Dasarp Edihb Profile picture
Dec 14 13 tweets 6 min read
भाजप सत्तेत असूनही असाच पुचाटपणा करत राहणार आहे का? नेत्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर स्कॅनर लावून त्यातील निवडक भाग काढून "अपमान अपमान" करत गदारोळ करण्याचा डाव शिवसेना-राष्ट्रवादी प्रणित मीडिया व त्यांची एकूणच इकोसिस्टीम यशस्वी करत असल्याचं दिसतं. १/१३
१. #चंद्रकांत_पाटील यांनी भीक शब्द वापरायला नको होता. वर्गणी शब्द योग्य झाला असता. पण बोलण्याच्या ओघात एखाद वेळी पटकन एखादा शब्द निसटतो. त्यांचं संपूर्ण भाषण ऐकल्यास #महात्मा_फुले यांचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू अगदीच नव्हता हे स्पष्ट होतं. २/१३
२. #प्रसाद_लाड यांनी रायगड आणि शिवनेरी यात गोंधळ केला यात मूर्खपणा दिसतो. अपमान नाही.

३. #भगतसिंग_कोशियारी यांनी उत्साहाच्या भरात पूर्वीच्या काळचे आदर्श आणि सांप्रत काळचे आदर्श असा फरक केला. त्यात एवढी आदळ आपट करण्यासारखं अजिबात काही नाही. ३/१३
४. #सुधांशु_त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी केलेल्या पत्रव्यवहाराची तुलना सावरकर प्रकरणी करणं अनाठायी होतं. कदाचित तेव्हा #राहुल_गांधी यांनी सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख करून खाजवून खरूज काढल्यामुळे सुधांशू त्रिवेदी यांनी उदाहरणार्थ म्हणून तसा उल्लेख केला असावा. ४/१३
सदरील पत्र व्यवहार पुरावा म्हणून असल्याचे समजते आणि तो प्रकार आम्ही महाराजांच्या चाणाक्ष डावपेचांचा भाग मानतो.

५. #मंगलप्रभात_लोढा यांनी आग्र्याहून सुटलेला राजकीय बंडखोरी म्हटलं आहे. मला तरी त्यात वावगं काहीही वाटत नाही. तत्कालीन सत्तेविरुद्ध केलेली कामगिरी बंडखोरीच असते. ५/१३
आणि शिवाजी महाराजांनी ही बंडखोरी केली त्याबद्दल उभा महाराष्ट्राच नव्हे तर सकल हिंदू समाज त्यांचा आजन्म ऋणी राहील.

६. #रावसाहेब_दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून त्यांचा अपमान झाला असं म्हणणं हा तर हास्यस्पद प्रकार आहे. ६/१३
यावर मी एक वेगळी स्वतंत्र पोस्ट केली होती म्हणून जास्त लिहित नाही. परंतु शिवाजी महाराजांना आत्यंतिक जिव्हाळ्यामुळे अनेक कवने, पोवाडे वीरगीते यांत एकेरी उल्लेखण्यात आलं आहे. साधी घोषणा घेऊ. "जय भवानी, जय शिवाजी" अशी घोषणा आहे. "जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज" अशी नाही. ७/१३
आपण रामाला आणि कृष्णाला देखील जिथे एकेरी संबोधतो तिथे राजे रजवाडे, संत महात्म्यांची काय कथा!

८. असल्या कचकड्याच्या मोजपट्ट्या लावायच्याच असतील तर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या #संजय_राऊत यांच्या आईला जिजामाता यांची उपमा देणाऱ्या #सुषमा_अंधारे यांना लावा, ८/१३
शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असं म्हणणाऱ्या #शरद_पवार यांना लावा. महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा विचार महाराष्ट्राला दिला असं म्हणणाऱ्या #उदयनराजे_भोसले यांना लावा. "शिवाजी कोण होता" असा एकेरी उल्लेख करत पुस्तक लिहिणाऱ्या कॉम्रेड #गोविंद_पानसरे यांना लावा. ९/१३
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर दीर्घ लेख लिहून त्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा "ज्योतिबा असं म्हणाला, त्यानी तसं केलं" असा एकेरी उल्लेख करणाऱ्या #प्रबोधनकार_ठाकरे यांना लावा. १०/१३
हिंदुत्ववादी भाजपसाठी #शिवाजी_महाराज यांचे स्थान काय आहे याचं ताजं उदाहरण म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावर #नरेन्द्र_मोदी यांनी शिवमुद्रेवरुन प्रेरणा घेत विराजमान केलेलं चिन्ह. शिवाजी महाराज हिंदुस्थानच्या आरमाराचे आद्य प्रणेते होते. त्यांना दिलेली ही मानवंदनाच आहे. ११/१३
ब्रिटिशांच्या गुलामीचं चिन्ह काढून त्या जागी शिवमुद्रेवरून प्रेरणा घेत केलेलं चिन्ह विराजमान करणं हा फार मोठा संकेत आहे. आणि नरेंद्र मोदींच्या अशा धारणेमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख सेक्युलर करण्याच्या विरोधकांच्या मनसुब्यांना १२/१३
सुरुंग लागतो हेच खरं दुखणं आहे. आणि त्यातूनच "अपमान" शोधून धिंगाणा घातला जात आहे. हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचा पुत्र #उद्धव_ठाकरे या सगळ्यांबरोबर आनंदाने फरफटत आहे ही एक अधिकची शोकांतिका आहे. १३/१३

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dasarp Edihb

Dasarp Edihb Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @prasadbhide

Sep 26
"सुषमा अंधारे नवरात्र" हे तीन शब्द गुगल सर्च मध्ये टाका आणि या बाईंचे फुत्कार ऐका. ऐकून झाल्यावर आपल्या मित्र यादीतील आणि मोबाईल फोन बुक मधील प्रत्येक शिवसैनिकास ते व्हिडीओ पाठवा आणि त्याला विचारा हेच का तुमचं हिंदुत्व.

१/४
पक्षप्रमुख #उद्धव_ठाकरे एकीकडे मुंबादेवीच्या आणाभाका घेतात आणि दुसरीकडे हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा होईल, देवदेवतांची विटंबना होईल अशा भाषेत बोलणाऱ्या #सुषमा_अंधारे यांना पक्षात घेतात आणि लगेचच उपनेते पद बहाल करतात!

२/४
नवरात्र काळात पायात चपला न घालता वावरण्याला कुठलाही धार्मिक आधार नाही. अशा प्रकारच्या रूढी परंपरांचा विरोध मी देखील करतो. परंतु ते करत असताना देवी विषयी अपशब्द वापरणं मला गरजेचं वाटत नाही.

३/४
Read 4 tweets
Sep 25
कोण आहेत हे विचारवंत? फोटो त्यांचाच असेल तर वयाने ज्येष्ठ असावेत. मी त्यांच्या मुलाच्या वयाचा असेन पण तरीही अवधूत परळकर काकांना हे ४ प्रश्न विचारतो.

१. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया हे भारताची फाळणी होऊन निर्माण झालेले देश आहेत का?

१/४
२. इथे पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे पाकिस्तानातून येऊन इथे स्थायिक झाले आहेत का?
३. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया हे भारताचे शत्रु देश आहेत का? भारत व या देशांमध्ये युद्ध झाले आहे का?
४. इथे पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या व्यक्तींची मायभूमी पाकिस्तान आहे का?
२/४
काका, वरील चार प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर आपण प्रकट केलेले विचार म्हणजे भरकटलेल्या मनस्थितीचं प्रतीक. लवकरात लवकर उपचार घ्या.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त मुस्लिमच नव्हे तर कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं म्हणजे देशद्रोहच आहे.३/४
Read 4 tweets
Sep 9
#याकूब_मेमन ला फाशी कोर्टाने दिली. भारताच्या कायद्यात फाशीनंतर मृतदेह समुद्रात फेकून देण्याची तरतूद नाही. त्यामुळे #आदित्य_ठाकरे यांनी कितीही दावा केला तरी याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना दिला गेल्यास त्याचा दोष तत्कालीन गृहमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना जात नाही. १/३
परंतु निरपराध मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या #असलम_शेख यांना त्याच मुंबईचा पालकमंत्री करण्याचं पाप मात्र आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत केलं. २/२
एवढेच नव्हे तर #दाऊद शी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या #नवाब_मलिक यांनादेखील #उद्धव_ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं होतं.

चहा बिस्कीट पत्रकारांनी #आदित्य_ठाकरे यांची री ओढण्यापेक्षा त्यांना हे प्रश्न विचारले असते तर बरं झालं असतं. ३/३
Read 6 tweets
Jun 15
#मराठा_आरक्षण मोर्चाच्या वेळी स्टेजवरून एक मुलगी "आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही" असं तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना म्हणत होती तेव्हा आपण गप्प होतात, #सुप्रियाताई. मुख्यमंत्र्याला असं म्हणणं म्हणजे #महाराष्ट्राचा_अपमान आहे असं आपल्याला तेव्हा वाटलं नव्हतं. १/९
आज तुमच्या #अजितदादा ला, म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला भाषण करायला मिळालं नाही तर तुम्हाला तो #महाराष्ट्राचा_अपमान वाटतोय? वा ताई वा! भले शाब्बास.

उपमुख्यमंत्री हे संविधनिक पद नाही. प्रोटोकॉलमधे त्याचा विचार झालाच पाहिजे अशी सक्ती नसावी. २/९
तरीही भाषणासाठी #पंतप्रधान #नरेंद्र_मोदी यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मोदींनी खुणेनेच अजितदादांना बोलण्याचं सुचवलं परंतु त्यांनीच नकार दिला हे कॅमेरात स्पष्ट दिसतं. ३/९
Read 9 tweets
Nov 16, 2021
काही धार्मिक धारणा म्हणा अथवा गैरसमजूत म्हणा परंतु वस्तुस्थिती ही आहे की बहुतांश मुस्लिम समाज रक्तदान अथवा मरणोत्तर देहदान त्याज्य (हराम) समजतो. अशी समजूत असणारे मुसलमान स्वतःचा अथवा आपल्या जिवलगाचा जीव वाचवताना दुसऱ्याचे रक्त वा अवयव घेण्याचे सुद्धा टाळत असेल का? १/८
तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि अगदी नाईलाजास्तव जर ते दुसऱ्याचे अवयव घेत असतील तर वरील वस्तुस्थिती पाहता ते अवयव एखाद्या हिंदूचे (काफिर) असण्याची शक्यताच जास्त. तर मग अशा वेळी एखाद्या काफिराचे अवयव आपल्या शरीरात जोडून घेणे हराम होत नाही का? २/८
डॉ. अमोल कोल्हे यांनी भगव्याचे रक्त, हिरव्याचे रक्त अशा अर्थाची काहीतरी टिपण्णी केल्याची बातमी वाचण्यात आली त्यावरून हे मुद्दे डोक्यात आले. तुमचा पेशंट मरत असेल आणि त्याला रक्ताची गरज असेल तर हिरव्याचं रक्त आहे का भगव्याचं रक्त आहे हे विचारणार का असा प्रश्न कोल्हे करतात. ३/८
Read 8 tweets
Nov 16, 2021
ज्या दिवशी महाराष्ट्राच्या सशस्त्र पोलीस दलाने नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिवासींच्या एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांनी "अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही" अशा अर्थाचं एक विधान केलं. १/७
पवारांचं हे विधान एरवी कितीही सुयोग्य वाटलं तरी त्याचं टायमिंग बघता ते बुद्धीभेद करणारं ठरावं. पवारांना असं खरंच वाटत असेल तर त्यांनी मुक्तकंठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमांद्वारे आदिवासीबहुल भागात जे मोलाचं काम केलं जातं त्याचं कौतुक करावं. २/७
परंतु वस्तुस्थिती अशी आहे की स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या पवारांसहित तथाकथित सेक्युलर बुद्धिवाद्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे काम डोळ्यात सलतं. डाचतं. ३/७
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(