#पुस्तकआणिबरचकाही
सरोजिनी बाबर : (७ जानेवारी १९२०‒२० एप्रिल २००८). मराठी लोकसाहित्याच्या संकलक-संपादक आणि अभ्यासक. त्यांची लोकसाहित्याची संपादने ग्रंथरूपाने प्रसिध्द आहेतच, पण समाजशिक्षणमालेची २७० संपादनेही त्यांच्या संपादनकार्यात समाविष्ट आहेत. समाजशिक्षणमाला ही त्यांचे वडील 👇
कृ. भा. बाबर यांनी सुरू केलेली पुस्तकमाला सर्वपरिचित आहे. शिक्षण, समाजकारण, लोकसाहित्य इत्यादी क्षेत्रांतली २८० लहानलहान पुस्तके या मालेद्वारे त्यांच्या वडिलांनी प्रसिध्द केली. प्रारंभापासूनच वडिलांना त्यांच्या लेखनकामात साहाय्य करणाऱ्या सरोजिनीबाईंनी वडिलांच्या निधनांतर २७० 👇
पुस्तकांची मालेत भर घातली. याशिवाय मी पाहिलेले यशवंतराव आणि वसंतदादा पाटील गौरवग्रंथ या ग्रंथांची संपादने त्यांच्या नावे आहेत. कुमारवयीन मुलांसाठीही त्यांनी काही सहसंपादने केली होती.
कथा, कादंबऱ्या बालवाङ्मय इ. वाङ्मयप्रकारांचे त्यांनी स्वतंत्रपणे लेखन केले आहे. ७ कादंबऱ्या, 👇
११ कथासंग्रह, २६ ललितलेखसंग्रह, २ कवितासंग्रह, ४ नाट्यवाङ्मयाची पुस्तके आणि आत्मचरित्र अशी ५१ स्वतंत्र पुस्तके त्यांच्या ३०७ संपादित पुस्तकांच्या जोडीला ठेवली, तर त्यांच्या ग्रंथांची एकूण संख्या ३५८ आहे. याशिवाय ‘रानजाई’ या नावाने त्यांनी शांता शेळके यांच्यासह केलेली दूरदर्शन 👇
मालिकाही लोकसाहित्याकडे जनसामान्यांचे लक्ष वेधण्यात महत्त्वाची ठरली.त्यांची लोकसाहित्यविषयक महत्त्वाची संपादने अशी : एक होता राजा, दसरा-दिवाळी, जनलोकांचा साम्यवेद, साजाशिणगार, मराठीतील स्त्रीधन, वनिता सारस्वत, बाळराजे, कुलदैवत, राजाविलासी केवडा, लोकसंगीत, समाजशिक्षणमालेतील 👇
लोकसाहित्यविषयक पुस्तिका.
त्यांच्या ग्रंथसंपादनासाठी विविध पुरस्कार आणि सन्मान त्यांना प्राप्त झाले. त्यांपैकी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची गौरववृत्ती, भद्रकाली ताराराणी पुरस्कार, गुरूवर्य बाबुराव जगताप पुरस्कार, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार,
मराठा सेवा संघ विश्व गौरव पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या कार्याला दिशा देऊन लोकसाहित्याच्या संकलनाचे भरीव कार्य त्यांनी केले. ( संदर्भ - मराठी विश्वकोश) @Marathi_Mee@ShubhangiUmaria@threadreaderapp unroll #threadकर
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पुस्तकआणिबरचकाही
राजाराम भालचंद्र पाटणकर : (९ जानेवारी १९२७ - २४ मे २००४ )सौंदर्यशास्त्र हा पाटणकरांच्या व्यासंगाचा व लेखनाचा खास विषय होय. क्रोचे व कांट यांच्या सौंदर्यशास्त्रीय विचारांचा चिकित्सक परिचय करून देणारे ग्रंथ ज्याप्रमाणे त्यांनी लिहिले त्याचप्रमाणे स्वतःची 👇
स्वतंत्र सौंदर्यमीमांसा विस्तृतपणे त्यांनी सौदर्यमीमांसा या मौलिक ग्रंथात मांडली. साहित्यसमीक्षेच्या संकल्पनात्मक विवेचनाला त्यांची सौंदर्यमीमांसा अत्यंत उपयुक्त ठरते. पाटणकारंच्या सौंदर्यमीमांसेचे गुण व मर्यादा दाखवून देण्याचे कार्य प्रभाकर पाध्ये यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून 👇
केले आहे. १९६९ साली इस्थेटिक्स अँड लिटररी क्रिटिसिझम हे त्यांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर सौंदर्यमीमांसा , क्रोचेचे सौंदर्यांशास्र : एक भाष्य व कांटची सौंदर्यमीमांसा ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. यांपैकी सौदर्यमीमांसा हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा असून त्यास 👇
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभाकर ऊर्ध्वरेषे ( ९ जानेवारी १९१८ - १० जुलै १९८९ ) . ‘प्रतिभा’ आणि ‘किर्लोस्कर’ यांमधून लेखनास त्यांनी सुरुवात झाली. १९४२ मध्ये ‘किर्लोस्कर’मधून ‘आम्ही हिंदू आहोत का?’ हा पहिला लेख लिहिला. ‘प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा’ हा लेख त्या काळी गाजला होता. 👇
मार्क्सवादी विचारवंत, चांगल्यापैकी समीक्षक, पत्रकार, रशियन साहित्याचे अनुवादक अशीही त्यांची ओळख होती. अनेकविध चिनी व रशियन पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. माओ, स्टालिन, पुश्कीन, गॉर्की यांच्या ग्रंथांचे तसेच रशियन आणि युक्रेनियन लोककथांचे अनुवाद त्यांनी केले. 👇
हरवलेले दिवस या आत्मचरित्रात मुंबई येथे कम्युनमध्ये राहताना तेथे आलेले अनुभव, कम्युनिस्टांची कार्यप्रणाली, त्यांची मुखपत्रे, त्यातील लेखनप्रक्रिया, स्वतःचा झालेला कोंडमारा, मानसिक त्रास, स्वतःचा भ्रमनिरास इत्यादी गोष्टींचे इत्थंभूत वर्णन व प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचे 👇
#पुस्तकआणिबरचकाही
श्रीपाद कृष्ण बेलवलकर : (१० डिसेंबर १८८० – ८ जानेवारी १९६७). थोर प्राच्यविद्यापंडित. संशोधनाच्या व लेखनाच्या क्षेत्रात बेलवलकरांनी बजावलेली कामगिरी मोठी आहे. गीता व अभिज्ञानशाकुंतल ह्या ग्रंथाची प्रमाणित आवृत्ती त्यांनी काढली, महाभारतातील भिष्मपर्व, व 👇
संपादन केले (भीष्मपर्व, १९५७ शांतिपर्व, १९५० ते ५३) दांडीच्या काव्यादर्शाची आवृत्ती काढून (१९२०) त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध केले (१९२४). भारतीय तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक इतिहासाची गुरुदेव डॉ.रा. द. रानडे ह्यांच्या सहकार्याने त्यांनी एक योजना आखली व तिच्यातील क्रिएटिव्ह 👇
पिरिअड हा वेद, ब्राह्मणे, उपनिषदे ह्यांच्याशी संबंधित असलेला दुसरा खंड लिहिला, संपादिला (१९२७). त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आणि संशोधनलेखांत माठरवृत्ति (१९२४), कॅनन्स ऑफ टेक्स्च्यूअल अँड हायर क्रिटिसिझम अप्लाइड टू शाकुंतल (१९२५), वेदान्त फिलॉसफी (१९२९), बसु मलिक लेक्चर्स ऑन 👇
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभा गणोरकर : ( ८ जानेवारी १९४५). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका. व्यतीत , विवर्त , व्यामोह हे काव्यसंग्रह. बाळकृष्ण भगवंत बोरकर हा समीक्षाग्रंथ तर बोरकरांची निवडक कविता , गंगाधर गाडगीळ व्यक्ती आणि सृष्टी , किनारे मनाचे, 👇
शांता शेळके यांची निवडक कविता ,आशा बगे यांच्या निवडक कथा ही त्यांची संपादने आहेत. वाङमयीन संज्ञा संकल्पना कोश , संक्षिप्त मराठी वाड्ःमय कोश भाग. १ आणि भाग २ ही त्यांची सहसंपादने आहेत एकेकीची कथा , श्रावण बालकथा याचे लेखन त्यांनी केले. तसेच त्यांनी वर्तमानपत्रातून व 👇
नियतकालिकातून विपुल प्रमाणात पुस्तक परीक्षणे केली. विविध चर्चासत्रांतून निबंध वाचन केले. जगण्याच्या रुढ वर्तुळाबाहेर जाऊन जीवनानुभव घेणारी त्यांची कविता मानवी संबंधांचा शोध घेते. अस्तित्वशोध हे प्रभा गणोरकर यांच्या कवितेचे महत्त्वाचे आशयसूत्र आहे. समाजव्यवस्थेत स्त्री म्हणून 👇
जगभरातील महापुरुषांची नियतीने अनेकदा सत्त्वपरीक्षा घेतली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनात नियतीसह त्यांच्या शरीर प्रकृतीने त्यांची सत्व परीक्षा घेतली होती. #पुस्तकआणिबरचकाही @LetsReadIndia@PABKTweets
या सगळ्यांनचा सामना करीत कोसळत्या कड्यावरून पावले टाकताना या पुरुषसिंहाने आपली धीरगंभीरता सोडली नाही. निधर्मी, बलदंड, बलवान, श्रेष्ठ आणि सुसंस्कृत भारताच्या आपल्या स्वप्नासाठी त्यांनी अवघे जीवन वेचले आहे.सुभाषचंद्र बोस यांचा जीवनसंघर्ष अनेक वेगळ्या पातळ्यांवर घडला आहे. 👇
हिंदुस्थानातील स्वातंत्र्य चळवळ आणि गांधी-नेहरुंशी प्रेम तसाच संघर्ष, महायुद्धकालीन जर्मनीतले वास्तव्य, पाणबुडीतून प्रवासी करून गाठलेला जपान..आणि शेवटी पूर्व आशियातील तेज:पुंज कर्तृत्वकडा! इंफाळ मोहीम १९४१-४२ मध्येेच जपानने रद्द केली होती. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे ( १६ जुलै १९४३ - ६ जानेवारी २०१० )हे मराठी भाषेमधील लेखक होते.प्राध्यापक, लेखक, मराठी भाषेतील साहित्यिक, दलित साहित्यिक म्हणून त्याची ख्याती देशभर आहे. "अस्मितादर्श" नावाच्या त्रैमासिकामधून त्यांच्या लिखाणाचा प्रारंभ झाला. 👇
'आठवणींचे पक्षी' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यातल्या समजूतदार भाषेने त्यांच्या दु:खाचे झाड गदगदून हलवून सोडले. सोनकांबळे यांनी सांगितलेली आयुष्याची वेदना झणझणीत आणि खरे तर संतप्त आक्रोशाची असली तरी दाह जाणवला तो शांत भाषेत.या आत्मचरित्राचे अकरा भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले.👇
याशिवाय "असं हे सगळं', "पोत आणि पदर' ही त्यांची ग्रंथसंपदा आहे.
'असं हे सगळं' हा ललित लेखांचा संग्रह आणि 'पोत आणि पदर' हा समीक्षा ग्रंथ अशी आणखी दोन पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी सोनकांबळे यांची खरी ओळख आणि लेखक म्हणून ताकद एकवटली होती ती, 'आठवणींचे पक्षी' या आत्मकथनातच. 👇