#पुस्तकआणिबरचकाही
अगाथा क्रिस्टी ( १५ सप्टेंबर १८९० - १२ जानेवारी १९७६ ) ही इंग्रजी भाषेत लिखाण करणारी लेखिका होत्या. जगभरातील रहस्यकथा प्रेमींना रहस्यात गुंगवणारी.पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं ते पहिलं महायुद्ध संपल्या संपल्या. तिथून पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातलं जग 👇
तिच्या पुस्तकांतून व्यक्त होत राहिलं. अगाथा ज्या काळात या कथा लिहीत होती त्या काळातील जागतिक घडामोडींचे संदर्भ, अर्थातच ब्रिटिश आणि युरोपियन दृष्टिकोणातून यात सतत येत राहतात. किंबहुना तिच्या जगाविषयीच्या अनुभवांचं हे सार असतं. पुरातत्त्वशास्त्रज्ञ पतीमुळे अगाथाला मेसोपोटेमिया,👇
इजिप्त अशा पुरातत्त्वसमृद्ध भागांतलं वास्तव्य लाभलं आणि ते तिच्या कथांमधून उतरलं. १९३४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या ‘मर्डर ऑन ओरिएण्ट एक्सप्रेस’मध्ये तर आशिया खंड ते युरोप खंड अशा रेल्वे प्रवासात त्या वेळचे अनेक देश, तिथल्या वृत्ती-प्रवृत्तींसह, सूक्ष्म राजकीय, प्रशासकीय 👇
संदर्भासहित डोकावतात. ब्रिटनमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये हिंदुस्तानातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या गरम वाऱ्यांच्या झुळकादेखील मधूनच जाणवतात. अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवृत्तींमधला विसंवाद, अस्मितांची टक्कर बोलण्यात खेळकरपणे पण सहेतुक येत असते.
रहस्यकथेत रहस्याची उकल एकदा झाली की मग 👇
वाचकाच्या लेखी त्या रहस्यकथेचं अस्तित्व संपतं, एकदा वाचून झालं की दुसऱ्यांदा वाचण्यात रस राहत नाही, असा एक सामान्य अनुभव असतो. पण हिचकॉकचे चित्रपट जगातले असंख्य प्रेक्षक पुन:पुन्हा पाहतात हा अनुभव आहे.नेमका हाच अनुभव अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं देतात.
#पुस्तकआणिबरचकाही
रघुनाथ धोंडो कर्वे (१४ जानेवारी १८८२ - १४ ऑक्टोबर १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती. अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून 👇
समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व 👇
त्यासंबंधी उपायाची जी चर्चा करण्यास पत्रकार घाबरत, ती रघुनाथराव ह्या मासिकामधून निर्भीडपणे करीत. ह्यात लैंगिक विषयांना प्राधान्य मिळालेले असे. समाजस्वास्थ्य मधील लेखांमुळे सनातनी, तसेच दिखाऊ सुधारक ह्यांचा रोष त्यांना पत्करावा लागला. त्यांच्या मासिकावर, अश्लीलतेच्या आरोपावरून 👇
गांधीजींना कधीही प्रत्यक्ष न भेटलेले फ्रेंच विचारवंत रोमाॅं रोलाॅं यांनी गांधीजींचे द. आफ्रिकेतील कार्य बघून त्यांचे चरित्र लिहिले. ते वाचून संपूर्ण जगात गांधीजींबद्दल कुतूहल वाढले. @LetsReadIndia @PABKTweets#पुस्तकआणिबरचकाही
पुढे भारतातल्या व्यापक कार्याने प्रभावळ वाढली त्यातल्या काही निवडक महिलांचा हा मागोवा...
सोंजा श्लेशिंग ही रशियन ज्यु मुलगी, विशीच्या आसपासची, गांधीजींच्या द. आफ्रिकेतील कार्यालयात मदतनीस म्हणून आली आणि वर्णभेद चळवळीची प्रमुख कार्यकर्ती झाली. 👇
मॅडलिन स्लेड, बिथोविनच्या संगीतात आकंठ बुडालेली तरुणी गांधींचं चरित्र वाचून प्राणांतिक ओढीने सर्वसंग परित्यागाच्या भावनेने हिंदुस्थानात आली.
एस्थर फारिंग,डेन्मार्कच्या मिशनरींचे लोकशिक्षण , रुग्णाइतांची सेवा आणि धर्मप्रसाराचे काम करणारी . 👇
#पुस्तकआणिबरचकाही
मृणालिनी गडकरी ( १२ जानेवारी १९४९ - २७ऑक्टोबर २०१८) ह्या बंगाली साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देणाऱ्या अनुवादिका लेखिका होत्या. जर्मन भाषा घेऊन पदवी प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठी विषयात एम.ए. केले. ‘कविवर्य बा. भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर 👇
यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास ’ या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल. केले .रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि समकालीन मराठी कविता ’ हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन सेंटर’ यांच्या सहकार्याने इंग्रजी👇
बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. विविध नियतकालिकांत त्यांचे लेखन व अनुवादित साहित्य प्रकाशित झाले आहे. साहित्यसेवेबद्दल त्यांना मातृ-पितृ पुरस्कार, सुभाष भेंडे पुरस्कार, प. बंगाल सरकारचा शरद पुरस्कार, जी.ए. कुलकर्णी पुरस्कार,
#पुस्तकआणिबरचकाही
पं. महादेवशास्त्री जोशी (१२ जानेवारी १९०६ – १२ डिसेंबर१९९२). भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासंगी संपादक आणि मराठी लेखक.पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण, काव्यशास्त्र तसेच ज्योतिष ह्या विषयांचे अध्ययन करून १९२६ साली ‘सत्तरी शिक्षण संस्था’ स्थापन करून त्यांनी 👇
शिक्षणप्रसारास वाहून घेतले. १९३४ मध्ये ‘राण्यांचे बंड’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी सातत्याने कथालेखन केले. वेल विस्तार हा पहिला कथासंग्रह १९४१ मध्ये प्रकाशित झाला. १९५७ पर्यंत त्यांचे एकूण दहा कथासंग्रह प्रसिद्ध झाले. खडकांतले पाझर , 👇
विराणी, घररिघी हे त्यांपैकी काही होत. त्यांच्या अनेक कथा गोमंतकीय जीवनाच्या पार्श्वभूमीवर आहेत. साधी, सोपी पण भावोत्कट भाषा आणि आकर्षक निवेदनशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. जीवनाकडे पाहण्याचा एक प्रसन्न, सोज्वळ दृष्टिकोण त्यातून प्रत्ययास येतो. त्यांच्या 👇
#पुस्तकआणिबरचकाही
विष्णु सखाराम खांडेकर : (११ जानेवारी १८९८ - २ सप्टेंबर १९७६). प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक. खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात कादंबऱ्या, लघुकथासंग्रह, लघुनिबंधसंग्रह, रूपककथासंग्रह, १ नाटक ह्यांशिवाय काही चरित्रात्मक 👇
समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह ह्यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिलेल्या आहेत. तेजस्वी कल्पनाशक्ती आणि तल्लख विचारशक्ती या गुणांना शब्दप्रभुत्वाची जोड मिळाल्याने खांडेकरांची भाषाशैली आलंकारिक आणि सुभाषितात्मक ठरली. 👇
मराठी कादंबरीला तंत्रमंत्रदृष्ट्या प्रगल्भ व प्रभावी करण्याचे श्रेय ना. सी. फडक्यांबरोबर खांडेकरांनाही दिले जाते. मराठी कथेला तर त्यांनी नानाविध प्रयोगांनी समृद्ध व संपन्न केले. त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य 👇
गांधीजी आणि त्यांचे टिकाकार
लेखक - सुरेश द्वादशीवार
गाधींजीच्या सहवासातल्या सहकाऱ्यांचे किंवा विरोधकांचे गांधीजी विषयी काय मत होते किंवा गांधीजींचे त्यांच्याविषयी काय मत होते याचा उहापोह करण्याचा या पुस्तकात प्रयत्न आहे. @LetsReadIndia@PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही 👇
घटना व्यक्ती आणि विचारधारा यांचं गांधीजींच्या अनुषंगाने विस्तृत विवेचन केलं आहे डाॅ. आंबेडकर, सरदार पटेल, नेहरू, सुभाषचंद्र बोस, सावरकर, जीना, मौलाना आझाद, चर्चिल, टाॅलस्टाॅय, कस्तुरबा, शिवाय मुस्लिम लिग, सशस्त्र क्रांतिकारक यांच्याविषयीही चर्चा केलेली आहे. 👇
गांधीजींवर लिहितांना अनेकांना तटस्थता राखता येत नाही. या पुस्तकातही लेखकाचा पक्षपातीपणा जाणवतो. त्यांच्या धोरण व धारणांकडे संशयाने पाहणारे, त्यांच्यावर टीका करणारे समाजसुधारक कमी नव्हते. आजही कमी नाहीत. 👇