#पुस्तकआणिबरचकही
मंगेश पाडगावकर ( १० मार्च १९२९ - ३० डिसेंबर २०१५ ) पाडगावकरांचा ‘धारानृत्य’ हा पहिला संग्रह १९५० साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर आजतागायत पाडगावकरांची एकूण ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नाट्यकविता, बालकविता, उपहासपर कविता (वात्रटिका), गझल या स्वरूपाची काव्यरचना 👇
केली. आधी भावकवी आणि नंतर गीतकार असे स्थित्यंतर झाल्यामुळे कवीचे हळुवार, तरल, संवेदनशील मन रस-रंग-नाद-गंध-स्पर्शयुक्त शब्दांच्या आधारे संगीतानुकूल झाले. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘असा बेभान हा वारा’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘श्रावणात घन निळा बरसला’ ह्या गीतांनी रसिकांच्या कायमचे👇
स्थान निर्माण करून ठेवले आहे. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गीतसंग्रहाप्रमाणेच पाडगावकरांचा ‘गझल’ हा संग्रहही उल्लेखनीय आहे. बालकविता हा काव्यप्रकारही पाडगावकरांनी आत्मसात करून मुलांसाठी प्रामुख्याने गेय बालगीते लिहिली आहेत- ‘भोलानाथ’ , ‘बबलगम’, ‘चांदोमामा’, ‘सुट्टी एके सुट्टी’ 👇
‘वेडं कोकरू’ , ‘आता खेळा नाचा’, ‘झुले बाई झुला’ , ‘अफाटराव’. केवळ शब्दांशी बांधील राहून काव्यलेखन करतांना ‘निंबोणीच्या झाडामागे’ ह्या लघुनिबंध संग्रहाखेरीज गद्यलेखन केले नाही. मात्र संतसाहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान यांत रस असलेल्या पाडगावकरांनी मीरा, कबीर, सूरदास या मध्ययुगीन 👇
संत कवि-कवयित्रींच्या रचनांचे अनुवाद केले आहेत. वस्तुतः कवितेचा अनुवाद करणे बरेच अवघड असते. पण मीरेच्या आणि कबिरांच्या मूळ पदांचे अनुवाद मूळ आशयाला बाधा न आणता केले आहे. राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचे पुरस्कार पाडगावकरांच्या ‘जिप्सी’ (१९५३), ‘छोरी’ (१९५७),
‘बबलगम’ (बालगीत संग्रह), (१९६७) या काव्यसंग्रहांना लाभले आहेत. पाडगावकरांना १९९० साली ‘महाराष्ट्र गौरव पुरस्काराने’ तर २००८ साली ‘महाराष्ट्र भूषण’ ह्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. १९९८ च्या चिपळूण कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)
#पुस्तकआणिबरचकाही
कविता विश्वनाथ नरवणे ( १२ मार्च १९३३ - २८ ऑगस्ट २०२० ) प्राध्यापिका म्हणून काम करीत असतांना लेखनाची सुरुवात केली. अनेक दिवाळी अंकात काय प्रसिद्ध झाल्या होत्या. विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले. 👇
कथासंग्रह, कादंबरी, नाटके अशी त्यांची पस्तीसहुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली. ओघवती भाषा व नेमके विश्लेषण ही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या एका कथासंग्रहाचे जाने अन्जाने या नावाने हिंदीत भाषांतर झाले. सोळा भाषांतील म्हणी व वाक्प्रचार या 👇
संबंधी त्यांनी केलेले संशोधन महत्वपूर्ण आहे. या कोशाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या हस्ते झाले होते. नेपोलियन या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला.
#पुस्तकआणिबरचकही
शंकर भाऊ साठे : (२६ ऑक्टोबर १९२५ – ११ मार्च १९९६). महाराष्ट्रातील शाहीर व साहित्यिक. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकर भाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. तसेच ते शाहीर व साहित्यिक म्हणूनही सुपरिचित आहेत. ' माझा भाऊ आण्णाभाऊ ' ( १९८० ) 👇
हे त्यांचे आत्मकथनात्मक चरित्र प्रसिध्द आहे. अण्णाभाऊंचे जीवन आणि कार्य समजून घ्यायला हे आत्मपर लेखन महत्त्चाचे आहे. एकच काडतूस (१९८४), सूड (१९८५), सगुणा (१९८६), घमांडी (१९८६), सावळा (१९८६),जग (१९८६), लखू (१९८७), बायडी (१९९१), सुगंधा (१९९१), बाजी (१९९१), काळा ओढा इत्यादी 👇
कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यापैकी शामगाव या कादंबरीची काही पाने जिर्णावस्थेत उपलब्ध आहेत. यातील दोन कादंबऱ्यांची माहिती उपलब्ध नाही. शंकर भाऊंनी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारीत फकिरा या मराठी भाषेतील चित्रपटात फकिराच्या एका दरोडेखोर साथीदाराची भूमिका केली होती.👇
#पुस्तकआणिबरचकही
सावित्रीबाई फुले ( ३ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७ ) बालवयातच ज्योतिबांशी विवाह झाल्यावर पतीकडून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी आपल्या पतीच्या सामाजिक कार्यातच सहभाग घेतला नाही तर अनेक वेळा मार्गदर्शन केले. अवहेलना व प्रतिकुल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन👇
समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला मुक्ति चळवळीच्या पहिल्या नेत्या होत्या, ज्यांनी पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने देशातील महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले या दलित कुटुंबात जन्मल्या👇
होत्या, परंतु एकोणिसाव्या शतकातील स्त्री शिक्षणाची सुरुवात म्हणून त्यांनी थेट ब्राम्हणवादाच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते.त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित घटकांच्या, विशेषत: महिला आणि दलित यांच्या हक्कांच्या संघर्षात व्यतीत झाले. त्या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. 👇
#पुस्तकआणिबरचकही
वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९)मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व👇
ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतल्यामुळे 👇
बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. १९४२ साली 👇
#पुस्तकआणिबरचकही
वि. भा. देशपांडे : (३१ मे १९३८ – ९ मार्च २०१७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यसमीक्षक. नाट्यक्षेत्रात ते ‘विभा’ म्हणून ओळखले जात असत. विभा यांनी नाट्यविषयक विपुल ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने विभा यांनी १२०० पानी मराठी नाट्यकोश 👇
हा नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा मराठीतील पहिला नाट्यकोश संपादित केला. यामध्ये भारतातील विविध रंगभूमींच्या संक्षिप्त परिचयासोबत मराठी रंगभूमीच्या सुरुवातीपासूनचा कालखंड शब्दबद्ध करताना जुनी नाटके, मराठी व अमराठी नाटककार, कलाकार, निवडक संगीत नाटके, दिग्दर्शक, तंत्रज्ञ,👇
समीक्षक, पडद्यामागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्यग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. या कोशाचा हिंदी अनुवादही मराठी नाट्यकोश खंड १ व २ या नावाने प्रकाशित झालेला आहे.मराठी नाट्यसमीक्षा करताना नाटक, साहित्य संगीत या👇
#पुस्तकआणिबरचकही
कवी यशवंत : (९ मार्च १८९९–२६ नोव्हेंबर १९८५). विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे होती. पुढे रविकिरणमंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. 👇
यशोधन हा त्यांचा पहिला मोठा लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध , यशोनिधि, यशोगिरी, ओजस्विनी इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदुःखांशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरणमंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता 👇
त्यांना मिळाली. स्फुट कवितेबरोबर जयमङ्गला (एक प्रेमकथा) , बन्दीशाळा , काव्यकिरीट अशी दीर्घ काव्यरचनाही त्यांनी केली. बन्दीशाळेत बालगुन्हेगाराची जीवनकथा सांगितलेली आहे, तर जयमङ्गला म्हणजे कवी बिल्हणाची प्रेमकथा होय. २२ भावगीतांचे मिळून हे एक काव्य झालेले असून रचनादृष्ट्या 👇