पु. लं देशपांडे ( ८ नोव्हेंबर १९१९ - १२ जुन २००० ज्याच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा व साहित्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असे हे हरहुन्नरी कलंदर व्यक्तिमत्व. पुलंचे मराठी साहित्य व संगीतात अमुल्य योगदान आहे. त्यांचे आकाशवाणी, दुरदर्शन, नाट्य, चित्रपट या #पुस्तकआणिबरचकाही 👇
क्षेत्रातील कार्यही लक्षणीय आहे. १९४७ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण करून अभिनय, संगीत,दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद देण्याचे काम केले. वंदे मातरम या चित्रपटात पुलं आणि सुनीताबाईंच्या प्रमुख भूमिका आहेत. गुळाचा गणपती हा सबकुछ पूल असलेला चित्रपट. त्यांनी काही हिंदी चित्रपटासाठीही 👇
काम केले.१९५९ मधे पूलं भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दूरदर्शनसाठी पंडित नेहरूंची मुलाखत घेणारे ते पहिले मुलाखतकार होते.
पुलंनी जवळपास ४० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. पैकी असा मी असामी,बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक ही काही. वाऱ्यावरची वरात, 👇
तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, फुलराणी ही काही नाटके, पूर्व रंग, अपूर्वाई, जावे त्याच्या वंशा ही त्यांनी केलेली युरोप अमेरिका देशाची प्रवास वर्णने आहेत. त्यांनी कथाकथनाचे कर्यक्रम केले. त्याच्या ऑडिओ कॅसेट त्यावेळी प्रत्येक मराठी माणसाकडे हमखास सापडणारच.नारायण, रावसाहेब, 👇
अंतू बर्वा अशी व्यक्तिचित्रे आजही ऐकली जातात.
पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. होय पुलंवर महाराष्ट्राचं कालही प्रेम होतं आणि आजही आहे आणि उद्याही राहिल. याचं कारण त्यांची खुमासदार शैली. 👇
या महान लेखकामुळे आज महाराष्ट्राच्या साहित्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भाषेवरील त्यांचे विशेष प्रभुत्व होत. त्यांची अनेक नाटकं प्रसिद्ध होती,मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. 👇
त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात. उपहास- उपरोध, विसंगती, वक्रोक्ती, श्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करीत असले तरीही त्यांच्या विनोदात मर्म घातक डंख नसतो. कारण मानवी जीवनातील त्रुटीप्रमाणे कारुण्याची या विनोदाला जाण आहे. हास्याच्या कल्लोळात अश्रुंनाही👇
हळुवार स्पर्श करतो. हसू व असू याच्या हृदयंगम रसायनाने त्यांच्या विनोदाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार(१९६५), पद्मश्री(१९६६), पद्मभूषण(१९९०), महाराष्ट्र भूषण पुरस्कार(१९९६) याशिवायही अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ( संकलीत)
सानिया : ( १० नोव्हेंबर १९५२– ). आधुनिक मराठी कथा-कादंबरीकार. स्त्रीवादी साहित्यिक म्हणून त्या विशेष प्रसिद्घ आहेत. विद्यार्थिदशेतच त्या कथा, कविता लिहू लागल्या व त्या शालेय-महाविद्यालयीन नियतकालिकांतून प्रकाशितही झाल्या. १९७५ पासून सत्यकथा या नियतकालिकातून #पुस्तकआणिबरचकाही 👇
प्रकाशितही झाल्या. १९७५ पासून सत्यकथा या नियतकालिकातून कथा प्रकाशित होऊ लागल्या. त्यांचा पहिला कथासंग्रह शोध (१९८०) हा होय. त्यानंतर प्रतीती , खिडक्या , भूमिका , वलय , परिमाण , ओमियागे हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्घ झाले. दिशा घराच्या , ओळख हे त्यांचे दीर्घ कथासंग्रह .👇
स्थलांतर , आवर्तन , अवकाश या त्यांच्या कादंबऱ्या. सानिया यांच्या कथा-कादंबऱ्या नायिकाप्रधान आहेत. सुशिक्षित, आधुनिक, शहरी, संवेदनशीलस्त्री, तिने जगताना घेतलेला स्वतःचा व सभोवतालच्या जगातल्या इतर नातेसंबंधांचा शोध, हा त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा मूळ आशय व स्रोत असून आधुनिक जगात👇
कुसुमावती देशपांडे (१० नोव्हेंबर १९०४–१७ नोव्हेंबर १९६१) श्रेष्ठ मराठी कथालेखिका आणि समीक्षक. श्रेष्ठ मराठी कवी अनिल (आ. रा. देशपांडे) यांच्याशी प्रेमविवाह झाला. उभयतांच्या प्रेमजीवनाचे दर्शन घडविणारा पत्रव्यवहार कुसुमानिल (१९७२) नावाने प्रसिद्ध झालेला आहे.#पुस्तकआणिबरचकाही 👇
मराठीत तरी तो अपूर्व आहे. दीपकळी (१९३५), दीपदान (१९४१), मोळी (१९४६), दीपमाळ (१९५८), असे चार लघुकथासंग्रह प्रकाशित. निसर्ग आणि मानवी जीवन यांतील संबंधांचा त्यांनी आपल्या कथांतून शोध घेतला. तंत्रापेक्षा कथेचा विषय व त्याविषयीचा आपला दृष्टिकोण यांना महत्त्व दिल्याने त्यांच्या 👇
कथांना वेगळेपणा लाभला. . मुंबई मराठी साहित्य संघाच्या वा.म.जोशी स्मारक व्याख्यानमालेत त्यांनी मराठी कादंबरीसाहित्यावर १९४८ ह्या वर्षी व्याख्याने दिली. ती मराठी कादंबरी पहिले शतक या नावाने दोन भागात प्रसिद्ध झाली. त्यांत १८५७ ते १९५० मधील कादंबऱ्यांचे समालोचन आहे. 🙏
लक्ष्मण रामचंद्र पांगारकर : (३१ जुलै १८७२–१०नोव्हेंबर १९४१). प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार, मराठी संतचरित्रकार,पांगारकरांनी प्राचीन मराठी वाङ्मयाचे अत्यंत आवडीने आणि समरसतेने अध्ययन केले होते. मराठी भाषा आणि इतिहास यांचा साक्षेपी व्यासंग करून, आपल्या #पुस्तकआणिबरचकाही 👇
लेखणीचा आणि वाणीचा प्रभावी वापर करून, जनमानसात या विषयांची गोडी निर्माण करण्याचे कार्य त्यांनी आमरण केले.मराठी भाषेचे स्वरूप हे पांगारकरांनी लिहिलेले पहिले पुस्तक. त्यात प्राचीन मराठी साहित्याचे थोडक्यात समीक्षण केलेले आहे. पांगारकरांचा पहिला मोठा ग्रंथ म्हणजे मोरोपंत–चरित्र –👇
आणि काव्यविवेचन (१९०८) हा होय. पूर्वार्धात दिलेले पंतांचे चरित्र तसेच उत्तरार्धातील पंतकाव्याचे विवेचन लेखकाच्या रसाळ व सहृदय पंतभक्तीचा नमुनाच म्हणावा लागेल. या ग्रथांने पांगारकर चांगलेच प्रसिद्धीस आले. पुढे त्यांनी अनेक विषयांवर संशोधन व लेखन करून ग्रंथनिर्मिती केली. 👇
मुळ कादंबरी ६०० पानांपेक्षा जास्त आहे. त्याचा संक्षेप जेमतेम १५० पानात असल्यामुळे कथानकाच्या मुळ गाभ्याला जरी धक्का लागला नसला तरीही कादंबरीची अद्भुतरम्यता खुपशी फिकट झाल्यासारखे वाटते. 👇
वीरधवलच्या आयुष्यात अनेक अद्भुतरम्य प्रसंग आहेत. नियती, चण्डवर्म्यासारख्या बलाढ्य शत्रूशी त्याची जन्मतःच गाठ घालून देते. पण, कीर्तीवर्म्याचे पिशाच्च वीरधवलची कशी पाठराखण करते आणि तो आपल्या नियोजित कार्यात कसा यशस्वी होतो, 👇
सुनिता देशपांडे ( ३ जुलै १९२५ - ७ नोव्हेंबर २००९ ) पुलंचे व्यक्तिमत्व भरात असताना सुनीताबाई फारशा प्रकाश झोतात नव्हत्या. खरंतर सुनीताबाईंनी पुलं बरोबर बरोबर अनेक नाटके व चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. नंतर बोरकर, मर्ढेकर, आरती प्रभू यांच्या #पुस्तकआणिबरचकाही 👇
काव्याचा मागोवा घेणारे कार्यक्रम सुरू केले तेव्हा रसिकांना सुनीताबाईंची ओळख झाली. १९९० मध्ये 'आहे मनोहर तरी' हे सहजीवनाचा मागोवा घेणारे चरित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध झाले, आणि त्याने साहित्य वर्तुळात खळबळ उडवून दिली. लेखिका म्हणून त्यांचे हे पहिलेच पुस्तक चांगलेच गाजले. 👇
गुजराती व इंग्रजी भाषेत त्याचे भाषांतरही झाले. त्यानंतर 'मन्याची माळ', 'मनातले आकाश', ' सोयरे सकळ' या पुस्तकातून त्यांची साहित्यिक म्हणून ओळख प्रस्थापित झाली. जीए कुलकर्णी यांच्याशी त्यांचा जो पत्र व्यवहार झाला त्या पत्रव्यवहाराचा संग्रह पुस्तक रूपात प्रसिद्ध झाला.. 👇
केशवसुत (७ ऑक्टोबर १८६६ - ७ नोव्हेंबर १९०५) आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे #पुस्तकआणिबरचकाही 👇
असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी काव्यातील सुनीत हा छंदःप्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही 👇
त्यांनी प्रचलित केली. सृष्टीतील सौदर्य काव्याला प्रेरक ठरते व तीत मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा दृष्टीने केशवसुत निसर्गाकडे बघतात. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपांखरूं’ (१९००) या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता होत. 👇