सावित्रीमाई फुले यांनी ज्योतीबा यांना लिहीलेलं एक पत्र.
सावित्रीमाई ह्या एक सामाजिक भान असलेल्या,निडर स्वतः निर्णय घेण्याची क्षमता असलेलं व्यक्तिमत्व होत्या हेच पत्रातून दिसून येते.
सत्यरूप जोतिबा स्वामी यांस,
सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत,
पत्रास कारण की, आपले पत्र पावले. इकडील सर्व मंडळी खुशाल आहेत. मी येत्या पाच तारखेपर्यंत पुण्यास येईन
काळजी करू नये. येथे एक अघटित वर्तमान घडले की, गणेश नामे एक ब्राह्मण यास पोथी पुराणाचा नाद असून गावोगाव फिरून पंचाग सांगून उदरनिर्वाह करत करत गावी येते झाला. पण येथे नुकतीच वयात आलेली सारजा नामे पारीवर त्याची प्रीती जडली असोन, त्यापासून तीस सहा महीने दिवस गेले आहेत.
त्याचा बोभाटा होवून गावातील दुरामती दृष्ट टवाळांनी त्या उभयतास आणून मारपीट करून गावातील गल्लीबोळातून वाजत-गाठत मिल्लत ठार मारण्यास चालविले. हि भयंकर गोष्ट मला कळताच मी तेथे धावत पाळत गेले व त्या लोकांस इंग्रज सरकारचे भय दाखविले व त्याना क्रुर कर्मापासून वळविले.
सदुभाऊने तोडमोडी लावून बोलणे केले की, या भटुकड्याणे या महाराणीने आमचे गाव सोडून जावे. हे उभयतांनी कबूल केले. या उभतास मी वाचविले. तेणेकरून लोकांस अद्भुत वाटले. ती उभयता मला देवी समजून माझ्या पाया पडून शोक करू लागली. यांचा शोक उना होईना.
त्यांची कशीबशी समजूत घालून त्या उभयतांस तुमचेकडे पाठविले आहे.अधिक दुसरे काय वर्तावे. कळावे ही विज्ञापना.
आपली सावित्री जोतीबा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
जवळपास १५० दीडशे वर्षांपूर्वी, 1869 साली, टाटा समूहाचा वार्षिक उलाढाल 20 हजार रुपये होती .
आणि त्याचवेळी या माणसाची, पूना कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीची वार्षिक उलाढाल 21 हजार रुपये होती. त्याचकाळात सोनं 10 रुपये तोळा होत.
सांगायचंय एवढंच,
एकेकाळी टाटापेक्षाही श्रीमंत इतकं सधन असा हा माणूस.
इमारती,धरणं,पूल,बोगदे, इतकंच नाही तर राजवाडे,कापड गिरण्या., इत्यादी सर्व प्रकारच्या भव्य बांधकामात अग्रेसर.
सोन्याचे दागिने बनवण्यासाठी लागणारे मोल्ड्स ,त्याची संपूर्ण भारताची होलसेल एजन्सी या माणसाकडे.
पुस्तकं प्रकशित करणं ते विकणं.. हा सुद्धा यांचा एक अग्रगण्य व्यवसाय.
त्याकाळी शेती सर्वश्रेष्ठ, उत्तम भाजीपाला आणि फुलांची मोठी शेती करून ती पुण्याहून रेल्वेने मुंबईला नेऊन विकायची. हा अजून एक व्यवसाय.
देवेंद्रजी आणखी किती खोटं बोलणार, किती खालची पातळी गाठणार ?
1) फॉक्सकॉन ऍपल मोबाईल बनविण्याचा 36 हजार कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार अशी घोषणा मा देवेंद्र फडणवीस साहेबानी जानेवारी 2015 मध्ये केली. त्यानंतर सुमारे साडेचारवर्ष तेच मुख्यमंत्रीपदावर होते
पण तो प्रकल्प गुजरातला न्यावयाचे असल्याने त्यांना दिल्लीतुन समाज देण्यात आल्याने त्यांनी त्याबाबत जाणीवपूर्वक प्रतिकुल पावले उचलली. परिणाम त्या प्रकल्पातील कंपनीचा रस निघुन गेला, कंपनीने प्रकल्प रद्द केला पण ते गुजरातला गेले नाहीत.
केंद्र ईडी सारख्या संस्था वापरून त्यांच्यावर दबाव आणू शकले नाही कारण त्यात फक्त फॉक्सकॉन होती आणि त्यांनी त्यात भारतीय पार्टनर घेतला नव्हता. जानेवारी 2020 मध्ये म्हणजे मविआ सरकार आल्यानंतर 10-12 दिवसात सुभाष देसाईंनी जे वक्तव्य केले होते ते त्या प्रकल्पाबाबत होते
राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवर हेरंब कुलकर्णी सरांची कविता
तो निघालाय....
तो निघालाय
दक्षिणेकडून उत्तरेकडे
उत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करत
विमान,जेट,हेलिकॉप्टर,बुलेटप्रूफ गाड्या,सारे हाताशी असतानाही
धुळीच्या रस्त्यावरून तो निघालाय....
गर्दीचा गैरफायदा घेत
बापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातून
पुन्हा त्याच गर्दीवर विश्वास टाकत
हिंसेलाही लज्जित करत तो निघालाय..
पूर्वीही असेच राजे निघत
अश्वमेध करायला, सैन्य घेऊन
जिंकत जिंकत
रक्ताचा सडा शिंपडत---
पण तो नि:शस्त्र आहे
प्रेम आणि संवादाचे शस्त्र घेऊन
राज्य जिंकण्याचे सोडाच
निवडणूक जिंकण्याचीही गोष्ट तो बोलत नाही
पक्षाच्या सीमा ओलांडून समविचारींना कवेत घेत तो निघालाय
फक्त येईल त्याला प्रेमाने आलिंगन देत,
एकट्या पडलेल्या
व्यवस्थेत हरलेल्या
फाटक्या
केविलवाण्या माणसांना
मायेची ऊब देत तो निघालाय...
Next level hacking - फक्त 2 दिवसात हैद्राबाद मधली एक अतिशय सेन्सिटिव्ह केस सॉल्व्ह केली आहे - अभिजित वाघमारे
एका मोठ्या कंपनीचा CEO माझ्या मित्राचा boss आहे
त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये ऑनलाईन चोरी झाले कुठलाच OTP Call नव्हता ,कुठली ही ऑनलाईन लिंक पाठवली गेली नाही
किंवा ओपन केली गेली नाही त्याचा boss स्वतः अतिशय टेक्नो फ्रेंडली आहे पण कुठूनच मार्ग कळत नव्हता की इतकी अमाऊंट उडवली कशी सायबर क्राईमचें एलीट ऑफिसर्स केसवर होते पण समजत नव्हत....
मोबाईल मधुन सगळी स्कॅनिंग स्क्रूटणी झाली कुठलाच ट्रेस मिळाला नाही तेव्हा फक्त एक क्लू मला मिळाला
त्याच्या ऑफिसमधला CCTV फुटेजवरून तिथं क्लू मिळाला
तर त्या CEO चा मोबाईलचा चार्जर हा बदलला गेला.ऑफिसमधेच आणी त्याच्या ठिकाणी दुसरा USB चार्जर ठेऊन त्याचा सगळा डेटा हा कॉपी केला गेला त्याची अख्खी मोबाईल बँकिंग हॅक केली गेली आणी अकाउंट मधुन पैसे काढले गेले
महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकारने फॉक्सकॉन व वेदान्ताच्या सेमीकंडक्टर व डिस्प्ले प्रोजेक्ट साठी तळेगाव परिसरातील MIDC च्या ताब्यातील 400 एकर जागा मोफत व 700 एकर विकत अशी जमिनी संदर्भात 2100 कोटी subsidy मंजूर केलेली होती.
त्यानंतर प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या सेक्टर मध्ये कॅपिटल subsidy हि 39000 कोटी subsidy या कंपनीला बहाल केली जाणार होती.
गुजरातने फक्त 28000 कोटीची कॅपिटल subsidy देऊन शिंदे व फडणवीस सरकारला मॅनेज करून हा मोठा प्रोजेक्ट आपल्या पदरात पाडून घेतला.
11 हजार कोटी रुपयाची कमी subsidy प्राप्त करून वेदान्ताचे मालक अनिल अग्रवाल ज्यांची 60% प्रकल्पात भागीदारी आहेत त्यांनी हा प्रोजेक्ट नुकसान स्वीकारून गुजरात घेऊन जाण्याचे का मान्य केले असावे?
आज तामिळनाडू मधून भारत जोडो यात्रेची सुरुवात करताना राहुल गांधी यांनी इंग्रजीत केलेल्या भाषणाचा मी मराठीत केलेला स्वैर अनुवाद शेअर करत आहे. अगदी मोजक्या शब्दात सोपं आणि महत्त्वाचं बोलून भारत जोडो यात्रेचं ध्येय राहुल गांधींनी उलगडून सांगितलंय.
ईथे उपस्थित सर्वाना माझा नमस्कार. स्टेजवर उपस्थित दिग्विजय सिन्घ जी,पी चिदंबरम जी, दिनेश गुंटुराव जी,सेलवा पेरुंतगाई जी, शेलाकुमारजी , माणिक टागोर जी, विजय वसंत जी, ज्योतिमनी जी,काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते,पक्षाचे कार्यकर्ते,माध्यमांमधील मित्र
तुम्हा सर्वाचं मी आज इथे मनापासून स्वागत करतो. तामिळनाडूला येणे हे माझ्यासाठी नेहमीच आनंदाचे आणि सन्मानाचे राहिले आहे. तुम्ही माझं तामिळनाडू सोबत असलेलं नातं जाणताच. ह्या अदभूत आणि सुंदर राज्यात, समुद्राच्या किनार्यावर भारत जोडो यात्रेची सुरुवात करताना मला प्रचंड आनंद होत आहे.