पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र !!.🧐
हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच.
असे लेखन फक्त आणि फक्त पुणेकरणाच येते.
प्रिय राजूस,( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो )
चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे,
ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर....!!!
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल...!!
हल्ली आपण खोकत असता, खोकला थंड पेयाचा दिसत नाही, आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन
फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे!!
हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात,जेवण जात नाही, त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.
गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात, पण ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल...!!
आमची मिलेट्री अकौंटमधील नोकरी आता काही दिवसाची राहिली आहे, तेव्हा पुढची भिस्त आपल्यावर रहाणार नसली तरी आपली भिस्त आमच्यावर ठेऊ नये हि माफक अपेक्षा...!!
प्रेमं जरुर करा, पण सोबत अर्थार्जन पण हवे....!!! प्रेमाने मंडईत भाजी फुकट मिळत नाही कि वाण्याकडुन किराणा माल...!!
अधिक काही बोलत नाही ,आपण सुज्ञ असाल किवा आहात अशी आशा करतो...???
आपल्या लग्नानंतर आपणास आमच्या घरात रहायचे असल्यास लिव ॲंड लायसन्स चे ॲग्रीमेंट बनवण्यात येईल.
सोबत वीजपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यात येईल.!
जेवण मातोश्रींना बनवण्यास लावलेत तर त्याचा आकार त्या त्या वेळी लावण्यात येईल
व ती रोख स्वरूपात वसुल केली जाईल....!!!
अगदी थोडक्यात आणि मोजकेच सांगायचे झाल्यास लवकर कामाला लागा.....!!
आपला जन्मदाता.
🤣🤣🤣🤣 #coppied
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एका मित्राने स्वयंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली. माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली. तसं मला अधिकच रडू येऊ लागले. तशी ती बाबांच्या खोलीत गेली. त्यांना बोलवायला.*_
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले. मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही. गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणामुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही. तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे. तसं करेल सुद्धा.ते म्हणाले,
जुनी शहाणी माणसं !!....
१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. धेनु (गाय)मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.
२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते
दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.'
३.वाळवण घालताना आज्जी सूर्यमंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.
४.रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची,
स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.'
५.मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा, माझ्या लेकरांना चावू नका.
६तुळशीला दिवा लावायची, चिलटे, किडे नष्ट होऊन घरात येत नाहीत.
रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे.
या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या... होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले.
अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी...पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.
त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला.
उन्हाळा येताच सुर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली.... इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला
बरेचदा तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असतात ज्यांना कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये चांगलं, सकारात्मक असं काहीही दिसत नसतं, किंवा आपण असं म्हणूया कि त्यांनी आपली नजर फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टींमध्ये चूक काढण्यासाठीच तयार केलेली असते.
बरं त्यांना काय चुकीचे आहे हे विचारल्यानंतर logically तस फारसं काही सांगता येतं नाही किंवा त्या चुकीच्या गोष्टी ऐवजी नक्की काय करायला हवं ह्याचही उत्तर त्यांच्याकडे नसते आणि जरी असलं तरी त्या उत्तर हे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच नकारात्मक असतं.
ही अशी माणसं एनर्जी ड्रेनर असतात.
अशी माणसं आपल्या आसपास असतील तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्यावर होतो आपण करत असलेल्या कामावर होतो.
अश्यावेळी एकच करायाचं, आपल्या कोणत्याही गोष्टीबाबत ह्यांच्याशी बोलायच नाही. ह्यांच्यापर्यंत आपली कोणतीही गोष्ट, आपले कोणतेही प्लॅन जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची.
*बोधकथा : पैसा* 🏮
सत्तर हजार कोटींचा मालक सायरस मिस्त्री रिकाम्या हाती गेला... भाऊ तू सत्तर रुपयांचा मालक असलास तरी रिकामाच जाणार आहेस.
फक्त सायरस आणि तुझ्यात एवढाच फरक असेल की सायरस गेला तरी त्याची बायका पोरं रस्त्यावर येणार नाहीत. दहा पिढ्या बसून खातील.
इथे तू गेल्यावर तुझ्या घरच्यांचा बँड वाजलेला असेल. मानसिक धक्क्या पलीकडचा आर्थिक झटका सोसवताना त्यांची अनेक वर्ष निघून जातील. सगळं पुन्हा शून्यातून उभं करावं लागेल.
आनंदाने जगावं वगैरे लॉजिक सांगू नकोस. पैसे कमावणं थांबव कोण किती आनंदात जगतं हे लगेच कळेल.
काळ बदलला आहे. लोकांना तू कमी आणि पैसा अधिक प्रिय आहे.
मृत्यू गरीब श्रीमंत बघत नाही हे ठीक आहे पण श्रीमंतांचं मरण आपल्यासारखं नसतं हे लक्षात घे.
फिलॉसॉफी जेवू घालत नाही. कलियुग आहे. मृत्यूनंतर जगायचं असेल तर अवलंबून असणाऱ्यांची आधी सोय कर मग वाट्टेल त्या गोष्टी ऐकवत बस.
सिनेमा चालणे न चालणे याची कबर मल्टिप्लेक्स ने खोदली आहे, १९९९ ला एकाच वेळी गोविंदा,अमिताभ बच्चन, आमिर खान, मिथुन, फरदिन खान,अक्षय खन्ना यांचे सिनेमा बघू शकत होतो.सिनेमा हिट होत होती कारण तिकीट २५ ₹ stall आणि बाल्कनी ४० होती. लोकं परिवार घेऊन कुठला ही कधी ही सिनेमा पाहू शकत होती.
आज विचार करावा लागतो ४ पिक्चर रिलिज होतात त्यात एक सिनेमा म्हणजे १२०० मध्ये ४ तिकीट, २०० चे पॉपकॉर्न, १८० चे समोसा, २० ₹ पार्किंग,एवढं सगळं करून फिल्म बेकार असते.
मग तुम्हीच सांगा हे Boycott वगैरे सगळं बाजुला केला तरी आज सामान्य माणसाच्या हातात आहे का सिनेमा थिएटर मध्ये जाऊन
बघावा?
सिनेमा, अर्थकारण आणि त्यात OTT PLATFORM आली असताना लोकं कधी ही आपल्या सवडीने आपल्या घरात सिनेमे पाहू शकतात तर ते का म्हणून थिएटर मध्ये जाऊन पाहतील?
South Film industry, Bollywood, मराठी फिल्म इंडस्ट्री या पलिकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे.