SandeepWankhede Profile picture
Nov 26 11 tweets 4 min read
1789 च्या अगोदर फ्रेंच समाज त्रैवर्गिक होता.
१. #पाद्री किंवा #ख्रिश्चन धर्मगुरु- जमिनीच्या पाचव्या भागाचे, अपार संपत्तीचे मालक आणी म्हणुन शान-शौकत वाले ! टाईथ नामक कर वसुल करणारे
२. कुलीन वर्ग- सेना, चर्च, न्यायालय इ विभागातील राजा द्वारे नियुक्त अधिकारी, शेतकऱ्यांकडुन (१/११)
विभिन्न प्ररकारचे कर वसुल करणारे!
३. जनसाधारण- मध्यम वर्ग, शेतकरी, मजदुर, शिल्पी, व्यापारी, बुद्धीजीवी इ.
काहीं कडे धनसंपदा होती परंतु प्रतिष्ठा नव्हती. २ कोटी अर्धवेळ शेती करणारे अथवा वेठबिगार होते. हाच वर्ग करदाता होता. मध्यम वर्गात व्यापारी शिक्षक डॉक्टर वकिल लेखक कलाकार(२/११)
यांचा समावेश होता. यांना कुठल्याही प्रकारचे राजनैतिक अधिकार नव्हते. यांच्या प्रति प्रथम दोन वर्गांचा व्यवहार हि असमानतेचाच होता.
१४,१५,१६व्या लुई राजांनी युद्धात व शान शौकतीत शाही खजाना रिता केला होता. वर्साय चा राजमहल राजकोषीय तुटीचा अडडा बनला होता. करांचा सर्व भार शेतकरी(३/११)
व जनसाधारण लोकांवर होता. १६व्या लुईने राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु कुलीनांनी विषेशाधिकाराचा वापर करत कुठल्याही करभार त्यांच्यावर लादु दिला नाही. याचा रोष जनमानसात उमटत होता. म्हणुन असं म्हणता येते, कि फ्रेंच राज्यक्रांती दोन गटातील(४/११)
वर्ग संघर्ष होता. एक राजकिय दृष्ट्या प्रभावशाली वर्ग व दुसरा आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली वर्ग..
या क्रांती ची बीजे,....
#मॉन्टेन्सक्यु (१६८९-१७६५) याच्या 'स्पिरिट ऑफ लॉज' ...
#वाल्टेयर (१६९४-१७७८) याच्या ' लेटर्स आन द इंग्लीश' मध्ये व
#रुसो (१७१२-१७७८) याच्या एमिली, सोशल (५/११)
कॉन्ट्रॅक्ट व रुसोनी मध्ये सापडतात. मॉन्टन्सक्यु या दर्शनिका च्या जन्मा नंतरच्या १०० वर्षातील घुसळणीतुन #स्वातंत्र्य #समता #बंधुता या त्रिसुत्रीला आकार आला. याचाच परिणाम म्हणुन १७८९ ची फ्रेंच राज्य क्रांती झाली. १७८९-१७९९ हा फ्रेंच इतिहासातील राजकिय व आर्थिक उलथा पालथी व (६/११)
आमुलाग्र बदलाचा काळ होता. जनरल असेम्बलीत मनाधिकारा च्या मुद्द्यावर मतभेद होऊन जन-साधारणांनी टेनिस कोर्टात राष्ट्रीय सभेची स्थापना केली. पुढे त्यातुन संविधान सभेची निर्मिती केली गेली. याला 16व्या लुई ने मान्यता दिली. थोड्याश्या गैरसमनातुन बास्टील किल्लाचा पाडाव झाला व १४ (७/११)
जुलै१७८९ ला फ्रेंच राज्यक्रांतीची सुरवात झाली. पुढे नेपोलियनने फ्रेंच साम्राज्याच्या विस्ताराने या क्रांतीचा काही प्रमाणात पाठपुरावा केला. राजा गादीला मुकला. प्रजासत्ताकाची स्थापना झाली. रक्तरंजीत संघर्षाचा काळ आला. शेवटी #नेपोलियनची हुकुमशाही प्रस्थापित झाली.१८१४ तो मरे(८/११)
पर्यंत.!
भारतात म.फुले यांच्या जन्मापासुन (१८२७) ते २६ नोव्हेंबर १९४९ या काळात सामाजीक क्रांती घडत राहीली. संविधान निर्माण झाले स्विकारले गेले. मनुशाही मेली. लोकशाही आली. आर्थिक परिस्थितीत थोडाफार फरक पडला असला तरी सामाजीक विषमता आजही कायम आहे. तिथं वर्ग संघर्ष होता. इथं(९/११)
जात व वर्ण संघर्ष आहे. न संपणारा हा संघर्ष केवळ संविधानाच्या वेसणाने आवळुन ठेवला आहे. हिच संविधानाची ताकद आहे व ते संविधान घडविणाऱ्या महामानव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांच्या मनगटाची ताकद आहे. (१०/११)
जाती रचनेच्या विषमतेचे चटके सोसणाऱ्या माझ्या तमाम भारतीय नागरिकांना #संविधान_दिवस च्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉(११/११)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SandeepWankhede

SandeepWankhede Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(