ऋण फेडता आले पाहिजे.
वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली,
तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले,
पण पाणी कोठेच मिळेना.
सर्वत्र जंगलच दिसत होते.
तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की,
जेथे कोठे पाणी असेल,
तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव.
तेव्हा एक मयुर 🦚तेथे आला,
व श्रीरामास म्हणाला,
येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.
चला मी आपणास दाखवतो.
पण तिथे मी उडत उडत जाईन,
आणि आपण चालत येणार,
त्यामुळे चुकामूक होऊ शकते.
म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन.
त्यामुळे आपणास मार्ग सापडेल
व आपण जलाशया जवळ पोहचाल.
आपणास माहिती आहे की,
मयूर पंख, हॆ एक विशेष काळी,
व एक विशेष ऋतुमध्ये पंख तुटून पडतात.
पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख निघत असतील,
तर त्याचा मृत्यु होतो.
आणि तेच झाले.
त्याचे पंख निघत होते,
त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता.
तेव्हा मोर म्हणाला की,
मी किती भाग्यशाली आहे की,
जो जगाची तहान भागवतो,
त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले.
माझे जीवन धन्य झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.
तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की,
माझ्या साठी जे मयूरपंख इच्छेविरूद्ध काढून,
मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे,
व जो ऋणानुबंध झाला आहे,
हे ऋण मी पुढच्या अवतारात, नक्की फेडीन.
माझ्या कृष्ण अवतारात तुला,
माझ्या माथ्यावर धारण करीन.
त्यानुसार पुढच्या अवतारात,
श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करुन,
वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.
तात्पर्य हे आहे की,
जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले,
ऋण पुढील जन्मात फेडावे लागले,
मग आपण तर मनुष्य आहोत.
न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.
आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत.
ते ऋण फेडण्यासाठी,
कित्येक जन्म कमी पडतील.
अर्थात,आपणास जे काही भले करायचे आहे,
ते या जन्मात करायचे आहे.
कारण पुढचा जन्म कुठला असेल,
आपणास माहिती नाही,
आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.
एक महत्त्वाचे-
पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय,
माशी सुध्दा अंगावर बसत नाही.
त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला,
हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण,नातेवाईक, शेजारी,
या रुपात आपापले ऋण वसूल करतात,
व ज्यांना आपण मदत केली,
तेही या जन्मी कोणत्या ना,
कोणत्या रुपात येवून,
परतफेड करतात.
त्यामुळे मी सरळमार्गी आहे,
मी कोणालाही त्रास दिला नाही,
मग माझ्याबाबतीत असे का होते,
याची कधीच खंत करु नका,
समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
मना त्वाची रे पूर्वसंचित केले.!
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले.!!
देह प्रारब्धावर सोडून,
मन सद्गुरुचरणी,
व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास,
जीवनातील गंमत,
व आनंद अनुभवता येतो...!!
प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती. इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुना करवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावून मारले. हे अनेकांना न उलगडलेले कोडे...! तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले होते.
युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले "कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता तरी तुम्ही त्याला का मारले..?" त्यावर कृष्णाने सांगितलं की, "नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्य संपन्न होता. याचकाला कधीही त्याने विन्मुख पाठवले नाही.
अशी अनेक चांगली कामे (कर्म) त्याने केले.
मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता, तेव्हा खरेतर त्याने सर्वाना जणू पराभूत केलेच होते. त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते.
आज मी तुम्हाला एक अदभुत गोष्ट सांगणार आहे. सावता माळ्याची.
मग तुम्हाला कळेल की भक्ती काय चीज असते !
सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता.
सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे.
सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत.
आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला.
त्या अभंगांचं सार हेच की 'प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.'
तर, हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूर कडे जाणारी वारकर्यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं.
सगळे भोजनाने खूश झाले.
👉 1) देवपूजेपेक्षा श्रेष्ठ सेवा कोणती. ?
उत्तर : आईवडीलांची सेवा ही अधिक श्रेष्ठ.
👉 2) उघड शत्रूपेक्षा अधिक घातक कोण?
उत्तर : कृतघ्न मित्र अधिक घातक.
👉 3 ) गृहस्थाश्रमाचे खरे वैभव कोणते?
उत्तर : त्यागशील आणि सद्गुणांची पत्नी.
👉 4)सर्वात मोठे आश्चर्य कोणते?
उत्तर : आपल्या डोळ्यांसमोर रोज अनेक माणसे मरताना दिसतात, पण आपण मात्र अमर आहोत असे अनेकांना वाटते, हे मोठे आश्चर्य.
👉 5) मानवाचा सर्वात मोठा शत्रू कोणता?
उत्तर : क्रोध राग .
👉 6) पृथ्वीपेक्षा गौरवास्पद काय?
उत्तर : आई.
👉 7) गवतापेक्षा अधिक गतीने कोण वाढते?
उत्तर : चिंता - काळजी.
दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात?
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून लगेच निघू नये मंदिरात काही वेळ बसायला पाहिजे
परंतु तुम्हाला माहिती आहे का
या परंपरेमागचं मूळ कारण काय आहे?
आजकाल काही लोकं दर्शनाला जातात आणि वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पायऱ्यांवर बसतात आणि तिथं बसून व्यावसायिक किंवा राजकीय चर्चा सुद्धा करतात.
परंतु ही प्राचीन_परंपरा एका विशिष्ट उद्देशासाठी बनवली गेली होती.
वास्तविक पाहता आपण सर्वांनी दर्शन घेऊन निघताना किं श्लोक म्हणायला हवा, जो आजकाल बहुतांश लोकांना माहित नाही.
आपल्या माहितीसाठी तो श्लोक सांगत आहे तुम्ही नक्की वाचा व इतरांनाही सांगा
वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. घडुन गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते.
हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही.
मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लाउन घ्यायची ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते.
👏 श्रीकृष्ण.... ! 🍁
कोण आहे श्रीकृष्ण ?
पहिला अपशब्द ऐकल्यानंतर शिरच्छेद करण्याची शक्ती असताना सुद्धा नव्यान्नव अपशब्द ऐकण्याचा संयम आहे! सुदर्शन चक्रासारखे शस्त्र असताना सुद्धा हातात मुरली आहे! द्वारका नगरी सारखं वैभव असताना देखील सुदामा सारखा मित्र आहे!
शेषनागाच्या मृत्यू रुपी मुखावर उभे असताना देखील नृत्य होत आहे! प्रचंड सामर्थ्य असताना देखील युद्धात सारथी बनून सारथ्य करत आहे! तो श्रीकृष्ण आहे.
श्रीकृष्ण व्यक्ती नाही, विचार आहे.
जन्मानंतर लगेच जन्मदात्यांना सोडावं लागलं! पालनकर्त्यांनाही सोडावं लागलं! मित्रमंडळींना सोडावं लागलं! जिच्यावर प्रचंड प्रेम केलं तिलाही सोडावं लागलं! गोकुळ सोडलं! शेवटी मथुरा ही सोडली! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीच अशी निर्माण झाली की काही ना काही सोडावं लागलं!