#पुस्तकआणिबरचकाही
खलील जिब्रान ( ६ जानेवारी १८८३ - १० एप्रिल १९३१ ) हे लेबनॉनी-अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतला कवी व लेखक होते. खलील जिब्रानने १९१८ पासून इंग्रजीत ग्रंथरचनेस प्रारंभ करून एकंदर नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांची वीस भाषांत भाषांतरे झाली. 👇
आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी (गीतांजली) केली गेली.
अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील 👇
प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.[२] इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील ’द प्रॉफेट’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या 👇
थंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. शेक्सपिअर आणि लाओ-त्झूनंतर खलील जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.खलील जिब्रानचे एक मराठी चरित्र श्रीपाद जोशी यांनी लिहिले होते. ( विकिपीडिया)
#पुस्तकआणिबरचकाही
श्रीपाद कृष्ण बेलवलकर : (१० डिसेंबर १८८० – ८ जानेवारी १९६७). थोर प्राच्यविद्यापंडित. संशोधनाच्या व लेखनाच्या क्षेत्रात बेलवलकरांनी बजावलेली कामगिरी मोठी आहे. गीता व अभिज्ञानशाकुंतल ह्या ग्रंथाची प्रमाणित आवृत्ती त्यांनी काढली, महाभारतातील भिष्मपर्व, व 👇
संपादन केले (भीष्मपर्व, १९५७ शांतिपर्व, १९५० ते ५३) दांडीच्या काव्यादर्शाची आवृत्ती काढून (१९२०) त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध केले (१९२४). भारतीय तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक इतिहासाची गुरुदेव डॉ.रा. द. रानडे ह्यांच्या सहकार्याने त्यांनी एक योजना आखली व तिच्यातील क्रिएटिव्ह 👇
पिरिअड हा वेद, ब्राह्मणे, उपनिषदे ह्यांच्याशी संबंधित असलेला दुसरा खंड लिहिला, संपादिला (१९२७). त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आणि संशोधनलेखांत माठरवृत्ति (१९२४), कॅनन्स ऑफ टेक्स्च्यूअल अँड हायर क्रिटिसिझम अप्लाइड टू शाकुंतल (१९२५), वेदान्त फिलॉसफी (१९२९), बसु मलिक लेक्चर्स ऑन 👇
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभा गणोरकर : ( ८ जानेवारी १९४५). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका. व्यतीत , विवर्त , व्यामोह हे काव्यसंग्रह. बाळकृष्ण भगवंत बोरकर हा समीक्षाग्रंथ तर बोरकरांची निवडक कविता , गंगाधर गाडगीळ व्यक्ती आणि सृष्टी , किनारे मनाचे, 👇
शांता शेळके यांची निवडक कविता ,आशा बगे यांच्या निवडक कथा ही त्यांची संपादने आहेत. वाङमयीन संज्ञा संकल्पना कोश , संक्षिप्त मराठी वाड्ःमय कोश भाग. १ आणि भाग २ ही त्यांची सहसंपादने आहेत एकेकीची कथा , श्रावण बालकथा याचे लेखन त्यांनी केले. तसेच त्यांनी वर्तमानपत्रातून व 👇
नियतकालिकातून विपुल प्रमाणात पुस्तक परीक्षणे केली. विविध चर्चासत्रांतून निबंध वाचन केले. जगण्याच्या रुढ वर्तुळाबाहेर जाऊन जीवनानुभव घेणारी त्यांची कविता मानवी संबंधांचा शोध घेते. अस्तित्वशोध हे प्रभा गणोरकर यांच्या कवितेचे महत्त्वाचे आशयसूत्र आहे. समाजव्यवस्थेत स्त्री म्हणून 👇
जगभरातील महापुरुषांची नियतीने अनेकदा सत्त्वपरीक्षा घेतली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनात नियतीसह त्यांच्या शरीर प्रकृतीने त्यांची सत्व परीक्षा घेतली होती. #पुस्तकआणिबरचकाही @LetsReadIndia@PABKTweets
या सगळ्यांनचा सामना करीत कोसळत्या कड्यावरून पावले टाकताना या पुरुषसिंहाने आपली धीरगंभीरता सोडली नाही. निधर्मी, बलदंड, बलवान, श्रेष्ठ आणि सुसंस्कृत भारताच्या आपल्या स्वप्नासाठी त्यांनी अवघे जीवन वेचले आहे.सुभाषचंद्र बोस यांचा जीवनसंघर्ष अनेक वेगळ्या पातळ्यांवर घडला आहे. 👇
हिंदुस्थानातील स्वातंत्र्य चळवळ आणि गांधी-नेहरुंशी प्रेम तसाच संघर्ष, महायुद्धकालीन जर्मनीतले वास्तव्य, पाणबुडीतून प्रवासी करून गाठलेला जपान..आणि शेवटी पूर्व आशियातील तेज:पुंज कर्तृत्वकडा! इंफाळ मोहीम १९४१-४२ मध्येेच जपानने रद्द केली होती. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सरोजिनी बाबर : (७ जानेवारी १९२०‒२० एप्रिल २००८). मराठी लोकसाहित्याच्या संकलक-संपादक आणि अभ्यासक. त्यांची लोकसाहित्याची संपादने ग्रंथरूपाने प्रसिध्द आहेतच, पण समाजशिक्षणमालेची २७० संपादनेही त्यांच्या संपादनकार्यात समाविष्ट आहेत. समाजशिक्षणमाला ही त्यांचे वडील 👇
कृ. भा. बाबर यांनी सुरू केलेली पुस्तकमाला सर्वपरिचित आहे. शिक्षण, समाजकारण, लोकसाहित्य इत्यादी क्षेत्रांतली २८० लहानलहान पुस्तके या मालेद्वारे त्यांच्या वडिलांनी प्रसिध्द केली. प्रारंभापासूनच वडिलांना त्यांच्या लेखनकामात साहाय्य करणाऱ्या सरोजिनीबाईंनी वडिलांच्या निधनांतर २७० 👇
पुस्तकांची मालेत भर घातली. याशिवाय मी पाहिलेले यशवंतराव आणि वसंतदादा पाटील गौरवग्रंथ या ग्रंथांची संपादने त्यांच्या नावे आहेत. कुमारवयीन मुलांसाठीही त्यांनी काही सहसंपादने केली होती.
कथा, कादंबऱ्या बालवाङ्मय इ. वाङ्मयप्रकारांचे त्यांनी स्वतंत्रपणे लेखन केले आहे. ७ कादंबऱ्या, 👇
#पुस्तकआणिबरचकाही
प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे ( १६ जुलै १९४३ - ६ जानेवारी २०१० )हे मराठी भाषेमधील लेखक होते.प्राध्यापक, लेखक, मराठी भाषेतील साहित्यिक, दलित साहित्यिक म्हणून त्याची ख्याती देशभर आहे. "अस्मितादर्श" नावाच्या त्रैमासिकामधून त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ झाला. 👇
'आठवणींचे पक्षी' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यातल्या समजूतदार भाषेने त्यांच्या दु:खाचे झाड गदगदून हलवून सोडले. सोनकांबळे यांनी सांगितलेली आयुष्याची वेदना झणझणीत आणि खरे तर संतप्त आक्रोशाची असली तरी दाह जाणवला तो शांत भाषेत.या आत्मचरित्राचे अकरा भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले.👇
याशिवाय "असं हे सगळं', "पोत आणि पदर' ही त्यांची ग्रंथसंपदा आहे.
'असं हे सगळं' हा ललित लेखांचा संग्रह आणि 'पोत आणि पदर' हा समीक्षा ग्रंथ अशी आणखी दोन पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी सोनकांबळे यांची खरी ओळख आणि लेखक म्हणून ताकद एकवटली होती ती, 'आठवणींचे पक्षी' या आत्मकथनातच. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
विजय तेंडुलकर ( ६ जानेवारी १९२८ - १९ मे २००८ ) तेंडुलकरांची पहिली यशस्वी पटकथा म्हणजे ‘सामना’.एका साखरसम्राटाची ही कथा होती.तोपर्यंत मराठी साहित्यातही साखरसम्राटावर कादंबरी लिहिली गेली नव्हती.त्यापाठोपाठ ‘सिंहासन’ आणि ‘उंबरठा’ हे उत्कृष्ट मराठी चित्रपट लिहिले.👇
याच काळात श्याम बेनेगल यांच्यासाठी ‘निशांत’ व ‘मंथन’ हे दोन हिंदी चित्रपट लिहिले. ‘मंथन’साठी विजय तेंडुलकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.‘मानवत खून खटल्यावर’ त्यांनी ‘आक्रीत’ हा चित्रपट लिहिला. फ्रान्सच्या नाण्टस महोत्सवामध्ये या चित्रपटालाही उत्कृष्ट 👇
चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. नंतर गोविंद निहलानींसाठी ‘आक्रोश’ लिहिला.नंतर अर्धसत्य. 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच👇