#नरकचतुर्दशी 🧵
आश्विन वद्य चतुर्दशी,
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर / नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला.++
श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व स्त्रियांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. ++
त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.++
आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते.नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात++
या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. ++
आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात. ++
अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, ++
प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.
पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान. वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा. दिवाळी चे तीन दिवस ++
आश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा.
आपल्या सर्वांच्या जीवनात, ही दीपावली समृद्धी उत्तम आरोग्य आणि सुख घेऊन येवो हीच प्रार्थना 🙏🙌🎇🎆🪔🪔( वरील माहिती सनातन पंचांग व भागवत पुराण तून घेतलेली आहे.)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
३० एप्रिल परत आला. आज मी रात्रभर जागी आहे. झोप येत नाही आहे. ३० एप्रिल २०२१ ..आई ला जाऊन आज २ वर्ष झाली, सगळे पुन्हा प्लॅशबॅक समोरून गेला. २.५७ वाजलेत रात्रीचे जेव्हा ही पोस्ट लिहित आहे.मी आता आईला अग्नी देऊन आले होते. ++
मला लिहायचे नव्हते, आई ११ एप्रिल ला तिथीनुसार तुझे संवत्सारिक २ रे श्राद्ध कर्म केले पण आज ची तारीख जास्त त्रास देत आहे. छोट्या छोट्या गोष्टी वर हट्ट करणारी तुझी लेक आता स्वतः रडून स्वतः ला सावरायला ही शिकली आहे. तुझ्या दृष्टीने मोठी झाले. ++
असो जिथे असशील तिथे आनंदी आणि सुखात राहा. "नसतेस घरी तू जेव्हा" हे बाबा हल्ली जास्त ऐकतात. रोजच्या जीवनात चालून माझे पाय जेव्हा थकतात, जेव्हा घरी आल्यावर कडाडून भूक लागलेली असते. एखादी जखम होते, माय लेकी ची जोडी जेव्हा पाहते. तेव्हा आईची खूप आठवण होते. ++
कसे आहे आम्हाला जातीवर आणि वैचारिक वंध्यत्व घेऊन लिहायचे आणि पसरवायचे असते.लिहणार नव्हते पण या ट्वीट ला कोट करून बहूजन समाज ने वाचावे वेगैरे लिहले आहे तर काही सत्य घटना सांगणार आहे. आम्ही डावे नाही की नुसत्या थेअर्या मांडायच्या आड ना बूड. १/११ #स्वातंत्र्यवीर_सावरकर
१) वेदोक्तबंदी, २) व्यवसायबंदी, ३) स्पर्शबंदी, ४)सिंधुबंदी, ५) शुद्धीबंदी, ६) रोटीबंदी, व ७) बेटीबंदी, हे सगळे हेरून या अनिष्ट रूढी प्रथांना तोडण्यासाठी प्रयत्न करणारे कृती करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सर्व जातींसाठी सहभोजनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. २/११
देशबंधू चित्तरंजन दास यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी १९२५ साली सावरकरांनी दलित आणि सवर्ण यांची एकत्रित सभा रत्नागिरी च्या जुन्या विठ्ठल मंदिरात घेतली होती, तत्पूर्वी त्या मंदिर मध्ये दलितांना प्रवेश नव्हता, त्यानंतर १३ सप्टेंबर १९२९ साली विठ्ठलाच्या पायावर डोक देखील टेकले. ३/११
वैचारिक बाटग्यांकडुन तसेच गुढग्यात मेंदू असलेल्यांकडून यापेक्षा वेगळ्या अपेक्षा नाहीतचं.
ज्या माणसाने खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती करिता शपथ घेऊन आपले जीवन अर्पण केले त्यांना मनाला येईल तेव्हा तोंडाला येईल ते बरळतं बसायचे .१/३
यांची भंपक वक्तव्य सार्या पुरोगाम्यांनी मम म्हणून स्वीकारली आहेत .डाव्या विचारात घटना महत्वाच्या नसतात सत्य महत्वाचे नसतात - त्यांच्या फालतू थेअर्या महत्वाच्या असतात. २/३
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कळायला तुमचा हा बाप जन्म पुरणार नाही.
धन्योऽहम ! धन्योऽहम !
कर्तव्य मे न विद्यते किंची । धन्योऽहम ! धन्योऽहम !
प्राप्तत्यम सर्वमहा संपन्नम ! ३/३
नाती असतात स्वच्छंद फुलपाखरासारखी... आयुष्य रंगी-बेरंगी करणारी...
नाती असतात खळखळनार्या झर्यासारखी... थेंब थेंबात सुख-दुखाचे मोती वेचणारी...
काही नाती असतात मधाळ गोडवा घेऊन येणारी...
तर काही कारल्यालाहि कडूपणा शिकवणारी... पण जितकी मुरतील तितकाच जास्त आनंद देणारी...++
काही नाती असतात अगदी खळखळून हसवणारी...
आणि काही तितकंच रडवणारी... हसता रडता आपल्याला प्रत्येक क्षणी सावरणारी...काही नाती अगदी बाल कृष्णासारखी खट्याळ..
तर काहींमध्ये साचलेला नुसता शिष्टपणाचा गाळ.. पण इतक्या भिन्नतेतहि असते एकत्र बांधलेली नाळ... ++
काही नाती मनात खोल घरट करून बसतात...
काही मात्र आभाळभर भरकटलेलीच असतात...सांजवेळी सगळी पुन्हा मनात एकत्र येऊन निजतात...काही नाती मनाशी अगदी घट्ट बांधलेली...
तर काही अगदी सहजच सुटत गेलेली.... सगळ्यांनी मिळून मायेची उब देणारी गोधडी विणलेली...++
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
काल तुम्हा सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची ची फुले झाली आणि एक सुंदर सुंगधी फुलांची माळ तयार झाली. आपण दिलेल्या शुभेच्छा तितक्याच भावनेनं स्वीकारून , हा आभार मानण्यासाठी खटाटोप. आपण जन्माला आलो ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही ++ #आभार
तर, उरलेल्या दिवसांचा उपभोग घेण्यासाठी. आपण किती आनंदी आहोत या पेक्षा आपण इतरांना किती आनंदी ठेवू शकलो हे महत्त्वाचे. जसे एखाद्या गोड पदार्थ मध्ये गोडी साठी घातलेली साखर, गूळ, पदार्थ तयार झाल्यावर जसा दिसत नाही तसचं तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा. ++
आयुष्यभर या शुभेच्छांची गोडी सोबत असेल.मी सर्वाचे आभार मानण्याचा प्रयत्न केला आहे. जर कुणी नजरचुकीने राहिले असेल तर त्यांचे ही आभार. क्षमस्व🙏💕आता थोडासा रेशमीचिमटा- ज्यांनी मनात नसताना ही शुभेच्छा दिल्या त्यांचे ही आभार काही लोक असेही होते. ++
तुळशीचं लग्न का लावले जात याची ही कथा आहे.
एकवेळ भगवान शंकरांनी आपल्या तेजाचा काही भाग समुद्रात फेकून दिला होता, त्या तेजातून जालधंर नावाचा तेजस्वी बालक जन्मला. हा पुढे जाऊन पराक्रमी असा दैत्य राजा झाला. दैत्यराज कालनेमी ची कन्या वृंदा हिच्याशी ++ #तुलसी_विवाह_कथा
त्याचा विवाह झाला. जालंधर क्रूर होता, मदमस्त झालेला राक्षसराजा, त्याचा अत्याचार, वाढतच जात होता. पण त्याची पत्नी वृंदा ही भगवान विष्णूंची भक्त होती. जेव्हा देव आणि दानवांच्या मध्ये युद्ध झाले, वृंदेने पतीला सांगितले की जोपर्यंत तुम्ही युद्ध संपवून येत नाही. ++
मी उपासनेला बसेन. आणि जोपर्यंत तुम्ही परत येत नाही मी संकल्प सोडणार नाही, पूजेतून उठणार नाही. व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवला आला नाही, जालंधर विजयी होईल ह्या भीतीने सर्व देवता श्रीविष्णूंकडे गेले.++