आज सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त त्यांचे अनेक फोटो दिसत आहेत. त्यात अनेक फोटो सावित्रीबाईंच्या खऱ्या चेहरापट्टीपेक्षा फार वेगळे आहेत. त्यानिमित्ताने काही मुद्दे... 1/4 #सावित्रीबाई#मराठी#म#SavitribaiPhule
अनेकदा महापुरुषांचे ओरिजिनल फोटो नसतील तर त्यांच्या चेहरापट्टीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. अनेकदा चित्रपट/मालिकांचाही प्रभाव फोटोंवर होतो. मात्र, सावित्रीबाईंबाबत हे टाळता येऊ शकतं. 2/4 #सावित्रीबाई#मराठी#म#SavitribaiPhule
कारण सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेतील दोन विद्यार्थीनी आणि सहशिक्षिका फातिमा बी यांच्या फोटोची एक ब्रिटिशकालीन निगेटिव्ह उपलब्ध आहे. त्यावरून त्यांचा एक फोटो विकसित करण्यात आला आहे. 3/4 #सावित्रीबाई#मराठी#म#SavitribaiPhule
त्यामुळे ज्यांना सावित्रीबाईंना अभिवादन करताना त्यांचा मूळ चेहरा हवा आहे त्यांनी वरील फोटोचा वापर करावा. बाकी चेहरापट्टी कोणतीही असली तरी त्यांच्या अनुयायांचा आदर तोच आहे हेही तितकंच खरं.
संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाच्या मिथकाकडे कसे पहावे?
लेखक - डॉ. आ. ह. साळुंखे
तुकारामांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाही असे म्हणून ज्या रामेश्वर भट्टाने त्यांची गाथा बुडवण्यापासून त्यांच्या हकालपट्टीपर्यंतचे अनेक आदेश काढले...
१/६
तोच रामेश्वर भट्ट तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याचे सांगतो, तेव्हा त्या सांगण्यामागचे हितसंबंधही स्पष्ट होतात आणि इतिहासाचे विकृतीकरणही स्पष्ट होते.
आपण कोणतेही चमत्कार करीत नाही, असे अगदी निःसंदिग्धपणे सांगणाऱ्या तुकारामांच्या चरित्रात असा चमत्कार घुसडणे म्हणजे...
२/६
त्यांच्या चरित्राचा विपर्यास करणे होय. विशेषतः, त्यांचे मोठेपण जणू काही त्या चमत्कारावरच अवलंबून आहे असे वाटण्याइतक्या भडक पद्धतीने त्या चमत्काराला महत्त्व देणे म्हणजे त्यांचे चमत्कारांच्या विरोधातील सगळे कार्य झाकून टाकणे होय.
३/६