तो आनंदी असो वा दुःखी,
त्याला कोणीही समजू शकत नाही.
तो प्रियजनांसाठी प्रत्येक क्षण जगतो.
आयुष्यातील प्रत्येक क्षण
इतरांसाठी समर्पित करतो.
लहानपणापासून तारुण्यापर्यंत
आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस धडपडतो.
कधी अनाथ
होऊन कुटुंबाची धुरा सांभाळतो,
तर कधी भाऊ आणि बहिणींसाठी स्वतःच्या छोट्याछोट्या स्वप्नांचा त्यागही करतो.
कधीकधी तो कौटुंबिक परंपरा आणि कुटुंबाच्या आनंदासाठी आपल्या प्रेमाचाही
त्याग करतो.
अवांछित विवाह करतो, पत्नी
कशीही असली तरी तिला आधार देतो,
पत्नी सुंदर, विनम्र असेल, तर आपल्या नशिबाची वाखाणणी करतो
पत्नी कजाग असेल तर नरकाची शिक्षा ही भोगतो.
पिता बनतो, आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी आपले शरीर, मन आणि संपत्ती अर्पण करतो .
प्रत्येक लढ्यात तो गप्प राहतो तो आपला संघर्ष कोणाला सांगू शकत नाही. पै-पै गोळा करून तो आपल्या स्वप्नातील घर बांधण्याचा प्रयत्न करतो.
आयुष्यभर प्रत्येक पैशांचा हिशोब ठेवतो. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वतःला दडपून टाकतो.
या सगळ्या प्रवासात जिंकतो-हारतो पण शेवटी आपल्या मनात, आपल्या इच्छांच्या थडग्यात एकटाच राहतो.
प्रत्येकजण त्याच्याकडे काही न काही मागतो पण देत कोणी नाही.
आणि एक दिवस शांतपणे तो त्या अज्ञात प्रवासाला निघून जातो, जिथून परत कोणीही येत नाही...
पुरुषाचं दुःख नेहमी मौनच असतं...
प्रत्येक जण स्त्री दुःखाबद्दल बोलतात पण पुरुषांच्या दुःखाची कोणाला कल्पनाच नसते...
मी काल एक पोस्ट टाकली होती, "गरिबाला नाही माहीत कोणाचा धर्म धोक्यात आहे..."
खूप प्रतिक्रिया आल्या, DM आले. काही चांगल्या होत्या काही विचित्र होत्या. काहींनी धर्मद्रोही ही ठरवलं.😂😛
प्रत्येकाच्या मताचा मी नेहमीच सन्मान करतो.
त्याच पोस्ट ला संलग्न काही टिपण्णी करू इच्छितो.
उदा. १
आपण भिकाऱ्याला काही दान करतो. अन्न, पैसे वा इतर काही. आपण त्याला देताना विचार करतो का तो हिंदू आहे का मुसलमान?
तो भिकारी तुम्हाला विचारतो का, तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम किंवा इतर कोणते धर्मीय?
ही आहे गरिबी. ही आहे खऱ्या गरजवंतांची गरज. त्याला नाही फरक पडत तुम्ही कोण...
उदा. २
आपल्याला कडाक्याची भूक लागली आहे. आपल्याला समोर जे हॉटेल दिसेल त्यात आपण जातो. आपण विचारतो का जेवण बनवणारा कोण आहे? हिंदू-मुस्लिम किंवा इतर जातीधर्माचा? आपण जेवण ऑर्डर करतो आणि पटपट खातो आणि भूक शमावतो.
चला, एका कथेपासून सुरुवात करूया. एक म्हातारी बाई बसमध्ये बसली होती. पुढच्या स्टॉपवर, एक मजबूत, चिडखोर तरुण स्त्री बसमध्ये चढली आणि म्हातारीच्या शेजारी बसली. तिने स्वतःचा पूर्ण भार त्या वृद्ध स्त्रीवर टाकला. तरी वृद्ध स्त्री शांत होती.
तरुणीने वृद्धेला विचारले की, "मी एवढा तुम्हाला त्रास देतेय तरी तुम्ही तक्रार का नाही करत आहात?"
वयोवृद्ध महिलेने उत्तर दिले: "मला एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर असभ्य वागण्याची किंवा वाद करण्याची गरज नाही, कारण माझा प्रवास खूप छोटा आहे, कारण मी पुढच्याच थांब्यावर उतरणार आहे."
हे उत्तर सुवर्ण अक्षरात लिहिण्यास पात्र आहे: "एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर चर्चा करण्याची गरज नाही, कारण आपला प्रवास खूप छोटा आहे." आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपला वेळ खूप कमी आहे.
तारांकित हॉटेलमध्ये वेटर येऊन विचारतो, पाणी कोणतं घेणार? पॅकेज्ड वॉटर की नॉर्मल वॉटर?
लोकं मोठेपणा दाखवायला, पॅकेज्ड वॉटर सांगतात. हो की नाही?
दिखाव्याच्या हॉटेलमध्ये तुम्हाला ही दिखावा करणे भाग आहे का?
नॉर्मल वॉटर आपण का घेत नाही? तो काय गटारातलं पाणी देणार आहे तुम्हाला?
हॉटेलमधील पाणी ही फिल्टर केलेलंच असतं की राव?
पण हॉटेलमध्ये घाण पाणी देतात म्हणून तुम्ही पॅकेज्ड वॉटर सांगता.
मग एक लॉजिक सांगा, तुम्ही जे हॉटेलमध्ये जेवता, ते जेवणही पॅकेज्ड वॉटर वापरून बनवलेलं असतं की हॉटेलमधील नॉर्मल वॉटर वापरून?
पण आपल्याला दिखावा करायचा असतो ना🤣😛😂
घरात काही गृहिणी पाण्याचा गैरवापर करतात, कालचं भरलेलं पाणी आज फेकून देतात, कपडे धुण्याकरिता नको तेवढ्या पाण्याची नासाडी करतात.
त्यावेळेस त्यांना जाणीव ही नसते की तेवढ्याच पाण्यात कितीतरी लोकांची तहान भागली जाईल. थोडी जाणीव बाळगलीत, तर हे नुकसान थांबवता येईल ना?
आपण सगळ्यांना आपलं समजतो पण तुम्हाला कोण आपलं समजतो हे जाणणे गरजेचे आहे. आपल्यासोबत काही असेही आपले असतात, जे खरं तर आपले कधीच नसतात, पण त्यांच्या मतलबासाठी आपले असण्याचा दिखावा जरूर करतात, एकदा का त्यांचा मतलब निघाला, की ते आपोआप तुम्हाला त्यांचे रंग दाखवतात.
म्हणून आयुष्यात प्रत्येकाला तेवढीच जागा द्या जेवढी ते तुम्हाला देतात. नाही तर आयुष्यात एक तर तुम्ही रडाल नाही तर ते तुम्हाला रडवतील...
आयुष्यात अश्या व्यक्तींना वर खेचण्याचा प्रयत्न करू नका, ज्यांना वरती यायचेच नाही. नाही तर एक काळ येईल, तेच तुम्हाला खाली खेचतील...
आयुष्यात चांगली व्यक्ती जरूर बना, पण इतकेही चांगले बनू नका की लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. तुम्ही लोकांना वाट दाखवत राहाल आणि लोकंच तुमची वाट लावतील अशी वेळ येऊ देऊ नका. वेळीच सावध राहा.
जीवनशैलीतील फरक की पैशांचा माज...
एक काळ होता, आम्ही भावंडं ब्रेडच्या पहिल्या आणि शेवटच्या स्लाईससाठी भांडायचो. आज काल पाहतो, सगळे पहिला आणि शेवटचा स्लाईस फेकून देतात. हळू हळू तर ब्रेडच्या स्लाईस च्या कडा पण कापून फेकून द्यायला लागले. ब्रेडचा फक्त मऊ भाग खातात.
आया मुलांना सांगतात"फर्स्ट स्लाईस फेकून द्यायचा हं, तो खायचा नसतो."
पण तीच लोकं तशाच कडक पावावर भाज्या टाकून सजवलेल्या पावाला "पिज्जा-पिज्जा" म्हणून आवडीने खातात आणि भरपूर पैसे ही देतात. तसाच ब्रेड करपवून सँडविच किंवा ब्रेड क्रंब्स नावाच्या डिशेस खातात हॉटेल मध्ये...😂😛
शाळेत असताना नळाला तोंड लावून पाणी प्यायचो. विहिरीचं काय तर हाबशीचं ही पाणी प्यायलो. अजून मेलो नाही.
पण आजकाल लोकं मिनरल वॉटर किंवा पाणी भरलेल्या बॉटल शिवाय (शुद्ध) पाणी प्यायला तय्यार नाहीत. कधी मिनरल वॉटर काय असतं बघायचं असेल, तर "टक्सेडो" नावाच्या चित्रपटाची फक्त सुरवात बघा.
पिकासो (Picasso) हा स्पेन या देशात जन्मलेला एक अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. त्यांनी काढलेली पेंटिंग्स अख्ख्या जगात कोट्यावधी आणि अब्जावधी रुपयांना विकल्या जात असत...
एक दिवस रस्त्यानं जात असता एका महिलेची नजर पिकासोकडे गेली आणि योगायोगानं त्या महिलेनं त्याला ओळखलं. ती धांवतच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, "सर, मी आपली खूप चाहाती आहे. आपली पेंटिंग्ज मला प्रचंड आवडतात. आपण माझ्यासाठीही एक पेंटिंग तयार करून देऊ शकाल काय ?
पिकासो हसत म्हणाला,"मी इथं रिकाम्या हातानं आलोय. माझ्यापाशी काहीही साधनं नाहीत, मी पुन्हा कधीतरी तुमच्यासाठी एक पेंटिंग नक्की बनवून देईन."
परंतु त्या महिलेनं आता हट्टच धरला. ती म्हणाली, "मला आत्ताच एक पेंटिंग बनवून द्या. पुन्हा कधी आपली भेट होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही.