#पुस्तकआणिबरचकाही
कविता विश्वनाथ नरवणे ( १२ मार्च १९३३ - २८ ऑगस्ट २०२० ) प्राध्यापिका म्हणून काम करीत असतांना लेखनाची सुरुवात केली. अनेक दिवाळी अंकात काय प्रसिद्ध झाल्या होत्या. विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले. 👇
कथासंग्रह, कादंबरी, नाटके अशी त्यांची पस्तीसहुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली. ओघवती भाषा व नेमके विश्लेषण ही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या एका कथासंग्रहाचे जाने अन्जाने या नावाने हिंदीत भाषांतर झाले. सोळा भाषांतील म्हणी व वाक्प्रचार या 👇
संबंधी त्यांनी केलेले संशोधन महत्वपूर्ण आहे. या कोशाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांच्या हस्ते झाले होते. नेपोलियन या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला.
#पुस्तकआणिबरचकाही
सुरेश भट ( १५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३ ) मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी👇
लिहायला सुरुवात केली.काही वेळा नापास होत कसेतरी शिक्षण पूर्ण करुन ते नौकरीला लागले. ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सुरेश भट यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर👇
अभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा👇
#पुस्तकआणिबरचकाही
विंदा करंदीकर (२३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, 👇
गांभीर्य आणि मिस्किलपणा, आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून 👇
घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न 👇
#पुस्तकआणिबरचकाही
वासुदेव विष्णु मिराशी (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा 👇
मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला.हा सिद्धांत त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने प्रकाशित केला .अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे 👇
मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली हे त्यांनी स्पष्ट केले. शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणकशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे हे पहिले भारतीय संपादक होत.मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन👇
#पुस्तकआणिबरचकाही
रविंद्र पिंगे ( १३ मार्च १९२६ - १७ ऑक्टोबर २००८ ) १९५५ मध्ये ‘मौज’ साप्ताहिकात युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्रीगणेशा गिरवला, आणि पुढे सतत पन्नास वर्षे पिंगे लिहीत होते. ४० ग्रंथांची निर्मिती त्यांच्या नावे जमा झाली आहे. 👇
चपखल लेखशीर्षके; अचूक व नेमकी शब्दयोजना ललित्यपूर्ण, एकात्म, एकसंध, बंदिस्त भाषाशैली हे खास वैशिष्ट्य होय. मौज, साधना, माणूस, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. ‘देवाघरचा पाऊस’ , ‘दिवे लक्ष्मण दिवे’, 👇
‘अत्तर आणि गुलाबपाणी’ हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’, ‘आनंदव्रत’, ‘दुसरी पौर्णिमा’ ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ , ‘पिंपळपान’ , ‘हिरवीगार पानं’ ही पाश्चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’व ‘सुखाचं फूल’ 👇
महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड
भाग १ - १६३० - १७०७
भाग २ - १७०७ - १७१८
लेखक - डॉ. वि. गो. खोबरेकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. @LetsReadIndia@PABKTweets#पुस्तकआणिबरचकाही 👇
आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड सत्तेचा मराठा सुप्रीमसी कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईच्या रुपात अस्तंगत झाली. 👇
या मराठा कालखंडाचा उदयास्त या दोन भागातील पुस्तकात अगदी सुलभतेने बारीकसारीक तपशिलांसह मांडला आहे.
पहिल्या भागात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड असुन दुसऱ्या भागात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू राजांची मोगलांच्या कैदेतून सुटकेपासुन 👇
#पुस्तकआणिबरचकही
शंकर भाऊ साठे : (२६ ऑक्टोबर १९२५ – ११ मार्च १९९६). महाराष्ट्रातील शाहीर व साहित्यिक. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकर भाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. तसेच ते शाहीर व साहित्यिक म्हणूनही सुपरिचित आहेत. ' माझा भाऊ आण्णाभाऊ ' ( १९८० ) 👇
हे त्यांचे आत्मकथनात्मक चरित्र प्रसिध्द आहे. अण्णाभाऊंचे जीवन आणि कार्य समजून घ्यायला हे आत्मपर लेखन महत्त्चाचे आहे. एकच काडतूस (१९८४), सूड (१९८५), सगुणा (१९८६), घमांडी (१९८६), सावळा (१९८६),जग (१९८६), लखू (१९८७), बायडी (१९९१), सुगंधा (१९९१), बाजी (१९९१), काळा ओढा इत्यादी 👇
कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यापैकी शामगाव या कादंबरीची काही पाने जिर्णावस्थेत उपलब्ध आहेत. यातील दोन कादंबऱ्यांची माहिती उपलब्ध नाही. शंकर भाऊंनी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारीत फकिरा या मराठी भाषेतील चित्रपटात फकिराच्या एका दरोडेखोर साथीदाराची भूमिका केली होती.👇