मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. #मंत्रिमंडळनिर्णय
✅ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द
✅ कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ५०० हेक्टर जमिनीला फायदा
✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर,औरंगाबाद खंडपीठ येथे मा. मुख्य न्यायमुर्ती यांचे अति.सचिव ही पदे निर्माण करण्यास मान्यता
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविले. आता मिळणार दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना लाभ मिळणार
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करणार. २ हजार ५८५ लाखाचा निधी देण्याचा निर्णय
✅ अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ.
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. अधिसंख्य पदांवर सामावून घेणार
✅ 'जेएसपीएम विद्यापीठ, पुणे' या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु , प्र कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केल्याप्रमाणे होणार. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करणार
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येईल
✅ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास मंजूरी. भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या. ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता
✅ आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ आता पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस- आयओएन, व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेणार. भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
... @msrtcofficial ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक, दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता-टापटीपपणा ठेवून गाड्यांची निगा राखा आणि राज्यातील जनतेला दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
सीएनजी बसेससाठी चेसिस उपलब्ध होत नसल्याने आणि सीएनजी पंपांची कमी संख्या पाहता सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल बसगाड्या वाहने एसटीच्या ताफ्यात घेण्यास आणि पुणे व सांगली विभागाकरिता १८० बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यासही मुख्यमंत्री @mieknathshinde यांची मान्यता
इंदू मिल परिसरात #भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू असून या कामाची मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी स्मारकस्थळी भेट देऊन पाहणी केली. सामाजिक न्याय, एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला.
पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री डॉ. बालाजी किणीकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांचेसह @MMRDAOfficial आयुक्त एस. व्ही आर. श्रीनिवासन, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
दादरच्या इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून या स्मारकाचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग घेत असलेल्या खबरदारीचीही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी माहिती घेतली.
ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग फैलवणार नाही याची काळजी घ्या. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी निर्देश दिले.
नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली घोषणा
➡️ उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे #पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.