#पुस्तकआणिबरचकाही
शरच्चंद्र चिरमुले ( १५ जानेवारी १९३१ - २७ मार्च १९९२ ) ‘कामरूपचा कलावंत’ ही पहिली कथा ‘वाङ्मयशोभा’मध्ये (१९४९) प्रसिद्ध झाली. १९६७ ला प्रकाशित झालेली, ‘श्री शिल्लक’ ही त्यांचा पहिला महत्त्वाचा कथा संग्रह. यानंतरच्या पाच कथासंग्रहाव्यतिरिक्त आत्मवृत्तात्मक 👇
आत्मवृत्तात्मक ‘वास्तुपुरुष’ आणि ललित निबंध ‘जीवितधागे’ हे लेखन केले. त्यांनी कथालेखनाची वेगळी व स्वतंत्र पायवाट निर्माण केली. नवकथेतून कथालेखनाला बळ घेतले, पण अंधानुकरण केले नाही. फार मोठी प्रायोगिकता आणली नसली, तरी कथाप्रवाहावर स्वतःच्या कथालेखनाचा स्वतंत्र ठसा उमटवला. 👇
कलावाद-जीवनवाद या वादचर्चेच्या अधीन न जाता कथाविषयक कलात्मक जाणिवेचे भान गांभीर्याने ठेवून चिरमुले यांच्या कथेने मराठी कथेला वैविध्यपूर्ण आणि समृद्ध बनविले आहे. माणसाचे मन, त्याचे एकाकीपण, मृत्यू, मानवी जीवनातील रहस्यतत्त्व अशा आशयसूत्रांतून गंभीरपणे पाहणारे चिरमुले जीवनाकडे👇
मिस्किलपणाने पाहतात आणि त्यातून निखळ शुद्ध विनोदाचे दर्शन घडविणार्या विनोदी कथांचे दालन उघडले जाते. अर्थात अशा विनोदी कथा मोजक्याच पण दर्जेदार आहेत. ‘श्री शिल्लक’ या कथासंग्रहासाठी १९६८ साली ललित पारितोषिक मिळाले तर ‘कॉग्ज’ या कथासंग्रहासाठी १९७४-७५ साली महाराष्ट्र शासनाचे 👇
पारितोषिक मिळाले. ‘एका जन्मातल्या गाठी’ ह्या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार १९८६ साली तर ‘वास्तुपुरुष’ लेखसंग्रहासाठी कै.प्रा.वि.ह. कुलकर्णी पारितोषिक १९८८ साली त्यांना मिळाले. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)
#पुस्तकआणिबरचकाही
शकुंतला परांजपे ( १७ जानेवारी १९०६ - ३ मे २००० ) परदेशात शिक्षण पूर्ण करून नौकरी करीत असताना रशियन व्यक्तीशी विवाह झाला. पुढे घटस्फोट झाल्यावर मुलीसह भारतात परतल्या. हिंदुस्थानात परतल्यावर त्यांनी संततिनियमनाच्या प्रचाराचे कार्य पुष्कळ वर्षे हिरिरीने केले. 👇
या कामासाठी शकुंतला परांजपे यांनी काही काळ पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात नोकरी केली. १९५८ साली राज्य सरकारने त्यांची नियुक्ती विधानसभेवर केली. त्यानंतर १९६४ साली, राज्यसभेवरही सहा वर्षांसाठी त्यांची नेमणूक झाली. . संततिनियमनाच्या संदर्भात ‘पाळणा लांबवायचा की, थांबवायचा?’ 👇
हे पुस्तक आणि र.धों.कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्या’तून काही लेखन केले. ‘काही आंबट काही गोड’ या पुस्तकातील ‘राष्ट्रपती नियुक्तीची सहा वर्षे’ या लेखातही या कार्यासंबंधीचे अनुभव आले आहेत. शकुंतला परांजपे यांचे ललितगद्य, कादंबरी आणि नाटक या तीनही साहित्यप्रकारांतील लेखन वेधक आहे. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
मधुकर केचे ( १७ जानेवारी १९३२ - २५ मार्च १९९३ ) मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करणारे मधुकरराव कवी आणि ललित निबंधकारही होते. ‘एक घोडचूक’ या लेखसंग्रहात ते म्हणतात, ‘व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने वगैरे लिहीत असतानाच काही प्रकारचा उपद्व्याप मी अधूनमधून केला. 👇
आपल्यातल्याच काहींनी त्या प्रकाराला वात्रट लेखन हे नाव दिले. त्यांचे तीन कवितासंग्रह महाराष्ट्र सरकारची बक्षिसे लागोपाठ पटकावून गेले. ‘वंदे वंदनम्’ या त्यांच्या लेखसंग्रहातील पैसा कसा खावा, माझे मंत्रिमंडळ, मुंबईतील बशी, वंदे मास्तरम् हे लेख विनोदी व रोजच्या अनुभवविश्वातले 👇
असून वाचकाचे मनोरंजन करतात. केचे यांची कविता दुर्बोध व जटील नसून साधी, सौम्य व सहज आहे. ओवी, अभंग या पारंपरिक छंदांचाही त्यांनी वापर केला आहे. विदर्भातील गावे, माणसे आणि तिथल्या परिसराचे मार्मिक निरीक्षण खास वैदर्भी बोलीतून प्रस्तुत केले आहे. ‘पुनवेचा थेंब’ व ‘आसवांचा ठेवा’👇
#पुस्तकआणिबरचकाही
ज्योत्स्ना देवधर ( २७ फेब्रुवारी १९२६ - १७ जानेवारी २०१३ ) विवाहपूर्व वास्तव्य महाराष्ट्राबाहेर झाल्याने प्रारंभी हिंदी भाषेतून कथा-लेखन केले. ‘तरुण भारत’ (पुणे) ह्या दिवाळी अंकात ज्योत्स्नाबाईंची ‘घर गंगेच्या काठी’ ही पहिली मराठी कादंबरी आली. पुढे लगेचच 👇
ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांची स्वतंत्र नाममुद्रा उमटली. पुढच्याच वर्षी १९६८मध्ये त्यांची ‘कल्याणी’ ही कादंबरी प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यांच्या अन्य लेखनाप्रमाणेच या दोन्ही कादंबर्यांचे विषय कौटुंबिक विशेषतः एकत्र कुटुंब पद्धती आणि तिच्यामधील 👇
स्त्री हेच होते. या कुटुंब पद्धतीचे गुण-दोष आणि मर्यादाही त्यांच्या लेखनातून स्पष्ट होतात. अनेक कादंबर्यांबरोबर वीस कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यात ‘गार्या-गार्या भिंगोर्या’ (१९६९) ते ‘याचि जन्मी’ (१९९९) या प्रदीर्घ काळखंडातील त्यांचा कथाविषयक लेखनप्रवास समोर येतो. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
शरत्चंद्र चट्टोपाध्याय (१५ सप्टेंबर १८७६—१६ जानेवारी १९३८). प्रख्यात बंगाली कादंबरीकार आणि कथाकार. वास्तववादी कादंबरीकार म्हणून शरदबाबूंचे नाव वंग साहित्यात लोकप्रिय झाले आहे. खालच्या थरातील उपेक्षित समाजाचे अंतर्बाह्य चित्रण इतक्या मनोवेधकतेने, सहृदयतेने 👇
आणि मार्मिकतेने करणारा कादंबरीकार भारतीय साहित्यात झाला नाही, असा त्यांचा सार्थ नाव लौकिक आहे. शरदबाबूंची स्त्रीसृष्टी इतक्या वैविध्याने व वैचित्र्याने नटलेली आहे, की ती पाहून मन थक्क होते. परंपरागत रूढ चालीरीतींत अडकलेल्या भारतीय स्त्रीच्या भावभावनांने दर्शन घडविण्याचे 👇
त्यांचे कसब आगळे आहे. बंगालमधील स्त्रियांनी तर शरदबाबूंना आपले ‘सुहृद’ मानून त्यांचा गौरव केला व त्यांच्याविषयी आपला आदरभाव व्यक्त केला. या पतितांना ते ‘शापभ्रष्ट देवता’ समजतात. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत विविध स्वभावांची व थराची पात्रे दिसत असली, तरी त्यांचा प्रामुख्याने विषय 👇
#पुस्तकआणिबरचकाही
महादेव गोविंद रानडे ( १८ जानेवारी १८४२ - १६ जानेवारी १९०१), हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते, तसेच ते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. 👇
शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात 👇
त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी 👇
#पुस्तकआणिबरचकाही
नामदेव ढसाळ ( १५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४ ) कविता ही त्यांच्या स्वतःच्या प्रातिभिक सामर्थ्याची साक्ष तर आहेच, पण त्याबरोबर ती तिच्या निर्मितीकाळाशी अभिन्नपणे निगडित आहे. काळाचे सर्व चढ-उतार तिने पाहिले आहेत, पचवले आहेत. ढसाळांच्या लेखनामागे 👇
डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आणि कृतींचा पाया आहे,सातत्याने परिश्रम, अखंड चणचण आणि त्यासाठी करायची धावपळ, राजकीय आयुष्यातल्या उलथापालथी, दलित पॅन्थरचा उदयास्त, खासगी आयुष्यातले ताणतणाव हे सगळे पेलत, प्रदीर्घ काळ ‘मायस्थेनिया ग्राव्हिस’ या दुर्धर आजाराने ग्रासले असतानाही 👇
त्यांची कविता ताज्या दमाने उसळी घेताना दिसते. स्वतःला आणि भोवतालाला तपासत पुढे जाताना दिसते.ढसाळांच्या कवितेचा प्रभाव मराठी कवितेवर अटळच आहे.पण तो भारतीय भाषांतूनही आहे. जर्मन भूमीवर त्यांना कविता-वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले (बर्लिन फेस्टिव्हल, जून २००१), त्यांची ही अविरत👇