मी, इस्ल्या(विशाल), ,आणि सोन्या विट्याहून सिनेमा बघून येत होतो . रात्रीचे साधारण ११.४५ वाजले असतील सिनेमा संपला आणि निघालो . तिघेच असल्याने एकच बाईक घेऊन गेलो होतो . इस्ल्याला लागल्या होत्या भुका " सोन्या गाडी थांबव आय*व्यां....पोटात कावळ वर्डायला लागल्यात " मधी बसलेला
इसल्या सोण्याला म्हणत होता. तोवर मी त्याला थांबवत " सोन्या गाडी थांबवू नको ह्याच्यात लै किडे हायती... घरातन ज्यून यी म्हटलं व्हतं तसच आलंय... ढाब्यावर खायची हौस हाय आयघालायला " . " शाप्या गाडी डुलत्या ऱ... हवा तर कमी न्हाय ना झाली ... " सोन्या मला थांबत म्हणाला ...
गाडी थांबली उतरलो आणि बघितल तर मागचं टायर पंक्चर...! " आता कशी आयघालायची ...झाली की पंचायत" ईसल्या डोक्याला हात लावून म्हंटला. " तामखडी पर्यंत ढकलत न्हावी लागल" सोन्या म्हंटला . " आलिया भोगासी असावे सादर .. ढकला आता काय" मी नाराज होत बोललो .. मस्त गप्पा मारत गाडी ढकलत चाललो होतो
मधेच माळावर एक माणूस भेटला .. लेंगा,आणि पांढरा शर्ट घातला होता . त्याने हाक दिली " ओ पाव्हनं कुठं चालाय अन् गाडी का ढकलत चालयसा.." सोन्या पुढं होत म्हणाला " पाव्हणं राव पंकचारल्या गाडी" . "व्हय अवघड झालं म्हणायचं की मग ... कुठणं आलाय कुठं जायचं हाय ... जेवलायसा का ?" तो अनोळखी
माणूस म्हंटला... तसं आमचं ईस्ल्या " न्हाय राव जेवण नाय केलं ... हीथ पुढं एखाद हाटिल असल की चालू " . " कशाला हाटिल बघताय चला म्या देतो जेवान ते बि मटण.." त्याला तिथच थांबवत मी म्हटल " पाव्हणं कशाला उगाच त्रास तुम्हाला आम्ही करतो पुढं जाऊन जेवण " . " न्हाय न्हाय त्रास कसला ...
अहो ते येतालबा च बोकाड केलतं... उरलं हाय म्हणुंशिना इथ रस्त्यावर उभा राहिलु हाय कोणी उपाशी वाटसरू असल तर तेवढच चार घास जत्याल त्याच्या मुखात " . " चला जाऊया " ईस्ल्या पुढं होत म्हणाला . " हे हापापल्याला हुं मागं लगीच जाऊया की .. बस म्हटलं बसलाच जेवायला ... पाव्हणं नाय जमायचं "
सोन्या इस्ल्याला थांबत म्हणाला. " अहो चला की राव ..जवळचं हाय इथ ...बाजूला पुण्य करू द्या अम्हस्नी चला... न्हाय म्हणायचं नसतं" तो पाहुणा बोलला . ईस्ल्या लै आग्रह करायला लागला मग मी अन् सोन्या बे पण इचार केला की चला ..जेऊन तर घेऊ . म्हणून म्हंटल चला जाऊया . ते पाहुणे पुढं आम्ही
त्याच्या मागे मागे चाललो होतो .. जाता जाता ते वेतलबा च जेवण कसं करायच आणि कसं नाय ते सांगत होते . " लागल तेवढच खायचं बघा ..उगा वंधन राखायच न्हाय.. कितीबी खावा पण ताटात काय ठेवायचं नसतं. अजुन एक जेवताना बोलायचं न्हाय अज्याबात. नको असल तर हातानेच इशारा करायचं ."
सोन्या ल आणि मला जरा इचीत्रच वाटलं . तरीपण कुजबुजत आम्ही निघालो. बरच अंतर आल्यावर ती जागा आली जिथं जेवण होतं. त्याने बसायचं इशारा केला आम्हाला आम्ही बसलो . ताट वाढायला एक बाई आली ..गोरी ,पुरा उंच बांधा आणि केस मोकळे सोडलेले ...बघितलं तरी बघतच बसावं असं . त्या चांदण्याच्या
किलकिलत्या प्रकाशात अजूनच उठून दिसत होती . लावण्यवती होती. आमच्या तिघांची पण नजर तिच्यावर खिळली. तोवर तिकडून त्या पाव्हण्यानी आवाज दिला तिला " भाने आवर लवकर ...पाव्हणं लै लांब जायचं हायत..." " व्हय व्हय तात्या ... अवरत्या की दम न्हाय वी जरा" ती पुढं लगबगीने म्हणाली.
तो रस्सा आणि मटण घेऊन आला . त्याच्या पाठोपाठ ती पण आली " भाकर किस्ती द्यु दाजीबा ... व्हय " माझ्याकडे नजर टाकत ती म्हटली तशी माझी बोलतीच बंद. दाजीबा आणि तिचा तो गोड आवाज ... काय बोलणार पुढं ... ईसल्या बाजूने मला मांडीला बोट टोचवत चिडवत होता. तिने परत आवाज दिला
" अवं सांगा की दाजीबा किती द्यू भाकर... मुकं हायसा का ? " मी आपलं बोटाने इशारा करत एकच दे म्हटलं . सर्वांना भाकर वाढून ती गेली . माझं जेवणावर चीतच नव्हतं नजर सारखी ती गेली तिकडे लागून राहिली होती . त्यात पावण्यानी सांगितलं होतं..जेवताना अजिबात बोलायचं न्हाय नायतर वेतळबा
कोपतो. आता म्हटलं जेवताना असं पण काय बोलायचं . जेवण चालू झालं जेवढं पाहिजे तेवढं जेवण जेवलो ...हाताने इशारा करतच होतो नको म्हणून तरी ती लाड लाड भाकर मटण देतच होती. लाडाने देत असल्याने नाही पण म्हणता येईना आणि बोलता पण येईना ...अवघड झालेलं आमच्या तिघांचं. शेवटी हातानेच ताट मागे
घेत तिघेही नको बोललो . ती ते नाजूक उठावदार नाक मुरडत " राहुंद्या आता प्याट भरलं नव्हं आता आमच्या हातचं ग्वाड लागतं व्ही " एकतर ते जेवण येवढं भारी आणि त्यात तिची ती अदाकारी. कळतच नव्हतं काय करावं. तिला जा म्हणून त्या पव्हण्यानी सांगितलं . अन् आम्हाला म्हणाले ताटत आहे तेवढं संपवा
आम्ही नको नको हातानेच म्हणत होतो. जरा रागात येऊन पाव्हणं म्हटलं " संपवल्याबिगर कुणी बी जायचं न्हाय ..." तसं आम्ही परत खायला लागलो . ते जेवण काय संपेना म्हणून हळूच मातीत टाकलं तरी ताटात वाढतच होतं. हे कसं शक्य आहे ...दोन तीन वेळेस बघितलं तरी तसच...आम्ही तिघांनी एकमेकाकडे
बघितलं आणि इशारा केला की कायतरी गडबड आहे. तोवर ती भानू आली " व्हय तात्या ह्यांनी जर नाय संपवलं ताटातलं तर काय करायचंय व्ह यांचं " ती पुढं होत म्हणाली. " काय करायचं म्हंजी मागच्या दोघांचं जे केलं तेच ..." आमच्या तिघांकडे बघत तो पाव्हणा म्हणाला . आम्ही तिघांनी त्याच्यकडे
प्रश्नार्थक नजरेने बघितलं . त्याला समजलं आम्हाला काय म्हणाच आहे ते तो पुढं होत म्हणाला "काय नाय ..नाय संपलं तर तुमच्या खंडोल्या करून पुढचं जेवण घालायचं ... असच बाकीच्या लोकांना..नियमच हाय इथला तो " पुरता घाबरलो आम्ही तिघ...आता म्हटलं काय खरं नाय...! भरभर खायला लागलो
तोवर सोन्याने मला इशारा केला त्या भानुच्या पायाकडे बघ बोलला ... मी बघितलं तर तिचे पाय उलटे .. संपलं म्हंटल आता . डोळ्यांनी एकमेकाला इशारा केला पळून जायचा आणि पटकन उठलो आणि पळायला सुरुवात केली. थोडं पुढं गेलो तोवर ती भानू समोर अचानक . वळलो आणि परत पळतोय तर समोरच ...
आता ती विचित्र विचित्र रूप घेऊन समोर येत होती. एकदम भयानक चेहरा . पळून पळून थकलो ..ती शेवटी बोलली " आता तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही ... हाहाहाहा" ते असुरी हसन बघून तर पार फाटून हातात आली . राम राम राम ..हनुमान चालीसा म्हणत होतो पण काही एक उपयोग नव्हता ..त्या दोघांनी आम्हाला पकडलं
घेऊन गेले त्यांच्या ठिकाणी . मोठी लाट तेलाची कढई होती तेल उकलत होतं... त्याच्यात टाकणार असं वाटलं पण पुढं गेलो तर अजून दोघं चोघे माणसं मारत होते ...ते बघितलं आणि जीवच गेला अंगातून ....सुटण्याचा प्रयत्न करत होतो . पण काही सुटेना . ओरडत होतो किंचाळत होतो कोण येणार मदतीला
कोणी नव्हतच तिथे . तिथे फक्त हेच पापी आत्म्ये...जोरात ओरडलो... वेतालबा धाव वेतलबा धाव... जय वेतलबा...आणि मला आईनी उठवलं . " काय झालं रे बाळा ..असा का झोपेत बडबडतोय..." उठलो बघितलं आई होती बाजूला . मी "ईस्ल्या,सोन्या ती हडळ कुठं हाय.." . "अरं कोणती हडळ अन् काय बोलतोय तू "
आई म्हणाली ...घाबरलो होतो मी ... थोडसं सावरलं आणि आईला पूर्ण हकिकित सांगितली .. आई हसून हसून लोटपोट झाली.. " असली स्वप्न बरी पडतात रे तुला ... भुताटकी कुठला " म्हणून ती गेली . मी अजून पूर्ण भानावर नाही आलो. भयानक होतं स्वप्न भेंडी 😪😴😴 #स्वप्न #भयकथा
बोधकथा : - नाव नंतर तुम्हीच वाचून ठरवा.
हरी नावाचा एक इसम गावात राहत होता. तशी त्याची परिस्थिती पहिल्यांदा खूप हलाखीची म्हंजे आज काम केलं तरच जेवण नाहीतर उपाशी. पूर्वजांकडून पदरी फक्त कष्ट करण्याची धमक मिळाली बाकी काहीच नाही . बाहेरचे सावकार लोकांनी सगळी जमीन वगैरे लुटली होती
हा खूप कष्टाळू होता हरी. त्याने कष्ट केले त्या सावकारांच्या तावडीतून जमीन पण घेतली माघारी. जमीन घेतली पण आता त्यास लागणारा बैल जोड, नांगर अवजारे बी बियाणे याचं काय ? याने हळू हळू सुरुवात केली . बैल वगेरे एक एक गोष्टी जमवल्या . याला बराच काळ लोटला . घर बांधलं. शेती वाडी उभा
केली. मुलं वगैरे सर्व काही व्यवस्थित होतं. अपार कष्ट केलं हयात कष्टात काढली. आता शरीर थकलं कारभार गेला मुलाच्या हाती. मुलाला सगळं आयत सापडलं होतं. त्याला काय माहीत हा सगळं डोलारा कसा उभा राहिला आहे ते . त्याला वाटायचं बापाची तर गम्मत आहे ऐशपेश सगळं. बाप आपल्याला
आमची 90 मधली पिढी म्हणजे कच्च्या रस्त्याला आणि हायवे ला जोडणारा डांबरी रस्ता . धड कच्चा नाही की हायवे पण . आमचं बालपण ,तरुणपण यात बरंच अंतर आणि गफलत ही आहे . म्हणजे ती कशी तर ब्लॅक अँड व्हाइट टी व्ही पासून सुरू झालेला प्रवास LED, LCD पर्यंत आलाय ...
/1
अजून सुरूच आहे तो कुठपर्यंत ते काय ठाव नाही. आमच्या या पिढीने जे काही सख्या डोळ्यांनी जग बदलताना बघितलं ते मला नाही वाटत असे कोणती पिढी बघू शकेल कदाचित नाहीच .
आमच्या आधीच्या पिढीने सतत एकसंध जीवन बघितलं .आताची पिढीही पण तसेच काहीसे जीवन बघत आहे. /2
आमची ही अशी पिढी आहे ज्या पिढीने मोबाईल नव्हता ,परत की बोर्ड मोबाइल ,त्यांनंतर अँड्रॉइड हा बद्दल अगदी जवळून बघितला .आणि अनुभवला सुद्धा .
पिढ्या बदलत गेल्या तसे शहर,गाव,घरांची रचना सगळंच काही बदलत गेलं. बदल ही काळजी गरजच असते त्यात काय चुकीचं म्हणा. /3
आजही मी माझी काळोखातील प्रतिमा तशीच राखून ठेवली आहे . जी प्रतिमा आहे आपल्या नात्याची ...माफकर.. होती ..!
तुझ्या माझ्या नात्यातील काळोखात ती मूर्ती जरी हरवली असली तरी काळोख आजही तसाच आहे . सतावतो मला नेहमी सांज वेळी एक आगळीच हुरहूर लागून राहते मनाला तुझ्या आठवणींची .. /1
जगाला वर्तमानातील मी माहीत आहे ,माझ्या अवतीभवती असलेला उजेड माहीत आहे , माझी सावली , माझा संघर्ष ,माझं यश अपयश माहीत आहे पण जगाला हा जो ' माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यातील काळोख माहीत नाही जो फक्त तुला माहीत होता.. आहे . आपलं नातं जगासमोर कधीच आलं नाही ../2
आलं नाही म्हणण्यापेक्षा आपण ते येऊ दिलं नाही .गुप्त होती ती नात्याची गोष्ट आपल्यात आता तर ती फक्त माझ्यासाठीच राहिली .
तू निघून गेलीस तुला एक उजेडाचा कवडसा दिसला तिकडे आणि जाऊन मिसळलीस ही जगाच्या उजेडात ...माझं काय ? कधी केलास विचार ? /3
घरात बसुन बसून कंटाळा आला म्हणून सायंकाळी सहज फेरफटका मारायला म्हणून गावच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगरात गेलो . तसा लवकरच निघालो होतो घरून आपलं कडूस पडायच्या आत घरी पोहचावं या बेताने. गावं सोडलं आणि आता पुढे पुढे जात असताना मधेच कुठेतरी पाखरांचा आवाज .
डोंगरातून घरी परतत असणारी जनावरे आणि त्यांच्या पाठी त्यांचे मालक . कोणी ओळखीचं भेटलं की तेवढंच दोन मिनिट थांबून पुढे जायचं . जाता जाता आमच्या गावच म्हादबा अण्णा भेटलं . त्यांच्या म्हशी घेऊन परत येत होते . मी बोलायच्या आधीच ते बोले " ये पोऱ्या कुठं वर त्वांड करून निघालास"
मी आपलं आदराने बोलो "कुठ न्हाय अण्णा आलू जरा डोंगरात जाऊन" . अण्णा पुढे होऊन " अर खुळा बिळा हाईस का? ह्या वक्ताला कुठ जातूयास डोंगरात " . मी चेष्टेने " मग कवा जायचं अण्णा" . अण्णा " लका तुम्ही शिकलेली गाबडी कंधी ऐकाचाल तवा खरं, अर् सुकाळीच्या दिवसभर काय झोपला हूतास का ?"
सुगी ❤️
नुकतीच कडधान्याची पिकं निघून गेली . लगबग सुरू झाली ती खरीप पिकांची काढणी आणि रब्बी पिकांची लागवड . भुईमुगाच्या शेंगा निघून वाळायला पडल्यात दारात तर कोणाच्या काढायच्या चालू आहेत . हरभरा आत्ताच नवीन जन्म घेऊन लुसलुशीत हिरवीगार मान वरती काढून डोलत उभा आहे . #माझाक्लिक#शेती
गव्हाणे पण आपलं एक एक पातं वर काढायला सुरुवात केली आहे . शेताच्या कडेने पावटा फुलोऱ्यात आलाय लवकरच त्याचाही आस्वाद घ्यायला मिळेल . दोडका आता जवान झालाय लवकरच सर्वांच्या जिभेवर रेंगाळत रेंगाळत परतीचा प्रवास सुरू करेल . त्याच्या जोडीला मळ भिंडी नसेल असं कधी होईल का .?
आम्हा कुनब्याच्या नशिबी नसेल पिझ्झा , बर्गर पण या साऱ्या पेक्षा जिभेवर चव रेंगाळत राहते ती याच रान मेव्याची .. नुसतं नाव जरी निघालं तरी जिभेवर पाणी येतं. रानात आता गार वरा त्याच्या सोबतीला थोडी बोचरी थंडी आणि लांब कुठतरी वाजणारं ट्रॅक्टर वरचं गाणं आसमंत दणानुन टाकतय...