२०१३ मध्ये कांदा ७००/- रुपये क्विंटलने विकला होता आणि २०२३ ला, कालच कांदा ७००/- रुपये प्रति क्विंटलनेच विकला आहे...
फरक इतकाच आहे, २०१३ मध्ये डिएपी ५६०/- रुपयांना एक बॅग होती आज १९००/- रुपयांना एक बॅग आहे..
तेव्हा लागवड मजुरी ५०००/- रुपये एकर होती आता ११,०००/- रुपये एकर आहे...
मजूर तेव्हा ५००/- रुपयांचा गॅस भरत होता, तोच आज १२००/- रुपयांना झालाय...
२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,०००/- रुपयांत सहज बसून जात होते आज तोच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,०००/- रुपये लागत आहेत.
तेव्हा मिळणारी १५,०००/- रुपयांची बैलजोडी आज ५५,०००+ रुपयांच्या घरात गेली.
एरव्ही मोदी निवडून येण्याच्या आधी ५०,०००/- रुपये ला मिळणारी मोटासायकल जिच्यात लोक ६०/- रुपये लिटर पेट्रोल टाकून गावोगावी चहा पावडर, भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिर्वाहासाठी दोन पैसे कमवत होते आज तिच गाडी १,१०,०००/- रुपयांवर नेऊन ठेवली आणि तिचे पेट्रोल ११०/- रुपये..
एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतकी जुजबी कर वसुली का देशात..? एकंदरीत पहिल्या गेलं तर शेतकरी २५/- रुपये किलो ने गहू व्यापाऱ्याला विकत आहे आणि तोच गहू दुकानदार ५०/- रुपयाने जनतेला विकत आहे.,
असा धान्याचा काळा बाजार जोरात सुरू आहे.
२०१३ ला सोयाबीन ६०००/- रुपये प्रति क्विंटल होती तर तेल ६० रुपयाला होते, आज पण सोयाबीन ५ ते ६०००/- रुपये प्रति क्विंटल आहे पण तेल मात्र १४५/- रुपये प्रति लिटर...
काय चाललंय...??
त्या तुलनेत शेतमालाचा भाव का नाही वाढत आहे.,
शेताला लागणारा सर्वच खर्च तर दुप्पट झाला आहे.
शेतीला लागणाऱ्या सर्व वस्तूंचे भाव ज्या तुलनेत वाढले आहेत त्याचप्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणेने दिले तर बरं होईल, किमान शेतकरी जगू तर शकेल..!
नाही तर पेपरवर आणि गूगल वर दाखवावे लागेल, शेतकरी नावाची एक अशा पद्धतीची जमात भारतात अस्तित्वात होती म्हणून.
आज खऱ्या अर्थाने समाजकारणचे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे... भरमसाट कर गोळा करून महागाई वाढली आहे. त्यातून निर्माण होणारा सर्व पैसा शहरात लावला जात आहे...
परंतु आज ही ६०% जनता खेड्यात आहे ६०% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्यांच्या शिवाय काहीच शक्य नाही...
शहरात बिना कामाचे मेट्रो, मोनो, बुलेट, ट्रेन, करोडो रुपयांची संसद, पुतळे, मंदिरे उभरण्यापेक्षा, खेड्यात चांगल्या दर्जाची शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे-प्रक्रिया उद्योग, निर्दोष विक्री-व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत.
खेड्यातील लोक ज्या सहजतेने आपल्या एकूण उत्पन्नातून दानधर्म, मदत करतात त्यात कित्येक मंदिरं उभे राहू शकतात, परंतु खेड्यातील लोकांना जिवंतपणे मारून, खोट्या अफवा पसरवून सोशल मीडियाचा वापर करून आणि जात-धर्म व शेजारील देशाचा उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे...
नक्की आपण आपल्या पुढील पिढीस काय देत आहोत, काय देणे लागतो आणि काय देऊ शकतो.?
आपले आजोबा जितकी संपत्ती आपल्याला देऊन गेले त्या बदल्यात किमान पुढील पिढीस उत्तम, सदृढ, जगण्यायोग्य समाज दिला तरी खूप बरे होईल.
बघा विचार करा!🙏 @hemantraomulay @MarathiDeadpool
तसे तर मराठी रियासतीमध्ये अनेक आयांनी असे बरेच योद्धे जन्माला घातलेत ज्यांनी आपले प्राण याच मराठी रियासतीच्या रक्षणार्थ ऐन तारूण्यात रणांगणावर खर्ची घातले...
मग ते सिंहगडाचे सिंह सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे असुदेत वा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे असुदेत...
शुजा उद्दौल्लाह ने ज्यांच्या मृत्युपश्चात फक्त गोऱ्यापान चेहऱ्यावरच ४० जखमा मोजल्या ते विश्वासराव पेशवे असोत वा निव्वळ "समयी का पावला नाहीत" म्हणणाऱ्या राजांच्या क्रोधाला उत्तर म्हणून केवळ ७ जणांना सोबत घेऊन मोगली छावणीत कहर माजवून मृत्युस आलिंगन देणारे प्रतापराव गुर्जर असोत...
या समस्त मराठी इतिहासात दोन शुरवीरांचे मृत्यू मात्र मनाला चटका लावून जातात...
त्यांचा इतिहास वाचतांना मनाला प्रचंड दाह झाल्याशिवाय राहत नाही आणि तोच दाह आज लेखणीतून रीता करावा या प्रामाणिक उद्देशाने आज काहीतरी अपणासमोर मांडतोय...
सर्वप्रथम.,
थोडंसं इतिहासात डोकावुयात.,
भगवान परशुरामाने म्हणे आपल्या क्रोधाग्नीच्या बळावर अखंड धरणी तब्बल २१ वेळा निक्षत्रीय केली होती म्हणे, अर्थात अखंड पृथ्वीस २१ प्रदक्षिणा घालत सर्वच्या सर्व क्षत्रिय राजांना यमसदनी धाडले होते ते केवळ आपल्या खांद्यावरील परशूच्या सहाय्याने...
या आख्यायिका रचणारेही अर्थात त्यांचेच वंशज, हेच ते ३% वाले....
मग त्या न्यायाने, या पृथ्वीतलावर हेच तेवढे एकमेव श्रेष्ठ हिंदू ठरतात आणि इतर सर्व शुद्र...
अगदी तुमच्या सकट बरं का शहाणे...
खरं तर गणेशोत्सव आला कि पाठोपाठ एक वाद नेहमीच येत असतो, "गणेशोत्सवाची सुरुवात प्रथम कुणी, कधी व का केली..?"
बहुतांश लोक हेच सांगतील कि,लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये एकजूट निर्माण करून त्याचा वापर स्वातंत्र्यलढ्यासाठी करण्यास्तव १८९४ साली पुण्यात गणेशोत्सवास सुरुवात केली.
पण ही माहिती मुळातच सपशेल चुकीची आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती...
भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी १८९३ मध्ये एक लेख लिहून केसरीतून घेतली होती.
त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच १८९४ साली टिळकांनी त्यास व्यापक स्वरूप दिले.