सर्वप्रथम.,
थोडंसं इतिहासात डोकावुयात.,
भगवान परशुरामाने म्हणे आपल्या क्रोधाग्नीच्या बळावर अखंड धरणी तब्बल २१ वेळा निक्षत्रीय केली होती म्हणे, अर्थात अखंड पृथ्वीस २१ प्रदक्षिणा घालत सर्वच्या सर्व क्षत्रिय राजांना यमसदनी धाडले होते ते केवळ आपल्या खांद्यावरील परशूच्या सहाय्याने...
या आख्यायिका रचणारेही अर्थात त्यांचेच वंशज, हेच ते ३% वाले....
मग त्या न्यायाने, या पृथ्वीतलावर हेच तेवढे एकमेव श्रेष्ठ हिंदू ठरतात आणि इतर सर्व शुद्र...
अगदी तुमच्या सकट बरं का शहाणे...
आज कलियुगात सुद्धा याच वाक्याचा पुनरुच्चार वारंवार केला जातो, तुम्ही तसा ऐकला नसेल कुठे तर राममंदिर पायाभरणीच्या वेळचं मोहन भागवतांचं भाषण ऐकू शकता, ज्यात सुरुवात त्यांनी एका श्लोकाने केलेली आहे ज्याचा अन्वयार्थ हाच निघतो....युट्यूबवर उपलब्ध आहे.
अपणास ठाऊक आहे की नाही माहीत नाही पण, इतिहासात थोडे पुढे गेल्यावर समजते कि, पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरावर गाढवाचा नांगर फिरविणारा आणि संपूर्ण शहर बेचिराख करणारा ही या ३% पैकीच होता बरं का, मुरार जगदेव कुळकर्णी नाव त्याचं आणि,
वर जो कुणी हे शहर पुन्हा वसविण्याचा प्रयत्न करेन त्याचा निर्वंश होईल या श्रापाची याद खुद्द मॉंसाहेबांना आणि शिवरायांना करून देणारे ही पुन्हा तेच होते ३% वाले.
रामेश्वर भट आणि पुरुषोत्तम भट नावे त्यांची.
आता कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाहीच म्हणा पण विषय निघालाच आहे म्हणून.
आज कलियुगात ही असे श्राप या ३% वाल्यांकडून दिले जातात बरं का शहाणे, तुमच्यावर कदाचित ती वेळ आली नसावी परंतु आहेत आज ही असे काही कावळे जे आपल्या श्रापाने गुरं मारण्याचा प्रयत्न करतात, त्यात सफल होत नाहीत हा भाग निराळा....
थोडे आणखी पुढे गेल्यावर,
अपणास तुकाराम महाराजांचे देहावसान कसे झाले हे ठाऊक असेलच ना शहाणे...??
अर्थात असायलाच हवं, कारण तुकाराम महाराजांना पुष्पक विमान सदेह वैकुंठाला घेऊन जातांना बघणारे किंवा तशी खोटीच हाकाटी पिटणारे मंबाजी भट आणि कंपू या ३% पैकीच होते.
इंद्रायणीचा मासा विचारतो नभा |
वैकुंठाला तुका नेला कैसा ||
माझा भोळा देव का रे तु चोरला |
मोह कैसा आवरला नाही तुजला ||
मारोनी त्याला भट झालासे थोर |
जीवासी खेळ कैसा केला ||
दादा म्हणे माझा तुका देहभाव |
गाथा रुपी अमर जगी जाहला ||
पुढे,
शिवराज्याभिषेक सोहळ्यास विरोध करणारे अनाजीपंत आणि चांडाळचौकडी हे ही त्या ३% वालेच होते, ज्यांची मजल पुढे जाऊन स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कटकारस्थानं करून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यापर्यंत जाऊन पोहचली होती....
आणखी पुढे जाऊयात.,
गोदावरी नामक ब्राम्हणकन्येचं काल्पनिक नाटक रचून छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करणारे चिटणीस बखरकार हे तत्कालीन संभाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाळाजी आवजी चिटणीसांचे वंशज हे ही त्या ३% पैकीच बरं का शहाणे...
पुढे.,
महाराष्ट्राच्या मातीत मुलींसाठीची पहिली शाळा उभारणाऱ्या सावित्रीबाई फुलेंवर झालेले अनन्वित अत्याचार अपणास ऐकिवात आहेत की नाहीत ठाऊक नाही, पण अगदी शेणामुताचे लगदे मारून, गटारीतलं पाणी फेकुन त्यांना शाळेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता....
आता या त्यांच्या वर्तणुकीमागे कारण केवळ एकच बरं, मनुस्मृती मध्ये महिलेस दिलेले दुय्यम स्थान, महिलेस हीन-दिन म्हणून केलेले संबोधन आणि महिलांना शिकण्याचा वा वेद अभ्यासाचा कुठला ही अधिकार नसल्याचा दिलेला स्पष्ट आदेश, आणि हो यात मात्र त्यांच्या स्त्रीयांचा सुद्धा अपवाद नव्हता बरं.
पुढे जाऊन अपणास छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण माहिती असेलच,
नसेल तर विस्तृतपणे सांगतो.
शाहू महाराज कार्तिक मासात नियमित पहाटे पंचगंगेत स्नान करत. स्नान चालू असताना नारायण भट मंत्र म्हणत असे.एकदा महाराजांचे स्नेही प्रकांड पंडित राजाराम शास्त्री भागवत ही सोबत होते.
स्नान चालू असताना राजाराम शास्त्रींच्या लक्षात आले की,तो भट स्वतः स्नान न करता वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होता. राजाराम शास्त्रींनीं ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि महाराजांनी त्या भटास जाब विचारताच तो भट म्हणतो "शूद्रास पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात."
"क्षत्रिय कुलावतंस हिंदुपदपातशहा' अशी बिरुदावली असलेल्या छत्रपतींना एका भटाने शूद्र म्हणून हिणावने कदाचित आपणास मान्य असेल कारण तुम्ही ३% समर्थक, मला मात्र हे कदापी मान्य नाही....🙏
मुळात वरती मांडलेला प्रत्येक मुद्दा मला अमान्य आहे आणि म्हणूनच मी यास अन्याय म्हणून संबोधतो.
खरं तर गणेशोत्सव आला कि पाठोपाठ एक वाद नेहमीच येत असतो, "गणेशोत्सवाची सुरुवात प्रथम कुणी, कधी व का केली..?"
बहुतांश लोक हेच सांगतील कि,लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये एकजूट निर्माण करून त्याचा वापर स्वातंत्र्यलढ्यासाठी करण्यास्तव १८९४ साली पुण्यात गणेशोत्सवास सुरुवात केली.
पण ही माहिती मुळातच सपशेल चुकीची आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती...
भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी १८९३ मध्ये एक लेख लिहून केसरीतून घेतली होती.
त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच १८९४ साली टिळकांनी त्यास व्यापक स्वरूप दिले.