देशाचे पंतप्रधान माननीय @narendramodi जी यांनी #मुंबई तील ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध लोकोपयोगी विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण केले. यानिमित्ताने बीकेसी मैदानावर झालेल्या अतिविराट सभेला त्यांनी संबोधित केले.
मुंबई शहराला एक सुंदर आणि सुनियोजित दर्जाचे आंतरराष्ट्रीय शहर बनवणे आणि त्याचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यासमयी पंतप्रधान मोदीजी यांनी दिले.
मुंबईच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी @mybmc हद्दीतील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ७ मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नूतनीकरणाचा शुभारंभ याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
शहराची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी भांडुप येथील ३६० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, गोरेगाव येथील ३०६ खाटांचे रुग्णालय तसेच ओशिवरा येथील १५२ खाटांच्या प्रसूतीगृहाच्या पुनर्विकासाचा शुभारंभ देखील पंतप्रधान मोदीजींच्या शुभ हस्ते पार पडला.
याशिवाय मुंबई मनपा हद्दीतील २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण देखील त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून मुंबईतील सव्वा लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान माननीय @narendramodi जी यांच्या शुभ हस्ते आज मुंबई मेट्रो च्या मेट्रो लाईन २अ आणि मेट्रो लाईन ७ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी हेदेखील उपस्थित होते.
या मेट्रो मार्गांवरील गुंदवली स्थानक येथे पंतप्रधान महोदयांनी या मेट्रो मार्गांचे उद्घाटन केले. तसेच या मेट्रो स्थानकाची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मेट्रो मार्गाचा उपयोग होणार आहे.
मुंबई शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी दहिसर पूर्व ते डी.एन.नगर दरम्यानच्या १८.०६ किमी लांबीच्या मेट्रो लाईन २अ आणि अंधेरी पूर्व आणि दहिसर यांना जोडणाऱ्या १६.०५ किमी लांबीच्या मेट्रो लाईन ७ या मार्गांचा यात समावेश आहे.
दावोस येथे दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले.प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी व विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे स्पष्ट दिसते. #WorldEconomicForum#WEF23#MaharashtraInDavos @wef
राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांचे मी आभार मानतो.
देशाचे पंतप्रधान मा.@narendramodi जी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली. महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली. या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील.
पुणे महानगर परिवहन महामंडळात ९० नवीन फेम-२ ई-बसेस आणि पुणे रेल्वे स्थानकाजवळ तयार करण्यात आलेल्या पुणे स्टेशन ई बस डेपोचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
पुणे शहरातील परिवहन सेवेत या ९० ई बसेस दाखल झाल्याने शहरातील नागरिकांना प्रदूषणमुक्त, वातानुकूलित, आरामदायक सगळ्यात महत्वाचे म्हणजे किफायतशीर प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या नवीन ई-बसेस दाखल झाल्यामुळे पुणे परिवहन सेवेत ६५० ई बसेस दाखल झाल्या आहेत.
यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री @DrMNPandeyMP, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, आमदार राहुल कुल, आमदार संजय जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ,
#नवी_मुंबई विमानतळानजीकच्या २७२ गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०१२ साली #नैना ची नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली होती. राज्याच्या नगरविकास विभागाने नैना प्राधिकरणाबाबत देखील काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या
या निर्णयांद्वारे या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाला चाप लावण्यासोबतच नैनासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे
🔘नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना चाप बसवण्यासाठी या क्षेत्रात कोणतेही बांधकाम करताना रेरा आधी @CIDCO_Ltd ची परवानगी घेणे अनिवार्य
🔘 नैना क्षेत्रातील भूखंडांवर आकारण्यात येणारे विकास शुल्क शेतकऱ्यांकडून न घेता थेट या भूखंडाचा शेवटचा फायदा घेणाऱ्या घटकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई क्षेत्रातील विकासकांचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी न.वि. विभागाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून विकासकांच्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावरील उपाय ही समिती महिन्याभरात शासनाला सुचवणार आहे. #NaviMumbaiHousingRevivalProgram
🔘 प्रकल्पग्रस्त भूधारकाला वाढीव नुकसान भरपाईच्या अनुषंगाने मिळालेल्या १२.५% योजनेअंतर्गत वाटप केलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात येणारी मावेजा रक्कम आणि त्याअनुषंगाने बांधकाम मुदतवाढीसाठी वाढणारे अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क कमी करावे.
🔘 अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आकारणीसाठी ११५% पर्यंतचा दर जास्त असल्याने हा दर कमी करावा.
🔘 बांधकाम पूर्णत्वाचा दाखला वास्तुविशारदाने प्रमाणित केल्यानंतर कोणतेही अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क विकासकाकडून आकारण्यात येऊ नये.
नवी मुंबई तील बांधकाम व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास विभागाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयांमुळे नवी मुंबईतील @CIDCO_Ltd सिडको क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकांना वर्षानुवर्षे भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार आहे. #NaviMumbaiHousingRevivalProgram
🔘नवी मुंबई विमानतळाजवळील बांधकामांची उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅप नुसार ठेवण्यासाठी मी स्वतः केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.
🔘सिडकोच्या २२.०५%योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना द्यायचे सुविधा शुल्क चार समान हफ्त्यात द्यायला मंजुरी देण्यात आली आहे.
🔘 बांधकाम मुदतवाढीच्या ना हरकत दाखल्यासाठी एकाच वेळी अर्ज करून ३ वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
🔘 नवी मुंबईतील कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन २०१९ ला लवकरच राज्याचा पर्यावरण विभाग मंजुरी देणार आहे.