छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे कार्य पण समजून घ्यायला हवे .👇👇
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती" करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!
6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे राजे"
7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे !
8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे"
9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडका जवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली.
जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता.
पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्या साहसांचा,
प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा...
मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला.
गेल्या काही वर्षांत आपण जवळ जवळ रोजच #श्रद्धा_आफ़ताब_मर्डर सारख्या बातम्या वाचत आहोत, हळहळ व्यक्त करत आहोत पण हे सर्व कुठून सुरू झालं आणि यावर उपाय काय? याचा गंभीरपणे विचार करायची वेळ आली आहे. सेक्युलरिझम चे भूत काँग्रेस सारख्या पक्षाने हिंदूंच्या मानगुटीवर बसवलंय
आणि त्याला अजून घट्ट करायचं काम केल ह्या थर्ड क्लास बॉलीवूड वाल्यानी आणि आपल्या सदोष शिक्षण पद्धतीने.
या लोकांनी आधुनिकता, स्त्री स्वातंत्र्य हे सगळं रीतसर डोक्यात भरताना ड्रग्ज आणि स्वैरपणाचा वापर केला.
हिंदू आपल्या धर्म, संस्कृती, आचरण यापासून दूर गेले.
आपले सण, रीतीरिवाज साजरे करण्यात त्यांना कमीपणा वाटू लागलाय. ज्या धर्मात स्त्रीला देवींची उपमा दिली जाते त्याच धर्माला ओल्ड फॅशन, patriarchy च्या नावाखाली दाबलं जातंय आणि वेस्टर्न संस्कृती मिरवण्यात लोकांना मोठेपणा वाटू लागलाय.