#पुस्तकआणिबरचकही
गिरिजाबाई केळकर ( १६ ऑक्टोबर १८८६ - २५ फेब्रुवारी १९८० ) स्त्री-जीवनातील समस्या, तिची दुःखे मांडणार्या आद्य गद्य लेखिकांपैकी एक होत्या. विवाहानंतर त्या मराठी भाषा शिकल्या व मराठीत त्यांनी प्राविण्य संपादन केले. घरच्यांनी गिरीजाबाईंच्या लेखनाला प्रोत्साहन 👇
दिल्यामुळे त्या लिहू लागल्या. त्यांनी विपुल व विविध लेखन करून चांगली मान्यता मिळवलीच, शिवाय उत्तम वक्त्या म्हणूनही लौकिक संपादन केला. त्यांच्या कथा-नाटकांतले अनुभवाचे विश्व रोजच्या जीवनातले व कौटुंबिक आणि घरगुती स्वरूपाचे होते. तत्कालीन संस्कारशील मध्यमवर्गीयांचे प्रातिनिधिक 👇
प्रातिनिधिक ठरू शकेल, असे लेखन त्यांनी केले. ‘मनोरंजन’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘खानदेश वैभव’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. ‘पुस्तकी शीक नि व्यवहाराची भीक’, ‘पुरी हौस फिटली’ या कादंबर्या; ‘अंगठीचा प्रभाव’ ही दीर्घ सामाजिक कथा; ‘स्वभावचित्रे’, भाग १ व २, ‘केवळ 👇
विश्रांतीसाठी’ हे कथासंग्रह; ‘पुरुषाचे बंड’, ‘आयेषा’, ‘राजकुंवर’ (शिरकाणाचा सूड), ‘हीच मुलीची आई’, ‘मंदोदरी’ ही नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या काही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, यावरून त्यांच्या लिखाणाची लोकप्रियता ध्यानी येते. ‘गृहिणी भूषण’, ‘पुष्पहार’, ‘स्त्रियांचा 👇
स्वर्ग’ ही त्यांची आणखी काही पुस्तके. त्यांचे ‘द्रौपदीची थाळी’ हे आत्मवृत्त असून स्त्री-शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आणि पतिपरायण संसारी स्त्रीचे साधेसुधे जिव्हाळ्याने भरलेले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १९२८ साली मुंबई नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद गिरीजाबाईंनी भुषविले.
#पुस्तकआणिबरचकाही
सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे : (२७ फेब्रुवारी १९१६– ८ ऑगस्ट १९९८) मराठी कथालेखिका, कादंबरीकर्त्री व प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिका . वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला आणि कथा-लेखनास सुरुवात केली. त्यांची ‘वादळ’ ही पहिली कथा स्त्री 👇
मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे स्त्री व माहेर मासिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. नंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या. सुमतीबाईंनी विपुल लेखन केले. त्यांचे वीस कथासंग्रह, पंधरा कादंबऱ्या, कुमार वाङ्मय व दोन नाटके असे विविध साहित्यप्रकारांना स्पर्श करणारे लेखन आहे. 👇
वि. स. खांडेकर यांच्या सूचनेवरून अमरावतीच्या (विदर्भ) शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या तपोवन संस्थेत काहीदिवस वास्तव्य केले. तेथील कुष्ठरोग्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्याव त्यांच्याशी संवाद साधला. या संवादाच्या अनुभूतीतून तेथील वास्तवावर बेतलेली 👇
#पुस्तकआणिबरचकाही
ज्योत्स्ना देवधर ( २७ फेब्रुवारी १९२६ - १७ जानेवारी २०१३ ) विवाहपूर्व वास्तव्य महाराष्ट्राबाहेर झाल्याने प्रारंभी हिंदी भाषेतून कथा-लेखन केले. १९६० ते १९७० या दशकाच्या उत्तरार्धात मराठीत ज्या स्त्री लेखिका पुढे आल्या त्यांमध्ये त्यांचे हे नाव महत्त्वाचे आहे. 👇
‘तरुण भारत’ (पुणे) या दिवाळी अंकात ज्योत्स्नाबाईंची ‘घर गंगेच्या काठी’ ही पहिली मराठी कादंबरी आली. पुढे लगेचच (१९६७) ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांची स्वतंत्र नाममुद्रा उमटली. पुढच्याच वर्षी १९६८मध्ये त्यांची ‘कल्याणी’ ही कादंबरी प्रसिद्धीच्या झोतात👇
आली. त्यांच्या अन्य लेखनाप्रमाणेच या दोन्ही कादंबर्यांचे विषय कौटुंबिक विशेषतः एकत्र कुटुंब पद्धती आणि तिच्यामधील स्त्री हेच होते. या कुटुंब पद्धतीचे गुण-दोष आणि मर्यादाही त्यांच्या लेखनातून स्पष्ट होतात. अनेक कादंबर्यांबरोबर वीस कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यात 👇
#पुस्तकआणिबरचकाही
श्याम मनोहर : (२७ फेबुवारी १९४१ ) . मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच ते लेखन करू लागले. ‘काँपिटिशन’ ही त्यांची पहिली कथा. त्यानंतर कथा, कादंबरी आणि नाटक ह्या तिन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. 'आणि बाकीचे सगळे' 👇
व 'बिनमौजेच्या गोष्टी' हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथांच्या शीर्षकांतही वेगळेपणा दिसून येतो. उदा., ‘वासू अमक्यातमक्या ठिकाणी ऐसपैस’, ‘गुरूत्वापसरणाचे प्रदेश’ इत्यादी. हे ईश्वरराव, हे पुरूषोत्तमराव, शीतयुद्ध सदानंद, कळ, खूप लोक आहेत, उत्सुकतेने मी झोपलो 👇
या त्यांच्या कादंबऱ्यांतून कादंबरीचे रूढ आकृतिबंध आढळणार नाहीत तथापि समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने व्यक्त करतात. 👇
#पुस्तकआणिबरचकही
विष्णु वामन शिरवाडकर ( २७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९ ) मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे👇
प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली झालेल्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता, 👇
त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण👇
#पुस्तकआणिबरचकही
विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे क्रांतिकारक. ‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. 👇
उच्चशिक्षणासाठी लंडनला असतांना जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले. ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्त्येत सहभागी असल्याने त्यांना भारतात आणुन खटला चालवला, त्यात त्यांना पन्नास वर्षाची 👇
जन्मठेपेची शिक्षा सुनावली व अंदमानात कैदेत ठेवले, तीथे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी 'कमला' हे खंडकाव्य रचले. काही वर्षांनी तिथून सुटका झाली पण रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवले,तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी मराठी अनुवाद, आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले. सावरकर 👇
#पुस्तकआणिबरचकही
विनायक कोंडदेव ओक (२५ फेब्रुवारी १८४०—९ ऑक्टोबर १९१४). चरित्रकार, निबंधकार, ‘बालबोध’ मासिकाचे संपादक. ओकांनी वयाच्या ३४-३५ व्या वर्षी लेखनास सुरुवात केली. त्यांची लहानमोठी मिळून सुमारे पासष्ट पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांत चरित्र, निबंध, इतिहास, कथा, कविता, 👇
अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. इंग्रजी निबंधांच्या आधारे लिहिलेले लघुनिबंधमाला (१८८६) हे त्यांचे पहिले पुस्तक. वाचकांची करमणूक साधून त्यांना इतिहासाची गोडी लावावी या भूमिकेतून त्यांनी हिंदुस्थान कथारस (१८७१), शिपायांच्या बंडाचा इतिहास (१८७४), फ्रान्स देशातील 👇
राज्यक्रान्तीचा इतिहास (१८७६) व इतिहास तरंगिणी (१८७८) ही पुस्तके लिहिली.
ओकांनी गोष्टींची, निबंधांची त्याचप्रमाणे माहितीपर अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी मधुमक्षिका (१८७१) व मुलांस उत्तम बक्षीस (१८७९) ही लोकप्रिय झाली होती. शिरस्तेदार (१८८१) लाच खाण्यापासून होणाऱ्या 👇