Abhijit Karande Profile picture
Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.
Mar 12, 2023 13 tweets 7 min read
किरीट सोमय्यांचे आरोप आणि परिणाम

- - - -
1) 2009 मध्ये सोमय्यांनी कृपाशंकर सिंग यांच्यावर मधु कोडांशी संबंधित कंपन्यांशी असलेल्या व्यवहारांवरुन आरोप केले होते. कंपनी अफेयर्स खात्याकडे आणि ईडीकडे तक्रारही केली होती.

#kiritsomaiya #ED_Raids

1/1 7 जुलै 2021 ला कृपाशंकर सिंग यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई पालिकेच्या तोंडावर त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आलंय.

#KiritSomaiya #ED_Raids

2/2
Jul 3, 2021 17 tweets 9 min read
214 एकर जमीन

कारखान्याची भलीमोठी इमारत

करोडो रुपयांची मशिनरी

अधिकारी, संचालकांचे बंगले आणि गाड्या

कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स

आणि बरीच इतर मालमत्ता..

या सगळ्याची किंमत झाली केवळ 40 कोटी
#ED #Maharashtra 1/1 लिलाव सुरु झाला

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये जवळपास 10 हून अधिक कारखाने, कंपन्यांनी निविदा भरल्या..

पण अचानक तिसऱ्या फेरीत एक कंपनी अवतरली आणि तिला कारखाना अवघ्या 65 कोटीत मिळाला..

कारखान्याचं नाव जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना..
#ED #Maharashtra 2/2
Jul 1, 2021 4 tweets 3 min read
देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायलं
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायच

पायावर ठेवलेलं डोकं
काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही
#पुस्तकवारी 1/1 Image रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं जरा
होत नाही

#पुस्तकवारी #वारी #तुकाराम 2/2
May 21, 2021 5 tweets 2 min read
म्युकरमायकॉसिस.. अर्थात ब्लॅक फंगस. अत्यंत जीवघेणा आजार.
महाराष्ट्रात 1500 हून अधिक रुग्ण. यावरचा उपचार अत्यंत महागडा. एका रुग्णाला 100-150 किंवा त्याहूनही जास्त इंजेक्शन्स लागतात. एकाची किंमत 7800 इतकी आहे. सरकारी नव्हे खुल्या बाजारातली. म्हणजे आपल्या आवाक्याबाहेर. #BlackFungus एखाद्या रुग्णाला 100 इंजेक्शन लागली तर किमान 7 लाख 80
हजार खर्च. डॉक्टरांची फी, शस्त्रक्रिया असं सगळं मिळून 15 ते 20 लाखाचा खर्च. अख्खं कुटुंब रस्त्यावर आणणारा आजार आहे. त्यातही डोळा, दात आणि इतर अवयव गमावण्याची किंवा त्यांना इजा होण्याची भीती वेगळीच. #BlackFungus