#पुस्तकआणिबरचकाही
प्रभा गणोरकर : ( ८ जानेवारी १९४५). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका. व्यतीत , विवर्त , व्यामोह हे काव्यसंग्रह. बाळकृष्ण भगवंत बोरकर हा समीक्षाग्रंथ तर बोरकरांची निवडक कविता , गंगाधर गाडगीळ व्यक्ती आणि सृष्टी , किनारे मनाचे, 👇
शांता शेळके यांची निवडक कविता ,आशा बगे यांच्या निवडक कथा ही त्यांची संपादने आहेत. वाङमयीन संज्ञा संकल्पना कोश , संक्षिप्त मराठी वाड्ःमय कोश भाग. १ आणि भाग २ ही त्यांची सहसंपादने आहेत एकेकीची कथा , श्रावण बालकथा याचे लेखन त्यांनी केले. तसेच त्यांनी वर्तमानपत्रातून व 👇
नियतकालिकातून विपुल प्रमाणात पुस्तक परीक्षणे केली. विविध चर्चासत्रांतून निबंध वाचन केले. जगण्याच्या रुढ वर्तुळाबाहेर जाऊन जीवनानुभव घेणारी त्यांची कविता मानवी संबंधांचा शोध घेते. अस्तित्वशोध हे प्रभा गणोरकर यांच्या कवितेचे महत्त्वाचे आशयसूत्र आहे. समाजव्यवस्थेत स्त्री म्हणून 👇
वाटयाला आलेला सनातन संघर्ष व एकटेपण हे व्यतीत या कवितासंग्रहातील कवितांचे लक्षणीय आशयसूत्र आहे. नवकाव्य परंपरेतल्या अस्तित्ववादाचे परिमाण प्रभा गणोरकर यांच्या कवितेत दिसून येते.प्रभा गणोरकर यांना बहिणाई पुरस्कार (१९९९), शांता शेळके पुरस्कार (२०१२) 👇
महाराष्ट्र शासनाचा कविवर्य केशवसुत पुरस्कार (२०१६) आदी पुरस्कार मिळाले आहेत.अमरावती येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे (२०००)अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹
#पुस्तकआणिबरचकाही
निरंजन घाटे ( १० जानेवारी १९४६ ) मराठी भाषेतून विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी निरंजन घाटे यांनी सातत्याने ४० वर्षे लेखन केलेले आहे. घाटे यांनी मराठी वाचकांसाठी वैज्ञानिक संकल्पनांमधील क्लिष्ट आशय सोप्या आणि सुबोध मराठी भाषेत प्रकट करण्यासाठी 👇
लेख व विज्ञानकथाही लिहिल्या. देशी आणि परदेशी शास्रज्ञांची चरित्रे, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांची अनन्यसाधारण व्यक्तिमत्वे, त्यांच्या वैज्ञानिक कामगिऱ्या त्यांनी उलगडून दाखविल्या आहेत. पर्यावरण, उत्क्रांती यांसंबंधीचे लेखन करून त्यांनी जनजागृतीचे कार्यही केलेले आहे. 👇
विज्ञान लेखनासाठी आवश्यक असणारी विशाल ग्रंथसंपदा त्यांनी मेहनतीने उभारलेली आहे. विज्ञान लेखनाप्रमाणे युद्धकथा, साहसकथा, हेरकथा आणि बालकुमार वाङ्मयनिर्मितीमध्ये रमतात.पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, मराठी साहित्य परिषद आणि महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांचे ते आजीव सदस्य आहेत. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
गणेश हरि खरे (१० जानेवारी १९०१ - ५ जून १९८५ ) महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास-संशोधक. इतिहासाचा सर्वांगीण अभ्यास आणि संशोधन करता यावे, म्हणून त्यांनी हिंदी, उर्दू, फार्सी, कन्नड, संस्कृत, इंग्रजी वगैरे भाषांचा सखोल अभ्यास केला; तसेच इतिहासाशी संबंधित अशा👇
नाणकशास्त्र, पुरातत्त्वविद्या, मूर्तिविज्ञान, पुरालेखविद्या यांचा अभ्यास केला. सर्व भारतभर प्रवास करून त्यांनी शेकडो ऐतिहासिक स्थळे तर पाहिलीच; पण नाणी, कागदपत्रे, पोथ्या व इतर ऐतिहासिक वस्तू जमा केल्या. सु. तीस इतिहासप्रसिद्ध घराण्यांचे कागद, २०,००० पोथ्या, ५,००० नाणी, 👇
८० चित्रे, ३० ताम्रशासने व २०० इतर वस्तू एवढे प्रचंड साहित्य त्यांनी जमा केले. या सर्वांचा उपयोग सामान्य विद्यार्थ्याला तसेच चिकित्सक संशोधकाला व्हावा, म्हणून त्यांवर त्यांनी सु. ४०० लेख आणि पन्नासहून अधिक लहान-मोठी पुस्तके लिहिली. दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, 👇
#पुस्तकआणिबरचकाही
राजाराम भालचंद्र पाटणकर : (९ जानेवारी १९२७ - २४ मे २००४ )सौंदर्यशास्त्र हा पाटणकरांच्या व्यासंगाचा व लेखनाचा खास विषय होय. क्रोचे व कांट यांच्या सौंदर्यशास्त्रीय विचारांचा चिकित्सक परिचय करून देणारे ग्रंथ ज्याप्रमाणे त्यांनी लिहिले त्याचप्रमाणे स्वतःची 👇
स्वतंत्र सौंदर्यमीमांसा विस्तृतपणे त्यांनी सौदर्यमीमांसा या मौलिक ग्रंथात मांडली. साहित्यसमीक्षेच्या संकल्पनात्मक विवेचनाला त्यांची सौंदर्यमीमांसा अत्यंत उपयुक्त ठरते. पाटणकारंच्या सौंदर्यमीमांसेचे गुण व मर्यादा दाखवून देण्याचे कार्य प्रभाकर पाध्ये यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून 👇
केले आहे. १९६९ साली इस्थेटिक्स अँड लिटररी क्रिटिसिझम हे त्यांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर सौंदर्यमीमांसा , क्रोचेचे सौंदर्यांशास्र : एक भाष्य व कांटची सौंदर्यमीमांसा ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. यांपैकी सौदर्यमीमांसा हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा असून त्यास 👇
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभाकर ऊर्ध्वरेषे ( ९ जानेवारी १९१८ - १० जुलै १९८९ ) . ‘प्रतिभा’ आणि ‘किर्लोस्कर’ यांमधून लेखनास त्यांनी सुरुवात झाली. १९४२ मध्ये ‘किर्लोस्कर’मधून ‘आम्ही हिंदू आहोत का?’ हा पहिला लेख लिहिला. ‘प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा’ हा लेख त्या काळी गाजला होता. 👇
मार्क्सवादी विचारवंत, चांगल्यापैकी समीक्षक, पत्रकार, रशियन साहित्याचे अनुवादक अशीही त्यांची ओळख होती. अनेकविध चिनी व रशियन पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. माओ, स्टालिन, पुश्कीन, गॉर्की यांच्या ग्रंथांचे तसेच रशियन आणि युक्रेनियन लोककथांचे अनुवाद त्यांनी केले. 👇
हरवलेले दिवस या आत्मचरित्रात मुंबई येथे कम्युनमध्ये राहताना तेथे आलेले अनुभव, कम्युनिस्टांची कार्यप्रणाली, त्यांची मुखपत्रे, त्यातील लेखनप्रक्रिया, स्वतःचा झालेला कोंडमारा, मानसिक त्रास, स्वतःचा भ्रमनिरास इत्यादी गोष्टींचे इत्थंभूत वर्णन व प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचे 👇
#पुस्तकआणिबरचकाही
श्रीपाद कृष्ण बेलवलकर : (१० डिसेंबर १८८० – ८ जानेवारी १९६७). थोर प्राच्यविद्यापंडित. संशोधनाच्या व लेखनाच्या क्षेत्रात बेलवलकरांनी बजावलेली कामगिरी मोठी आहे. गीता व अभिज्ञानशाकुंतल ह्या ग्रंथाची प्रमाणित आवृत्ती त्यांनी काढली, महाभारतातील भिष्मपर्व, व 👇
संपादन केले (भीष्मपर्व, १९५७ शांतिपर्व, १९५० ते ५३) दांडीच्या काव्यादर्शाची आवृत्ती काढून (१९२०) त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध केले (१९२४). भारतीय तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक इतिहासाची गुरुदेव डॉ.रा. द. रानडे ह्यांच्या सहकार्याने त्यांनी एक योजना आखली व तिच्यातील क्रिएटिव्ह 👇
पिरिअड हा वेद, ब्राह्मणे, उपनिषदे ह्यांच्याशी संबंधित असलेला दुसरा खंड लिहिला, संपादिला (१९२७). त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आणि संशोधनलेखांत माठरवृत्ति (१९२४), कॅनन्स ऑफ टेक्स्च्यूअल अँड हायर क्रिटिसिझम अप्लाइड टू शाकुंतल (१९२५), वेदान्त फिलॉसफी (१९२९), बसु मलिक लेक्चर्स ऑन 👇
जगभरातील महापुरुषांची नियतीने अनेकदा सत्त्वपरीक्षा घेतली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनात नियतीसह त्यांच्या शरीर प्रकृतीने त्यांची सत्व परीक्षा घेतली होती. #पुस्तकआणिबरचकाही @LetsReadIndia@PABKTweets
या सगळ्यांनचा सामना करीत कोसळत्या कड्यावरून पावले टाकताना या पुरुषसिंहाने आपली धीरगंभीरता सोडली नाही. निधर्मी, बलदंड, बलवान, श्रेष्ठ आणि सुसंस्कृत भारताच्या आपल्या स्वप्नासाठी त्यांनी अवघे जीवन वेचले आहे.सुभाषचंद्र बोस यांचा जीवनसंघर्ष अनेक वेगळ्या पातळ्यांवर घडला आहे. 👇
हिंदुस्थानातील स्वातंत्र्य चळवळ आणि गांधी-नेहरुंशी प्रेम तसाच संघर्ष, महायुद्धकालीन जर्मनीतले वास्तव्य, पाणबुडीतून प्रवासी करून गाठलेला जपान..आणि शेवटी पूर्व आशियातील तेज:पुंज कर्तृत्वकडा! इंफाळ मोहीम १९४१-४२ मध्येेच जपानने रद्द केली होती. 👇