Zubair N Profile picture
सारा जहां अदू सही, आओ मुकाबला करें। RT≠Endorsement , views are personal
Nov 27, 2022 23 tweets 5 min read
#longread
#भारत_जोड़ो_यात्रा आणि "रि"डिस्कव्हरी ऑफ इंडिया

जेव्हा कन्याकुमारी ला विवेकानंद, थिरुवल्लर आणि राजीव गांधी यांना नमन करून 7 सप्टेंबर ला भारत जोडो यात्रा सुरू केली होती तेव्हा विरोधकांसोबत काँग्रेस समर्थकांमध्ये पण शंका होती की यात्रा कशी होईल, लोकं येतील का,राहुल खरंच एवढं चालेल का वगैरे. त्यासोबतच अनेक आक्षेपासोबत प्रश्न सुद्धा होते की फक्त तिरंगा का? पक्षाचा झेंडा ऐच्छिक असं का? यात्रा मार्ग असाच का , तसा का नाही, xyz ठिकाण का मार्गात नाही, ज्या सिव्हिल सोसायटी व लोकांनी सत्तेतून घालवण्यासाठी नसलेल्या मुद्द्यांवर बदनामी करून आंदोलन उभारले
Sep 11, 2022 14 tweets 4 min read
प्रॉपगंडा (बऱ्याचदा लोक प्रपोगंडा पण उच्चारता) हा शब्द आताच्या इंटरनेट मुळे एकदम जवळ आलेल्या आणि फास्ट झालेल्या जगात खूप महत्वाचा झाला आहे. माझ्या वाचन आणि समजुतीनुसार एक छोटासा प्रयत्न, यावर लिहिण्याचा..
जी मला सगळ्यात जवळ जाणारी व्याख्या वाटली ती मेरिअम वेबस्टर प्रमाणे आहे.
++ Propaganda - noun - ˌprɒp.əˈɡæn.də - spreading ideas, information or rumor for the purpose of helping or injuring an institution, a cause or a person.
प्रॉपगंडाचा वापर इतिहासात कित्येकदा झालाय आणि यापुढे होत पण राहेल. मानव हा भयंकर आशावादी आहे. भले त्याचे जगायचे, खायचे,
++
Aug 6, 2022 10 tweets 2 min read
देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या राजकारण्यापासून गल्लीतल्या पारावर बसलेल्या, मीडियातील धुरीणांपासून फेसबुक ट्विटर वर आभाळाला गवसणी घालणाऱ्या पोरांनी काँग्रेस संपली म्हणून डिक्लेअर करून पण झालं. पण काँग्रेस अशी संपत नसते. कारण काँग्रेस वर आधी टीका होत होतीच पण खासकरून 2014 नंतर जेव्हा काँग्रेसमुक्त भारत च्या घोषणा दिल्या गेल्या किंवा ज्या लोकांचा देश उभारण्यात सिंहाचा वाटा आहे त्यांची कुजबुज करून बदनामी केली जाऊ लागली तेव्हा पक्षाच्या जीवावर मोठे झालेले मातब्बर नेते गप्प बसले, पक्ष सोडला पण पक्षचौकटीबाहेरची तरुण पिढी सोशल मीडियावर काँग्रेसचा इतिहास
Mar 3, 2022 10 tweets 2 min read
मुस्लिम समाज आणि जातीव्यवस्था

जातीव्यवस्था ही कीड भारतीय उपखंडातील प्रत्येक धर्मात आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख धर्मात जात ही गोष्ट धर्माधिष्ठित प्रकार नसली तरी शोषणाला वैतागून, राजाश्रय व आर्थिक सुबत्ता मिळावी म्हणून मोठा वर्ग धर्मांतरित झाला, त्यांच्यासोबत ही प्रथा आली.

1/
आपण जर ढोबळ आकडेवारी व समाज वास्तव पाहिलं तर 80 ते 85% धर्मांतरित भारतीय हे शोषित म्हणजे महात्मा फुले यांच्या शब्दात सांगायचे तर "शूद्रातिशूद्र" वर्गातून इतर धर्मात गेलेत. मुस्लिम समाज याला अपवाद नाहीये. आपण आडनावे जरी बघितली तरी हा मुद्दा लगेच लक्षात येईल. खूपशी आडनावे
2/
May 27, 2021 9 tweets 3 min read
जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान, फक्त या पदापेक्षा खूप जास्त मोठे आहेत. त्यांची थोरवी खरंच समजून घ्यायची असेल तर त्यांना जगाच्या पातळीवर ठेवून बघा. १९४७ला एकत्र स्वतंत्र झालेल्या भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश(तत्कालीन पूर्व पाकिस्तान) या तिन्ही देशांची सद्यस्थिती कॅम्पेअर करा. जनजीवन, शिक्षण पद्धत, पायाभूत सुविधा या अंतर्गत गोष्टी आहेतच पण या सोबत जागतिक पातळीवरचं भारताचं स्थान सांगते की पायाउभारणी कशाला म्हणतात. देशाच्या नेतृत्वाने जगात आपल्या देशाचा ठसा उमटवायचा असतो. हा ठसा देशाची भूमिका, परराष्ट्र धोरण आणि स्वतःच्या