#सावित्रीमाईंनी ज्यांच्या नेतृत्वात "केशवपन" परंपरेला विरोध करत सर्व न्हाव्यांचा संप घडवून आणला असे, भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे एक समाज सुधारकाबरोबर उत्तम पत्रकार देखील होते..(1/15)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापलेल्या "सत्यशोधक समाज" मुंबई शाखेचे अध्यक्ष असणारे नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म इ.स १८४८ रोजी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला.
अतिशय गरीब परिस्थितीतून लोखंडेंनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. व ते रेल्वे (2/15)
खात्यात कारकून म्हणून तर 'पोस्ट खात्यात' काही काळ नोकरीस राहिले, पुढे लोखंडेंनी मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळवली.
तिथे त्यांनी दिवसातून १३-१४ तास दहशतीच्या वातावरणात काम करीत असलेले गिरणी कामगार बघितले. (3/15)
व त्या कामगारांना आठवड्याची सुट्टीही मिळत नसे हे समजल्यानंतर लोखंडेंनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.
त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी असंघटित कामगारांच्या (4/15)
समस्यांचाही विचार केला होता.
तसेच नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती "महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या विचारांचा सुरुवातीपासूनच जबरदस्त असा प्रभाव होता.
व याच प्रेरणेतून लोखंडेंनी २३ सप्टेंबर १८८४ रोजी विखुरलेल्या गिरणी कामगारांना संघटित करत मुंबईत (5/15)
"Bombay Mill Hands association" ही संघटना संघटना स्थापन केली.
पुढे ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली गेली. इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील स्वाभिमान कामगार चळवळीचे जनक (6/15)
म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जाऊ लागले.
पुढे कामगार संघटक लोखंडेंनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुटीसाठी प्रचंड असा लढा दिला आणि १० जून १८९० पासून रविवार ही साप्ताहिक सुुुटी (7/15)
म्हणून जाहीर झाली जी आजपर्यंत चालू आहे.
कामगार चळवळी बरोबरच लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष होते तसेच सत्यशोधक चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मुंबई येथे दि. १ डिसेंबर १८७३ ला ताडदेव येथे सत्यशोधक समाजाच्या (8/15)
स्थापना दिनी लोखंडेंनी "महात्मा ज्योतिबा फुलेंचे" जाहीर व्याख्यान ठेवले.
त्यानंतर नारायण लोखंडेंनी जानेवारी १८७४ मध्ये म. फुले यांच्या मुंबईतील परळ, वरळी, माझगाव, मांडवी, भायखळा,लालबाग, चिंचपोकळी, शिवडी, नायगाव, कुर्ला या कामगार वस्त्यांमधे अनेक सभाही (9/15)
घेतल्या कामगारांमध्ये सत्यशोधक समाजाचा विचार पसरविण्याचे त्यांनी अथक प्रयत्न केले.
याच काळात म्हणजे ११ मे १८८८ रोजी क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले जे समाज परिवर्तनाचे, अस्पृश्यता निवारणाचे महान कार्य करीत होते, त्या कार्याचा गौरव व त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद व्हावी (10/15)
म्हणून, नारायण लोखंडेंनी मुंबईतील कष्टकरीवर्गातर्फे मुंबईत खास मेळावा घेऊन जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ ही सुप्रसिद्ध उपाधी बहाल केली व त्यांचा जाहीर सत्कार देखील घडवून आणला.
तसेच नारायण लोखंडेंनी लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. कामगार (11/15)
हितासाठी, त्यांच्या दु:ख, शोषणाला वाचा फोडण्यासाठी व लोक प्रबोधन करण्यासाठी दि. ९ मे १८८० ला स्वतः च्या संपादकत्वाखाली पुण्यात बंद पडलेले ‘दीनबंधू’ हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडेंनी मुंबईत सुरू केले.
हे नियतकालिक शेतकरी-कामकरी (12/15)
केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडेंनी दीनबंधू ह्या मुखपत्रातून वाचा फोडली.
तसेच लोखंडे यांनी 'गुराखी' या नावाचे एक दैनिकही काढले होते. पुढे लोक जागृती व समाज प्रबोधन करीत असताना, मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत (13/15)
अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक इस्पितळ काढले.
व प्लेगच्या साथीमध्ये सेवा करीत असताना दि. ९ फेब्रुवारी १८९७ ला दुर्देवाने या महान नायकाचे निधन झाले. (14/15)
समाज सुधारक, समतावादी कष्टकरीवर्गाच्या नेत्याला म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याला, तसेच मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनी विनम्र अभिवादन..(15/15)
🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"स्त्रियांनी शिकावे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य होते. व विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अश्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे एकूणच सर्व कार्य समाजाला आजही प्रेरणा देणारे आहे. (1/27)
#समानता व बंधुभावाचे मूल्य समाजात रुजवणारे तसेच 'श्यामची आई' ही अजरामर साहित्यकृती निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि संवेदनशील शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी मानवतेविषयी महान असा संदेश देताना म्हणतात, (2/16)
"आपल्याला वैचारिक दर्जा वाढवायचा असेल तर मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा.
व्देषाची लाट आली तर, प्रेमाचा सिंधू घेऊन चला.
संकुचितपणा येत असेल तर विशालता घेऊन चला.
क्षुद्रता पेरू पाहात असाल तर उदारता घेऊन चला.
मनात अंधारुन येत असेल तर प्रकाशाचे झोत आणा." (3/16)
असे प्रतिपादन करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शेतीविषयक विचारांना गती देणारे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार अधिक समृद्ध करत (2/12)
"शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला."
तसेच "शेतकऱ्यांनी शिक्षण घेतल्याखेरीज त्यांच्यामध्ये नवविचार, नवतंत्रज्ञानाची बीजे रुजवता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाची कास (3/12)