"पनामा पेपर" आठवतो का?
तोच तो, ज्यात आपला पद्मश्री+पद्मभूषण+पद्मविभूषण असलेला "सदी का महानायक", त्याची सूनबाई, विजय मल्ल्या, हरिष साळवे अशा लोकांची नावं आली होती?
जगभरातल्या टॅक्सचोर गुंतवणूकदारांचा भांडाफोड करणारं हे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या पत्रकाराचं पुढं काय झालं?
डाफ्ने करुआना गॅलिझिआ नावाच्या ह्या स्त्री पत्रकाराला तिच्या परिवारासह बॉम्बने उडवण्यात आलं होतं; चिथड्या-चिथड्या झाल्या होत्या तिच्या!
"हे" हिडेनबर्गच्या नॅथन अँडरसनला माहिती नसेल?
मग त्या अँडरसनला हे सुद्धा माहिती असेलच की अदानी किती मोठा "भस्मासूर" आहे आणि त्याच्या हातातलं बाहुलं असणार इथलं सरकार विरोधकांचा कसा "लोया" करतं?
हे सगळं माहिती असतानाही त्याने अदानीची चड्डी उतरवण्याचं धाडस केलं, यासाठी त्या पठ्ठ्याचं विशेष कौतुक करायला(च) पाहिजे...
विशेषकरून तेव्हा, जेव्हा इथले गांडफाटे विरोधक नुसत्या ED'च्या धमकीने/धाकानेच रात्रीतून आपले बाप बदलतात!
"खरंतर, हे काम इथल्या विरोधकांनी करायला हवं होतं, जे अँडरसनने जीवाची जोखीम पत्करून करून दाखवलंय!"
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या, अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा, काही लोकांना प्रचंड गर्व असतो.
म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला...
नाती
कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण...
ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच...
भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.
त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही
जन्म - मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक
आपल्या अहंकाराची बळी कधी झाली
हे कळलंच नाही.
सावरकरांना "माफीवीर" कुणी बनवलं??
कॉंग्रेसने की भाजपने??
- डॉ. सुनील देशमुख.
७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉंग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही. उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचीच सरकारे होती "पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते."
या देशासाठी योगदान देणार्या कोणालाही कॉंग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.मला आठवतं सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो!!
आमच्या मनाला वाटेल त्यांच्यावर आम्ही ईडीची कारवाई करू शकतो, या भाजप नेत्यांच्या अहंकाराने आता कडेलोट केला आहे. महाराष्ट्र ही समृध्द राज्याची जननी आहे, हे ठाऊक असल्याने आपल्या सत्तेआड कोणी येऊ नये, अशी खूणगाठ बांधलेल्या भाजप नेत्यांनी ईडीचा पध्दतशीर...
वापर केला आणि जे आडवे येतील त्यांना ठरवून वाटेला लावलं. हे करण्याच्या मागे महाराष्ट्रातले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव सगळेच विरोधक घेत आहेत. आता तर सामान्य माणूसही फडणवीसांच्या चेहर्याखालची मानसिकता ओळखू लागला आहे. आव कितीही प्रामाणिक असला तरी आता या....
प्रामाणिकपणावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. माजी गृहमंत्री अनील देशमुख असोत वा नवाब मलिक किंवा संजय राऊत. भाजपची अडचण दूर करण्यासाठी या नेत्यांविरोधी कारवाई झाल्याची उघड चर्चा होते आहे. ज्यांच्या विरोधात कारवाई झाली त्या नेत्यांच्या धर्मपत्नी, त्यांची मुलं आणि नातलगही आता...
तुम्हाला केतन पारीख आठवतोय..? मधोपूरा बँक आठवतेय...?
तो केतन पारीख, ज्याने १६०० कोटींचा शेअर्स घोटाळा केला. त्यात ती माधोपूरा बँक सपशेल बुडाली. CBI ने चौकशी केली, केतन पारीखला अटक झाली. काही महिन्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला, त्याला जामीन मंजूर झाला...!
त्या जामीनाविरोधात मधोपूरा बँकेने आणि CBI ने आव्हान दिले...
हे आव्हान (अपील) बँकेने मागे घ्यावे आणि जामीनाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून माधोपूरा सहकारी बँकेच्या एका संचालकाने या केतन पारीखकडून अडीच कोटी रुपयांची लाच घेतली होती.
ही लाच घेतली गेल्याचा अहवाल अर्ज गुजरातचे तत्कालीन DGP (क्राईम) श्री. कुलदीप शर्मा यांनी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. सुधीर मांकड यांना पाठवला.
"गुजराथी-मारवाडी निघून गेले; तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी रहाणार नाही", अशी मुक्ताफळं उधळणार्या भगत'सिंग' कोश्यारी, जरा ऐका...
तुमच्यासकट, सगळ्या गुजराथी-मारवाड्यांना 'शिंगा'वरुन महाराष्ट्राबाहेर घेऊन जा... शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला काही फरक पडणं तर, सोडाचं...
उलट, तो प्रथमच मोकळा श्वास घेऊन सुखा-समाधानात जगेल!
जनहो, आजवर महाराष्ट्राच्या खेडोपाडी भोंदू 'भगत' मौजूद असलेलं आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलोत... पण, आता भोंदू 'भगता'चा शिरकाव, महाराष्ट्राच्या "..........." सुद्धा???
आजवर सातत्याने, महाराष्ट्राचा पदोपदी अवमान करुन, राज्यपालपदाचा सन्मान आणि प्रतिष्ठा साफ धुळीला मिळवणार्या 'भगतसिंग कोश्यारीं'चा निषेध असो!
पूर्वी म्हणायचे...
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी!
ते काका आज पुन्हा भेटले. त्यांचा हास्यक्लब संपायला आणि मी बागेत पोचायला एक वेळ आली. थोडे खट्टू होते. म्हणाले 'आता मोदीजींनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली रेल्वे प्रवास सवलत पण काढून घेतली' मी फक्त दीर्घ हुंकार भरला.
माझी नजर त्यांना छद्मी वाटली की काय कोण जाणे पण त्यांनी दुसर्याच क्षणी स्वतःला सावरलं आणि म्हणाले 'अर्थात यातही काही दूरगामी उद्देश असणार, उगाच नाहीत करणार असं मोदीजी'.
मी म्हणालो 'काका अगदी बरोबर आहे, मला तर हा मोदीजींचा मास्टरस्ट्रोक वाटतो.
अनावश्यक प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला नाही, 'ठायीच बैसोनी करा एकचित्त' असं महाराजांनी पण म्हणून ठेवलंय. प्रवासाला धडपडत जाऊन दुखापत करून घेण्यापेक्षा घरी टीव्हीसमोर बसून 'मन की बात' बघत राहणं कधीही चांगलंच!