सावरकरांना "माफीवीर" कुणी बनवलं??
कॉंग्रेसने की भाजपने??
- डॉ. सुनील देशमुख.
७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉंग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही. उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचीच सरकारे होती "पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते."
या देशासाठी योगदान देणार्या कोणालाही कॉंग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.मला आठवतं सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो!!
इतिहासाचे गुरुजी समुद्रात घेतलेल्या उडीचं वर्णन करू लागले की अंगावर शहारे उभे राहायचे आणि काळ्या पाण्याचे वेळी झालेला छळ ऐकला की मन सुन्न व्हायचं!
पण या मास्तरांनी कधीही आम्हाला सावरकरांनी माफी मागितल्याच, इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याचं किंवा...
आपल्या राष्ट्रपित्याच्या हत्येत त्यांच नाव आल्याच कधीही आम्हाला कळू दिल नाही. कारण कॉँग्रेस आणि गांधी-नेहरूंच्या विचारांचे संस्कार!!! आमच्या मनामधे सावरकरांची प्रतिमा एक थोर साहित्यिक, राष्ट्र कवि आणि स्वातंत्र्यवीर अशीच कायम रुजवली गेली होती.
सावरकरांविषयी कमालीचा आदरही होता,
पण २०१४ मध्ये भाजपा सरकार आले आणि गांधी-नेहरू कसे हिंदू विरोधी हे दाखवायला आणि सावरकरच कसे वीर होते याची अतिशयोक्ती करण्याच्या नादात गांधी नेहरूंची बदनामी करायला सुरुवात केली गेली. इथूनच खऱ्या अर्थाने सावरकरांच्या 'वीर' पणाची पडझड सुरू झाली.
कारण...
क्रियेला प्रतिक्रिया तर येणारच ना!
डाव्यांनी मग उत्तरादाखल आजपर्यंत माहीत नसलेले सावरकरांचे माफीनामे, इंग्रजनिष्ठा, पेन्शन आणि इतर बाजू लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. कॉँग्रेसच्या ७० वर्षात सावरकरांची कधी बदनामी झाली नसेल तेवढी २०१४ पासून झाली.
मला वैयक्तिक सुद्धा सावरकरांनीविषयी ह्या सगळ्या गोष्टी भाजप सरकार आल्यानंतर कळल्या आणि सावरकरांविषयी पहिल्यासारखा आदर आता राहिला नाही. एक साहित्यिक, कवी म्हणून आजही आदर आहे.
मग तुम्ही ठरवा...
सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं?
तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही विचारा सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून पेन्शन घेतली हे तुला कधी कळालं?
उत्तर असेल २०१४ नंतर...
मग आता तुम्हीच ठरवा सावरकर माफीवीर होते हे लोकांना कुणामुळे समजलं?
आमच्या मनाला वाटेल त्यांच्यावर आम्ही ईडीची कारवाई करू शकतो, या भाजप नेत्यांच्या अहंकाराने आता कडेलोट केला आहे. महाराष्ट्र ही समृध्द राज्याची जननी आहे, हे ठाऊक असल्याने आपल्या सत्तेआड कोणी येऊ नये, अशी खूणगाठ बांधलेल्या भाजप नेत्यांनी ईडीचा पध्दतशीर...
वापर केला आणि जे आडवे येतील त्यांना ठरवून वाटेला लावलं. हे करण्याच्या मागे महाराष्ट्रातले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव सगळेच विरोधक घेत आहेत. आता तर सामान्य माणूसही फडणवीसांच्या चेहर्याखालची मानसिकता ओळखू लागला आहे. आव कितीही प्रामाणिक असला तरी आता या....
प्रामाणिकपणावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. माजी गृहमंत्री अनील देशमुख असोत वा नवाब मलिक किंवा संजय राऊत. भाजपची अडचण दूर करण्यासाठी या नेत्यांविरोधी कारवाई झाल्याची उघड चर्चा होते आहे. ज्यांच्या विरोधात कारवाई झाली त्या नेत्यांच्या धर्मपत्नी, त्यांची मुलं आणि नातलगही आता...
तुम्हाला केतन पारीख आठवतोय..? मधोपूरा बँक आठवतेय...?
तो केतन पारीख, ज्याने १६०० कोटींचा शेअर्स घोटाळा केला. त्यात ती माधोपूरा बँक सपशेल बुडाली. CBI ने चौकशी केली, केतन पारीखला अटक झाली. काही महिन्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला, त्याला जामीन मंजूर झाला...!
त्या जामीनाविरोधात मधोपूरा बँकेने आणि CBI ने आव्हान दिले...
हे आव्हान (अपील) बँकेने मागे घ्यावे आणि जामीनाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून माधोपूरा सहकारी बँकेच्या एका संचालकाने या केतन पारीखकडून अडीच कोटी रुपयांची लाच घेतली होती.
ही लाच घेतली गेल्याचा अहवाल अर्ज गुजरातचे तत्कालीन DGP (क्राईम) श्री. कुलदीप शर्मा यांनी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. सुधीर मांकड यांना पाठवला.
"गुजराथी-मारवाडी निघून गेले; तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी रहाणार नाही", अशी मुक्ताफळं उधळणार्या भगत'सिंग' कोश्यारी, जरा ऐका...
तुमच्यासकट, सगळ्या गुजराथी-मारवाड्यांना 'शिंगा'वरुन महाराष्ट्राबाहेर घेऊन जा... शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला काही फरक पडणं तर, सोडाचं...
उलट, तो प्रथमच मोकळा श्वास घेऊन सुखा-समाधानात जगेल!
जनहो, आजवर महाराष्ट्राच्या खेडोपाडी भोंदू 'भगत' मौजूद असलेलं आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलोत... पण, आता भोंदू 'भगता'चा शिरकाव, महाराष्ट्राच्या "..........." सुद्धा???
आजवर सातत्याने, महाराष्ट्राचा पदोपदी अवमान करुन, राज्यपालपदाचा सन्मान आणि प्रतिष्ठा साफ धुळीला मिळवणार्या 'भगतसिंग कोश्यारीं'चा निषेध असो!
पूर्वी म्हणायचे...
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी!
ते काका आज पुन्हा भेटले. त्यांचा हास्यक्लब संपायला आणि मी बागेत पोचायला एक वेळ आली. थोडे खट्टू होते. म्हणाले 'आता मोदीजींनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली रेल्वे प्रवास सवलत पण काढून घेतली' मी फक्त दीर्घ हुंकार भरला.
माझी नजर त्यांना छद्मी वाटली की काय कोण जाणे पण त्यांनी दुसर्याच क्षणी स्वतःला सावरलं आणि म्हणाले 'अर्थात यातही काही दूरगामी उद्देश असणार, उगाच नाहीत करणार असं मोदीजी'.
मी म्हणालो 'काका अगदी बरोबर आहे, मला तर हा मोदीजींचा मास्टरस्ट्रोक वाटतो.
अनावश्यक प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला नाही, 'ठायीच बैसोनी करा एकचित्त' असं महाराजांनी पण म्हणून ठेवलंय. प्रवासाला धडपडत जाऊन दुखापत करून घेण्यापेक्षा घरी टीव्हीसमोर बसून 'मन की बात' बघत राहणं कधीही चांगलंच!
मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला, तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे.
महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंद्राचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे 'मुंबई कोणाची?' हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.
मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते. मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते.
दत्तकुमार खंडागळ - संपादक वज्रधारी, मो. 9561551006
शिवसेनेतील भाजप पुरस्कृत बंडाळीमुळे सध्या राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि पक्षालाच मुळासकट उखाडून काढण्याचा प्रयत्न ...
शिवसेनेतील आमदारांना हाताशी धरून केला गेला आहे. शिवसेनेत या पुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा लोकांची बंडाळी झाली पण या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड मोठे आणि धक्कादायक आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देणारे आहे.
उध्दव ठाकरेंच्याकडे १७ आमदार उरलेत तर शिंदे तब्बल ३७ आमदार घेवून पळाले आहेत. आज उध्दव ठाकरेंची झालेली अवस्था बघून पुरंदरच्या तहाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. ११ जून १६६५ साली पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांचा मोठा पराभव झाला होता.