किरीट सोमय्यांचे आरोप आणि परिणाम

- - - -
1) 2009 मध्ये सोमय्यांनी कृपाशंकर सिंग यांच्यावर मधु कोडांशी संबंधित कंपन्यांशी असलेल्या व्यवहारांवरुन आरोप केले होते. कंपनी अफेयर्स खात्याकडे आणि ईडीकडे तक्रारही केली होती.

#kiritsomaiya #ED_Raids

1/1
7 जुलै 2021 ला कृपाशंकर सिंग यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई पालिकेच्या तोंडावर त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आलंय.

#KiritSomaiya #ED_Raids

2/2
2) 2012 ला सोमय्यांनी भुजबळांविरोधात महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याचा आरोप केला होता. तसंच शेल कंपन्यांच्यामाध्यमातून शेकडो कोटी रुपयांचं मनी लाँडरिंग केल्याचाही सोमय्या यांचा दावा होता. 2016 मध्ये या प्रकरणी छगन भुजबळ आणि पुतण्या समीरना अटक झाली.

#KiritSomaiya #ED_Raids

3/3
छगन भुजबळ जवळपास 18 महिने तुरुंगात होते. मविआ सरकार आल्यानंतर त्यांनी डिस्चार्ज अप्लीकेशन फाईल केलं. जे कोर्टानं मान्य केलं..

#KiritSomaiya #ED_Raids

4/4
3) 2015 ला अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 800 कोटीच्या मनी लाँडरिंगचा आरोप करत सोमय्या यांनी एसीबीकडे धाव घेतली होती. सिंचन घोटाळ्याप्रकरणी FA कन्स्ट्रक्शन कंपनीतून पैसे वळवण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

#KiritSomaiya #ED_Raids

5/5
अजित पवार यांच्यासोबत भाजपनं 80 तासाचं सरकार स्थापन केलं. त्याच काळात अजित पवारांना एसीबीनं क्लीन चीट दिली होती.

#KiritSomaiya #ED_Raids

6/6
4) 2014 ला भक्कम परतावा देण्याच्या नावाखाली राज्यात 26 पॉन्झी स्कीम्स चालवून 10 लाख लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याची तक्रार करुन मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पाठबळामुळेच हे प्रकरण दाबलं जात असल्याचं सोमय्यांचं म्हणणं होतं.

#KiritSomaiya #ED_Raids

7/7
2014 च्या निवडणुकीआधीच बबनराव पाचपुते यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र त्यांना निवडणूक जिंकता आली नाही.

#KiritSomaiya #ED_Raids

8/8
5) 2017 मध्ये सोमय्यांनी नारायण राणेंवर 300 कोटींच्या मनी लाँडरिंगचा आरोप केला होता, अविघ्न रिअल इस्टेटचे कैलाश अग्रवाल यांच्या कंपनीशी हातमिळवणी करुन राणेंनी 300 कोटी रुपये रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये वळवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

#KiritSomaiya #ED_Raids

9/9
नारायण राणेंनी स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला.. त्यानंतर राणेंना आधी राज्यसभा आणि नव्या विस्तारात केंद्रीय मंत्रीपद मिळालं.

#KiritSomaiya #ED_Raids

10/10
6) 2004 ते 2012 मध्ये आदिवासी विकासच्या योजनांमध्ये 6 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप तत्कालीन मंत्री विजयकुमार गावितांवर झाला होता. गंभीर तक्रारीनंतरही 2009 पासून गावितांची चौकशी पेंडिंग ठेवल्याबद्दल सोमय्यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर तोफ डागली होती.

#KiritSomaiya

11/11
2014 च्या निवडणुकीआधी विजयकुमार गावित भाजपात दाखल झाले.. त्यांना तिकीटही मिळालं आणि त्यांची मुलगी दोनदा खासदार म्हणून निवडूनही आली.

#KiritSomaiya #ED_Raids

12/12
गेल्या अडीच-तीन वर्षात …

प्रताप सरनाईक
आनंदराव अडसूळ
भावना गवळी
अर्जुन खोतकर
यशवंत जाधव
संजय राऊत
नवाब मलिक
हसन मुश्रीफ
यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्यांनी केले आहेत.

#KiritSomaiya #ED_Raids

13/13

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Abhijit Karande

Abhijit Karande Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AbhijitKaran25

Jul 3, 2021
214 एकर जमीन

कारखान्याची भलीमोठी इमारत

करोडो रुपयांची मशिनरी

अधिकारी, संचालकांचे बंगले आणि गाड्या

कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स

आणि बरीच इतर मालमत्ता..

या सगळ्याची किंमत झाली केवळ 40 कोटी
#ED #Maharashtra 1/1
लिलाव सुरु झाला

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये जवळपास 10 हून अधिक कारखाने, कंपन्यांनी निविदा भरल्या..

पण अचानक तिसऱ्या फेरीत एक कंपनी अवतरली आणि तिला कारखाना अवघ्या 65 कोटीत मिळाला..

कारखान्याचं नाव जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना..
#ED #Maharashtra 2/2
विकत घेणारे गुरु कमॉडिटीज..

कंपनीची वार्षिक उलाढाल 63 लाख आणि निव्वळ नफा केवळ 10 हजार

तरीही गुरु कमॉडिटीजनं 65 कोटीचा कारखाना विकत घेतला..

अर्थात हे सगळं होत असताना शिखर बँकेचे चेअरमन होते अजित पवार. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री.
#ED #Maharashtra 3/3
Read 17 tweets
Jul 1, 2021
देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायलं
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायच

पायावर ठेवलेलं डोकं
काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही
#पुस्तकवारी 1/1 Image
रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं जरा
होत नाही

#पुस्तकवारी #वारी #तुकाराम 2/2
कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधी कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगाचं
एकटेपण
#पुस्तकवारी 3/3
Read 4 tweets
May 21, 2021
म्युकरमायकॉसिस.. अर्थात ब्लॅक फंगस. अत्यंत जीवघेणा आजार.
महाराष्ट्रात 1500 हून अधिक रुग्ण. यावरचा उपचार अत्यंत महागडा. एका रुग्णाला 100-150 किंवा त्याहूनही जास्त इंजेक्शन्स लागतात. एकाची किंमत 7800 इतकी आहे. सरकारी नव्हे खुल्या बाजारातली. म्हणजे आपल्या आवाक्याबाहेर. #BlackFungus
एखाद्या रुग्णाला 100 इंजेक्शन लागली तर किमान 7 लाख 80
हजार खर्च. डॉक्टरांची फी, शस्त्रक्रिया असं सगळं मिळून 15 ते 20 लाखाचा खर्च. अख्खं कुटुंब रस्त्यावर आणणारा आजार आहे. त्यातही डोळा, दात आणि इतर अवयव गमावण्याची किंवा त्यांना इजा होण्याची भीती वेगळीच. #BlackFungus
सरकारनं म्युकरमायकॉसिस म.फुले जनआरोग्य योजनेत घेतलंय. त्यात किमान 10 हजार आणि कमाल 70 हजार रु. मिळतात. सरकारी रुग्णालयात म.फुले योजना लागू आहे. पण खासगी रुग्णालयं आर्थिक फायद्यासाठी रुग्णांना उभं करतात? त्यामुळे सगळं गहाण ठेऊन रुग्णालयाच्या दारात उभं राहावं लागतं. #BlackFungus
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(