#पुस्तकआणिबरचकही
विष्णु वामन शिरवाडकर ( २७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९ ) मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे👇
प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली झालेल्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता, 👇
त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण👇
नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. १९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते. 'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते👇
१९६६ साली प्रसिध्द झाली. सार्या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली 'वैष्णव' ही कादंबरी व 'दूरचे दिवे' हे नाटक प्रसिध्द झाले.
'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. 👇
नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला.👇
नाशिकमधील अनेक चळवळीचे ते प्रणेते होते. नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाचे १९६२ ते १९७२ पर्यंत ते अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग समजले जाते. १९६४ च्या गोवा येथील साहित्य संमेलनाचे तसेच १९७० च्या कोल्हापूर नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९८९ ला मुंबई येथील👇
जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले. १९८८ साली साहित्याच्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान केला. १९९१ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन व मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. ( संकलीत)
#पुस्तकआणिबरचकाही
गौरी देशपांडे ( ११ फेब्रुवारी १९४२ - १ मार्च २००३ ) कथा कादंबरी कविता अनुवाद स्फुट असे लेखन प्रकार सहजपणे हाताळणाऱ्या, चौकटीबाहेर लिहिणार्या मराठीतील लेखिका म्हणून परिचित होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन 👇
यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला.👇
त्यांच्या लेखनात मुक्त विचारांचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं. त्यांच लेखन स्त्रीवादी असण्यापलीकडे जाऊन स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी होतं. वेगवेगळ्या पातळीवरचं प्रेम, त्या प्रेमाची मोजावी लागणारी किंमत आणि त्या प्रेमाच्या मर्यादा ह्याबद्दलचे विचार त्यांच्या लेखनात दिसतात. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
कुसुम अभ्यंकर ( २८ फेब्रुवारी १९३६ - ५ एप्रिल १९८४ ) आपल्या लालित्यपूर्ण, प्रवाही शब्दकळेने आणि लेखनातल्या सखोल जीवनदर्शनाने थोड्या अवधीत लोकप्रिय झाल्या. त्यांची तेहेतीस पुस्तके प्रकाशित झाली. त्यांतील बहुतांश कादंबर्या नायिकाप्रधान आहेत. पुरुषप्रधान 👇
कुटुंबव्यवस्था, पारंपरिक नीतिमूल्यांची चौकट, बाईपणामुळे येणार्या मर्यादा यांमध्ये दडपून गेलेल्या स्त्रियांचे चित्रण त्यातून आहे. या नायिका तडफदार आहेत. स्वाभिमानी, करारी, समजूतदार, सेवाभावी आहेत. तशाच स्वप्नाळूही आहेत. स्त्रीची ही विविध रूपे कुसुम अभ्यंकरांनी उठावदारपणे सादर 👇
केली आहेत. रंजनप्रधान कथांच्या साच्यात बसणार्या या कादंबर्यांपेक्षा वेगळ्या धाटणीचे कादंबरीलेखनही त्यांनी केले. ओघवती भाषा आणि कादंबरीच्या तंत्राची उत्तम समज यांमुळे त्यांच्या कादंबर्या लोकप्रिय झाल्या आहेत. ‘विघ्नहर्ता’, ‘झुरते मी अंतरी’ (१९७५), ‘अश्विनी’, ‘स्पर्श’ (१९७५),👇
#पुस्तकआणिबरचकाही
कृष्ण गंगाधर दीक्षित ( १४ एप्रिल १९१४ - २८ फेब्रुवारी १९९५ ) कवी संजीव या नावाने ओळखले जातात. १९३५-१९८८ या काळात संजीव यांचे बारा कवितासंग्रह प्रकाशित झाले. ‘सुख आले माझ्या दारी’, ‘मराठा तितुका मेळवावा,’ ‘रंगपंचमी,’ ‘सुधारलेल्या बायका,’ ‘वाट चुकलेले नवरे,’ 👇
‘जन्मठेप,’ ‘हात लावीन तिथे सोने,’ ‘सौभाग्यकांक्षिणी’, ‘जखमी वाघीण’, ‘ठकास महाठक’, ‘हे दान कुंकवाचे’, ‘ग्यानबाची मेख’ या चित्रपटांचे गीतलेखन त्यांनी केले. याखेरीज अनेक गैरफिल्मी गीतांच्या ध्वनिमुद्रिकाही त्यांच्या नावावर सापडतात. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातील 👇
‘अखेरचा हा तुला दंडवत’ हे गीत कवी संजीव यांनीच लिहिले होते. केवळ चित्रपटगीतेच नव्हे, तर ‘सासर-माहेर,’ ‘भाऊबीज, ‘चाळ माझ्या पायात’, ‘पाटलाची सून’ अशा निवडक चित्रपटांच्या कथा आणि संवादही त्यांनी लिहिले. त्यापैकी ‘पाटलाची सून’ (१९६७) या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कथेचा 👇
#पुस्तकआणिबरचकाही
शंकर दामोदर पेंडसे : (२८ फेब्रुवारी १८९७ - २३ ऑगस्ट १९७४) ग्रंथकार आणि संतसाहित्याचे अभ्यासक. संस्कृत व मराठी साहित्य संत साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा असल्याने त्यांचे बहुतेक लेखन याच विषयाशी संबंधित आहे. त्यांनी लिहिलेल्या संतवाङ्मय विवेचक ग्रंथांतूनही 👇
त्यांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग आणि त्यांची रसिकता ह्यांचे दर्शन घडते. विशेषत: महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या पाच संतकवींच्या कार्याचे आपल्या विद्वात्तापूर्ण ग्रंथांमधून त्यांनी केलेले विवेचन आणि मूल्यमापन अतिशय मूलगामी झालेले आहे. वैदिक 👇
वाङ्मयातील भागवत धर्माचा विकास (१९६५) या ग्रंथात त्यांनी भागवत धर्म हे मूळच्या सूर्योपासनेचे विकसित रूप होय, हे साधार प्रस्थापित केले आहे. याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेले पौराणिक भागवत धर्म (१९६७) हे पुस्तक उल्लेखनीय आहे. ह्याशिवाय त्यांचे स्फुट लेखनही बरेच आहे. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे : (२७ फेब्रुवारी १९१६– ८ ऑगस्ट १९९८) मराठी कथालेखिका, कादंबरीकर्त्री व प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिका . वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला आणि कथा-लेखनास सुरुवात केली. त्यांची ‘वादळ’ ही पहिली कथा स्त्री 👇
मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे स्त्री व माहेर मासिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. नंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या. सुमतीबाईंनी विपुल लेखन केले. त्यांचे वीस कथासंग्रह, पंधरा कादंबऱ्या, कुमार वाङ्मय व दोन नाटके असे विविध साहित्यप्रकारांना स्पर्श करणारे लेखन आहे. 👇
वि. स. खांडेकर यांच्या सूचनेवरून अमरावतीच्या (विदर्भ) शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या तपोवन संस्थेत काहीदिवस वास्तव्य केले. तेथील कुष्ठरोग्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्याव त्यांच्याशी संवाद साधला. या संवादाच्या अनुभूतीतून तेथील वास्तवावर बेतलेली 👇
#पुस्तकआणिबरचकाही
ज्योत्स्ना देवधर ( २७ फेब्रुवारी १९२६ - १७ जानेवारी २०१३ ) विवाहपूर्व वास्तव्य महाराष्ट्राबाहेर झाल्याने प्रारंभी हिंदी भाषेतून कथा-लेखन केले. १९६० ते १९७० या दशकाच्या उत्तरार्धात मराठीत ज्या स्त्री लेखिका पुढे आल्या त्यांमध्ये त्यांचे हे नाव महत्त्वाचे आहे. 👇
‘तरुण भारत’ (पुणे) या दिवाळी अंकात ज्योत्स्नाबाईंची ‘घर गंगेच्या काठी’ ही पहिली मराठी कादंबरी आली. पुढे लगेचच (१९६७) ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांची स्वतंत्र नाममुद्रा उमटली. पुढच्याच वर्षी १९६८मध्ये त्यांची ‘कल्याणी’ ही कादंबरी प्रसिद्धीच्या झोतात👇
आली. त्यांच्या अन्य लेखनाप्रमाणेच या दोन्ही कादंबर्यांचे विषय कौटुंबिक विशेषतः एकत्र कुटुंब पद्धती आणि तिच्यामधील स्त्री हेच होते. या कुटुंब पद्धतीचे गुण-दोष आणि मर्यादाही त्यांच्या लेखनातून स्पष्ट होतात. अनेक कादंबर्यांबरोबर वीस कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यात 👇