#पुस्तकआणिबरचकही
डॉ. रत्नाकर मंचरकर ( ६ ऑक्टोबर १९४३ - २० फेब्रुवारी २०१२ ) जुनी नवी साहित्य मीमांसा, नवे वाङ्मयप्रवाह, तौलनिक साहित्याभ्यास ही मंचरकरांच्या अभ्यासाची क्षेत्रे होत. त्यांनी संपादने, संहिता संपादने आणि सर्वांगीण संशोधनात्मक लेखन, सूत्रसंचालने इत्यादी कार्य केले.👇
विशेषतः मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा सखोल व संशोधनात्मक अभ्यास व लेखन केले.मूलगामी संशोधन, सहृदय आकलन, चिकित्सक प्रतिपादन आणि विश्लेषक निष्कर्षण यांमुळे मंचरकरांचे संशोधनात्मक लेखनही सर्वांना आकर्षित करते आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अर्वाचीन मराठी वाङ्मयातील काही विषयांवरही 👇
त्यांनी प्रकाश टाकला आहे. ‘अर्वाचीन मराठी साहित्य आणि साहित्यिक’ (१९ लेख), ‘ग्रामीण-दलित-स्त्रीवादी-जनसाहित्य’ (१६ लेख), तसेच ‘अर्वाचीन मराठी साहित्यविचार आणि समीक्षा यांविषयीचे चिंतन’, ‘अर्वाचीन साहित्यविचार’ (८ लेख), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (६ लेख) 👇
‘समीक्षा आणि समीक्षापद्धती’ (११ लेख), असे बहुविध लेख लिहून त्यांनी समीक्षकाची योगदान करण्याची भूमिका पार पाडली .  ‘मुक्तेश्वरांची कविता : खंड पहिला :  आख्यानक व स्फुट कविता’ (१९८३), ‘मुक्तेश्वरांची कविता : खंड दुसरा : संक्षेपरामायण’ (१९८३), या दोन्ही खंडांना 👇
महाराष्ट्र शासनाचा ‘समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र’ या विभागातील सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (१९८४) मिळाला. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)
@Marathi_Mee @ShubhangiUmaria @threadreaderapp unroll

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रविण कलंत्री

प्रविण कलंत्री Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KalantriPravin

Feb 22
#पुस्तकआणिबरचकही
डाॅ. लक्ष्मण देशपांडे (५ डिसेंबर १९४३ - २२ फेब्रुवारी २००९ ) बहुरंगी मराठी लेखक, नाट्य दिग्दर्शक, व अभिनेते . त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री 👇 Image
नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे. 👇 Image
या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर खूप यशस्वी झाले.👇
Read 6 tweets
Feb 22
#पुस्तकआणिबरचकाही
वि. स. वाळिंबे ( ११ ऑगस्ट १९२८ - २२ फेब्रुवारी २००० )राजकीय स्वरूपाचे लेखन करणारे विनायक सदाशिव वाळिंबे एक महत्त्वाचे लेखक मानले जात. राजकीय विषय केंद्रस्थानी धरून साहित्यनिर्मिती करणारे लेखक, जातिवंत पत्रकार म्हणून विनायक वाळिंबे यांची नोंद महत्त्वाची ठरते.👇 Image
‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ हे त्यांचे पुस्तक अतिशय गाजले. ‘इंदिराजी’, ‘बेंगलोर ते रायबरेली’, ‘रायबरेली आणि त्यानंतर’ ही इंदिरा गांधींवरची त्यांची अभ्यासपूर्ण पुस्तके विशेष गाजली. राजकीय पार्श्वभूमीवरील वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण पुस्तके म्हणजे ‘इस्रायलचा वज्रप्रहार’, 👇 Image
‘तीन युद्धकथा’, ‘स्टॅलिनची मुलगी', ‘पराजित अपराजित’, ‘दुसरे महायुद्ध’, ‘हिटलर’, अशी ५०पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. खेरीज ‘वुई द नेशन’ या पालखीवालांच्या पुस्तकाचा अनुवाद, राजमाता विजयाराजे सिंदियांचे ‘आत्मकथा राजमाता’, ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’, ‘ट्वेंटी टू फेथफुल डेज’👇 Image
Read 6 tweets
Feb 21
#पुस्तकआणिबरचकही
रामचंद्र श्रीपाद जोग ( १५ मे १९०३ - २१ फेब्रुवारी १९७७ ) जोगांचा खरा परिचय साहित्यक्षेत्राला झाला तो त्यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ (१९३०) या ग्रंथामुळे. यात जोगांनी इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे 👇 Image
संस्करण केले व अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य-विचार धारा प्रदान केली. ‘काव्यविभ्रम’ (१९५१) या ग्रंथातील अलंकारावरील त्यांचे विवेचन स्वतंत्र प्रज्ञेचे द्योतक आहे. त्यांनी अलंकारांना काव्याच्या उपरे, बाह्यपदार्थ न मानता 👇 Image
ते विभ्रम कसे आहेत, ते सप्रमाण पटवून दिले. ‘मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन’ या त्यांच्या व्याख्यानमालेत त्यांनी सहाशे-सातशे वर्षांतील मराठी वाङ्मयाचे विहंगमावलोकन केले.    मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाचे तीन खंड त्यांनी संपादित केले., 👇 Image
Read 5 tweets
Feb 20
#पुस्तकआणिबरचकही
आबाजी नारायण पेडणेकर : (२० फेब्रुवारी १९२८ - ११ ऑगस्ट २००४). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.
'आम्ही मासे मारतो त्याची गोष्ट’ ही त्यांची पहिली कथा. तर शेलूक (१९७२) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे 👇
वास्तवपूर्ण चित्रण, विशेषत: कोकणातील माणसे, सांस्कृतिक लोकजीवन, समुद्र, कोकणातील निसर्ग, मालवणी बोली आणि तेथील मानवी जीवनाचा अनुबंध त्यांनी शेलूकमध्ये गुंफला आहे. रेडग्रीन , मैत्र, वेडा आंबा  हे त्यांचे पुढील कथासंग्रह होत. या कथासंग्रहातील कथनात त्यांनी फॅन्टसीचा वापर 👇
केला आहे. ‘वेडा आंबा’ ही त्यांची परीकथा अनेक भारतीय भाषांत भाषांतरित झाली. ऐलपैल (१९७६) ही त्यांची कोकणच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी प्रसिद्ध आहे. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे आणि निसर्गाचे विविध विभ्रम कादंबरीत त्यांनी रेखाटले आहेत. संतांच्या क्रांतिकारी जीवनाविषयीची आस्था 👇
Read 6 tweets
Feb 19
#पुस्तकआणिबरचकही
अरविंद गोखले (१९ फेब्रुवारी १९१९ - २४ ऑक्टोबर १९९२ ) दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील एक श्रेष्ठ मराठी कथाकार. 
‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली . त्यानंतर लिहिलेल्या सुमारे साडेतीनशे 👇
कथा नजराणा ते दागिना पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत. गोखल्यांचे कथाविश्व नव्या प्रवृत्तींचा वेध घेणारी आहे. पुष्कळदा त्यांच्या कथांना 👇
चमत्कृतिप्रवण घाट प्राप्त होतो त्या नाट्यात्म घटनाचित्रणात रंगतात तसेच त्यांच्या कथा खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीय संसारकथा आहेत. मिथिला , शुभा , अनामिका ह्या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके लाभली तसेच ‘गंधवार्ता’ ह्या कथेस एन्‌काउंटर  ह्या आंतरराष्ट्रीय 👇
Read 6 tweets
Feb 18
#पुस्तकआणिबरचकही
गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२). थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांनी कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांनी ‘शतपत्रे’ म्हणून लिहिलेल्या निबंधांवर. ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली. भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर ह्या 👇
पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली. ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत. त्या पत्रातून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक 👇
प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.लोकहितवादींनी मुख्यत: लिहिले, ते हिंदू समाजाबद्दल. तथापि अन्य धर्मीयांतील त्यांना अनुचित वाटणाऱ्या काही अपप्रवृत्तींवरही त्यांनी टीका केली आहे. इंग्रजही त्यांच्या टीकेतून सुटले नाहीत कारण त्यांची सर्व टीका एका व्यापक सामाजिक 👇
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(