Discover and read the best of Twitter Threads about #पुस्तकआणिबरचकही

Most recents (23)

#पुस्तकआणिबरचकही
शंकर भाऊ साठे : (२६ ऑक्टोबर १९२५ – ११ मार्च १९९६). महाराष्ट्रातील शाहीर व साहित्यिक. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकर भाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. तसेच ते शाहीर व साहित्यिक म्हणूनही सुपरिचित आहेत. ' माझा भाऊ आण्णाभाऊ ' ( १९८० ) 👇
हे त्यांचे आत्मकथनात्मक चरित्र प्रसिध्द आहे. अण्णाभाऊंचे जीवन आणि कार्य समजून घ्यायला हे आत्मपर लेखन महत्त्चाचे आहे. एकच काडतूस (१९८४), सूड (१९८५), सगुणा (१९८६), घमांडी (१९८६), सावळा (१९८६),जग (१९८६),  लखू (१९८७), बायडी (१९९१), सुगंधा (१९९१), बाजी (१९९१), काळा ओढा इत्यादी 👇
कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यापैकी शामगाव या कादंबरीची काही पाने जिर्णावस्थेत उपलब्ध आहेत. यातील दोन कादंबऱ्यांची माहिती उपलब्ध नाही. शंकर भाऊंनी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारीत फकिरा  या मराठी भाषेतील चित्रपटात फकिराच्या एका दरोडेखोर साथीदाराची भूमिका केली होती.👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकही
सावित्रीबाई फुले ( ३ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७ ) बालवयातच ज्योतिबांशी विवाह झाल्यावर पतीकडून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी आपल्या पतीच्या सामाजिक कार्यातच सहभाग घेतला नाही तर अनेक वेळा मार्गदर्शन केले. अवहेलना व प्रतिकुल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन👇 Image
समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला मुक्ति चळवळीच्या पहिल्या नेत्या होत्या, ज्यांनी पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने देशातील महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले या दलित कुटुंबात जन्मल्या👇 Image
होत्या, परंतु एकोणिसाव्या शतकातील स्त्री शिक्षणाची सुरुवात म्हणून त्यांनी थेट ब्राम्हणवादाच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते.त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित घटकांच्या, विशेषत: महिला आणि दलित यांच्या हक्कांच्या संघर्षात व्यतीत झाले. त्या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. 👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकही
वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९)मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व👇
ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतल्यामुळे 👇
बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. १९४२ साली 👇
Read 9 tweets
#पुस्तकआणिबरचकही
मंगेश पाडगावकर ( १० मार्च १९२९ - ३० डिसेंबर २०१५ ) पाडगावकरांचा ‘धारानृत्य’ हा पहिला संग्रह १९५० साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर आजतागायत पाडगावकरांची एकूण ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नाट्यकविता, बालकविता, उपहासपर कविता (वात्रटिका), गझल या स्वरूपाची काव्यरचना 👇
केली. आधी भावकवी आणि नंतर गीतकार असे स्थित्यंतर झाल्यामुळे कवीचे हळुवार, तरल, संवेदनशील मन रस-रंग-नाद-गंध-स्पर्शयुक्त शब्दांच्या आधारे संगीतानुकूल झाले. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘असा बेभान हा वारा’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘श्रावणात घन निळा बरसला’ ह्या गीतांनी रसिकांच्या कायमचे👇
स्थान निर्माण करून ठेवले आहे. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गीतसंग्रहाप्रमाणेच पाडगावकरांचा ‘गझल’ हा संग्रहही उल्लेखनीय आहे. बालकविता हा काव्यप्रकारही पाडगावकरांनी आत्मसात करून मुलांसाठी प्रामुख्याने गेय बालगीते लिहिली आहेत- ‘भोलानाथ’ , ‘बबलगम’, ‘चांदोमामा’, ‘सुट्टी एके सुट्टी’ 👇
Read 7 tweets
#पुस्तकआणिबरचकही
वि. भा. देशपांडे : (३१ मे १९३८ – ९ मार्च २०१७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यसमीक्षक. नाट्यक्षेत्रात ते ‘विभा’ म्हणून ओळखले जात असत. विभा यांनी नाट्यविषयक विपुल ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने विभा यांनी १२०० पानी मराठी नाट्यकोश 👇
हा नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा मराठीतील पहिला नाट्यकोश संपादित केला. यामध्ये भारतातील विविध रंगभूमींच्या संक्षिप्त परिचयासोबत मराठी रंगभूमीच्या सुरुवातीपासूनचा कालखंड शब्दबद्ध करताना जुनी नाटके, मराठी व अमराठी नाटककार, कलाकार, निवडक संगीत नाटके, दिग्दर्शक, तंत्रज्ञ,👇
समीक्षक, पडद्यामागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्यग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. या कोशाचा हिंदी अनुवादही मराठी नाट्यकोश खंड १ व २ या नावाने प्रकाशित झालेला आहे.मराठी नाट्यसमीक्षा करताना नाटक, साहित्य संगीत या👇
Read 8 tweets
#पुस्तकआणिबरचकही
कवी यशवंत : (९ मार्च १८९९–२६ नोव्हेंबर १९८५). विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे होती. पुढे रविकिरणमंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. 👇
यशोधन हा त्यांचा पहिला मोठा लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध , यशोनिधि, यशोगिरी, ओजस्विनी  इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदुःखांशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरणमंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता 👇
त्यांना मिळाली. स्फुट कवितेबरोबर जयमङ्‌गला (एक प्रेमकथा) ,  बन्दीशाळा , काव्यकिरीट अशी दीर्घ काव्यरचनाही त्यांनी केली. बन्दीशाळेत बालगुन्हेगाराची जीवनकथा सांगितलेली आहे, तर जयमङ्‌गला म्हणजे कवी बिल्हणाची प्रेमकथा होय. २२ भावगीतांचे मिळून हे एक काव्य झालेले असून रचनादृष्ट्या 👇
Read 6 tweets
घणघणतो घंटानाद - दि. बा. मोकाशी

अर्नेस्ट हेमिंग्वे ह्याच्या " फॅर हुम द बेल्स टोल्स " या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.
@LetsReadIndia @PABKTweets @pustakaayan #पुस्तकआणिबरचकही 👇
स्पेनमध्ये १९३७ झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचे वर्णन या कादंबरीत आहे. फॅसिस्ट सैन्याशी गटागटाने गनिमी काव्याने लढणारी जनता. शत्रू असला तरीही तो माणुस च ना....त्याला मारतांना हळवे होणारे गट तुकडीचे नेते, ... 👇
शिवाय या युद्धग्रस्त परिस्थितीत उद्या जिवंत असण्याची हमी नसतांनाही एक हळुवार उमलणारी प्रेमकथा ...
उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचे वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिले आणि अनुभवले ते यामध्ये आले आहे. 👇
Read 4 tweets
#पुस्तकआणिबरचकही
विष्णु वामन शिरवाडकर ( २७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९ ) मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे👇
प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली झालेल्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता, 👇
त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण👇
Read 9 tweets
#पुस्तकआणिबरचकही
विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक. ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. 👇
उच्चशिक्षणासाठी लंडनला असतांना जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण  हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर  ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले. ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्त्येत सहभागी असल्याने त्यांना भारतात आणुन खटला चालवला, त्यात त्यांना पन्नास वर्षाची 👇
जन्मठेपेची शिक्षा सुनावली व अंदमानात कैदेत ठेवले, तीथे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी 'कमला' हे खंडकाव्य रचले. काही वर्षांनी तिथून सुटका झाली पण रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवले,तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, आणि माझी जन्मठेप  हे ग्रंथ लिहिले. सावरकर 👇
Read 9 tweets
#पुस्तकआणिबरचकही
गिरिजाबाई केळकर ( १६ ऑक्टोबर १८८६ - २५ फेब्रुवारी १९८० ) स्त्री-जीवनातील समस्या, तिची दुःखे मांडणार्‍या आद्य गद्य लेखिकांपैकी एक होत्या. विवाहानंतर त्या मराठी भाषा शिकल्या व मराठीत त्यांनी  प्राविण्य संपादन केले. घरच्यांनी  गिरीजाबाईंच्या लेखनाला प्रोत्साहन 👇
दिल्यामुळे त्या लिहू लागल्या. त्यांनी विपुल व विविध लेखन करून चांगली मान्यता मिळवलीच, शिवाय उत्तम वक्त्या म्हणूनही लौकिक संपादन केला. त्यांच्या कथा-नाटकांतले अनुभवाचे विश्व रोजच्या जीवनातले व कौटुंबिक आणि घरगुती स्वरूपाचे होते. तत्कालीन संस्कारशील मध्यमवर्गीयांचे प्रातिनिधिक 👇
प्रातिनिधिक ठरू शकेल, असे लेखन त्यांनी केले. ‘मनोरंजन’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘खानदेश वैभव’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. ‘पुस्तकी शीक नि व्यवहाराची भीक’, ‘पुरी हौस फिटली’ या कादंबर्‍या; ‘अंगठीचा प्रभाव’ ही दीर्घ सामाजिक कथा; ‘स्वभावचित्रे’, भाग १ व २, ‘केवळ 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकही
विनायक कोंडदेव ओक (२५ फेब्रुवारी १८४०—९ ऑक्टोबर १९१४). चरित्रकार, निबंधकार, ‘बालबोध’ मासिकाचे संपादक. ओकांनी वयाच्या ३४-३५ व्या वर्षी लेखनास सुरुवात केली. त्यांची लहानमोठी मिळून सुमारे पासष्ट पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांत चरित्र, निबंध, इतिहास, कथा, कविता, 👇
अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. इंग्रजी निबंधांच्या आधारे लिहिलेले लघुनिबंधमाला (१८८६) हे त्यांचे पहिले पुस्तक. वाचकांची करमणूक साधून त्यांना इतिहासाची गोडी लावावी या भूमिकेतून त्यांनी हिंदुस्थान कथारस (१८७१), शिपायांच्या बंडाचा इतिहास (१८७४), फ्रान्स देशातील 👇
राज्यक्रान्तीचा इतिहास (१८७६) व इतिहास तरंगिणी (१८७८) ही पुस्तके लिहिली.
ओकांनी गोष्टींची, निबंधांची त्याचप्रमाणे माहितीपर अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी मधुमक्षिका (१८७१) व मुलांस उत्तम बक्षीस (१८७९) ही लोकप्रिय झाली होती. शिरस्तेदार (१८८१) लाच खाण्यापासून होणाऱ्या 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकही
लक्ष्मीबाई टिळक ( १ जुन १८६६ - २४ फेब्रुवारी १९३६ ) या रेव्हरंड टिळकांच्या पत्नी होत्या. लग्नानंतर टिळकांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली.टिळक धर्मांतर करणार, ही बातमी कानावर येताच लक्ष्मीबाई कासावीस झाल्या आणि ‘म्हणे जातो सोडून नाथ माझा, अता कवणाला बाहू 👇
देवराजा.’ ही चार ओळींची कविता लिहिली. हे  बाईंचे पहिले काव्यलेखन. लक्ष्मीबाईंच्या कविता टिळक दुरुस्त करत व प्रसिद्धीला पाठवत.बाईंना रात्री कविता सुचत. मग जमिनीवर आगपेटीच्या काडीने किंवा खडूने किंवा कोळशानेही त्या लिहून काढीत. एकदा तर पावणे तीनशे ओळींची कविता त्यांनी अशी 👇
लिहिली होती. बालकवींनी नंतर ती कागदावर लिहून काढली. लक्ष्मीबाईंच्या कवितांचा ‘भरली घागर’ हा कवितासंग्रह त्यांचा पुत्र देवदत्त नंतर प्रकाशित केला.टिळकांच्या हातून अपूर्ण राहिलेल्या ‘ख्रिस्तायन’ ह्या काव्याचे चौसष्ट अध्याय सहज, सोप्या, रसाळ शैलीत लिहून लक्ष्मीबाईंनी पूर्ण 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकही
अनंत पै ( १७ सप्टेंबर १९२९ - २४ फेब्रुवारी २०११ ) अमर चित्रकथा या प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेल्या कॉमिक मालिकेची सुरुवात त्यांनी १९६७ मध्ये केली. त्यावेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय कार्यक्रमात ग्रीकपुराणावर आधारित प्रश्न विचारले जात मात्र भारतीय पुराणांचा 👇
या प्रश्नावलीत समावेश केला जात नसे,कारण याविषयी कोणाला माहितीच नसायची.त्यांना या घटनेने अस्वस्थ केले आणि मग जन्म झाला अमरचित्र कथेचा जी.आर.वीरचंद आणि यांच्या इंडिया बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमरचित्र कथा सुरू केली. 👇
अमरचित्र कथेच्या इंग्रजीत आठ कोटी, साठ लाख प्रति विकल्या गेल्या हा एक जागतिक विक्रम समजला जातो १९८० मध्ये त्यांनी रंगरेखा फीचरच्या माध्यमातून ट्विंकल या कार्टूनची सुरुवात केली. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या ट्विंकल व अमरचित्रकथा तसेच अन्य 👇
Read 4 tweets
विंडफाॅल ऑफ द गाॅड्स - सिडने शेल्डन
अनुवाद अजित कात्रे

अमेरिकन अध्यक्षांनी पत्नीला घटस्फोट देऊन दुसऱ्या स्रीशी लग्न केले या शुल्लक कारणाने सत्ता सोडावी लागली.
@LetsReadIndia @PABKTweets @pustakaayan
#पुस्तकआणिबरचकही 👇
त्यांचा जवळचा मित्र असलेलाच त्यांच्या जागी अध्यक्ष झाल्यावर त्यांची नेमणूक अध्यक्षांची विदेश व्यवहार सल्लागार या पदावर नेमणूक झाली. त्यांच्या मदतीने
नव्या अध्यक्षांना पोलादी पडद्याआड झाकलेल्या रुमानिया, रशिया, बल्गेरिया अशा कम्युनिस्ट देशांशी संबंध सुधारण्याच्या धोरणाचे 👇
सुतोवाच करताच नाट्यमय घडामोडींना सुरुवात होते. सत्तेत असलेल्या काहींचा या धोरणाला विरोध होता.
राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना केवळ रूमानिया आणि इतर कम्युनिस्ट राष्ट्रांच्या संबंधी त्यांचे अभ्यास पूर्ण लेख वाचून आणि त्यासंबंधी त्यांचे अगदी नवीन प्रकारच्या विचारामुळे 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकही
डाॅ. लक्ष्मण देशपांडे (५ डिसेंबर १९४३ - २२ फेब्रुवारी २००९ ) बहुरंगी मराठी लेखक, नाट्य दिग्दर्शक, व अभिनेते . त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री 👇
नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे. 👇
या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर खूप यशस्वी झाले.👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकही
रामचंद्र श्रीपाद जोग ( १५ मे १९०३ - २१ फेब्रुवारी १९७७ ) जोगांचा खरा परिचय साहित्यक्षेत्राला झाला तो त्यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ (१९३०) या ग्रंथामुळे. यात जोगांनी इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे 👇
संस्करण केले व अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य-विचार धारा प्रदान केली. ‘काव्यविभ्रम’ (१९५१) या ग्रंथातील अलंकारावरील त्यांचे विवेचन स्वतंत्र प्रज्ञेचे द्योतक आहे. त्यांनी अलंकारांना काव्याच्या उपरे, बाह्यपदार्थ न मानता 👇
ते विभ्रम कसे आहेत, ते सप्रमाण पटवून दिले. ‘मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन’ या त्यांच्या व्याख्यानमालेत त्यांनी सहाशे-सातशे वर्षांतील मराठी वाङ्मयाचे विहंगमावलोकन केले.    मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाचे तीन खंड त्यांनी संपादित केले., 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकही
डॉ. रत्नाकर मंचरकर ( ६ ऑक्टोबर १९४३ - २० फेब्रुवारी २०१२ ) जुनी नवी साहित्य मीमांसा, नवे वाङ्मयप्रवाह, तौलनिक साहित्याभ्यास ही मंचरकरांच्या अभ्यासाची क्षेत्रे होत. त्यांनी संपादने, संहिता संपादने आणि सर्वांगीण संशोधनात्मक लेखन, सूत्रसंचालने इत्यादी कार्य केले.👇
विशेषतः मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा सखोल व संशोधनात्मक अभ्यास व लेखन केले.मूलगामी संशोधन, सहृदय आकलन, चिकित्सक प्रतिपादन आणि विश्लेषक निष्कर्षण यांमुळे मंचरकरांचे संशोधनात्मक लेखनही सर्वांना आकर्षित करते आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अर्वाचीन मराठी वाङ्मयातील काही विषयांवरही 👇
त्यांनी प्रकाश टाकला आहे. ‘अर्वाचीन मराठी साहित्य आणि साहित्यिक’ (१९ लेख), ‘ग्रामीण-दलित-स्त्रीवादी-जनसाहित्य’ (१६ लेख), तसेच ‘अर्वाचीन मराठी साहित्यविचार आणि समीक्षा यांविषयीचे चिंतन’, ‘अर्वाचीन साहित्यविचार’ (८ लेख), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (६ लेख) 👇
Read 5 tweets
#पुस्तकआणिबरचकही
आबाजी नारायण पेडणेकर : (२० फेब्रुवारी १९२८ - ११ ऑगस्ट २००४). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.
'आम्ही मासे मारतो त्याची गोष्ट’ ही त्यांची पहिली कथा. तर शेलूक (१९७२) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे 👇
वास्तवपूर्ण चित्रण, विशेषत: कोकणातील माणसे, सांस्कृतिक लोकजीवन, समुद्र, कोकणातील निसर्ग, मालवणी बोली आणि तेथील मानवी जीवनाचा अनुबंध त्यांनी शेलूकमध्ये गुंफला आहे. रेडग्रीन , मैत्र, वेडा आंबा  हे त्यांचे पुढील कथासंग्रह होत. या कथासंग्रहातील कथनात त्यांनी फॅन्टसीचा वापर 👇
केला आहे. ‘वेडा आंबा’ ही त्यांची परीकथा अनेक भारतीय भाषांत भाषांतरित झाली. ऐलपैल (१९७६) ही त्यांची कोकणच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी प्रसिद्ध आहे. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे आणि निसर्गाचे विविध विभ्रम कादंबरीत त्यांनी रेखाटले आहेत. संतांच्या क्रांतिकारी जीवनाविषयीची आस्था 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकही
अरविंद गोखले (१९ फेब्रुवारी १९१९ - २४ ऑक्टोबर १९९२ ) दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील एक श्रेष्ठ मराठी कथाकार. 
‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली . त्यानंतर लिहिलेल्या सुमारे साडेतीनशे 👇
कथा नजराणा ते दागिना पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत. गोखल्यांचे कथाविश्व नव्या प्रवृत्तींचा वेध घेणारी आहे. पुष्कळदा त्यांच्या कथांना 👇
चमत्कृतिप्रवण घाट प्राप्त होतो त्या नाट्यात्म घटनाचित्रणात रंगतात तसेच त्यांच्या कथा खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीय संसारकथा आहेत. मिथिला , शुभा , अनामिका ह्या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके लाभली तसेच ‘गंधवार्ता’ ह्या कथेस एन्‌काउंटर  ह्या आंतरराष्ट्रीय 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकही
गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२). थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांनी कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांनी ‘शतपत्रे’ म्हणून लिहिलेल्या निबंधांवर. ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली. भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर ह्या 👇
पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली. ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत. त्या पत्रातून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक 👇
प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.लोकहितवादींनी मुख्यत: लिहिले, ते हिंदू समाजाबद्दल. तथापि अन्य धर्मीयांतील त्यांना अनुचित वाटणाऱ्या काही अपप्रवृत्तींवरही त्यांनी टीका केली आहे. इंग्रजही त्यांच्या टीकेतून सुटले नाहीत कारण त्यांची सर्व टीका एका व्यापक सामाजिक 👇
Read 8 tweets
#पुस्तकआणिबरचकही
पुरुषोत्तम शिवराम रेगे (२ ऑगस्ट १९१०–१७ फेब्रुवारी १९७८) श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक. छांदसी नावाचा त्यांचा १९६२ साली प्रसिद्ध झालेला समीक्षात्मक लेखांचा संग्रह.साधना आणि इतर कविता ह्या त्यांच्या काव्यसंग्रहानंतर त्यांचे अनेक 👇
कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय आहे. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होत असते. त्यांच्या कथा व 👇
कविता जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत.रूपकथ्थक  व मनवा  हे त्यांचे दोन कथासंग्रह असून त्यांच्या कथांतूनही त्यांच्या कविमनाचे नाजूक पदर दिसतात. सावित्री,अवलोकिता, रेणू आणि मातृका या रेगे यांच्या चारी कादंबऱ्या काव्यात्म व अर्थगर्भ आहेत.त्यांतील भावविश्व 👇
Read 6 tweets
#पुस्तकआणिबरचकही
मल्लिका अमर शेख ( १६ फेब्रुवारी १९५७ ) शाहीर अमर शेख ह्यांच्या कन्या. मल्लिकाने शालेय जीवनापासूनच कविता करायला सुरुवात केली. नृत्य, अभिनय, संगीत ह्या कला जोपासण्याचा प्रयत्न केला. पुढे वेगळे जीवन आणि वेगळा विचार जगणार्‍या कवी नामदेव ढसाळ यांच्याशी विवाह केला.👇
मॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण घेऊन विवाहोत्तर जीवनात त्या अनुभवाच्या शाळेतच बरेचसे शिकल्या. जे शिकल्या त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडले आहे. १९७९ साली ‘वाळूचा प्रियकर’ नावाचा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. बर्‍याच उशिरा म्हणजे १९९३ मध्ये ‘महानगर’ कवितासंग्रह 👇
आला. संस्कृतीचा भेदक उपहास करणारी त्यांची कविता प्रामुख्याने स्त्री-मनाच्या जाणिवा व्यक्त करते. स्त्री-वादी कवयित्रींमध्ये मल्लिका अमरशेखांचे नाव ठळकपणे घ्यावे लागते. ‘देहऋतु’ (१९९९) आणि ‘समग्राच्या डोळा भिडवून’ (२००७) हे अलीकडचे कवितासंग्रह याची साक्ष देतात. मानवी दुःखे आणि 👇
Read 6 tweets
सेल - डॉ. राॅबिन कुक, अनुवाद अजेय हर्डीकर

वैद्यकीय क्षेत्रातील बदलांमुळे स्पेशलायझेशनकडे डाॅक्टरांचा ओढा वाढल्याने आणि जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांच्या कमतरतेमुळे सर्वसाधारण लोकांसाठी वैद्यकीय सुविधा अत्यंत खर्चिक झल्यात. @LetsReadIndia @PABKTweets #पुस्तकआणिबरचकही 👇
यातून मार्ग काढण्यासाठी सर्वसाधारण लोकांकडे असलेल्या मोबाईलचा वापर केला गेला.
' आयडाॅक ' हे एक असं मोबाईल एप्लिकेशन आहे जे सतत पेशंटच्या तब्येतीवर देखरेख करतं आणि त्यानुसार तात्काळ रोगनिदान करुन तज्ञांचा सल्ला घेऊन उपचारसुध्दा सुचवते. 👇
या मोबाईल ॲप मध्ये स्वतः विकसित होण्याची क्षमता होती. त्यामुळे कालांतराने रोगनिदान झाल्यावर उपचारासाठी कोणत्याही मार्गदर्शनाची गरज राहणार नव्हती.
मोबाईल ॲप्लिकेशनची चाचणी करण्यासाठी कंपनीने वीस हजार लोकांची निवड केली.

आणि याचा वापर करणारे काही पेशंट अचानक मृत्यू पावले... 👇
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!