गिरणगावचा विचार केला की साधारण लालबाग परळ हा भागच डोळ्यासमोर तराळतो. कारण त्यामागे केलेले डॉक्युमेंटेशन आहे. बर्यापैकी याभागावर साहित्यिक मुल्यांतून वा सामाजिक आशयातून लिहलेले आहे. मागे मी बोलल्या प्रमाणे गिरणगावचे तीन सांस्कृतिक भागात विभागणी होते.(१)
शहरांना कधीच संस्कृती नसते वा सभ्यता नसते. बाहेरून आलेले लोक शहरांना ओळख देत असतात. गिरणगावात देखिल तसेच होते. कोकणी बहूल लालबाग-परळ, कोल्हापूर मिश्र वरळी, पारशी प. महाराष्ट्र बहूल नायगाव दादर असे भाग केले जातील. गावांकडून आलेल्या चाकरमाण्यांनी आपल शेत सर्व काही आणले.(२)
अशी विभागणी होण्यास मास्तर नावाचे पद कारणीभूत होते. मास्तर चा खाक्या व कापड खात्यात असणारी वचक त्यातून आपल्याच भागातले कामगार भरण्यापर्यंत चक्र होते.
लालबाग नावाप्रमाणे 'लाल' होता. मिलांवर लालबावटा चेच वर्चस्व होते. वरळी तसे दोलायमान होते.(३)
नायगाव दादर मात्र राष्ट्रीय मिल मजदूर संघांकडे होता. त्याचे मुख्यालय नावाला परळ भोईवाडा मध्ये होते पण भोईवाडा परळ शी निगडीत नव्हताच. त्याने आपली कूशी नायगाव शी कायम ठेवली. नायगावच्या उत्तरेला पारशी कॉलनी आहे. मिलांचे मालक उच्च अधिकारी तेथे राहत होते.(४)
रा.मि.म.सं ही कॉंग्रेस प्रणित कामगार संघटना होती. जी तत्कालीन एकमेव सरकार मान्य संघटना होत. ८२ च्या संपाचे मुख्य कारण ह्या संघटनेची सरकार मान्यता नष्ट करावी ही देखिल होती. कारण सरकार कामगांरांचे निर्णय घेताना केवळ रामिमसं लाच विचारात घ्यायची. (५)
त्यामुळे तिचे मालक धार्जिने स्वरूप कोणापासून लपून देखिल नव्हते.
नायगाव १९९० अगोदर कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. नायगाव जुन्या मतदार संघांनुसार सर्वात छोटा मतदार संघ होता. ह्याच मतदाल संघाने महारष्ट्राला तीन कामगार मंत्री दिले. त्यात माधवराव माने हे नाव महत्वाचे आहे.(६)
कामगार मंत्री त्याकाळात गिरणगावातला असायचा नायगाव कॉंग्रेसमय असल्यामुळे ते मंत्रीपद तिकडे येणे स्वाभाविक होते
नायगाव ला संपाची तुलनात्मक मोठी झळ न बसण्याचे कारण बॉंम्बे डाईंग,प.महाराष्ट्र बहूल असल्यामुळे लोकांनी गावाला स्थलांतर केले गावाला जमीनी असल्यामुळे पोटाची नड भागात होती(७)
बॉम्बे डाईंग च्या वाडीयांनी त्यांच्या कामगारांची जास्त वाताहत होवू दिली नाही. व त्यांच्या दोन्ही मिल चालू ठेवल्या. त्या ह्या दहा वर्षात बंद झाल्या. वाडीयांचे जय व नेस याला कारणीभूत होते.
प. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ देखिल नायगाव मध्ये लवकरच पोहोचली. (८)
त्यातून सहकारी बँका उभ्या राहिल्या. नडेल त्याला कर्जपुरवठा त्या कर्जाला अख्खा गाव तारण राहायचा. त्यावेळी लोकांचा विश्वास टिकून होता. स्वातंत्र्यानंतर लगेचच सहकारी तत्वावर ग्राहक संस्था उभी राहीली.जी आजही दिखात टिकून आहे.मॉलच्या गराड्यात देखिल तिने आपले अस्तित्व पुसून दिले नाही(९)
ती म्हणजे 'मुंबई मध्यवर्ती कामगार ग्राहक संस्था' जी आज अपना बाझार या नावाने ओळखली जाते. ह्याची स्थापना स्प्रिंग मिल नायगाव येथे झाली. जी आज जगातली मोठ्या सहकारी ग्राहक संस्थांत मोडली जाते. तिच्या मार्फत स्वस्त व रास्त अन्नधान्य पुरवठा गिरणगावात होवू लागला.(१०)
संपातही ह्या संस्थेने खुप आधार दिला होता.
नायगाव वर कॉंग्रेसींबरोबर समाजवादयांचे वर्चस्व मोठे होते. समाजवादी चळवळ नायगाव मध्ये जोर धरून होती. त्यांनी पहिले काम मुंमकाग्रासं कॉंग्रेसींपासून ताब्यात घेण्यापासून केले. त्याचे नामकरण अपना बाझार केले. (११)
त्यांनी अपना बँक नावाची सहकारी बँक देखिल स्थापन केली. शिवसेनेच्या गदारोळात कॉंग्रेसच्या बँका बंद होत असताना ग्राहकांना नाडत असताना गिरणगावात अपना बँकेने केलेले काम स्पृहनीय म्हणावे लागेल. लोकमित्र सहकारी मुद्रणालय ही प्रेस देखिल आज चालू अवस्थेत आहे.(१२)
नायगाव मध्ये संघर्ष नव्हता असे नाही पण सहकाराच्या जीवावर त्यांनीतो कमी केला होता. त्यांचे प्रश्न वेगळे होते. नायगाव वेढलाय पोलिस कॉलनी कवायत मैदान बीडीडी चाळींनी. दक्षिणेला हाफकिन मध्ये मुंबईचा गव्हर्नर राहायचा. आता हाफकीन इंस्टीट्यूट आहे. पलिकडे हॉस्पिटलची रांग आहे.(१३)
कामगारांसाठीचे गांधी हॉस्पिटल ही चांगले होते. नायगावात सहकारी तत्वावर शाळाही उभारल्या गेल्या होत्या. छोट्या भागात चार पाच शाळा होत्याच पण जवळच राजा शिवाजी परळ मध्ये सोशल सर्विस लीग ही मुंबईतली सर्वात जुवी शाळा होती.(१४)
त्यामुळे नायगावात अन्न आरोग्य शिक्षण हे व्यवस्थित मिळेल याची बर्यापैकी सोय होती. त्यामुळे टोकाचा संघर्ष इथे बघायला मिळाला नाहीच पण त्याचे डॉक्युमेंमटेशन ही झाले नाही. शेवटी खपण्यासाठी टोकाचा संघर्षच लागतो.(१५) @MarathiRT
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Long thread #चुनाभट्टी
मुंबईतल्यांना चुनाभट्टी हे नाव सहज माहीतेय. हार्बर ला रेल्वे स्टेशन ही आहे त्या नावाचे.
मुंबईतली ब्रिटिशकालीन जी काय बांधकामे झालीत, आणि आजही ही मजबूत आहेत याचे संपूर्ण श्रेय चुनाभट्टी भागाचे आहे. चुन्याच्या खूप मोठ्या भट्ट्या त्याभागात होत्या. (१)
चुन्याच काम हे सिमेंटच्या कामापेक्षा कितीतरी मजबूत.जुन्या गड किल्ल्यांची पण साक्षय याला.
मुंबईत आता चुनाभट्टी नाहीत,मला चुनाभट्टी बघायला मिळाली रत्नागिरी मधल्या जुवे गावात.जुवे म्हणजे खाडीतले बेट.खाडीत मिळणारे शिंपले गोळा करून भट्टीत भाजून मग चोपले की बारीक शुभ्र चुना मिळतो(२)
हे वाचायला जेवढे सोप्पे वाटते तेवढेतर नक्कीच नाही.
गोलाकार भट्टीत लाकडाचा थर द्यावा लागतो. थोडीही जागा न ठेवता तो मांडवा लागतो. मध्ये उभा ओंडका बसेल एवढीच जागा ठेवायची, मग त्यावर शिंपल्यांचा थर लावायचा. परत लाकडांचा थर लावायचा. अशे पाच थर लावायचे.(३)
हे आहे साखरी नाटे.
४००० वा थोडी कमी जास्ती लोकसंख्या. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत.मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळत. हे फक्त मासेमारी शी निगडित(१)
मासे विकणे , त्याचे परिवहन , प्रक्रिया याचा यात उल्लेख नाही. ते धरले तर ४० हजार हून अधिकचा रोजगार केवळ साखरी नाटे हे बंदर देते. एक मोठी बोट व त्यावरचे इतर सामान यांची किंमत साधारण ७० लाखांच्याही वर जात असते. म्हणजे ३५० कोटी हे बोटींसाठी लागलेत.(२)
आणि दिवसाला ३ कोटींची उलाढाल ह्या बंदरातून होत असते. आजही हे बंदर पुर्ण क्षमतेने कार्य करत नाही. कारण बंदरावर जाण्यासाठी मोठा रस्ता नाही किंवा मोठी जेट्टी सुध्दा नाही. त्याची अंमलबजावणी केली तरी लाखभर रोजगार निर्माण करण्याची क्षमता ह्या ‘गावाची’ आहे.(३)
दहिहंडी जुनी असेल खूप , काला म्हणत असतील जुन्या काळी. पण ही मुंबईतली थरांची दहिहंडी ही इथून सुरू झालीय.
ही दहिहंडी का सुरू झाली असेल, किर्तनात तर काठीनेच हंडी फोडतात थर लावत नाही. कोणी सुरवात केली हे थर लावायला, तर मुंबईतल्या भंडारी समाजाने.(१)
कसे ते नंतर सांगतो. भंडारी हे भांडार रखवालदार म्हणून नाव पडले असावे असेही म्हणतात. संस्कृतच्या ‘मनधारक’ वरून भंडारी झाले असे बोलले जाते पण मला काही पटत नाही. माहिम हे भंडारी राज्य होते. बिंब राजे हे भंडारी होते असे बोलले जाते. पहिल्यापासून लढवय्ये.(२)
पण ते ताडी कधी बनवायला लागले माहीत नाही. मनधारक हे ताडी बनवणार्याला संस्कृत मध्ये म्हटले जाते. मुंबई गॅजेट मध्ये मारामारी आणि ताडी बनवणे ह्या गोष्टी भंडारी समाजाला येतात असे बोललेय.
तर हे मध्ययुगात ताडी बनवणे व विक्री करणे यात आले.(३)
यश नेहमीच खर नसत ,अस कोणीतरी बोललंय.खरच बरोबर वाटत जेव्हा साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड च्या क्रिकेट टीम बघतो.त्यांच्या कडे यश मिळवून देऊ शकणारे खेळाडू होतेच,पण टीम पण होती. पण नाही शक्य झालं.यश शक्य होणे याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात.पण यश नाही म्हणून कोणी कच्चा असतो असे नाही.(१)
खेळाच्या परिपक्वतेवरून खेळाडू चा दर्जा ठरवला जातो बहुतेक. पण समीक्षा करणारे लोकच ह्या जगात तुन बाद झालेत. त्यांना समीक्षा करायची असते का गांड खाजवायची असते. लोकांच्या समीक्षेवर आता बोलणंच बंद केलं पाहिजे, समीक्षेचा उद्देश त्यांच्यासाठी आत्मप्रौढी मिरवण असाही असू शकतो.(२)
मिरवावी पण पळणाऱ्याच्या पायात पाय टाकून पाडणारी कशाला. त्यात आपण अभिजात कलेचे खेळाचे वाहक आहोत हा आदिम दंभ.
परवा कोणी तरी म्हटल कंपौंडर का काय ते, चांगली समीक्षा करतात बहुतेक ते. खरंच आहे त्यांचं. माझ्या एका मित्राचा बाप सरकार मध्ये क्लर्क आहे अशी नोंद असेल सरकार दप्तरी,(३)
रात्री आपल्याला जे कळत नसत त्यावर बोलावं.
टिकटोक बंदी नंतर थेट फायदा इंस्टा फेसबुक ला झाला, मागेच अंबानी च्या जिओत पैसे टाकले झुक्याने. व्हाट्सप् पण त्याचच आहे.
अशा काळात बीजेपी चे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस ने काय केले असते, वाटून वाटून दिले असते.(१)
लोकशाही अबाधित ठेवल्याचा फील आला असता.
आयरणी ही हे फेसबुक वर टाकतोय मी. अंबानी माझा डेटा घेऊन झोप विकत देईल का? सरकारला माझ्या झोपेची काळजी आहे म्हणून चीन चे लफडे केले. खरतर लॉकडाऊन हे देशात झोपेची कमी होती म्हणून केलेला. सर्व जनतेला पुरेशी झोप मिळावी. पण जनता ऐकणार तर ना ,(२)
यांना चीन बरोबर युद्ध करायचे होते म्हणून ती चालत निघाली. रस्त्यारस्त्याने. संसार घेऊन. असाच संसार घेऊन जावं लागायचं युद्धात रामाच्या काळात. अगदी पानिपत पर्यंत. पण मोदिजीनी साधलेच त्यांना माहितेय चालत गेलेल्यांचा डेटा झुक्याला नाहीच देणार. तो पोलिसांकडे देणार.(३)
सगळ्याच खिडक्यांना मिळत नाय दान पुस्तकांचं
पानकळ्यात त्यांना मिळतो ट्रंकेचा कोपरा
चहाचा निवेद खिडक्यांना मकबूल नसतोच काही
घासलेट च्या चिमणीन काही खिडक्या उजळतात पावसात(१)
पावसाचा गनिमी कावा दिसत नसतोय खिडकीतून
कधी तो तात्पर्य देतो माळाच्या झाडावर
सगळ्याच खिडक्या नाय दाखवत पान फुल
काही दाखवतात पावसाने तुंबलेली गटार संसाराने वाहिलेले नाले(२)
सगळ्याच खिडक्यातून दिसत नसतोय पाऊस
काही बंद कराव्या लागतात निळ्या ताडपत्रीन
चौकातून चोरून आणलेल्या बॅनरने
त्या खिडक्या गेट होतात गोमांचं झुरळांच
जित्याच ठिबक गोळा करणारी बादली
मग खाली करावी लागते वेळोवेळी मोरीत(३)