#पुस्तकआणिबरचकही
अनंत पै ( १७ सप्टेंबर १९२९ - २४ फेब्रुवारी २०११ ) अमर चित्रकथा या प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेल्या कॉमिक मालिकेची सुरुवात त्यांनी १९६७ मध्ये केली. त्यावेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय कार्यक्रमात ग्रीकपुराणावर आधारित प्रश्न विचारले जात मात्र भारतीय पुराणांचा 👇
या प्रश्नावलीत समावेश केला जात नसे,कारण याविषयी कोणाला माहितीच नसायची.त्यांना या घटनेने अस्वस्थ केले आणि मग जन्म झाला अमरचित्र कथेचा जी.आर.वीरचंद आणि यांच्या इंडिया बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमरचित्र कथा सुरू केली. 👇
अमरचित्र कथेच्या इंग्रजीत आठ कोटी, साठ लाख प्रति विकल्या गेल्या हा एक जागतिक विक्रम समजला जातो १९८० मध्ये त्यांनी रंगरेखा फीचरच्या माध्यमातून ट्विंकल या कार्टूनची सुरुवात केली. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या ट्विंकल व अमरचित्रकथा तसेच अन्य 👇
मालिकांमुळे त्यांना अंकल पै हे संबोधन मिळालं अंकल पै यांनी अमरचित्र कथे बरोबरच रामू आणि शामू,लिटल राजी आणि रेखा या कार्टूनचीही ही निर्मिती केली. ( संकलीत) @Marathi_Mee@ShubhangiUmaria@threadreaderapp unroll
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पुस्तकआणिबरचकही
विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक. ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. 👇
उच्चशिक्षणासाठी लंडनला असतांना जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले. ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्त्येत सहभागी असल्याने त्यांना भारतात आणुन खटला चालवला, त्यात त्यांना पन्नास वर्षाची 👇
जन्मठेपेची शिक्षा सुनावली व अंदमानात कैदेत ठेवले, तीथे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी 'कमला' हे खंडकाव्य रचले. काही वर्षांनी तिथून सुटका झाली पण रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवले,तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले. सावरकर 👇
#पुस्तकआणिबरचकही
गिरिजाबाई केळकर ( १६ ऑक्टोबर १८८६ - २५ फेब्रुवारी १९८० ) स्त्री-जीवनातील समस्या, तिची दुःखे मांडणार्या आद्य गद्य लेखिकांपैकी एक होत्या. विवाहानंतर त्या मराठी भाषा शिकल्या व मराठीत त्यांनी प्राविण्य संपादन केले. घरच्यांनी गिरीजाबाईंच्या लेखनाला प्रोत्साहन 👇
दिल्यामुळे त्या लिहू लागल्या. त्यांनी विपुल व विविध लेखन करून चांगली मान्यता मिळवलीच, शिवाय उत्तम वक्त्या म्हणूनही लौकिक संपादन केला. त्यांच्या कथा-नाटकांतले अनुभवाचे विश्व रोजच्या जीवनातले व कौटुंबिक आणि घरगुती स्वरूपाचे होते. तत्कालीन संस्कारशील मध्यमवर्गीयांचे प्रातिनिधिक 👇
प्रातिनिधिक ठरू शकेल, असे लेखन त्यांनी केले. ‘मनोरंजन’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘खानदेश वैभव’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. ‘पुस्तकी शीक नि व्यवहाराची भीक’, ‘पुरी हौस फिटली’ या कादंबर्या; ‘अंगठीचा प्रभाव’ ही दीर्घ सामाजिक कथा; ‘स्वभावचित्रे’, भाग १ व २, ‘केवळ 👇
#पुस्तकआणिबरचकही
विनायक कोंडदेव ओक (२५ फेब्रुवारी १८४०—९ ऑक्टोबर १९१४). चरित्रकार, निबंधकार, ‘बालबोध’ मासिकाचे संपादक. ओकांनी वयाच्या ३४-३५ व्या वर्षी लेखनास सुरुवात केली. त्यांची लहानमोठी मिळून सुमारे पासष्ट पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांत चरित्र, निबंध, इतिहास, कथा, कविता, 👇
अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. इंग्रजी निबंधांच्या आधारे लिहिलेले लघुनिबंधमाला (१८८६) हे त्यांचे पहिले पुस्तक. वाचकांची करमणूक साधून त्यांना इतिहासाची गोडी लावावी या भूमिकेतून त्यांनी हिंदुस्थान कथारस (१८७१), शिपायांच्या बंडाचा इतिहास (१८७४), फ्रान्स देशातील 👇
राज्यक्रान्तीचा इतिहास (१८७६) व इतिहास तरंगिणी (१८७८) ही पुस्तके लिहिली.
ओकांनी गोष्टींची, निबंधांची त्याचप्रमाणे माहितीपर अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी मधुमक्षिका (१८७१) व मुलांस उत्तम बक्षीस (१८७९) ही लोकप्रिय झाली होती. शिरस्तेदार (१८८१) लाच खाण्यापासून होणाऱ्या 👇
#पुस्तकआणिबरचकही
लक्ष्मीबाई टिळक ( १ जुन १८६६ - २४ फेब्रुवारी १९३६ ) या रेव्हरंड टिळकांच्या पत्नी होत्या. लग्नानंतर टिळकांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली.टिळक धर्मांतर करणार, ही बातमी कानावर येताच लक्ष्मीबाई कासावीस झाल्या आणि ‘म्हणे जातो सोडून नाथ माझा, अता कवणाला बाहू 👇
देवराजा.’ ही चार ओळींची कविता लिहिली. हे बाईंचे पहिले काव्यलेखन. लक्ष्मीबाईंच्या कविता टिळक दुरुस्त करत व प्रसिद्धीला पाठवत.बाईंना रात्री कविता सुचत. मग जमिनीवर आगपेटीच्या काडीने किंवा खडूने किंवा कोळशानेही त्या लिहून काढीत. एकदा तर पावणे तीनशे ओळींची कविता त्यांनी अशी 👇
लिहिली होती. बालकवींनी नंतर ती कागदावर लिहून काढली. लक्ष्मीबाईंच्या कवितांचा ‘भरली घागर’ हा कवितासंग्रह त्यांचा पुत्र देवदत्त नंतर प्रकाशित केला.टिळकांच्या हातून अपूर्ण राहिलेल्या ‘ख्रिस्तायन’ ह्या काव्याचे चौसष्ट अध्याय सहज, सोप्या, रसाळ शैलीत लिहून लक्ष्मीबाईंनी पूर्ण 👇
त्यांचा जवळचा मित्र असलेलाच त्यांच्या जागी अध्यक्ष झाल्यावर त्यांची नेमणूक अध्यक्षांची विदेश व्यवहार सल्लागार या पदावर नेमणूक झाली. त्यांच्या मदतीने
नव्या अध्यक्षांना पोलादी पडद्याआड झाकलेल्या रुमानिया, रशिया, बल्गेरिया अशा कम्युनिस्ट देशांशी संबंध सुधारण्याच्या धोरणाचे 👇
सुतोवाच करताच नाट्यमय घडामोडींना सुरुवात होते. सत्तेत असलेल्या काहींचा या धोरणाला विरोध होता.
राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना केवळ रूमानिया आणि इतर कम्युनिस्ट राष्ट्रांच्या संबंधी त्यांचे अभ्यास पूर्ण लेख वाचून आणि त्यासंबंधी त्यांचे अगदी नवीन प्रकारच्या विचारामुळे 👇
#पुस्तकआणिबरचकही
डाॅ. लक्ष्मण देशपांडे (५ डिसेंबर १९४३ - २२ फेब्रुवारी २००९ ) बहुरंगी मराठी लेखक, नाट्य दिग्दर्शक, व अभिनेते . त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री 👇
नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे. 👇
या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर खूप यशस्वी झाले.👇