभेरी शौर्य आमच्या धमन्यातुन वाहत आहे.
असा आपला दैदिप्यमान समरधुरंदरी इतिहास आहे. तो दिल्लीचा उपरा अथवा इथला फ़ंद कुणी विसरला आणि मग्रुरी केली तर त्याच्या मुस्काडात देऊन त्याला हेच सांगावं.
प्राचीन काळापासून इतिहास आहे― इथला महाराष्ट्री माणूस साधा भोळा, रांगडा आहे, त्याला कट कपट, धुर्तपणा, षडयंत्र आवडत नाही.
महाराष्ट्राला जिंकायच असेल तर फक्त प्रेमाने जिंकता येत. जोर जबरदस्ती साम दाम दंड भेद घेऊन येत असाल तर थेट औरंगजेब करू..! #महाराष्ट्र
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#औरंगाचे_बेरंग ( भाग-१)
१) मुघल औरंगजेब हा अतिशय हरामखोर व नीच दानतीचा क्रूर रानटी शासक होता.
याचा दाखला देताना, त्याकाळचा 'बर्नियर नावाचा एक प्रवाशी सांगतो- मुघल राज्यात कोणी सरदार, उमराव कर्तव्यावर गेले की, औरंगजेब त्यांची सगळी मालमत्ता सोने-चांदी आदी माया जप्त करत असे.
२) मुख्य याच कारणाने मोघली सरदार- उमराव, अज्जिबात तणाव घेत नव्हते, फार दिलखुलास राहायचे, चैन करायचे, तऱ्हेतऱ्हेचे शौक- नाटकशाळा, रंगशाळा आदीमध्ये दौलत फुकुन यायचे.
त्याना माहीत होतं मतलबी बादशहा, आपण खपल्यानंतर आपल्या कुटूंबाला चुकुन -ढुंकून- थुंकूनही बघणार नाही.
३) बादशहा त्यांची मालमत्ता जप्त करताना त्यांचे घरदार सुद्धा जप्त करायला मागेपुढे बघत नसत. मर्जी झालीच तर पुढे त्या सरदाराच्या कार्ट्याना बक्षीसी वैगरे देत सरदारी बहाल करी.
ह्या सगळया भिकार भानगडीचा विचित्र परिणाम मोघल प्रजेवर, राज्यावर, आर्थिक परिस्थिती अन व्यवस्थेवर झाला.
#Thread - महाराष्ट्राचा पहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव -
"श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव"
( दादर-मुंबई- महाराष्ट्र राज्य )
हा उत्सव कुणी सुरू केला, त्यामागचा सद्हेतू काय होता. मराठी मातीचा गौरव वाढवणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबद्दल माहिती देणारा हा लेख संपूर्ण वाचा. ( १३/१)
1920 च्या दशकातील घटना-
दादर ला सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होण्यास बहुजन बांधवाना बंदी होती, यातून पूज्य डॉ आंबेडकर, रा. बोले व प्रबोधनकार ठाकरे यांनी आंदोलन उभा करत तो डाव हणून पाडला, यापुढे उत्सवात दलित नको ह्या कुयोजनेने ब्राह्मणांनी गणेशोत्सव बंद पाडला. ( १३/२)
मात्र प्रबोधनकार ठाकरेना मनोमन वाटायचे असा कुठला तरी उत्सव असावा ज्यात स्पृश्य-अस्पृश्य आदी मंडळी आनंदाने सहभागी व्हावे व महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत व्हावा. याच पुण्यहेतू कारणे राव बहादूर बोले यांच्या बंगल्यावर अनेक पुरोगामी मंडळींची नियोजनबद्ध बैठक झाली व ठरले.. (१३/३)
आज महाराष्ट्राचे लाडके, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती. या निमित्ताने त्यांच्या महालोकप्रिय अशा देवळाचा धर्म धर्माची देवळे या पुस्तकातली काही मुख्य ओळी थ्रेडमार्फत आपल्या वाचनास देत आहे. नक्की वाचा..👍 आणि त्यावर विवेकबुद्धीने चिंतन करा. #लोकप्रबोधनदिन 🔥
१) देवळें म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाहीं आणि भटाशिवाय देऊळ नाहीं.
३) देशांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला, तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही
४) गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही
हा भटांचा ‘सनातन धर्म’ त्यांनी आजर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे
#वाचकांचे_पार्लमेंट भाग -२
जळगांव मधील बातमीदार साप्ताहिकात वाचकांचे पार्लमेंट या सदरात वाचक विविध प्रश्न विचारायचे, अन प्रबोधनकार त्याना मार्मिक, तिखट, विनोदी, शैलीत उत्तर द्यायचे त्यालाच आपण ठाकरी स्टाईल म्हणतो.!
अशीच काही प्रश्नोत्तरे खाली दिले आहेत वाचा. 👇
भाजपचे नेते- जे लोकशाहीत अधिकृतपणे कुठल्याही शासकीय प्रशासनात सहभागी नाही.
ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, अन शासकीय यंत्रणा लगेच कारवाई करतात..! याचा अर्थ जनतेने नक्की काय घ्यायचा ?
ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षातील पक्षातील नेते पदाधिकारी यंत्रणेत हस्तक्षेप कसा काय करू शकतात ? अन त्यांनी दिलेले पुरावे व तत्सम बाबींवर तातडीने होकारार्थी निर्णय घेऊन, सरकारी यंत्रणेतील लोक संबंधीत विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी मोठ्या वेगाने करतात, आणि थेट अटक करतात..!
नीट पाहिलं तर त्या राजकीय पक्षांनी केलेले आरोप हे फारसे मोठ्या स्वरूपाचे नसूनही, त्या यंत्रणा केवळ हुकमावरून असा हावभाव दाखवतात जणू काय त्यांनी भारत सरकारची तिजोरी फोडलीय. मला वाटत अशा आकसभावनेतून केलेल्या कारवाया समाजात, अन त्या विरोधी पक्षात एक विक्षिप्त मत तयार करत आहेत..!