वैद्यकीय क्षेत्रातील बदलांमुळे स्पेशलायझेशनकडे डाॅक्टरांचा ओढा वाढल्याने आणि जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांच्या कमतरतेमुळे सर्वसाधारण लोकांसाठी वैद्यकीय सुविधा अत्यंत खर्चिक झल्यात. @LetsReadIndia@PABKTweets#पुस्तकआणिबरचकही 👇
यातून मार्ग काढण्यासाठी सर्वसाधारण लोकांकडे असलेल्या मोबाईलचा वापर केला गेला.
' आयडाॅक ' हे एक असं मोबाईल एप्लिकेशन आहे जे सतत पेशंटच्या तब्येतीवर देखरेख करतं आणि त्यानुसार तात्काळ रोगनिदान करुन तज्ञांचा सल्ला घेऊन उपचारसुध्दा सुचवते. 👇
या मोबाईल ॲप मध्ये स्वतः विकसित होण्याची क्षमता होती. त्यामुळे कालांतराने रोगनिदान झाल्यावर उपचारासाठी कोणत्याही मार्गदर्शनाची गरज राहणार नव्हती.
मोबाईल ॲप्लिकेशनची चाचणी करण्यासाठी कंपनीने वीस हजार लोकांची निवड केली.
आणि याचा वापर करणारे काही पेशंट अचानक मृत्यू पावले... 👇
एका रेडिओलाॅजीस्ट डाॅक्टरला संशय आल्याने त्याने खोलात जाउन तपास करण्याचा प्रयत्न करताच तो हादरला.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीला अधुनिक तंत्रज्ञानाशी जोडतांना आर्थिक लोभापायी नैतिकता कशी आगतिक ठरते हे लेखकाने अत्यंत वेगवान रहस्यकथेतुन मांडले आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पुस्तकआणिबरचकाही
मिर्झा असदुल्लाखान गालिब ( २७ डिसेंबर १७९७, १५ फेब्रुवारी १८६९) प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. 👇
जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. गालिबच्या कवितांचा परिचय सेतू माधव पगडी, वसंत पोतदार आणि विद्याधर गोखले आदी 👇
मराठी लेखकांनी करून दिला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी तर ’गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा ग्रंथराज लिहिला असून रसिकांना शब्दागणिक तो समजावा म्हणून गालिबच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ देऊन त्यांनी गालिब जाणत्या वाचकांपर्यंत पोचविण्याची अपूर्व धडपड केली आहे.👇
#पुस्तकआणिबरचकाही
नामदेव ढसाळ ( १५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४ ) कविता ही त्यांच्या स्वतःच्या प्रातिभिक सामर्थ्याची साक्ष तर आहेच, पण त्याबरोबर ती तिच्या निर्मितीकाळाशी अभिन्नपणे निगडित आहे. काळाचे सर्व चढ-उतार तिने पाहिले आहेत, पचवले आहेत. ढसाळांच्या लेखनामागे 👇
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कृतींचा पाया आहे,सातत्याने कवितालेखन, अखंड चणचण आणि त्यासाठी करायची धावपळ, राजकीय आयुष्यातल्या उलथापालथी, दलित पॅन्थरचा उदयास्त, खासगी आयुष्यातले ताणतणाव, प्रकृती अस्वास्थ्य हे सगळे पेलत, त्यांची कविता ताज्या दमाने उसळी घेताना दिसते. 👇
स्वतःला आणि भोवतालाला तपासत पुढे जाताना दिसते.ढसाळांच्या कवितेचा प्रभाव मराठी कवितेवर अटळच आहे. पण तो भारतीय भाषांतूनही आहे. जर्मन भूमीवर त्यांना कविता-वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले (बर्लिन फेस्टिव्हल, जून २००१), त्यांची ही अविरत ऊर्जा त्यांच्या गद्यलेखनातही पाहता येते. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
य. न. केळकर ( १९ जुलै १९०२ - १४ फेब्रुवारी १९९४ ग्रंथवाङ्मय व इतिहास या दोन्हींना अनेक दृष्टींनी अपूर्व वाटेल अशा ‘ऐतिहासिक पोवाडे’ (मराठ्यांचा काव्यमय इतिहास) या ग्रंथाचे कर्ते शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक म्हणूनही नावाजले गेले आहेत.
मूळ मोडी लिपीतल्या पोवाड्यांचे मराठी बाळबोधीत लिप्यंतर करण्याच्या कामी त्यांनी घेतलेले परिश्रम व दाखवलेली सूक्ष्मता, काटेकोरपणा यापूर्वीच्या कोणाही पोवाडे संग्राहकाकडून दाखवले गेलेले नाही. ‘ऐतिहासिक पोवाडे’चे आणखी दोन खंड पुढे प्रसिद्ध झाले (१९४४ व १९६९). 👇
‘ऐतिहासिक पोवाडे निवडून त्यांच्या पाठांची मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्याने चिकित्सा करून अर्थबोधक व अवांतर टीपा जोडून वगैरे अनेक रीतींनी ग्रंथ होईल तेवढा उपयुक्त करण्याचा प्रयत्न केळकर यांनी मोठ्या कसोशीने केला आहे.’ विस्तृत प्रस्तावना हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य होय. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
वासुदेव सीताराम बेंद्रे (१३ फेब्रुवारी १८९४ - १६ जुलै १९८६)व्यासंगी मराठी इतिहासकार. इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे होय. 👇
वेगवेगळ्या विषयांची हाताळणी सविस्तरपणे करण्यात म्हणजेच वैविध्य आणि वैपुल्य या दोन्ही आघाड्यांवर वा.सी.बेंद्रे ह्यांची कामगिरी अतुलनीय आहे बेंद्रे ह्यांचा पहिला ग्रंथ साधनचिकित्सा (१९२८) हा होय. शिवशाहीच्या इतिहासाचा हा प्रास्तविक खंड असून इतिहाससंशोधनाच्या साधनांची मार्मिक 👇
चिकित्सा त्यात करण्यात आली आहे. त्यानंतर मराठी इतिहासावर त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. तथापि छत्रपति संभाजी महाराज (१९६०) हा त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ होय. संभाजी महाराज हे एक तेजस्वी, कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते निग्रही स्वराज्यनिष्ठेने आपल्या कारकीर्दीचा क्षण न् 👇
#पुस्तकआणिबरचकाही
पद्मा गोळे : (१० जुलै १९१३ - १२ फेब्रुवारी १९९८) आधुनिक मराठी कवयित्री. ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन. शालेय जीवनात त्यांना नाट्यलेखनाची विशेष आवड होती. पन्नादाई हे त्यांचे नाटक वार्षिक संमेलनात सादर केले गेले होते. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (अप्रकाशित) 👇
ही दोन पुरुषपात्रविरहित नाटकेही त्यांनी लिहिली. प्रीतिपथावर (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी (१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह. प्रितिपथावर ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने 👇
पृथगात्म रूप धारण केले. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सतीश काळसेकर : (१२ फेब्रुवारी - १९४३ २४ जुलै २०२१). मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते.काळसेकर यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात काव्य लेखनाने झाली. 👇
१९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला.वाचणार्याची रोजनिशी , पायपीट हे त्यांचे गद्यलेखन प्रकाशित आहे. महाश्वेता देवी आणि रस्किन बाँण्ड यांच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत. प्रवास लेखन, सांस्कृतिक चळवळी, खाद्यजीवन या सारख्या विषयांवर त्यांनी 👇
वेळोवेळी केलेले लेखन नियतकालिकांतून, वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. नवसाहित्याची सुरुवात करणाऱ्या या चळवळीतील ते अग्रणी कार्यकर्ते होते.त्यांनी साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्यत्व (१९९८-२००२),👇