"शिवरायांच्याच अस्तित्वास नाकारणारे ऐतिहासिक सिनेमे"
हर हर महादेव, तानाजी किंवा सुसाट निघत चाललेले अलीकडचे शिवरायांवरील सिनेमे बघून तुमच्या भावना उत्कटतेला गेल्या? थोडक्यात तुम्ही सिनेमा बघताना अत्यंत भावनावश झालात?
मग हा थ्रेड खास तुमच्यासाठी
1
अफजल खान कोणामुळं मेला? कोणा एकाच्या शापानं?
त्या शापाचा परिणाम म्हणून शिवरायांच्या हातून तो पराक्रम "घडला"??
मग शिवरायांच्या अप्रतिम नियोजनाचं काय, ज्याच्यामुळं त्याला घनदाट जंगलात आणि सह्याद्रीच्या अवघड पर्वतरांजीत येणं भाग पडलं?
2
आपल्या तेजतर्रार बुद्धीनं प्रसंगानुरूप केलेल्या नियोजनास अत्यंत काटेकोरपणे अंमलात आणणाऱ्या शिवरायांमधल्या एका उत्कृष्ठ व्यवस्थापन कौशल्याचं काय?
शिवरायांमधल्या "चपळतेचं" काय जीनं सेकंदाच्या वेगाने शत्रूला कळायच्या आत "स्वराज्यावरील संकटास" ठार करायचं ठरलेलं नियोजन तडीस नेलं?
3
शिवरायांच्या दुर्दम्य साहसाचं काय ज्यानं बलाढ्य शत्रू आणि त्याच्या अतिप्रचंड सेनेच्या मध्यावर जाऊन त्यांची आतडी टराटरा बाहेर काढली?
4
हे सिनेमे भाबड्या शिवभक्तांच्या मनावर नेमकं काय बिंबवतात?
शिवरायांचं कर्तृत्व हे नाममात्र, खरा न्याय केला कोणा एका "माणसाच्या" काल्पनिक शापाने !
शिवरायांचं कर्तृत्व गेलं खड्ड्यात, त्यांच्या अंगात येऊन भगवान "नरसिंहाने" ते कार्य "करवून घेतलं" !!
5
मित्रहो, आज २०२२ मध्ये बसून आपण समजू शकतो शिवरायांचं कर्तृत्व, पण अशा विकृत सिनेमांचा मारा असाच चालू राहिला तर मात्र आणखी ५०-१०० वर्षांनी आपल्या येणाऱ्या पिढ्या शिवरायांना नाही "वाचणार" बरं, त्या पुजतील "नरसिंहाला", त्या उदो उदो करतील "शाप" देणाऱ्या "दैवी" माणसाला !!
6
स्वराज्यावर चालून येणारा उदयभान कोण होता?
हिंदू ना? मग "तानाजी" सिनेमात त्याचा पेहेराव मुस्लिम का?
१९३६ ला आलेला "संत तुकाराम" सिनेमा आठवतोय?
किती वर्ष झाली त्या सिनेमाला? ८६ वर्षे, बरोबर ना?
आज ८६ वर्षांनी काय समजतीये मेजॉरिटी पिढी?
तुकोबांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले?
7
विचार करा
"त्यांचं" हे "विकृत" नियोजन १००-१५० वर्षांचं असतं दोस्तहो आणि विषारी असलं तरी बहुज पोरं नासवत, पिढ्यान-पिढ्यांच्या मनात विष पेरत अत्यंत "सातत्याने" त्याला सत्यात उतरवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेऊन ही लोकं काम करत असतात,
8
दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे, प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रात, मग तो सिनेमा असो किंवा नाटके, शिक्षिताला "बाधित" करायचे असो व अशिक्षितास, पुरुष असो किंवा महिला, लहान असो किंवा मोठा, "त्यांच्या विषकार्यात" कधीच खंड पडत नाही
9
संघ स्थापनेवेळेसच "त्यांनी" देश नासवून आपण १०० वर्षांनी काय काय करायचं याच पक्कं नियोजन केलेलं "अध्यक्ष महोदय"!
पण याला छेद बसू लागला
कॉ.गोविंद पानसरेंनी "शिवाजी कोण होता" लिहिले इथपर्यंत ठीक होतं
त्याला प्रतिसाद मिळू लागला, ईथपर्यंतही कदाचित (त्यांच्या दृष्टीने) ठीक होतं
10
पण
पानसरे व्याख्यानं देऊ लागले
त्याला तरुणांमधून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला
१००-२०० कॉलेजांमध्ये जाऊन त्यांनी व्याख्यानांमधून "खरा" शिवाजी समजावून सांगण्याची प्रतिज्ञा केली
इथंच "त्यांचं" बिनसलं !
11
काय सांगत होते पानसरे?
ते सांगायचे
शिवरायांनी सर्वसामान्यांमध्ये जागवलेला स्वाभिमान, न्यायाची भावना
शिवरायांची लोकहितैषी धोरणे
शिवरायांचे न्यायी आणि कोणत्याही धर्म-जातीविषयी द्वेषविरहित वागणे
12
शिवरायांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना
शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्यातील "सर्वसमावेशक" व्यवस्था
शिवरायांचे "सर्व" जातीधर्मांतील महिलांप्रती "सुरक्षा" धोरण
13
हे सर्व "ते" शिवराय होते, ज्याचा आदर्श येणाऱ्या हजारो-लाखो पिढ्या घेतील
ज्याला "वाचलं" जाईल, "पुजलं" नव्हे !
14
हे "त्यांच्या" विकृत कल्पनांना सरळ सरळ भेदणारं अजस्त्र "पानसरे अस्त्र" होतं !
त्यांच्या "हळुवार विषप्रयोगांना (सायलेंट पॉयजन)" मुळासकट उखडून फेकण्याची ताकद असणारा "विवेकी" आवाज होता !!
15
आम्हाला इयत्ता ४ थी ला इतिहासाच्या पुस्तकात "भवानी" मातेने शिवरायांना दिलेल्या तलवारीचा चक्क धडा होता दोस्तहो !
आता माझ्या वेळेसच्या किती पोरांच्या "धडा"वरच्या डोक्यात "त्या" धड्याने शिवरायांच्या पराक्रमाला"नाकारणारी" भवानी तलवार घुसवली असेल याची कल्पना केली तरी आश्चर्य वाटेल!
16
तर माझ्यासारख्या शिवभक्तांनो,
शिवरायांचं अस्तित्वच नाकारणाऱ्या
त्यांच्या पराक्रमाला, त्यांच्या धाडसाला, त्याच्यातल्या न्यायीपणाला, त्यांच्या कर्तुत्वाला मातीमोल करणाऱ्या या विक्षिप्त आणि विषारी विकृतीला वेळीच उघडं पाडणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा..
17
..अन्यथा आपल्या येणाऱ्या पिढ्यांकडून शिवराय "वाचले" नाहीत जाणार तर "पुजले" जातील !
शिवराय वाचले गेले तरच त्यांचे आदर्श घेता किंवा देता येतील, पुजले गेले तर मात्र त्यांच्या कर्तुत्वाला मातीमोल करण्यामध्ये आपल्या २०२२मधल्या "मौनाचा" खारीचा वाटा असेल यात तिळमात्र शंका नाही !!
18/18
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
स्वातंत्र्य - जी कालपर्यंत अमूर्त कल्पना होती, आज ती मूर्त स्वरूपात येत होती.
जे, काळ एक स्वप्न होते, ते आज सत्य ठरणार होते.
जो, कालपर्यंत एक संकल्प होता, तो आज सिद्ध होणार होता.
1
कालपर्यंत गुलाम असलेला एक देश आज स्वतंत्र होणार होता.
पारतंत्र्याचा काळोख संपून स्वातंत्र्यासाठी मंगल प्रभात आज उगवणार होती.
गप्पागोष्टी चालल्या होत्या, आम्ही साजऱ्या केलेल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण निघाली होती
2
स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला, त्या दिवशी २६ जानेवारी १९३० ला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते.
म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या लढाईतील आम्ही सैनिक आहो
3
६ तारखेला आमच्या लग्नाच्या वाढदिनी रायगडावर माथा टेकवून आलो
सदर पहिल्या फोटोतल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ एक गाईड जिवाच्या आकांतानं आलेल्या शिवभक्त कुटुंबाला सांगत होता -
1
"या पुतळ्याला संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत रोज सकाळी हार घातला जातो"
राज्य तसेच देशभरातून असंख्य कुटुंबं, लोक रायगडाला भेटी देतात, त्यांच्या कानावर मनोहर भिडेंच्या शिवछत्रपतींवरील हाराचे "उपकार" पोटतिडकीनं घालून
2
मी देवळात जातो का?
- तर जातो !
मी हिंदू सणवार साजरे करतो का?
- तर करतो !
मग तुम्ही माझ्या कशावर नाराज आहात?
माझ्या,
धर्मचिकित्सेवर?
धर्मातील अनिष्ठ रूढी, चालीरीतींवर बोलण्यावर?
की, २०१४ पासून वाढत चाललेल्या कट्टर धर्मांधतेवरच्या बोलण्यावर?
1
काय म्हणता तुम्ही?
- आपल्या धर्माला नावं ठेऊ नका, धर्माभिमान बाळगा !
संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना मारणारे तत्कालीन सनातनी, तुकोबांचे तुकडे करून ठार मारणारा मंबाजी, ज्योतिबांवर मारेकरी धाडणारे मनुवादी, महात्मा गांधीजींवर गोळ्या झाडणारा गोडसे ते
2
दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश यांची हत्या करणारी सनातन संस्था हे सर्व मुस्लिम होते का?
- तर नव्हते !
काय म्हणतात ते?
- आपल्या धर्माला नावं ठेऊ नका, धर्माभिमान बाळगा !
हे प्रत्येकाने ऐका विशेषतः द्वेषाचा डोस घेऊन हिंदुत्ववादाच्या अंधाऱ्या गर्तेत बुडालेल्या प्रत्येक "शिक्षित" बहुजन अंधभक्ताने तर जरूर ऐकावे
या नीच माणसानं परवा शिवरायांवर गरळ ओकली
आज तो ज्योतिबा-सावित्रीबाई फुलेंवर घसरला
1
मध्ये एकाने "द्वेषधुंद" अवस्थेत इंग्रजीमध्ये संभाजी महाराजांवर अनैतिहासिक मुक्ताफळे उधळली होती
आरएसएस / भाजप च्या "खास" तालमीत तयार झालेली ही विषारी विचारवल्ली कशाप्रकारे महामानव, समाजक्रांतिकारकांबद्दल मनात खोलवर प्रचंड घृणा आणि पराकोटीचा मत्सर व हीनतेची भावना बाळगत असतात
2
याचं नमुणादाखल उदाहरण म्हणजे "विषारी भाज्यपाल कोश्यारी" !
जिजाऊ-शिवरायांपासून, ज्योती-सावित्री ते गांधी-दाभोळकरांपर्यंत सर्वांना हीन लेखणाऱ्यांच्या मेंदूने आपण अजून किती दिवस चालणार याचा आज झोपताना नक्की विचार करा मित्रांनो..
3
भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
- सुरेश भट
दुमदुमे जयभिमची गर्जना चोहीकडे!
सारखा जावे तिथे हा तुझा डंका जडे!
घे आता घे राहिलेल्या संघरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
1/7
कोणते आकाश हे तु आम्हा नेले कुठे!
तु दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
2/7
कालची सारे मुके आज बोलु लागले!
अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले!
घे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
एक आम्ही जाणतो आमुची तु माऊली!
3/7
...बळीराजा...
बळी !
सात काळजाच्या आत जपून ठेवावा,असा निरागस ‘माणूस’ !
आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !!
भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!!
1/10
बळी–हिराण्याकशिपुचा पणतू,प्रल्हादाचा नातू,विरोचानाचा पुत्र,कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता.भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व!सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट,एक महातत्त्ववेत्ता!
2/10
या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे - आपली माणसे, आपल्या रक्तामांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे ! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्त्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही,अशी माणसे.
3/10