#पुस्तकआणिबरचकाही
शंकर गोपाळ तुळपुळे ( ५ फेब्रुवारी २०१४ - ३० ऑगस्ट १९९४ ) प्राचीन मराठी भाषेच्या संदर्भात तुळपुळे यांनी केलेले संशोधन वाङ्मयाच्या इतिहासात अत्यंत मोलाचे ठरते. साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास: खंड:१’ या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. 👇
डॉ.अॅन फेल्डहाउस यांच्या सहकार्याने त्यांनी प्राचीन मराठी शब्दकोशाचे अवघड काम पूर्णत्वास नेले. सुमारे ६००० प्राचीन मराठी शब्दांचा कोश तयार केला. त्यात ज्ञानेश्वरी-अनुभवामृत, नामदेवांचे अभंग, महानुभाव-कालीन वाङ्मय, संतसाहित्यातील मराठी शब्दांची व्युत्पत्ती, सुबोध मराठीत तसेच 👇
तसेच इंग्रजीत अर्थ, लिप्यंतर, स्पष्टीकरणार्थ अवतरणे यांचा समावेश केला. संशोधन वृत्ती, आध्यात्मिक ओढ, प्रखर बुद्धीमत्ता, कार्यप्रवणता, मराठी भाषेचे प्रेम या गुणांनी ते संपन्न होते. पंचवीस मौल्यवान ग्रंथ हे त्यांचे संस्मरणीय योगदान आहे.. ‘पांच संतकवी’, ‘प्राचीन मराठी गद्य’, 👇
‘प्राचीन मराठी कोरीव लेख’, ‘मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल’, ‘महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय’, ‘भक्तीचा मळा’, ‘महानुभाव पद्य’, हे ग्रंथ त्यांनी लिहिले. गुरुदेव रानडे उर्फ रा.द.रानडे हे त्यांचे गुरू होते. त्यांच्यासंबंधी त्यांनी ‘गुरुदेव रानडे: चरित्र आणि तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ 👇
लिहिला. ‘लीळाचरित्र’, ‘दृष्टान्तपाठ’, ‘ऋद्धिपूरवर्णन’, ‘श्रीकृष्णचरित्र’, ‘मराठी निबंधाची वाटचाल’, ‘माधवस्वामीकृत योगवासिष्ठ’ या ग्रंथाचे टीपा शब्दसंग्रह, प्रस्तावना यांसह संपादन केले. महानुभाव वाङ्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)
#पुस्तकआणिबरचकाही
वामनराव हरी देशपांडे : (२७ जुलै १९०७ – ७ फेब्रुवारी १९९०). महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक.वामनरावांचे लेखन विचारसंपन्न व दर्जेदार आहे. ते कसदार आणि माहितीपूर्ण आहेच; पण त्याची भाषादेखील स्पष्ट व प्रासादिक आहे. 👇
गायनाच्या घराण्यांची प्रदीर्घ चर्चा त्यांनी सुरू केली, असे मत त्यावेळी व्यक्त होत असे. घरंदाज गायकी (१९६१), आलापिनी (१९७९), एका गायकाचा ताळेबंद, Maharashtra’s Contribution to Music (१९७२) ही त्यांनी लिहिलेली पुस्तके खूप गाजली. त्यांच्या काही लिखाणावर आक्षेपही घेण्यात आले. 👇
त्यांच्या घरंदाज गायकी या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद इंडियन म्युझिकल ट्रॅडिशन्स (१९७३) या नावाने झाला असून हिंदी अनुवाद घराणेदार गायकी या नावाने झाला आहे. त्यांच्या या ग्रंथास संगीतातील उत्कृष्ट समीक्षाग्रंथ म्हणून १९६२ या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा व १९६१ –६९ या कालावधीतील 👇
#पुस्तकआणिबरचकाही
मुरलीधर गोपाळ गुळवणी (६ फेब्रुवारी १९२५ – १८ डिसेंबर २०००). महाराष्ट्रातील अभ्यासू इतिहाससंशोधक, कुशल इतिहासकथनकार, वस्तुसंग्राहक व शिक्षक.
त्यांनी ऐतिहासिक संदर्भ साधने आणि कागदपत्रांवर आधारित काही छोट्या ऐतिहासिक कथा व प्रबोधनपर कविता लिहिल्या आहेत. तसेच👇
संशोधनावर आधारित पुस्तकेही त्यांनी लिहिली. पंत आम्ही निघालो, जय केदार, सादोबा, पन्हाळा, पन्हाळगड ते विशाळगड, यादवेंद्र स्वामी, करवीरचा खजिना, ऐतिहासिक मौलिक संशोधने, हुकुमत पनाह,स्वातंत्र्याचा फटका, गुळवणी कुलवृत्तांत, आकाशाशी जडले नाते ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. 👇
लहानपणापासूनच त्यांना जुन्या पोथ्या, नाणी, अवशेष गोळा करण्याचा छंद होता. मोठेपणी त्यात कागदपत्रे, दस्तऐवज, शस्त्रे, मूर्ती, शिलालेख, ताम्रपट, जुनी (१८०० सालापासूनची) लाटकर व पारनेरकर ह्यांची पंचांगे, वगैरे ऐतिहासिक साधनांची भर पडत गेली. त्यांचा आधार घेत, दऱ्याखोऱ्यातून भटकंती 👇
#पुस्तकआणिबरचकाही
गिरिजा कीर ( ५ फेब्रुवारी १९३३ - ३१ ऑक्टोबर २०१९ ) त्यांनी ‘अनुराधा’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका म्हणून काम केले. बालसाहित्यात कुमारगटासाठी लेखन करणाऱ्या महत्त्वाच्या लेखकांमधील त्या एक होत. ‘वेताळनगरी आणि साहसी हेमचंद्र’, ‘परीकथांच्या तोंडवळ्याची कथा’, 👇
‘चंद्रावर सफर’, ‘उंटा उंटा कवडी दे’ या कथासंग्रहांप्रमाणे ‘खूप खूप गोष्टी’, ‘देणारे हात’, ‘साहसकथा’, ‘शूरांच्या कथा,’ ‘नीलाराणीचा दरबार’, ‘कुमारांच्या कथा’ इत्यादी कुमार साहित्य त्यांनी लिहिले. रंजन व प्रबोधनपर लेखन करताना गिरिजाताईंनी चरित्रपर पुस्तकात ‘देवी अहल्याबाई होळकर,👇
राजा राममोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले’ इत्यादी समाजकार्य-कर्तृत्व असलेल्यांचा आलेख गोष्टीरूपातून मांडला.प्रवासवर्णन लिहीताना ‘प्रवासवर्णन’ या शीर्षकाचेच पुस्तक १९८९ मध्ये प्रकाशित झाले. त्याचप्रमाणे ‘तसूभर जमीन मनभर आकाश’ हेही प्रवासवर्णनावर आधारित पुस्तक लक्षवेधी आहे.👇
#पुस्तकआणिबरचकाही
लक्ष्मणराव सरदेसाई (१८ मार्च १९०५ - ५ फेब्रुवारी १९८६) नामवंत मराठी गोमंतकीय कथाकार, स्वातंत्र्यसेनानी आणि विचारवंत. मराठी कथाविश्वात त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी उत्कृष्ट व्यक्तिचित्रे, ललितनिबंध लिहिले. कथा हा त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा मर्मबंध👇
होता. सातशेहून अधिक कथा त्यांनी लिहिल्या.त्यांनी ‘सौमित्र’ या टोपणनावाने भारत या साप्ताहिकात लेखन करण्यास सुरूवात केली होती. १९२२ पासून तरुण वयातच लक्ष्मणराव सरदेसाई यांनी ललित आणि वैचारिक लेखनास प्रारंभ केला होता. भारत, हिंदू, केसरी आणि द हॅराल्ड मधून त्यांनी लेखन केले.
१९५१ मध्ये न्यूयॉर्क हॅराल्ड ट्रिब्यून च्या कथास्पर्धेत ‘मोहोर’ या त्यांच्या कथेला पहिले पारितोषिक मिळाले. केवळ कथासाहित्य यासाठी वाहिलेल्या यशवंत या मातब्बर मासिकातून त्यांच्या कथा नियमितपणे प्रसिद्ध झाल्या. सागराच्या लाटा , वादळातील नौका , ढासळलेले बुरूज , अनितेचे दिव्य , 👇
#पुस्तकआणिबरचकाही
चिंतामण गणेश कर्वे : (४ फेब्रुवारी १८९३ - १६ डिसेंबर १९६०) मराठी कोशकार आणि लेखक. महाराष्ट्र शब्दकोश (७ खंड, १९३२-३८), महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७), शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) यांसारख्या कोशांच्या रचनेत एक संपादक म्हणून महत्त्वपूर्ण 👇
कामगिरी बजावली.कोशकार्याखेरीज मानवी संस्कृतीचा इतिहास, प्राच्य आणि पाश्चात्य नीतिध्येये, आनंदीबाई पेशवे, मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी, कोशकार केतकर (य. रा. दाते ह्यांच्या सहकार्याने,)यांसारखी उल्लेखनीय पुस्तकेही लिहिली. तसेच निरनिराळ्या नियतकालिकांतून भाषा, वाङ्मय, 👇
इतिहास, संस्कृती आदी विषयांवर चारशेहून अधिक लेख लिहिले. त्यांनी लिहिलेली पेशवेकालीन स्त्रियांची छोटी चरित्रे, पुण्यातील काही प्राचीन अवशेषांवरील टिपणे, लहान लहान शोधनोंदी, व्यक्तिनोंदी आणि व्युत्पत्तिनोंदी लक्षणीय आहेत. माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा व संक्षेप, सूक्ष्म 👇
रशियन राज्यक्रांतीच्या अतिशय अस्थिर अशा कालखंडात समाजातील सर्वच स्तरांतील व्यक्तींच्या जीवनात घडून आलेला दुःखद बदल या कादंबरीत एका विस्तीर्ण कालपटलावर अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीनं रेखाटला आहे.नष्ट झालेलं व्यक्तिगत जीवन, देशाच्या नियतीशी अटळपणे बांधली गेलेली लोकांची आयुष्यं, 👇
उद्ध्वस्त झालेली स्वप्नं, युद्धाच्या आणि क्रांतीच्या छिन्नभिन्न वातावरणातही अकलंक राहिलेली प्रेमाची कोवळीक आणि जगण्याची अनिवार ओढ! ही कादंबरी म्हणजे एक विशाल जीवनप्रवाह आहे. माणसं येतात-जातात, युद्धं होतात, क्रांत्या होतात, देश निर्माण होतात, नष्ट होतात; पण जीवनाचा ओघ अखंड 👇