#पुस्तकआणिबरचकाही
रविंद्र पिंगे ( १३ मार्च १९२६ - १७ ऑक्टोबर २००८ ) १९५५ मध्ये ‘मौज’ साप्ताहिकात युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्रीगणेशा गिरवला, आणि पुढे सतत पन्नास वर्षे पिंगे लिहीत होते. ४० ग्रंथांची निर्मिती त्यांच्या नावे जमा झाली आहे. 👇
चपखल लेखशीर्षके; अचूक व नेमकी शब्दयोजना ललित्यपूर्ण, एकात्म, एकसंध, बंदिस्त भाषाशैली हे खास वैशिष्ट्य होय. मौज, साधना, माणूस, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. ‘देवाघरचा पाऊस’ , ‘दिवे लक्ष्मण दिवे’, 👇
‘अत्तर आणि गुलाबपाणी’ हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’, ‘आनंदव्रत’, ‘दुसरी पौर्णिमा’ ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ , ‘पिंपळपान’ , ‘हिरवीगार पानं’ ही पाश्चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’व ‘सुखाचं फूल’ 👇
हे कथासंग्रह; असे विविध स्वरूपाचे लेखन पिंगे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांचे सुमारे दोनशे ललितलेख ‘माणूस’ साप्ताहिकातून सतत पाच वर्षांच्या प्रसिद्ध कालावधीत झाले. ‘साहित्यसूची’चे ते लेखक आणि संपादकीय सल्लागार होते. ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’, तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, 👇
पाश्चात्त्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललितलेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती होय. ‘परशुरामाची सावली’ला राज्यपुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना ‘कोकण साहित्यभूषण पुरस्कार’, 👇
सोलापूरचा ‘दमाणी पुरस्कार’, गुणसमृद्ध लेखन दीर्घकाळ सातत्याने केल्याबद्दल पुण्याच्या साहित्य परिषदेनेही त्यांना खास पुरस्कार दिला. ( संकलीत) @Marathi_Mee@ShubhangiUmaria@threadreaderapp unroll
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पुस्तकआणिबरचकाही
सुधीर मोघे ( ८ फेब्रुवारी १९३९ - १५ मार्च २०१४ ) कवितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेलाच आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दमाध्यमावरचे प्रेम नितांत होते,
‘शब्दांना नसते दु:ख शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते’ 👇
या शब्दांतून सहज त्याचा प्रत्यय येतो.
कवी-गीतकार म्हणून सुधीर मोघे जेवढे आणि जसे श्रेष्ठ होते, तेवढे आणि तसेच ते संगीतकार म्हणूनही मोठे होते, त्यांनी संगीत दिलेल्या ‘कशासाठी प्रेमासाठी’ या मराठी चित्रपटाची गाणी जशी गाजली तशीच ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचीही गाजली. 👇
‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ या दूरदर्शनवरील मालिकांना त्यांनी दिलेले संगीत प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारतें’ या हिंदी मालिकांनाही संगीत दिले. त्यांनी व्यावसायिक माहितीपटांची केलेली निर्मितीही त्यांच्यातील सर्जनशीलतेची ग्वाही देते. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
अरुण कांबळे ( १४ मार्च १९५३ - २० डिसेंबर २००९ ) दलित साहित्य अखिल भारतीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर नेण्याचे काम करणे हीच जीवननिष्ठा, असे मानणारे ते धडाडीचे लेखक आणि कवी आहेत. मुंबई आणि हैद्राबाद या दोन्ही उच्च न्यायालयांनी संशोधन ग्रंथ म्हणून मान्यता 👇
दिलेल्या ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’ (१९८२) या ग्रंथांच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. या ग्रंथाचे भाषांतर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत करण्यात आले. ‘जनता पत्रातील लेख’, ‘धर्मांतराची भीमगर्जना’, ‘चीवर’, ‘युगप्रवर्तक डॉ.आंबेडकर’, ' चळवळीचे दिवस' 👇
‘वाद-संवाद’ या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला. ‘अरुण कृष्णाजी कांबळे’, तसेच ‘मुद्रा’ हे त्यांचे कविता संग्रहही लक्ष्यवेधी ठरले. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू तसेच जर्मन व फ्रेंच या भाषांमध्ये भाषांतरित झाल्या. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सुरेश भट ( १५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३ ) मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी👇
लिहायला सुरुवात केली.काही वेळा नापास होत कसेतरी शिक्षण पूर्ण करुन ते नौकरीला लागले. ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सुरेश भट यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर👇
अभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा👇
#पुस्तकआणिबरचकाही
विंदा करंदीकर (२३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, 👇
गांभीर्य आणि मिस्किलपणा, आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून 👇
घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न 👇
#पुस्तकआणिबरचकाही
वासुदेव विष्णु मिराशी (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा 👇
मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला.हा सिद्धांत त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने प्रकाशित केला .अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे 👇
मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली हे त्यांनी स्पष्ट केले. शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणकशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे हे पहिले भारतीय संपादक होत.मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन👇
महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड
भाग १ - १६३० - १७०७
भाग २ - १७०७ - १७१८
लेखक - डॉ. वि. गो. खोबरेकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. @LetsReadIndia@PABKTweets#पुस्तकआणिबरचकाही 👇
आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड सत्तेचा मराठा सुप्रीमसी कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईच्या रुपात अस्तंगत झाली. 👇
या मराठा कालखंडाचा उदयास्त या दोन भागातील पुस्तकात अगदी सुलभतेने बारीकसारीक तपशिलांसह मांडला आहे.
पहिल्या भागात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड असुन दुसऱ्या भागात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू राजांची मोगलांच्या कैदेतून सुटकेपासुन 👇