वरच्या यादीत असलेल्या अश्या ३८ कंपन्या हिंडेनबर्ग रिपोर्ट मध्ये आहेत ज्यांचे पत्ते, फोन नंबर, कर्मचारी सगळच बोगस आहे.
रिपोर्ट तयार करताना हिंडनबर्ग ची माणस त्या कंपन्या ज्या देशात नोंदणीकृत आहेत तिथल्या पत्त्यावर जाऊन आली आहेत.
या कंपन्या मॉरीशस, सायप्रस , यूएई अश्या देशात नोंदणी झालेल्या आहेत ज्यामध्ये नोंदणी झाल्यावर अचानक खूप सारे पैसे बँक खात्यात जमा होतात आणि ते पैसे शेअर्सच्या माध्यमातून काकाजींच्या दोस्ताच्या कंपनीत जमा होतात.
मार्ग काय ?
पहिला
हिंडेनबर्ग रिपोर्ट खोटा आहे अस म्हटल कि त्याच्यावर अमेरिकन आणि भारतीय कोर्टात , आंतरराष्ट्रीय कोर्टात खटला दाखल करणे. हिंडेनबर्ग संस्था नेमक तेच म्हणतेय. आमच्यावर खटला दाखल करा मग आम्ही पुरावे कोर्टातच देऊ.
दुसरा
रिपोर्ट खरा म्हटला तर बोगस कंपन्यांनी भारतातल्या शेअर बाजारात पैसे गुंतवले हे सिद्ध होत. हे पैसे तिकडे गेले कुठून आणि आले कुठून. त्यावर कारवाई नेमक कोण करणार आहे ?
- @AnandShitole
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
घरात असणाऱ्या अठराविश्वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे सिकंदर शेख.
सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे.
हमाली करून वडीलांनी पुरवला खुराक...
सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील,
सावित्रीमाई फुले यांनी ज्योतीबा यांना लिहीलेलं एक पत्र.
सावित्रीमाई ह्या एक सामाजिक भान असलेल्या,निडर स्वतः निर्णय घेण्याची क्षमता असलेलं व्यक्तिमत्व होत्या हेच पत्रातून दिसून येते.
सत्यरूप जोतिबा स्वामी यांस,
सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत,
पत्रास कारण की, आपले पत्र पावले. इकडील सर्व मंडळी खुशाल आहेत. मी येत्या पाच तारखेपर्यंत पुण्यास येईन
काळजी करू नये. येथे एक अघटित वर्तमान घडले की, गणेश नामे एक ब्राह्मण यास पोथी पुराणाचा नाद असून गावोगाव फिरून पंचाग सांगून उदरनिर्वाह करत करत गावी येते झाला. पण येथे नुकतीच वयात आलेली सारजा नामे पारीवर त्याची प्रीती जडली असोन, त्यापासून तीस सहा महीने दिवस गेले आहेत.
जवळपास १५० दीडशे वर्षांपूर्वी, 1869 साली, टाटा समूहाचा वार्षिक उलाढाल 20 हजार रुपये होती .
आणि त्याचवेळी या माणसाची, पूना कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीची वार्षिक उलाढाल 21 हजार रुपये होती. त्याचकाळात सोनं 10 रुपये तोळा होत.
सांगायचंय एवढंच,
एकेकाळी टाटापेक्षाही श्रीमंत इतकं सधन असा हा माणूस.
इमारती,धरणं,पूल,बोगदे, इतकंच नाही तर राजवाडे,कापड गिरण्या., इत्यादी सर्व प्रकारच्या भव्य बांधकामात अग्रेसर.
सोन्याचे दागिने बनवण्यासाठी लागणारे मोल्ड्स ,त्याची संपूर्ण भारताची होलसेल एजन्सी या माणसाकडे.
पुस्तकं प्रकशित करणं ते विकणं.. हा सुद्धा यांचा एक अग्रगण्य व्यवसाय.
त्याकाळी शेती सर्वश्रेष्ठ, उत्तम भाजीपाला आणि फुलांची मोठी शेती करून ती पुण्याहून रेल्वेने मुंबईला नेऊन विकायची. हा अजून एक व्यवसाय.
देवेंद्रजी आणखी किती खोटं बोलणार, किती खालची पातळी गाठणार ?
1) फॉक्सकॉन ऍपल मोबाईल बनविण्याचा 36 हजार कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार अशी घोषणा मा देवेंद्र फडणवीस साहेबानी जानेवारी 2015 मध्ये केली. त्यानंतर सुमारे साडेचारवर्ष तेच मुख्यमंत्रीपदावर होते
पण तो प्रकल्प गुजरातला न्यावयाचे असल्याने त्यांना दिल्लीतुन समाज देण्यात आल्याने त्यांनी त्याबाबत जाणीवपूर्वक प्रतिकुल पावले उचलली. परिणाम त्या प्रकल्पातील कंपनीचा रस निघुन गेला, कंपनीने प्रकल्प रद्द केला पण ते गुजरातला गेले नाहीत.
केंद्र ईडी सारख्या संस्था वापरून त्यांच्यावर दबाव आणू शकले नाही कारण त्यात फक्त फॉक्सकॉन होती आणि त्यांनी त्यात भारतीय पार्टनर घेतला नव्हता. जानेवारी 2020 मध्ये म्हणजे मविआ सरकार आल्यानंतर 10-12 दिवसात सुभाष देसाईंनी जे वक्तव्य केले होते ते त्या प्रकल्पाबाबत होते
राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवर हेरंब कुलकर्णी सरांची कविता
तो निघालाय....
तो निघालाय
दक्षिणेकडून उत्तरेकडे
उत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करत
विमान,जेट,हेलिकॉप्टर,बुलेटप्रूफ गाड्या,सारे हाताशी असतानाही
धुळीच्या रस्त्यावरून तो निघालाय....
गर्दीचा गैरफायदा घेत
बापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातून
पुन्हा त्याच गर्दीवर विश्वास टाकत
हिंसेलाही लज्जित करत तो निघालाय..
पूर्वीही असेच राजे निघत
अश्वमेध करायला, सैन्य घेऊन
जिंकत जिंकत
रक्ताचा सडा शिंपडत---
पण तो नि:शस्त्र आहे
प्रेम आणि संवादाचे शस्त्र घेऊन
राज्य जिंकण्याचे सोडाच
निवडणूक जिंकण्याचीही गोष्ट तो बोलत नाही
पक्षाच्या सीमा ओलांडून समविचारींना कवेत घेत तो निघालाय
फक्त येईल त्याला प्रेमाने आलिंगन देत,
एकट्या पडलेल्या
व्यवस्थेत हरलेल्या
फाटक्या
केविलवाण्या माणसांना
मायेची ऊब देत तो निघालाय...