कॉम्प्युटर किंवा मोबाईल आणि आपण यात बरेच साम्य आहे.
आपल्या शरीर म्हणजेच एका प्रकारे कम्प्युटरचे हार्डवेअर.
आपला मेंदू व त्याचे विविध भाग म्हणजे एका प्रकारे कम्प्युटरचा प्रोसेसर व मेमरी.
योगशास्त्रानुसार आपले चार देह आहेत.
स्थूल
सूक्ष्म
कारण
आणि महाकारण
यामध्ये स्थूल देह व कम्प्युटरचे हार्डवेअर या गोष्टी अगदी सहजपणे समजून येऊ शकतात.
सूक्ष्म देह म्हणजे आपल्या मनाच्या जाणीवेवर चाललेल्या गोष्टी. मग ते स्वप्न असो किंवा कोणत्याही भावना.
कॉम्प्युटर मध्ये आपण याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणू शकतो.
कॉम्प्युटरचे कितीही भाग एकत्र आणले त्यात प्रोसेसर असला मेमरी असली व त्याला पॉवर सप्लाय दिलेला असला तरी देखील त्यावर काम करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्यावर कोणतीतरी ऑपरेटिंग सिस्टीम असेल. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कोणतेही सॉफ्टवेअर तेथे लोड होऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे मन अस्तित्वात आहे तोपर्यंतच गोष्टी घडू शकतात. व्यक्ती गाढ झोपेमध्ये असली तर त्या व्यक्तीच शरीर असते त्याला पॉवर सप्लाय असतो म्हणजेच ते जिवंत देखील असते. परंतु गाढ झोपेमध्ये मन हे जवळपास अस्तित्वात नसते त्यामुळे कोणतेच विचार किंवा सूक्ष्म गोष्टींची हालचाल थांबते.
थोडक्यात मन हे आपल्या शरीराचे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. म्हणजेच
स्थूल शरीर = कॉम्प्युटरचे हार्डवेअर
सूक्ष्म शरीर = कॉम्प्युटर वरील ऑपरेटिंग सिस्टीम.
आता यापुढे कारण देह म्हणजे काय हे बघायचा प्रयत्न करू.
फेसबुक किंवा ट्विटर यावर आपले अकाउंट असेल तर ते अकाउंट बघण्यासाठी आपल्याला कम्प्युटर किंवा मोबाईल किंवा अशा कोणत्यातरी गोष्टीची गरज भासेलच ज्यामुळे आपण तो अकाउंट बघू शकू. आत्ता जरी माझ्या मोबाईल मधून मी ट्विटर किंवा फेसबुक डिलीट केले तरीदेखील तो अकाउंट या जगात अस्तित्वात असेलच.
थोडक्यात माझे जीमेल असो किंवा इंस्टाग्राम किंवा ट्विटर किंवा फेसबुक या गोष्टी एका प्रकारे कारण आहेत यासाठी मला कॉम्प्युटरच्या हार्डवेअरची गरज लागते. कम्प्युटर शिवाय देखील हे अकाउंट अस्तित्वात असतीलच परंतु ते अनुभवता येणे शक्य नसेल.
त्याचप्रमाणे इच्छा वासना भावना या सर्व गोष्टी एका प्रकारे आपले शरीर जन्माला घालण्यासाठी कारणीभूत असतात. शरीर जन्माला आल्यामुळे माझ्यात भावना किंवा इच्छा वासना आहेत असे नाहीये तर त्या आधीपासूनच अस्तित्वात होत्या. त्या दृश्यमान फक्त माझ्या शरीरामुळे आहेत.
किंवा त्या इच्छा वासना व ती अशी काही कर्मे यांच्यामुळे या देहाची निर्मिती होणे क्रमप्राप्तच होते. म्हणून अशा इंटरनेटवरील एप्लीकेशन्स ना एका प्रकारे कारण देह म्हटले तरी चालेल. म्हणजेच माझा मोबाईल किंवा लॅपटॉप तुटला तरी देखील माझ्या फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटला धक्का लागणार नसतो.
दुसरा लॅपटॉप घेऊन त्यावर मी तेच अकाउंट पुन्हा त्याच स्थितीमध्ये पुढे नेऊ शकतो ज्या स्थितीत मागील लॅपटॉपवर ते होते. आता महाकारण देह किंवा प्रत्यक्ष ब्रह्म किंवा conciousness. याला आपण एका प्रकारे इलेक्ट्रिसिटी म्हणू.
कम्प्युटरच्या असल्यामुळे किंवा नसल्यामुळे किंवा ऑपरेटिंग सिस्टमच्या असण्यामुळे किंवा नसल्यामुळे किंवा सॉफ्टवेअरच्या असल्यामुळे किंवा नसल्यामुळे या इलेक्ट्रिसिटी वर काहीही फरक पडत नाही. परंतु इलेक्ट्रिसिटी नसली तर याच्यातले काहीच चालणे शक्य नाही.
त्यामुळे आपल्या सनातन धर्माप्रमाणे
ब्रह्म एकाच गोष्टीवर सर्वकाही गोष्टी अस्तित्वात येतात. परंतु कोणत्याही गोष्टीमुळे ब्रह्म यावर कोणताही फरक पडत नाही.
कॉम्प्युटर किंवा मोबाईल गेल्यावर आपल्याला अर्थातच दुःख होते त्याचप्रमाणे स्थूल शरीर या जगातून नाहीसे झाल्यावर देखील होते. परंतु लॅपटॉप आणि मोबाईल जरी नाहीसे झाले
तरी देखील त्याच्यातील कोणताही डेटा परत मिळवणे शक्य असते व तो दुसरा कम्प्युटरमध्ये चालू करणे शक्य असतं त्याचप्रमाणे हा स्थूल देह पडल्यानंतर देखील खरे तर कोणीच मरत नसते.
अर्थात आपली अटॅचमेंट जशी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप बरोबर असते तसेच व्यक्तीच्या स्थूल देहाबरोबर असते.
त्यामुळे तो स्थूल देह गेला तर ती व्यक्ती नाही असे वाटणे सहाजिक आहे परंतु विचारांती कोणीही मरत नसते हेच अंतिम सत्य आहे.
आपल्याला स्वतःची इच्छा/मर्जी असे काही आहे का? के आपल्याला वाटते की आपण काहीतरी स्वतःच्या मर्जीने करीत आहोत परंतु ती मर्जी देखील कोणीतरी आधीच ठरवलेली असते??
माझे एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे. हे कितीही कळकळीने सांगितले तरी पूर्ण असत्य किंवा भासमय वाक्य आहे. (मी पार्टनर बद्दल जे प्रेम सांगितले जाते त्याबद्दल बोलतोय)
का?
कारण 1. प्रेम हे पूर्णपणे अपेक्षा नसलेली भावना आहे अशीच प्रेमाची व्याख्या केली जाते. जेथे अपेक्षा आहे तिथे
प्रेम असणे शक्य नाही 2. पार्टनर म्हणून ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात समोर येते त्यानंतर काही काळ गेल्यावर आपले त्या व्यक्तीवर प्रेम आहे असे आपण म्हणू लागतो
3.परंतु आता येथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पार्टनर म्हणून माझ्या काही कंडिशन असतात त्या पूर्ण होणे गरजेचे आहे
* सर्वात पहिली अट म्हणजे आपले sexual orientation काय आहे. स्ट्रेट आहे की गे आहे.
स्ट्रेट असणारी व्यक्ती नेहमीच पार्टनर म्हणून विरुद्ध लिंगी व्यक्तीकडेच आकार दिले जाईल व आपल्या आयुष्यात कधीतरी हे सांगू शकेल की माझे या व्यक्तीवर प्रेम आहे.
व समजा ती व्यक्ती गे असेल, तर पार्टनर
एकमेकावर प्रेम करणारे लोक काही वर्षातच त्रासलेले असतात. त्रासलेले दिसतात. लोक एकमेकावर प्रेम करतात परंतु त्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टीबाबत कधी विचार करत नाही. त्याचा कधीही अभ्यास देखील करत नाहीत.
माझ्या बायकोला किंवा नवऱ्याला मी चांगलाच ओळखतो अगदी पाच वर्षापासून वगैरे असे वाटत असते लोकांना. परंतु पूर्णपणे चुकीची समजूत आहे ती.
मुळातच स्त्रिया आणि पुरुष हे पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या.
सुरुवातीला प्रेमाच्या काळात भावनेने एकमेका साठी काय करू आणि काय नाही असे भेटलेले प्रेमवीर काही काळाने विझून जातात. कारण एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात.
त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते
बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
या गावामधील रम्या तसा हुशार मुलगा आणि धाडसी देखील. दहावी मध्ये होता तो. फारशी कोणाची फिकीर नाही. त्याच्या घरी कधी पुराचे पाणी शिरत नसे. यावर्षी त्यानेदेखील स्वतःच्या घरात पाच फूट पाणी अनुभवले होते.
तुला कल्पना नाहीये की मी तुला भेटवस्तू देण्यासाठी काय काय नाही शोधले
कोणतीच गोष्ट बरोबर वाटत नव्हती भेटवस्तू म्हणून.
कारण
सोन्याच्या खाणीला सोन्याचा कण देऊन काय उपयोग?
आणि समुद्राला पाण्याचा थेंब देऊन काय उपयोग?
मी असेही म्हणू शकत नाही की माझं हृदय आणि आत्मा मी तुला देईन
कारण ते आधीच तुझं झालेल आहे
म्हणून मी तुझ्यासाठी आरसा आणलेला आहे.
त्यामध्ये स्वतःला बघ, मीच दिसेन.
रुमी....
हा अनुवाद आहे माझ्या एका आवडत्या कवितेचा. अर्थात ती कविता देखील इंग्लिशमध्ये अनुवाद केलेली आहे पर्शियन लैंग्वेज मधून. इंग्लिश मध्ये ही कविता वाचताना खूप छान वाटते. मराठीतले भाषांतर तेवढे खास वाटत नाही. खालील आहे इंग्लिश भाषांतर पर्शियन भाषेतून केलेले. किंवा मला जमले नाही नीट.
प्रसंग 1:
तुम्ही एका पर्वतावरील कड्यावर उभे आहात. पुढे अत्यंत कठीण असा रस्ता आहे. जेथे तुमच्या उजव्या बाजूला दरी आहे , डावीकडे दगडाची प्रचंड मोठी भिंत आणि रस्ता जेमतेम अर्ध्या फुटाचा.
आणि तुम्ही पुढे जायचा निर्णय घेता.
प्रसंग 2:
तुम्ही जंगलात उभे आहात. तुमच्या समोर वाघ आला. तुम्ही पळून न जाता वाघावर हल्ला करून स्वतःचा बचाव करण्याचा निर्णय घेता.
प्रसंग 3:
तुमचे तुमच्या मित्राबरोबर प्रचंड भांडण झाले. मारामारी झाली. आणि तुम्ही त्या मित्राची कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला
हे तिन्ही प्रसंग स्वप्नातले आहेत.
आता तुम्ही या स्वप्नात कितीही निर्णय स्वतःच्या इच्छेनें घेतलेले आहेत असे तुम्हाला वाटत असेल तरी खरंच तसे आहे का?
कारण स्वप्नात डोंगर, दरी, पायवाट, वाघ, जंगल ही प्रत्येक गोष्ट मनाने तयार केलेली आहे.