#पुस्तकआणिबरचकाही
वासुदेव विष्णु मिराशी (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा 👇
मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला.हा सिद्धांत त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने प्रकाशित केला .अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे 👇
मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली हे त्यांनी स्पष्ट केले. शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणकशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे हे पहिले भारतीय संपादक होत.मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन👇
लेखन केले; तथापि प्रारंभीचे त्यांचे ग्रंथलेखन मराठीत आहे. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांपैकी इन्स्क्रिप्शन्स ऑफ द कलचुरी चेदी-इरा , इन्स्क्रिप्शन्स ऑफ द वाकाटकज , स्टडीज इन इंडॉलॉजी (खंड १ ते ४), कालिदास, हिज लाईफ अँड वर्क्स, भवभूती, हिज डेट, लाईफ अँड वर्क्स, इन्स्क्रिप्शन्स ऑफ द 👇
शिलाहारज , लिटररी अँड हिस्टॉरिकल स्टडीज इन इंडॉलॉजी प्रसिद्ध ग्रंथ होत. त्यांच्या ग्रंथांची प्रादेशिक भाषांतून विशेषत: हिंदी, ओडिया, कन्नड भाषांतरे झाली आहेत.मिराशी यांना अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळाली.तत्कालीन ब्रिटिश सरकारची ‘महामहोपाध्यायʼ ही उपाधी (१९४१); 👇
१९५६ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते व १९६१ मध्ये राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ताम्रपट; भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९७५) इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रविण कलंत्री

प्रविण कलंत्री Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KalantriPravin

Mar 15
#पुस्तकआणिबरचकाही
सुधीर मोघे ( ८ फेब्रुवारी १९३९ - १५ मार्च २०१४ ) कवितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेलाच आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांचे शब्दमाध्यमावरचे प्रेम नितांत होते,
     ‘शब्दांना नसते दु:ख     शब्दांना सुखही नसते
     ते वाहतात जे ओझे      ते तुमचे माझे असते’ 👇 Image
या शब्दांतून सहज त्याचा प्रत्यय येतो.
  कवी-गीतकार म्हणून सुधीर मोघे जेवढे आणि जसे श्रेष्ठ होते, तेवढे आणि तसेच ते संगीतकार म्हणूनही मोठे होते, त्यांनी संगीत दिलेल्या ‘कशासाठी प्रेमासाठी’ या मराठी चित्रपटाची गाणी जशी गाजली तशीच ‘सूत्रधार’ या हिंदी चित्रपटाचीही गाजली. 👇 Image
‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ या दूरदर्शनवरील मालिकांना त्यांनी दिलेले संगीत प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांनी ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारतें’ या हिंदी मालिकांनाही संगीत दिले. त्यांनी व्यावसायिक माहितीपटांची केलेली निर्मितीही त्यांच्यातील सर्जनशीलतेची ग्वाही देते. 👇 Image
Read 6 tweets
Mar 14
#पुस्तकआणिबरचकाही
अरुण कांबळे ( १४ मार्च १९५३ - २० डिसेंबर २००९ ) दलित साहित्य अखिल भारतीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर नेण्याचे काम करणे हीच जीवननिष्ठा, असे मानणारे ते धडाडीचे लेखक आणि कवी आहेत. मुंबई आणि हैद्राबाद या दोन्ही उच्च न्यायालयांनी संशोधन ग्रंथ म्हणून मान्यता 👇 Image
दिलेल्या ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’  (१९८२) या ग्रंथांच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. या ग्रंथाचे भाषांतर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत करण्यात आले. ‘जनता पत्रातील लेख’, ‘धर्मांतराची भीमगर्जना’, ‘चीवर’, ‘युगप्रवर्तक डॉ.आंबेडकर’, ' चळवळीचे दिवस' 👇 Image
‘वाद-संवाद’ या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला. ‘अरुण कृष्णाजी कांबळे’, तसेच ‘मुद्रा’ हे त्यांचे कविता संग्रहही लक्ष्यवेधी ठरले. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू तसेच जर्मन व फ्रेंच या भाषांमध्ये भाषांतरित झाल्या. 👇 Image
Read 5 tweets
Mar 14
#पुस्तकआणिबरचकाही
सुरेश भट ( १५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३ ) मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी👇 Image
लिहायला सुरुवात केली.काही वेळा नापास होत कसेतरी शिक्षण पूर्ण करुन ते नौकरीला लागले. ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सुरेश भट यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर👇 Image
अभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा👇 Image
Read 8 tweets
Mar 14
#पुस्तकआणिबरचकाही
विंदा करंदीकर (२३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, 👇 Image
गांभीर्य आणि मिस्किलपणा, आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून 👇 Image
घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न 👇 Image
Read 8 tweets
Mar 13
#पुस्तकआणिबरचकाही
रविंद्र पिंगे ( १३ मार्च १९२६ - १७ ऑक्टोबर २००८ )   १९५५ मध्ये ‘मौज’ साप्ताहिकात युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्रीगणेशा गिरवला, आणि पुढे सतत पन्नास वर्षे पिंगे लिहीत होते. ४० ग्रंथांची निर्मिती त्यांच्या नावे जमा झाली आहे. 👇
चपखल लेखशीर्षके; अचूक व नेमकी शब्दयोजना ललित्यपूर्ण, एकात्म, एकसंध, बंदिस्त भाषाशैली हे खास वैशिष्ट्य होय. मौज, साधना, माणूस, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. ‘देवाघरचा पाऊस’ , ‘दिवे लक्ष्मण दिवे’, 👇
‘अत्तर आणि गुलाबपाणी’  हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’, ‘आनंदव्रत’, ‘दुसरी पौर्णिमा’ ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ , ‘पिंपळपान’ , ‘हिरवीगार पानं’ ही पाश्‍चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’व ‘सुखाचं फूल’ 👇
Read 6 tweets
Mar 12
महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड
भाग १ - १६३० - १७०७
भाग २ - १७०७ - १७१८
लेखक - डॉ. वि. गो. खोबरेकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. @LetsReadIndia @PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही 👇
आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड सत्तेचा मराठा सुप्रीमसी कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईच्या रुपात अस्तंगत झाली. 👇
या मराठा कालखंडाचा उदयास्त या दोन भागातील पुस्तकात अगदी सुलभतेने बारीकसारीक तपशिलांसह मांडला आहे.
पहिल्या भागात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड असुन दुसऱ्या भागात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू राजांची मोगलांच्या कैदेतून सुटकेपासुन 👇
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(