Atharv Patil Profile picture
Proud Indian || Photography enthusiast
Nov 6, 2022 16 tweets 5 min read
#थ्रेड
तर, काल संध्याकाळी सांस्कृति मंत्रालय, भारत सरकारने आयोजित केलेल्या #राजशिवछत्रपतीऐतिहासिकमहानाट्य चा प्रयोग बघून आलो.. त्याबद्दल थोडंसं 🧵(१/n)
दिनांक २-६ नोव्हेंबर हा कार्यक्रम आयोजित केलाय. लाल किल्ल्यासमोरच्या मैदानात हे प्रयोग साकारले जात आहेत. प्रवेशद्वारांना वेगवेगळ्या गडांचे नाव दिले आहे. मी या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. (२/n)
Jun 18, 2022 20 tweets 6 min read
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन.. मला नेहमीच कुतूहल होते की या दिवशी रायगडावर कसे वातावरण असेल आणि त्या दिवशी तिथे काय झाले असेल.. या वर्षी तो थरार अनुभवायला मिळाला!

हा धागा त्या अनुभवाचा (१/n) साधारण १ महिन्यापूर्वी मला सकाळी फोन आला. "१२जून पर्यंत तुला ४ रचना वाजवता येतील का आणि त्या दिवशी दुसरं काही काम आहे का"
मी म्हणालो जमेल, आणि काही काम नाहीये.. इथून सुरुवात झाली.. (२/n)