संकल्प होता शतकाचा.....नाही जमलं ८१ वर वर्षे संपते आहे.
पानिपत - विश्वास पाटील, थाऊजंड स्ल्पेंडिड सन्स - खालिद हुसैनी, काॅल ऑफ द वाईल्ड - जॅक लंडन, इनसाइड द गॅस चेंबर - श्लोमो व्हेनेत्सिया, नागासाकी - क्रेग कोली, अरुणाची गोष्ट - पिंकी विराणी, ही काही अस्वस्थ करणारी.... 👇
नाॅट गाॅन विथ द विंड - विश्वास पाटील, आवा मारु टायटॅनिक ऑफ जापान - रेई किमुरा, या सम हा - शशिकांत पित्रे, रावण राजा राक्षसाचा - शरद तांदळे, आणि मग एक दिवस - नसिरुद्दीन शाह, शांताराम - ग्रेगरी राॅबर्ट, पाथ ऑफ ग्लोरी - जेफ्री ऑर्चर , पावणेदोन पायाचा माणूस - श्रीकांत बोजेवार, 👇
नेताजी - वि स वाळिंबे यातून नवीन खुप काही मिळाले. विन्स्टन चर्चिल, नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि ग कानिटकर, वाॅर्सा ते हिरोशिमा - वि स वाळिंबे यातुन दुसरे महायुद्ध उलगडले. डुम्स डे काॅन्सिपरंसी - सिडने शेल्टन, रुल्स ऑफ डिसेप्शन - क्रिस्टोफर हेन्री, शोध - मुरलीधर खैरनार, 👇
प्रिझनर ऑफ बर्थ - जेफ्री ऑर्चर, प्रतिपश्चंद्र - प्रकाश कोयांडे यांनी थरार दिला. ही त्यातल्यात्यात खास आवडलेली पुस्तके...बिंदु सागर - राजेंद्र खेर हे एक कंटाळवाणे... बाकी सर्व वाचनीय. @Nishigandha269
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पुस्तकआणिबरचकाही
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे- ( १२ जुलै १८६४ - ३१ डिसेंबर १९२६ ) मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या शीर्षकाचे अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड त्यांनी संपादून प्रसिद्ध केले(१८९८ – १९१७). ह्यापैंकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. 👇
राधामाधवविलासचंपू आणि महिकावतीची बखर हे दोन जुने ग्रंथ त्यांनी अनुक्रमे १९२२ व १९२४ मध्ये संपादून छापले व त्यांनाही मोठ्या विवेचक प्रस्तावना जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, निङ्त विचार, सुबंतविचार, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहतकाल असे काही त्यांनी👇
वसाहतकाल असे काही संपादिलेले व लिहिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिद्ध झाले. मराठी धातुकोश, नामादिशब्दव्युत्पत्तिकोश इ. ग्रंथ त्यांच्या मृत्यूंनतर प्रसिद्ध होऊ शकले. राजवाड्यांच्या लेखांचे आणि प्रस्तावनांचे काही खंड शं. ना. जोशी आदींनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. धुळ्याच्या👇
#पुस्तकआणिबरचकाही
श्रीलाल शुक्ल (३१ डिसेंबर १९२५-२८ ऑक्टोबर २०११) भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध हिंदी साहित्यिक. कथा, व्यंगकथा, कादंबरी, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. राग दरबारी ही श्रीलाल शुक्ला यांची उपहासात्मक 👇
श्रेष्ठ कादंबरी आहे. एका मोठ्या शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शिवपालगंज या एका खेड्याच्या जीवनाशी संबंध असलेल्या या कादंबरीने हिंदी साहित्य जगतात खळबळ माजवली.स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय समाजातील, ढासळणाऱ्या मूल्यांवर त्यांनी यात भाष्य केले आहे.शुक्ल यांची राग दरबारी ही👇
एक प्रभावी रचना आहे. स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाला समजून घेण्यासाठी ज्या लेखकांनी युक्तिवाद केला आहे अशा निर्मात्यांमध्ये श्रीलाल शुक्ल यांचे महत्त्व आहे. ते आपल्या काळाचे समर्थ भाष्यकार आहेत. त्यांच्या साहित्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतीय जनमानसाच्या 👇
#पुस्तकआणिबरचकाही
डाॅ. जयसिंगराव पवार ( ३० डिसेंबर १९४२ )मराठा इतिहासावर संशोधन करत असताना त्यांच्या लक्षात आले की, मराठ्यांच्या इतिहासातील, विशेषत: स्वातंंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील, व्यक्ती व त्यांच्या कामगिर्या उपेक्षित राहिल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल इतिहास लेखनात👇
घेतली गेलेली नाही. राजाराम महाराजांशिवाय रामचंद्र पंडित अमात्य, सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव, महाराणी ताराबाई अशा अनेक कर्तबगार स्त्री-पुरुषांची कामगिरी अंधारात राहिली होती. मग शिवछत्रपतींनंतर ज्यांनी-ज्यांनी स्वराज्य रक्षणाची धुरा सांभाळली त्यांचा इतिहास प्रकाशात आणावा, 👇
या कृतज्ञतेच्या भावनेतून डॉ. पवार मराठ्यांच्या इतिहासाकडे आकृष्ट झाले. डॉ. पवारांच्या संशोधनाची निष्पत्ती म्हणजे त्यांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील स्त्रीकर्तव्य सिद्ध करणारा ‘महाराणी ताराबाई’ हा संशोधनात्मक ग्रंथ.महाराणी ताराबाईंवरील ग्रंथाप्रमाणेच डॉ. पवारांच्या 👇
#पुस्तकआणिबरचकाही
मंगेश पाडगावकर ( १० मार्च १९२९ - ३० डिसेंबर २०१५ ) पाडगावकरांचा ‘धारानृत्य’ हा पहिला संग्रह १९५० साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर आजतागायत पाडगावकरांची एकूण ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नाट्यकविता, बालकविता, उपहासपर कविता (वात्रटिका), गझल या स्वरूपाची काव्यरचना👇
पाडगावकरांनी केली .आधी भावकवी आणि नंतर गीतकार असे स्थित्यंतर झाल्यामुळे कवीचे हळुवार, तरल, संवेदनशील मन रस-रंग-नाद-गंध-स्पर्शयुक्त शब्दांच्या आधारे संगीतानुकूल झाले. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘असा बेभान हा वारा’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘श्रावणात घन निळा बरसला’ ह्या गीतांनी 👇
रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून ठेवले आहे. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गीतसंग्रहाप्रमाणेच पाडगावकरांचा ‘गझल’ हा संग्रहही उल्लेखनीय आहे. बालकविता हा काव्यप्रकारही पाडगावकरांनी आत्मसात करून मुलांसाठी प्रामुख्याने गेय बालगीते लिहिली आहेत- ‘भोलानाथ’ , ‘बबलगम’, ‘चांदोमामा’,👇
नेताजी
वि.स.वाळिंबे
काॅलेजात इंग्रज प्राध्यापकांची अरेरावी सहन न झाल्याने विध्यार्थ्यांचा संप घडवून आणला म्हणून काॅलेजातून काढून टाकले. या बंडखोर स्वभावामुळे वडिलांनी शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. ICS ची परीक्षा देण्याच्या अटीवर. @LetsReadIndia@PABKTweets#पुस्तकआणिबरचकाही 👇
चांगल्या मार्कांनी ICS पास होऊनही आपल्या निष्ठा इंग्रज सरकारला वाहव्या लागतील म्हणून राजीनामा देऊन मायदेशी परतले.
"एक तर मी सरकारी नोकरीतल्या क्षुद्र मोहांकडे पाठ फिरवून संपूर्णपणे देशकार्याला वाहून घ्यावे, किंवा अंत:करणातल्या साऱ्या आकांक्षांना आणि ध्येयवादाला कायमचा 👇
रामराम ठोकून परकीय सरकारच्या साखळीत स्वत:ला जखडून घ्यावे"– यातले मला एक सोडावे लागणार आहे आणि एक निवडावे लागणार आहे".
गांधीजी वैष्णव होते, सुभाषबाबू शाक्त. अहिंसा ही वैष्णवाची उपासना असते. शाक्ताला शस्त्राचार निषिद्ध नसतो.
#पुस्तकआणिबरचकाही
गजानन त्र्यंबक माडखोलकर : (२८ डिसेंबर १८९९–२७ नोव्हेंबर १९७६). विख्यात मराठी पत्रकार, कादंबरीकार आणि समीक्षक. आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही कविता, ह्यांत संस्कृत काव्यरचनेचाही समावेश आहे . रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. 👇
त्या मंडळाच्या उषा ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.देवयानी हे त्यांनी लिहिलेले नाटक.रातराणीची फुले आणि शुक्राचे चांदणे ह्या त्यांच्या कथासंग्रहातील कथा गाजल्या होत्या. मध्ये मुक्तात्मा ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर कांदबरीकार म्हणून त्यांना 👇
ख्याती लाभली. भंगलेले देऊळ, शाप ,कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार, नागकन्या, डाकबंगला, चंदनवाडी, प्रमद्वरा , अनघा, स्वप्नांतरिता, रुक्मिणी, उर्मिला, सत्यभामा इ. त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ह्यांपैकी बऱ्याचशा कादंबऱ्या राजकीय स्वरूपाच्या आहेत. गांधीवादी विचारसरणीला 👇