जेव्हा कन्याकुमारी ला विवेकानंद, थिरुवल्लर आणि राजीव गांधी यांना नमन करून 7 सप्टेंबर ला भारत जोडो यात्रा सुरू केली होती तेव्हा विरोधकांसोबत काँग्रेस समर्थकांमध्ये पण शंका होती की यात्रा कशी होईल, लोकं येतील का,राहुल खरंच
एवढं चालेल का वगैरे. त्यासोबतच अनेक आक्षेपासोबत प्रश्न सुद्धा होते की फक्त तिरंगा का? पक्षाचा झेंडा ऐच्छिक असं का? यात्रा मार्ग असाच का , तसा का नाही, xyz ठिकाण का मार्गात नाही, ज्या सिव्हिल सोसायटी व लोकांनी सत्तेतून घालवण्यासाठी नसलेल्या मुद्द्यांवर बदनामी करून आंदोलन उभारले
ते यात्रेत काय करत आहेत वगैरे वगैरे.. जेव्हा जवळपास 1500 km चा प्रवास करून भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये दोन महिन्याने पोहोचली तेव्हा या सगळ्या शंकेचं निरसन झाले होते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये लाखो लोकांना भेटत, त्यांचे प्रेम घेत, एकही दिवस वेळ
न चुकवता राहुल देगलूर पर्यंत पोहोचला होता.
जेव्हा भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये पोहोचली होती तेव्हा सगळ्या देशाचे त्यावर लक्ष केंद्रित झाले होते. याला राजकीय आणि सामाजिक कारणे सुद्धा आहेत. महाराष्ट्र हे नेहमीच देशासाठी दिशादर्शक राज्य ठरले आहे. इथल्या सामाजिक घटना आणि
राजकारणाचे पडसाद देशभर उमटतात. मविआचा अभूतपूर्व प्रयोग, नुकताच झालेला सत्तापालट आणि खोकेबाजीचा आरोप, काँग्रेस मधील गटबाजी, मरगळलेल्या पक्षात जीव टाकण्याची गरज या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस चं काय होणार हा प्रश्न होताच.
देगलूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने
महाराष्ट्र यात्रेची सुरवात जबरदस्त झाली आणि ज्याला म्हणतात ना It started with a bang.. एक नवीन ऊर्जा भरली. पुढचे 14 दिवस नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा या 5 जिल्ह्यातून जात असताना, महाराष्ट्र राज्याने भारत जोडो यात्रेची पातळी एका वेगळ्याच उंचीवर नेलीये. यात्रेत
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ने सहभागी होत मविआ एकत्र आहे हा निरोप दिलाच, सोबत आम्ही एकत्र येऊन लढायला तयार आहोत हे देखील दाखवून दिले.
भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्र टप्प्यात या यात्रेला जोरदार राजकीय रंग चढला. RSS आणि सावरकर वर थेट नाव घेत टीका करत राहुलने मुद्दाम फुटेज न
देणाऱ्या मीडिया ला मागे यायला भाग पाडले. वनवासी नव्हे तर आदिवासी च आणि ते पण देशाचे पहिले मालक ही भूमिका ठासून मांडली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आवाज होते आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांना मार्ग दाखवण्याचे काम केले हे वाक्य प्रत्येक मराठी मनाला साद घालणारी होते.
नांदेड सभेतील #डरो_मत हा संदेश जर अमलात आणला तर आयुष्याला कलाटणी देणारा आहे.
या यात्रेत आतापर्यंत बघितलेली आणि सगळ्यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे महिलांचा मिळणारा अफाट प्रतिसाद. लहान , तरुण,थोर, शहरी, ग्रामीण, खेड्यापाड्यातील, उच्चभ्रू वर्तुळातील, परपुरुषापासून नजरेपासून
पण दूर राहणाऱ्या स्त्रिया बिनदिक्कत सगळ्या थरातील महिला राहुल ची गळाभेट घेत आहेत, सोबत हातात हात घेऊन चालत आहेत, ओवाळत आहेत, मायेने नजर काढून कानशिलावर बोटं मोडत आहेत. हा एक आश्वासक नजारा आहे.
समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना राहुल भेटतोय. दलित, आदिवासी, मुस्लिम, LGBTQ+ संघटना
यांच्यासोबत संवाद साधतोय, ऐकून घेतोय. कोणीतरी एककल्ली मनकी बात थोपवण्याऐवजी आपलं ऐकून घेतोय हे खूप वेगळं आहे. कित्येक जण जे सोबत चालले, ते जेव्हा त्यांच्या सूचना, अडचणी, गाऱ्हाणी मांडत होते तेव्हा आपला शहाणपणा मिरवण्याऐवजी "आप बोलो, मै सून रहा हू" हे ऐकणे लोकांसाठी सुखद धक्का
होता. खुपश्या लोकांना तो भेटल्यावर overwhelming वाटत होते, भरून येत होते, तेव्हा त्यांना आश्वस्त करून राहुलचे बोलणे हा पण एक वेगळाच अनुभव येत होता लोकांना. यात्रेतील असंख्य फोटो बघून कळून येते की हे खरे फोटो आहेत, रिकाम्या टनेल मध्ये, बोटीत कोण नसताना, गुहेत जाऊन काढलेले खोटे
फोटो नाहीत. या फोटो / व्हिडीओ मधल्या संवेदना ह्या खऱ्या मानवी आहेत.
विविध रंगी , गुंतागुंत असलेल्या भारतीय समाजापुढे असणाऱ्या समस्यांची जाणीव राहुल ला आहे हे दिसतेय. त्याच सोबत त्या समस्या व्यवस्थित रॅशनल आणि लॉजिकल रित्या सोडवायला हवे ही पण त्याला जाणीव आहे आणि त्याला लागणारा
वेळ देण्याची आणि कष्ट घ्यायची त्याची तयारी दिसते. सूट बूट की सरकार, नोटबंदी, गब्बर सिंग टॅक्स, कोवीड, कृषी कायदे याबद्दल राहुल जे सावध करत होता त्याचा परिणाम संपूर्ण भारताला दिसून आलाय.
24*7 राजकारण करून, प्रपोगंडा चा भयंकर मारा करून, जिवंत माणसाला फक्त मतदार नावाच्या कमोडिटी
वर आणून ठेवलेल्या आणि मानवी हितापेक्षा निवडणूक जिंकणे हे उद्दिष्ट असणाऱ्या कॉर्पोरेट मॅनेजमेंट वाल्या राजकीय विरोधकांना आता काय करावे हे कळेनासे झालेत. कधी कोण टी शर्ट ची किंमत काढतोय, तर कोण स्त्रियांसोबतच्या फोटोवरून खालच्या पातळीवर टिप्पणी करतोय. पण एक बदल हा दिसतोय की
जे काँग्रेस समर्थक नाहीत किंवा कधी काळी विरोधकच होते पण सेन्सिबल जाणीव असणारे लोक आहेत ते अश्या घाणीला, अश्या ट्रोलिंग ला स्वतः विरोध करत आहेत. पक्षातील सरंजामी लोकं देखील गडबडले आहेत. राहुल पुढे चालून गेलाय पण या अफाट जनसमुदाय, जो राहुल ला बघून भारावून गेलाय आणि बदल अपेक्षित
करतोय, त्याला उत्तरे या नेत्यांनाच द्यावे लागणार याचं भान त्यांना आलंय.
या यात्रेमुळे राहुल ची नॉन सिरीयस, केअर लस राजकारणी, पप्पू अशी अजस्त्र मीडिया मॅनेजमेंट मुळे जी खोटी इमेज बनवली होती, ती आता टरकावली गेली आहे. गेली अडीच महिने, रोज सकाळी 6 वाजता सुरू करून, दिवसभर 25 30 किमी
चालणे, ते पण वेळ न चुकता, लाखो लोकांना भेटत, ऐकत चालणारा व्यक्ती हा सिरीयस तर आहेच पण सोबत दृढ निश्चय सोबत संयमी पण आहे हे सगळ्यांना कळून चुकलं आहे.
राहुल यात्रेत होणाऱ्या सभांमधून एक वैचारिक बैठक मांडतोय. जी पक्षासाठी एक मार्ग दाखवणारा ठरतोय. भाजप आणि त्याला चालवणारी संस्था RSS
वर जोमाने टीका करतोय, संस्थात्मक संरचनेत कट्टर उजव्या विचारसरणी ची माणसे RSS घुसवत आहे आणि त्यामुळे तिरस्कार, राग, घृणा वाढण्यास मदत होतेय हे तो बोलून दाखवतोय. मूठभर धनाढ्य उद्योगपतींच्या शोषण आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाबद्दल वारंवार सांगतोय. आप आदिवासी हो, वनवासी नही यातून
भाजपच्या शब्दच्छलाला उघडा पाडतोय. संविधान सगळ्यांना एका समान पातळीवर आणतो आणि ते प्रत्यक्षात आणले पाहिजे हे पण बोलून दाखवतोय. हे बोलताना तो विरोधक संपवून टाका, त्यांच्या पासून देश मुक्त करा अशी खुनशी भाषा तो वापरत सुद्धा नाहीये. एकत्र येऊया, देश जोडूया, संवाद चालू राहिला पाहिजे
अशी शहाणी, बुद्धिवादी भूमिका राहुल घेतोय. राहुलची आज्जी , वडील हे ज्यापद्धतीने शहीद झालेत हे माहीत असून पण राहुल अकृत्रिमपणे गर्दीत जातोय, सहज नैसर्गिकरित्या लोकांसोबत संवाद साधतोय. त्याच्या वागण्यात बोलण्यात स्पर्शात कमालीची सहजता, विश्वास आणि आपुलकी आहे.
त्याला माहित आहे ही
लढाई एका दिवसाची नाहीये आणि सोपी तर अजिबातच नाही. पण तो प्रेमाने जग जिंकत निघालाय.
राहुलच्या पणजोबा, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःच्या नजरेतून डिस्कव्हरी ऑफ इंडिया केलेली. आता ही 3500 km ची भारत जोडो यात्रा त्यांच्या पणतू साठी नक्कीच "रि"डिस्कव्हरी ऑफ इंडिया
बनेल असं दिसतंय. तेव्हा या प्रेमाच्या, एकत्र येण्याच्या, भारत जोडण्याची इच्छा असलेल्या यात्रेला सलाम आणि शुभेच्छा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
प्रॉपगंडा (बऱ्याचदा लोक प्रपोगंडा पण उच्चारता) हा शब्द आताच्या इंटरनेट मुळे एकदम जवळ आलेल्या आणि फास्ट झालेल्या जगात खूप महत्वाचा झाला आहे. माझ्या वाचन आणि समजुतीनुसार एक छोटासा प्रयत्न, यावर लिहिण्याचा..
जी मला सगळ्यात जवळ जाणारी व्याख्या वाटली ती मेरिअम वेबस्टर प्रमाणे आहे.
++
Propaganda - noun - ˌprɒp.əˈɡæn.də - spreading ideas, information or rumor for the purpose of helping or injuring an institution, a cause or a person.
प्रॉपगंडाचा वापर इतिहासात कित्येकदा झालाय आणि यापुढे होत पण राहेल. मानव हा भयंकर आशावादी आहे. भले त्याचे जगायचे, खायचे,
++
कमवायचे वांदे असतील पण त्याला चकचकीत स्वप्ने दाखवले की तो नेहमी भुलून जातो. ही स्वप्ने नेहमी चेहरे, रूप, मुखवटे बदलत असतात. जर काही गेल्या वर्षांत जगात आपण निरीक्षण केले तर दिसून येईल की बऱ्यापैकी मोठ्या देशांत उजव्या, कट्टर आणि मूलतत्त्ववादी विचारसरणीचे शासन आले,
++
देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या राजकारण्यापासून गल्लीतल्या पारावर बसलेल्या, मीडियातील धुरीणांपासून फेसबुक ट्विटर वर आभाळाला गवसणी घालणाऱ्या पोरांनी काँग्रेस संपली म्हणून डिक्लेअर करून पण झालं. पण काँग्रेस अशी संपत नसते. कारण काँग्रेस वर आधी टीका होत होतीच पण खासकरून 2014 नंतर
जेव्हा काँग्रेसमुक्त भारत च्या घोषणा दिल्या गेल्या किंवा ज्या लोकांचा देश उभारण्यात सिंहाचा वाटा आहे त्यांची कुजबुज करून बदनामी केली जाऊ लागली तेव्हा पक्षाच्या जीवावर मोठे झालेले मातब्बर नेते गप्प बसले, पक्ष सोडला पण पक्षचौकटीबाहेरची तरुण पिढी सोशल मीडियावर काँग्रेसचा इतिहास
विचारधारा जास्त समजून घेऊन बोलू लागली, आत्मीयता दाखवू लागली आणि विखारी प्रचार मुद्देसूदपणे खोडुन काढू लागली. नेहरूंच्या नेतृत्वाच्या उंचीपुढे मार्केटिंग करून बनवलेली प्रतिमा किती खुजी आहे, गोडसेच्या नावाची जपनाम करणाऱ्यांना गांधीबाबा पुढेच झुकावे लागते हा विरोधाभास, सुभाष वि.
जातीव्यवस्था ही कीड भारतीय उपखंडातील प्रत्येक धर्मात आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख धर्मात जात ही गोष्ट धर्माधिष्ठित प्रकार नसली तरी शोषणाला वैतागून, राजाश्रय व आर्थिक सुबत्ता मिळावी म्हणून मोठा वर्ग धर्मांतरित झाला, त्यांच्यासोबत ही प्रथा आली.
1/
आपण जर ढोबळ आकडेवारी व समाज वास्तव पाहिलं तर 80 ते 85% धर्मांतरित भारतीय हे शोषित म्हणजे महात्मा फुले यांच्या शब्दात सांगायचे तर "शूद्रातिशूद्र" वर्गातून इतर धर्मात गेलेत. मुस्लिम समाज याला अपवाद नाहीये. आपण आडनावे जरी बघितली तरी हा मुद्दा लगेच लक्षात येईल. खूपशी आडनावे
2/
कामावरून देखील आहेत जी हिंदू धर्मात पण आढळतात. हा बहुसंख्य वर्ग शोषित जातीतून येत असल्याने यांचं पोट हातावर होते. तेव्हा हलाखी, कष्ट रोजचेच आणि राज्यकर्त्यांकडून होणारा त्रास वेगळाच. आपण मुस्लिम लोकांवर अत्याचार होणारे व्हायरल विडिओ बघितले तर हे सर्वसामान्य येणारी लोकं आहेत.
3/
जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान, फक्त या पदापेक्षा खूप जास्त मोठे आहेत. त्यांची थोरवी खरंच समजून घ्यायची असेल तर त्यांना जगाच्या पातळीवर ठेवून बघा. १९४७ला एकत्र स्वतंत्र झालेल्या भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश(तत्कालीन पूर्व पाकिस्तान) या तिन्ही देशांची
सद्यस्थिती कॅम्पेअर करा. जनजीवन, शिक्षण पद्धत, पायाभूत सुविधा या अंतर्गत गोष्टी आहेतच पण या सोबत जागतिक पातळीवरचं भारताचं स्थान सांगते की पायाउभारणी कशाला म्हणतात. देशाच्या नेतृत्वाने जगात आपल्या देशाचा ठसा उमटवायचा असतो. हा ठसा देशाची भूमिका, परराष्ट्र धोरण आणि स्वतःच्या
अभ्यासासोबत वैयक्तिक संबंधांचा देशासाठी वापर यातून साध्य होतो. फॅसिझमचा जोरदार विरोध, आशियाई एकता, अलिप्त चळवळ, आफ्रिकन देशांसोबतचे संबंध आणि तत्कालीन शीतयुद्धाच्या वादातून भारताला बाहेर ठेवण्याचं कसब यासोबत ज्याला स्टेट पॉलिसी म्हणतात त्याचा प्रभाव आणि परिणाम बघितले की कळून येते