माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे अस्तित्व संपवलं... पक्ष गेला चिन्ह गेलं... आता उद्धव ठाकरेंनी नेमकं काय करायला हवं असं सांगणारं अॅड. विश्वास कश्यप यांचं उद्धव ठाकरेंसाठी कळकळीने लिहिलेलं पत्र...
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
महोदय, प्रथमतः आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!
आपण सध्या प्रचंड वाईट मानसिक अवस्थेतून जात आहात याची आम्हाला कल्पना आहे. आपली प्रकृती सुद्धा ठीक नाही.
"मोघलांच्या नादी लागलेले..."
दिल्लीतील मोघलांच्या नादी लागून आपल्यातल्या काही लोकांनी आपल्याला दगा दिला हे सर्वश्रुत आहे. घाबरू नका साहेब यातला एकही पुढच्या निवडणुकीत निवडून येणार नाही ही खात्रीच नव्हे तर विश्वास आहे आम्हाला.
"पुणेरी नव्हे नागपूरी पेशवे..."
साहेब, आम्ही शिवसैनिक नाही. परंतु उद्धव ठाकरे नावाच्या पुरोगामी विचारांच्या व्यक्तीवर आम्ही प्रेम करायला लागलोय हे तुम्हाला आम्ही मागेही सांगितले होते. आपल्या तोंडी प्रबोधनकारांची भाषा येऊ लागली त्याचवेळेस आरएसएसच्या पेशव्यांनी आपल्याला...
दगा देण्याचा प्लॅन सुरू केला. पूर्वी पेशवे पुण्यात राहायचे आता ते नागपूर मुक्कामी राहतात.
"लोकशाही? छे ही तर हुकूमशाही..."
साहेब आपल्याला माहीत आहे की, आरएसएस संपूर्ण भारतात पसरले आहे. प्रशासकीय विभाग, शिक्षण, उद्योग, सांस्कृतिक क्षेत्र, दृक्श्राव्य माध्यमे, न्यायालये, पोलीस...
अशा कित्येक अगणित क्षेत्रात या लोकांनी घुसखोरी केली आहे. त्यांची माणसं त्यांनी प्रत्येक जागेत जाणीवपूर्वक पेरली आहेत. आणि हे काम ते इतके बिनबोभाट करतात की सर्वसामान्य बहुजनांना ते समजत सुद्धा नाही. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, आरबीआय अशा सगळ्या संविधानिक संस्था...
त्यांनी नासवल्या आहेत. संविधान फक्त दाखवायला आणि संविधान दिनी साजरा करायला ठेवले आहे. अघोषित कसली ही तर उघड उघड हुकूमशाही चालली आहे.
"तुम्ही घाबरू नका..."
आजूबाजूला इतकी आणीबाणीची परिस्थिती असताना सुद्धा साहेब तुम्ही घाबरू नका. सर्वसामान्य शिवसैनिक आणि आमच्यासारखी...
मराठी माणसं जोपर्यंत तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत तुमचे कोणीही वाकडे करू शकत नाही. साहेब हे अमित शहा फक्त मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून सगळी आखणी करीत आहेत. आणि त्या आखणीचे नियोजन करण्याचं काम देवेंद्रभाई करीत आहेत. कुठल्याही परिस्थितीत त्यांना मुंबई पाहिजे आणि...
तुम्हाला सांगतो कोणत्याही परिस्थितीत आम्ही मराठी माणसं त्यांना ती मिळू देणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा.
"परप्रांतीय आपले नाहीत..."
साहेब मुंबईतील गुजराती मारवाडी ही मोदीलाच मत देणार. त्यांचा धंदा कितीही गाळात जाऊ द्या ते मोदीलाच मत देणार. त्यामुळे त्यांच्या भरवशावर तर...
बिलकुलच राहू नका. परप्रांतीय भैये हे सुद्धा आजकाल योगी योगी आणि मोदी मोदी करतात त्यामुळे ते सुद्धा बेभरवशाचे आहेत. मुंबईत प्रत्येक भैयाची एस आर ए प्लॅनमध्ये मिळालेले पाच सहा फ्लॅट आणि पुन्हा नवीन तयार झालेल्या झोपडपट्टीत दोन दोन झोपड्या आहेत.
याला आपल्या पक्षाचेच जुने धोरण कारणीभूत आहे. परंतु जुन्या उखाळ्या पाखाळ्या काढून काहीही उपयोग नाही.
कारण रात्र "भाजपा" ची आहे.
"मराठी माणूस..."
मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला मराठी माणसांवरच अवलंबून रहावे लागणार आहे. कारण तीच तुमची खरी माणसं आणि शक्ती आहे. यावेळी भाजपामधील मराठी माणसं सुद्धा तुम्हालाच साथ देणार आहेत. काही गुजराती मराठी पेशवे सोडले तर.
"सध्या फक्त मुंबई आणि मुंबई..."
साहेब, सध्या तुम्ही फक्त मुंबईवरच लक्ष द्या. विधानसभेच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र पाहू. नाहीतरी आदित्य महाराष्ट्र पाहतोच आहे. कुठल्याही परिस्थितीत मोदी शहा यांना देवेंद्रभाईच्या हस्ते शिवसेना संपवायची आहे. त्यांनी तसा अफजलखानी विडाच उचललेला आहे.
परंतु प्रतापगडाचा इतिहास त्यांना माहित नाही.
"महाविकास आघाडीबाबत तुम्हीच पुढाकार घ्या..."
साहेब, तुम्ही जाणीवपूर्वक महाविकास आघाडी सांभाळा. थोडासा कमीपणा घ्यावा लागला तरी चालेल. काँग्रेस स्वबळावर लढू असे म्हणून फुकटचे आव्हान देतात आणि अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करतात.
ते स्वतःच बेडूक फुगवतात आणि स्वतःच फोडतात सुद्धा. त्यांच्या पक्षात अतिशय छोटा आणि मर्यादित विचार करणारी काही गल्लीतील मंडळी आहेत. त्यांना बीजेपीची ताकद माहिती नाही. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे आणि ते त्यांना माहित आहे. त्यामुळे ते जास्त आडेवेढे घेणार नाहीत.
"वंचितमुळे तुफान फायदा होणार.."
साहेब, वंचितचा मोठा फायदा तुम्हाला आणि त्यांना होणार आहे. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे संयुक्त मेळावे झाले पाहिजेत. एकदा का त्यांचे मनोमिलन झाले की मग पहा बीजेपीचे २० नगरसेवक सुद्धा निवडून येणार नाहीत.
"नवीन पक्ष आणि पक्षचिन्ह तयार करा..."
साहेब, त्या निवडणूक आयोगाला काही सिरीयस घेऊ नका. कागदपत्रे तयार करणे, सादर करणे इत्यादी कामे त्या त्या तज्ञांकडे सोपवा. नवीन पक्ष आणि पक्षचिन्ह रजिस्टर करून घ्या. पक्षाचे काहीही नाव द्या. त्यात "महाराष्ट्र" आला पाहिजे साहेब!
सध्या व्हाट्सअप आणि इतर समाज माध्यमे इतकी शक्तिशाली झाली आहेत की दोन तासात तुमचा नवीन पक्ष आणि पक्षचिन्ह संपूर्ण भारताला समजेल.
"सुप्रीम कोर्टातही तोच निकाल..."
साहेब निवडणूक आयोगासारखाच निकाल सुप्रीम कोर्टात सुद्धा लागणार आहे लिहून ठेवा. निकालाबाबत नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना आधीच विचारा. ते अगोदरच निकालातील ओळ न ओळ तुम्हाला समजावून सांगतील.
"प्रत्येक वॉर्ड पिंजून काढा..."
साहेब यांच्या नादी लागू नका. तुम्हाला ते जाणीवपूर्वक बिझी ठेवत आहेत. तुम्ही मुंबईतील प्रत्येक वॉर्ड पिंजून काढा. महाविकास आघाडी अधिक वंचित या सूत्रानुसारच २२७ वॉर्डांमध्ये फिरा आणि झंजावात सुरू करा.
देशातील सर्व संविधानिक आयोग हे भाजपा आयोग झाल्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहात तुम्ही? त्यांच्याकडून कोणता न्याय मिळणार आहे? मग कशाला उगाचच वेळेचा अपव्यय करताय?
"खणखणीत बोला..."
साहेब आता तुमची भाषा अधिक धारदार करा. बोलताना उगाच देवेंद्रजी, अमितभाई असे शब्द वापरू नका.
आपले इतके प्रचंड नुकसान करून सुद्धा जी आणि भाई हे शब्द आपण कसे वापरू शकता? बोलताना देवेंद्र, मोदी-शाह असेच शब्द वापरा. सगळा शब्दांचा खेळ आहे. सुप्रीम कोर्टाच्या बाबत बोलताना न्यायालयाचा आम्हाला आदर आहे वगैरे वगैरे असे काही बोलू नका. कोर्टाकडून न्याय मिळणारच नाही असेच खणखणीत बोला.
साहेब एक लक्षात ठेवा सगळ्याच पक्षाचे मराठी माणसं आपल्यावर प्रेम करत आहेत. मराठी भाषा बोलून गुजरातचे गोडवे गाणारे मराठी सोडून, बाकी सर्व तुमच्या सोबत आहेत.
"डरो मत..."
मराठीचा मुद्दा हाच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मुद्दा झाला पाहिजे. तुम्हीच जिंकणार ही काळ्या दगडावरची...
रेघ आहे . फक्त त्यासाठी दरबारी राजकारणा सोबतच रस्त्यावर येऊन राजकारण करा. मतदार यादी आत्ताच तयार करायला घ्या. शाखे- शाखेतून रात्रंदिवस लोकं कामाला लावा. मुंबई महापालिका मराठी माणसांच्याच हाती राहिली पाहिजे आणि ती राहणारच हा प्रचंड विश्वास आहे आम्हाला!
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील एक प्रसिद्ध नारा होता "डरो मत"! हाच नारा आपणाला हुकूमशाहीतून लोकशाहीकडे घेऊन जाईल.
अनेकांप्रमाणेच मीही गावावरून नोकरीसाठी मुंबईला आलेलो. मुंबईत आल्यावर शिवसेना कळायला लागली. नोकरीला लागल्यावर लोकाधिकार समितिचं काम करताना शिवसेना अंगात भिनायला लागली. बाळासाहेबांची ऐकलेल्या भाषणांनी अंगात संचारणं म्हणजे काय असतं ते जाणवायला लागलं.
अनेक तालुक्यात लोकाधिकार समितीतर्फे निरीक्षक म्हणून काम करताना गावा खेड्यातल्या शिवसैनिकांची ओळख व्हायला लागली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले साधेभोळे, निष्ठावान शिवसैनिक. कुणालाही हेवा वाटेल असा हा ठेवा आहे.
पण काय आहे मिस्टर शिंदे,
तुमच्या सारखे लोक जेव्हा शिवसैनिकांच्या मेहनतीवर व बाळासाहेबांच्या आशिर्वादाने निवडून आले ना, सगळ्या बाजूंनी सगळं मिळाल्यानंतर चटक लागली. मग कसंही,कुठूनही निवडून येणं. हेच महत्वाचं वाटायला लागलं तुमच्या सारख्यांना. पण शिवसैनिक तसाच आहे... फाटकाच!
"पनामा पेपर" आठवतो का?
तोच तो, ज्यात आपला पद्मश्री+पद्मभूषण+पद्मविभूषण असलेला "सदी का महानायक", त्याची सूनबाई, विजय मल्ल्या, हरिष साळवे अशा लोकांची नावं आली होती?
जगभरातल्या टॅक्सचोर गुंतवणूकदारांचा भांडाफोड करणारं हे इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या पत्रकाराचं पुढं काय झालं?
डाफ्ने करुआना गॅलिझिआ नावाच्या ह्या स्त्री पत्रकाराला तिच्या परिवारासह बॉम्बने उडवण्यात आलं होतं; चिथड्या-चिथड्या झाल्या होत्या तिच्या!
"हे" हिडेनबर्गच्या नॅथन अँडरसनला माहिती नसेल?
मग त्या अँडरसनला हे सुद्धा माहिती असेलच की अदानी किती मोठा "भस्मासूर" आहे आणि त्याच्या हातातलं बाहुलं असणार इथलं सरकार विरोधकांचा कसा "लोया" करतं?
हे सगळं माहिती असतानाही त्याने अदानीची चड्डी उतरवण्याचं धाडस केलं, यासाठी त्या पठ्ठ्याचं विशेष कौतुक करायला(च) पाहिजे...
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या, अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा, काही लोकांना प्रचंड गर्व असतो.
म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला...
नाती
कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण...
ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच...
भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.
त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही
जन्म - मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक
आपल्या अहंकाराची बळी कधी झाली
हे कळलंच नाही.
सावरकरांना "माफीवीर" कुणी बनवलं??
कॉंग्रेसने की भाजपने??
- डॉ. सुनील देशमुख.
७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉंग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही. उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचीच सरकारे होती "पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते."
या देशासाठी योगदान देणार्या कोणालाही कॉंग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.मला आठवतं सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो!!
आमच्या मनाला वाटेल त्यांच्यावर आम्ही ईडीची कारवाई करू शकतो, या भाजप नेत्यांच्या अहंकाराने आता कडेलोट केला आहे. महाराष्ट्र ही समृध्द राज्याची जननी आहे, हे ठाऊक असल्याने आपल्या सत्तेआड कोणी येऊ नये, अशी खूणगाठ बांधलेल्या भाजप नेत्यांनी ईडीचा पध्दतशीर...
वापर केला आणि जे आडवे येतील त्यांना ठरवून वाटेला लावलं. हे करण्याच्या मागे महाराष्ट्रातले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव सगळेच विरोधक घेत आहेत. आता तर सामान्य माणूसही फडणवीसांच्या चेहर्याखालची मानसिकता ओळखू लागला आहे. आव कितीही प्रामाणिक असला तरी आता या....
प्रामाणिकपणावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. माजी गृहमंत्री अनील देशमुख असोत वा नवाब मलिक किंवा संजय राऊत. भाजपची अडचण दूर करण्यासाठी या नेत्यांविरोधी कारवाई झाल्याची उघड चर्चा होते आहे. ज्यांच्या विरोधात कारवाई झाली त्या नेत्यांच्या धर्मपत्नी, त्यांची मुलं आणि नातलगही आता...
तुम्हाला केतन पारीख आठवतोय..? मधोपूरा बँक आठवतेय...?
तो केतन पारीख, ज्याने १६०० कोटींचा शेअर्स घोटाळा केला. त्यात ती माधोपूरा बँक सपशेल बुडाली. CBI ने चौकशी केली, केतन पारीखला अटक झाली. काही महिन्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला, त्याला जामीन मंजूर झाला...!
त्या जामीनाविरोधात मधोपूरा बँकेने आणि CBI ने आव्हान दिले...
हे आव्हान (अपील) बँकेने मागे घ्यावे आणि जामीनाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून माधोपूरा सहकारी बँकेच्या एका संचालकाने या केतन पारीखकडून अडीच कोटी रुपयांची लाच घेतली होती.
ही लाच घेतली गेल्याचा अहवाल अर्ज गुजरातचे तत्कालीन DGP (क्राईम) श्री. कुलदीप शर्मा यांनी गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. सुधीर मांकड यांना पाठवला.