दिनांक २-६ नोव्हेंबर हा कार्यक्रम आयोजित केलाय. लाल किल्ल्यासमोरच्या मैदानात हे प्रयोग साकारले जात आहेत. प्रवेशद्वारांना वेगवेगळ्या गडांचे नाव दिले आहे. मी या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. (२/n)
प्रवेशद्वारातून आत गेलं की वेगवेगळे स्टॉल लावले आहेत. खाण्याचे, पुस्तकांचे. त्यासोबत, प्रत्येक खांबावर मराठा सरदार, पेशवे, यांची माहिती असलेले फलक लावले होते.(३/n)
समोरंच शिवसृष्टी ची चित्रफीत लावली आहे.
A, B, C अश्या तीन भागांमध्ये आसनव्यवस्था विभागली आहे. प्रमुख पाहुण्यांना वेगळा प्रवेशद्वार आहे. (४/n)
काल कार्यक्रमाला @adgpi प्रमुख जनरल मनोज पांडेजी, महाराजांच्या सरदारांचे, पेशव्यांचे वंशज, @iccr_hq चे अध्यक्ष, डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे @Vinay1011 सुद्धा उपस्थित होते. (५/n)
आरतीनंतर प्रयोगाची सुरूवात होते.
लाल किल्ल्यासमोर असा दिमाखदार देखावा अतिशय सुंदर वाटतो!
दर्जेदार कलाकार, उत्कृष्ट ध्वनी आणि भारावून टाकणारी प्रकाशव्यवस्था. (६/n)
महाराजांच्या आयुष्यातले प्रमुख क्षण उत्तमरित्या दाखविले आहेत. पण काही महत्वाचे प्रसंग जसे पावनखिंडीतली लढाई ही दाखवली नाही त्याचं थोडं आश्चर्य वाटलं. संत तुकाराम महाराज-शिवाजी महाराज भेटीचा प्रसंग भारावून टाकतो. भाषा हिंदी असून संवाद छान लिहिले आहेत. आशय लोकांपर्यंत पोचतो (७/n)
पूर्वार्धात अफजलखान वध हा शेवटचा प्रसंग. उत्तरार्धात आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटं छाटली तो प्रसंग सुंदर दाखवलाय.. प्रोयगात गाण्यांचा वापर योग्य पद्धतीने केलाय.. त्यामुळे जास्तं खेचला गेला नाही प्रयोग. (८/n)
उत्तरार्धात २ प्रसंग खिळवून ठेवतात ते म्हणजे महाराजांची घालमेल. त्यांचे जिवाभावाचे मित्र, सरदार यांनी आपले प्राण देऊन स्वराज्य टिकवून ठेवलं, त्याचं वाईट वाटणारा प्रसंग आणि औरंगजेबाने केलेलं महाराजांचं कौतुक!
अपत्रिम वाक्यरचना आणि संवाद!याला अजून भारावून टाकते प्रकाशव्यवस्था (९/n)
घोडे, उंट; सैनिक म्हणून काम करणारे कलाकार यांचा ताळमेळ आणि प्रसंगावधान सुंदर! राज्याभिषेक सोहळा तर अपत्रिम दाखवला आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर सिंहासन लावलं पण कोणाचं लक्षं तिकडे जात नाही.महाराजांची प्रतिज्ञा ही खूप विशीष्ट पद्धतीने दाखवली आहे. फक्तं त्यासाठी अक्खा प्रयोग बघावा
राज्याभिषेक सोहळा किती दिमाखदार झाला असेल याचं चित्रं डोळ्यासमोर उभं राहतं. मला यावर्षी रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यात भाग घेण्याचं भाग्य लाभलं. रायगडावरचा अनुभव साक्षात डोळ्यासमोर दिसतोय याचा भास होतो!
प्रयोगातील सोहळ्याची खाली एक झलक. आवाज वाढवून ऐका! (११/n)
असा सुंदर प्रयोग बघून बाहेर पडल्यावर, खाण्यासाठी मराठमोळी पुरणपोळी मिळाली! 😋
यासोबतच भारतीय इतिहास, लाल किल्याचा इतिहास, याबद्दल बरीच पुस्तकं विकायला होती (१२/n)
सगळ्यात अभिमानाची गोष्टं ही की बरेच प्रेक्षक हे अमराठी होते. असे बरेच होते ज्यांनी आपल्या लहान मुलांना मुद्दाम आणलं होतं. मुलांनी कुतूहलाने पूर्ण प्रयोग बघितला!
जेंव्हा आपला लाडका राजा छत्रपती झाला तेव्हा आपसूक सगळे प्रेक्षक आपल्या जागी उठून उभे राहिले. (१३/n)
महाराजांच्या जयघोषात कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यावर या महाराजांच्या मूर्तीसमोर भरपूर लोकांनी जयघोष केला. लहान मुलं एकदम उत्साहाने भरून बाहेर आले. दिल्ली सारख्या ठिकाणी सुद्धा महाराजांची एवढी ख्याती बघून अभिमान वाटतो! (१५/n)
पण ज्या भूमीत महाराज वाढले, त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं त्या आपल्या महाराष्ट्रात आपण महाराजांची ती कीर्ती, ती ख्याती खरंच जपतो आहोत का, हा प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय राहत नाही! (n/n)
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन.. मला नेहमीच कुतूहल होते की या दिवशी रायगडावर कसे वातावरण असेल आणि त्या दिवशी तिथे काय झाले असेल.. या वर्षी तो थरार अनुभवायला मिळाला!
हा धागा त्या अनुभवाचा (१/n)
साधारण १ महिन्यापूर्वी मला सकाळी फोन आला. "१२जून पर्यंत तुला ४ रचना वाजवता येतील का आणि त्या दिवशी दुसरं काही काम आहे का"
मी म्हणालो जमेल, आणि काही काम नाहीये.. इथून सुरुवात झाली.. (२/n)
या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने महाराजांना मानवंदना द्यायचे ठरले होते.. त्याची तयारी सुरू झाली..
एक स्वयंसेवक म्हणून ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मी मुख्यत्वे घोष (वाद्यवृंद)चं काम पहातो. (३/n)